G 20 | Palkhi Sohala | PMC Pune | एक जेवण, दोन वेळचा नाश्‍ता तब्बल 25 लाख रुपयांना | काय आहे प्रकार जाणून घ्या

Categories
Breaking News PMC social पुणे

G 20 | Palkhi Sohala | PMC Pune | एक जेवण, दोन वेळचा नाश्‍ता तब्बल 25 लाख रुपयांना | काय आहे प्रकार जाणून घ्या

G 20 | Palkhi Sohala | PMC Pune |

शहरात मे महिन्यात झालेल्या जी-20 परिषदेत (G 20 Summit) सहभागी परदेशी पाहुण्यांसाठी डिनर आणि एका दिवसाच्या नाष्ट्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. या खर्चात फक्‍त एक वेळचे जेवण, दोन वेळचा नाष्टा तसेच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) आरक्षित केलेल्या दोन खोल्यांच्या भाड्याचा समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. यावर पुढील बैठकीत चर्चा होईल.

(G 20 | Palkhi Sohala | PMC Pune)

12 जून रोजी फर्गसन महाविद्यालयात पालखी सोहळा (Palkhi Sohala) पाहण्यासाठी आलेल्या जी 20 च्या सदस्यांना “हाय-टी’ आयोजित करण्यात आला होता. तर, 13 जून रोजी एका पंचताराकित हॉटेलमध्ये गाला डिनरचे आयोजन केले होते. तर, 20 जून रोजी आगाखान पॅलेस येथे “हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. तेथेही नाश्‍त्याची सोय करण्यात आली होती. ज्या हॉटेलमध्ये ही परिषद झाली, तेथे महापालिकेने नियोजनासाठी दोन खोल्या भाडेतत्वावर घेतल्या होत्या. या खर्चासाठी संबंधित हॉटेलने महापालिकेस सुमारे 25 लाख 35 हजारांचे बिल दिले आहे. त्यावर 18 टक्के जीएसटीसह 29 लाख 91 हजार 300 रुपयांची मागणी केली आहे. त्यानुसार, स्थायी समितीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. (PMC Pune News)

दरम्यान, राज्यशासनाने महापालिकेस जी-20 परिषदेसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, हा निधी अद्याप महापालिकेस मिळालेला नाही. त्यातच 2023-24 मध्ये शहरात जी-20 परिषदेसाठी महापालिकेने आधीच अंदाजपत्रकात सुमारे 6 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यामुळे शासनाचे पैसे आलेले नसल्याने महापालिकेने तूर्तास आपल्या निधीतून हे बिल देण्याची तयारी करून प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation News)
——

News Title | G 20 | Palkhi Sohala | PMC Pune | One meal, two breakfasts for Rs 25 lakh Learn what types are

Pune Traffic Update | पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या पुणे शहरात वाहतूक बदल

Categories
Breaking News social पुणे

Pune Traffic Update | पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या पुणे शहरात वाहतूक बदल

Pune Traffic Update | पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त (Palkhi Sohala) बुधवारी (१४ जून) शहराच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथून बुधवारी पहाटे मार्गस्थ होणार आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. (Pune Traffic Update)

श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठ, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, लष्कर भागातील मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सासवड रस्त्याने पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील अरुणा चौक, समाधान चौक, पिंपरी चौक, एडी कॅम्प चौक, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सरळ सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. (Pune News)

बुधवारी पहाटे दोन वाजल्यापासून पालखी शहराबाहेर पोहोचेपर्यंत पालखी मार्ग टप्याटप्याने बंद करण्यात येईल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे- संत कबीर चौक- बेलबाग चौक (लक्ष्मी रस्ता), संत कबीर चौक ते रामोशी गेट (नेहरु रस्ता), सेव्हन लव्ह चौक (ढोले पाटील चौक) ते रामोशी गेट, गोळीबार मैदान ते सेव्हन लव्ह चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, बिशप स्कूल चौक ते मम्मादेवी चौक, वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक, ट्रायलक चौक, महात्मा गांधी रस्ता, रामोशी गेट चौक, भैरोबानाला ते मम्मादेवी चौक, जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक, बी. टी. कवडे रस्ता, रामटेकडी चौक, वैदुवाडी चौक, मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस, सिरम कंपनी चौक ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड रस्ता. (Pune Traffic)

पुणे-सोलापूर रस्त्याने येणाऱ्या जड वाहनचालाकंनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत जाणाऱ्या दिंड्यामधील वाहनांनी भैरोबानाला चौक, लुल्लानगर चौक, कोंढवा खडीमशीन चौक, बोपदेव घाटमार्गे सासवडकडे जावे किंवा मंतरवाडी फाटा, फुरसुंगी, उंड्री, पिसोळी, खडी मशीन चौकमार्गे बोपदेव घाटातून सासवडकडे जावे. वाहतूक बदलांविषयी माहिती हवी असल्यास वाहतूक शाखा मुख्य नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्रमांक- ०२०-२६६८५००० किंवा ०२०-२६६८४०००) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

—-

सिहंगड व भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

सिहंगड वाहतूक विभागाच्या हद्दीत वडगाव ते पाउंजाई माता मंदीर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून विष्णू पुरम सोसायटीच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या दोन्ही बाजुला ५० मीटर पर्यंत  नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीत भारती विद्यापीठ मुख्यद्वार ते भारती रुग्णालयाचे प्रवेशद्वार दरम्यान उत्तर-दक्षिण अंतर २०० फूट व रुंदी ३० फुट या सेवा मार्गावर नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. सिहंगड वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेबाबतच्या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांना सूचना द्यावयाच्या असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे २१ जून पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

0000

News Title |Pune Traffic Update | Traffic changes in Pune city tomorrow on the occasion of Palkhi departure ceremony

Pune Congress | Warkari Lathi-charge | वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि वारकऱ्यांच्या सन्मानासाठी काँग्रेस तर्फे सन्मान दिंडी

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Pune Congress | Warkari Lathi-charge | वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि वारकऱ्यांच्या सन्मानासाठी काँग्रेस तर्फे सन्मान दिंडी

Pune Congress | Warkari Lathi-charge |  350 वर्षाच्या इतिहासात काळीमा फासणारी घटना काल घडली. वारकऱ्यांवर झालेल्या अमानुष पद्धतीने केलेला लाठी चार्ज (Warkari Lathicharge) कोणाच्या इशारानी केला होता ?  भागवत संप्रदायाच्या 350 वर्षाच्या इतिहासात अशी कुठलीही घटना घडली नव्हती. कित्येक वारकरी जखमी झाले असून  झाला असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात येत आहे. हा वारकऱ्यांच्या श्रद्धा आस्था आणि परंपरा काळीमा फासणारी घटना आहे. वारकऱ्यांच्या सन्मानासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहनदादा जोशी (Mohan Joshi),  आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar),  माजी मंत्री रमेश दादा बागवे (Ramesh Bagwe), संजय बालगुडे(Sanjay Balgude), वीरेंद्र  किराड यांच्या नेतृत्वात सन्मान दिंडी काढण्यात आली. (Pune Congress | Warkari Lathi-charge)
काँग्रेसतर्फे वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ला निषेध म्हणून साठी सन्मानदिनी दिंडी अलका टॉकीज चौक ते काढण्यात आली होती.  दिंडीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते  “आम्ही वारकऱ्यांच्या सन्मान करतो”, “आमची संस्कृती वारकरी संप्रदाय “”महाराष्ट्राचा अभिमान” असे फलक घेऊन  कार्यकर्ते वारकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते. (Palkhi Sohala) 
यावेळी किशोर मारणे, प्रवीण करपे, गौरव बोराडे, प्रशांत सुरसे, चेतन जी अग्रवाल, प्रथमेश आबनावे, संकेत गलांडे, पुष्कर अबनावे, दत्ता मांजरेकर, आयुब पठाण, उमेश काची, राजेश जाधव, गणेश साळुंखे, विशाल  गुंड, प्रवीण नाना करपे, गौरव बोराडे,  सुरेश कांबळे, बंडू शेडगे, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल, गोरख पळसकर, रुपेश पवार, रवी पठारे, नंदू जाधव, गणेश तामकर, संजय चव्हाण, रुपेश पवार, संतोष भुतकर, मयुरेश दळवी, साहिल राऊत, कान्होजी जेधे, भावेश पंखेवाले, सादिक बाबाजी, असे बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
——
News Title | Pune Congress |  Warkari Lathi-charge |  Samman Dindi by Congress in protest of lathi attack on Warkari and for the honor of Warkari

G 20 Delegates | Palkhi Sohala | जी-२० प्रतिनिधींनी अनुभवला पालखी सोहळा

Categories
Breaking News cultural PMC social देश/विदेश पुणे

G 20 Delegates | Palkhi Sohala | जी-२० प्रतिनिधींनी  अनुभवला पालखी सोहळा

G 20 Delegates | Palkhi Sohala | जी-२० ‘डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट’ (Digital Economy Working Group) बैठकीसाठी पुण्यात उपस्थित देश विदेशातील प्रतिनिधींनी (G 20 Delegates) पालखी सोहळ्याला (Palkhi Sohala) हजेरी लावत ‘याची देही याची डोळा’ महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवली. यावेळी काही प्रतिनिधींनी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) मनोभावे दर्शन घेतले. (G 20 Delegates | Palkhi Sohala)
पालकमंत्री चंदकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज पादुका मंदिरजवळ फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी-२० प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी मंडप उभारून प्रशासनाच्या आणि पुणे महानगर पालिकेच्यावतीने (Pune Municipal Corporation) व्यवस्था करण्यात आली होती. पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr Rajesh Deshmukh), पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक (ACP Sandeep Karnik) , मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakne) आदी उपस्थित होते. (G 20 Summit in Pune)
प्रारंभी ढोल ताशाच्या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे, टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी रस्त्यावरून दिंड्यांचे आगमन होऊ लागले. हाती भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीची रोपे, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणा वादनात, ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषात, अभंग गायनात, फुगडी, नर्तनात दंग वारकरी पाहून प्रतिनिधी वेगळ्याच अनुभवात दंग झाले. यावेळी काही प्रतिनिधींनी वारकऱ्यांकडून कपाळाला टिळा लावून घेतला. (Palkhi Sohala 2023)
ढोल ताशाच्या तालावर काही प्रतिनिधी नर्तनात दंग झाले. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरला. महिला प्रतिनिधींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली. सर्वच जण आपल्या मोबाईलमधून वारीची छायाचित्रे काढून घेण्यात दंग झाले. प्रतिनिधींनी वारकऱ्यांना भारतीय पद्धतीने नमस्कार करत स्वागत केले. तत्पूर्वी केशव शंखनाद पथकाद्वारे करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शंखनादाचा तसेच ढोल पथकाच्या ढोल वादनाने वातावरणात जोश आणला.
*पालकमंत्र्यांसह परदेशी प्रतिनिधींनी घेतले संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन*
यावेळी दिंड्यांच्या शिस्तबद्ध रांगा पुढे सरकत असताना श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पालखीच्या दर्शनासाठी गर्दीतून पुढे जाऊ लागताच काही परदेशी प्रतिनिधीही पालखीच्या दर्शनासाठी सरसावले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील आणि जी- २० प्रतिनिधींनी भक्तीभावाने पालखीचे दर्शन घेतले.
——
News Title | G 20 Representative |  Palkhi Sohala |  Palkhi ceremony experienced by G-20 delegates

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या वतीने दोन्ही पालख्यांचे स्वागत

Categories
Breaking News cultural PMC social पुणे महाराष्ट्र

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या वतीने दोन्ही पालख्यांचे स्वागत

Pune Municipal Corporation | श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) व श्री संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) यांच्या पालख्यांचे पुणे शहरात पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) वतीने स्वागत करण्यात आले.     (Pune Municipal Corporation)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत विक्रम कुमार प्रशासक तथा आयुक्त पुणे महानगरपालिका (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी आज केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे स्वागत स्वर्गीय सयाजीराव कुसमाडे संकुल कळस आळंदी रोड पुणे या ठिकाणी व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत बोपोडी सिग्नल चौकाजवळ पुणे मुंबई रस्ता या ठिकाणी करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त   विक्रम कुमार यांनी दिंडी मधील विणेकऱ्याचे नारळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

तसेच याप्रसंगी  पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त(इ) डॉ. कुणाल खेमनार,  अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज)  रवींद्र बिनवडे, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त संतोष वारुळे, मा. उपायुक्त किशोरी शिंदे, महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——
News title | Pune Municipal Corporation |  On behalf of the Pune Municipal Corporation, welcoming both the palanquins

Aashadhi Wari 2023 Timetable | आषाढी वारी २०२३ चे वेळापत्रक  जाणून घ्या 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Aashadhi Wari 2023 Timetable | आषाढी वारी २०२३ चे वेळापत्रक  जाणून घ्या

११/०६/२०२३
माऊली प्रस्थान आळंदी

१२/०६/२०२३ आळंदी ते पुणे, २९ कि.मी

१३/०६/२०२३ पुणे मुक्काम
१४/०६/२०२३
पुणे ते सासवड, ३२ कि.मी*
१५/०६/२०२३ सासवड मुक्काम

१६/०६/२०२३ सासवड ते जेजुरी,१६ कि.मी

१७/०६/२०२३ जेजुरी ते वाल्हे, १२ कि.मी

१८/०६/२०२३ वाल्हे ते लोणंद,२० कि.मी

१९/०६/२०२३ लोणंद मुक्काम

२०/०६/२०२३ लोणंद ते तरडगाव ०८ कि.मी

२१/०६/२०२३ तरडगाव ते फलटण २१ कि.मी .

२२/०६/२०२३ फलटण ते बरड, १८ कि.मी

२३/०६/२०२३ बरड ते नातेपुते, २१कि.मी

२४/०६/२०२३ नातेपुते ते माळशिरस, १८ कि.मी

२५/०६/२०२३ माळशिरस ते वेळापुर, १९ कि.मी

२६/०६/२०२३ वेळापुर ते भंडी शेगाव,२१ कि.मी

२७/०६/२०२३ भंडी शेगाव ते वाखरी,१० कि.मी

२८/०६/२०२३ वाखरी ते पंढरपुर, ५ कि.मी

२९/०६/२०२३ : देवषयनी आषाढी एकादशी
आषाढी एकादशी च्या पुढे ३ जुलै पौर्णिमा पर्यंत दिंडीचा पंढरपुर मुक्काम, ३ जुलै ला गोपाळ काला व परतीचा प्रवास

Aarogyawari | Palkhi Sohala | वारीतील महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक

Categories
Breaking News cultural Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Aarogyawari | Palkhi Sohala | वारीतील महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियानाचा शुभारंभ

Aarogyawari | Palkhi Sohala | वारी दरम्यान (Pandharpur Wari 2023) महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची (Sanitory Napkins) व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी (Lactating Mothers) वारी मार्गावर हिरकणी कक्ष (Hirkani Kaksha) उभारण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र डॉक्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक (Toll Free Number) आणि पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर मदतीसाठी दूतांची व्यवस्था केली आहे. (Aarogyawari | Palkhi Sohala)

निवडुंग विठोबा मंदिर येथे राज्य महिला आयोग (Maharashtra State Women Commission) आणि पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्यवारी अभियानाचे  (Aarogyawari Abhiyan) उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade), महिला आयोगाच्या सदस्य संगिता चव्हाण, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. (Aarogyawari Abhiyan)

संतांनी माणसातला देव ओळखण्याचा संदेश मानवजातीला दिला असून आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा घडते, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्य महिला आयोगाने अतिशय संवेदनशीलतेने हा उपक्रम सुरू केला आहे. मासिक पाळीसारख्या विषयाकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनामुळे याबाबतची समस्या मांडताना मनात संकोच असतो. त्यामुळे महिलांची ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजाच्या सहकार्याने शहरात अनेक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारे यंत्र बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे शहरात जागा उपलब्ध झाल्यास सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेच्या विषयावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले. वारीत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, साधुसंतांच्या विचारधारा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. पंढरपूर वारीच्या निमित्ताने हा विचार सर्वत्र पोहोचतो. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या महिलांची संख्या वाढते आहे. वारीदरम्यान महिलांना २३ ते २४ दिवस चालावे लागते. या कालावधीत त्यांना एकदा तरी मासिक पाळीला सामोरे जावे लागते. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन आरोग्यवारी अभियान सुरू करण्यात आले आहे.

वारी दरम्यान महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी वारी मार्गावर हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र डॉक्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक आणि पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर मदतीसाठी दूतांची व्यवस्था केली आहे. महिला वारकऱ्यांच्या हस्ते १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्यासोबत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार धंगेकर म्हणाले, वारीच्या निमित्ताने सर्व धर्मातील एकात्मता दिसून येते. वारीसाठी जिल्हा प्रशासनाने चांगल्या सुविधा केली आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यवारी उपक्रम स्तुत्य असून वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपा ठाकूर यांनी प्रास्ताविकात आरोग्यवारी अभियानाची माहिती दिली. वारी सोहळ्यादरम्यान महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियान आणि महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.


News Title | Aarogyawari | Palkhi Sohala | ‘1091’ toll free number for women in Wari | Guardian Minister Chandrakantada Patil launched Aarogyawari Abhiyaan

Pune Water Cut Update |  पुणे शहरातील सोमवारची पाणीकपात रद्द! | पुणेकरांना दिलासा 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Update |  पुणे शहरातील सोमवारची पाणीकपात रद्द!

| पुणेकरांना दिलासा

Pune Water Cut Update | संत ज्ञानेश्वर महाराज  (Sant DnyaneshwarMaharaj Palkhi) व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या (Sant Tukaram Maharaj Palkhi) पुण्यात असल्याने सोमवारची पुणे शहरातील पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. याबाबत मागणी झाल्यामुळे महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून (PMC Water Supply Department) हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर (PMC Head of water supply department Aniruddha Pawaskar) यांनी दिली. (Pune Water Cut Update)
याबाबत माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी पाणीपुरवठा विभाग प्रमुख  यांची भेट घेत पाणी कपात रद्द करण्याबाबत पत्र दिले होते.  सोमवारी आणि मंगळवारी पालख्या पुणे शहरात मुक्कामाला आहेत. दरवर्षी  लाखो वारकरी पुण्यामध्ये वारीला जात असताना मुक्कामी येतात. पुणेकर देखील त्यांची सेवा मनोभावे करतात. यथोचित आदरातिथ्य करतात. पुणे शहरातील  सिंहगड रस्त्यासह पुण्यातील काही भागात पाणी पुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येतो. परंतु, पालख्यांचे आगमन पाहता, हा पाणीपुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता शहरात सोमवारी पाणी बंद असणार नाही. पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे. (Pune Municipal corporation)
—-
News Title |Pune Water Cut Update | Monday’s water cut canceled in Pune city!| Relief for Pune residents

Pune Water Cut Update | पालखी मुक्कामाच्या काळात पुणे शहरातील सोमवारची पाणीकपात रद्द करा 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut Update | पालखी मुक्कामाच्या काळात पुणे शहरातील सोमवारची पाणीकपात रद्द करा

| माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची मागणी

Pune Water Cut Update | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज  (Sant DnyaneshwarMaharaj Palkhi) व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या (Sant Tukaram Maharaj Palkhi) पुण्यात असताना सोमवारची पाणी कपात रद्द करावी. अशी माजी नगरसेविका मंजुषा नागपूरे (Manjusha Nagpure) यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाकडे (PMC Water Supply Department) आग्रही मागणी केली आहे. (Pune Water Cut Update)
याबाबत नागपुरे यांनी पाणीपुरवठा विभाग प्रमुख मंजूषा नागपुरे यांची भेट घेत त्यांना पत्र दिले आहे. नागपुरे यांच्या पत्रानुसार  दरवर्षी लाखो वारकरी पुण्यामध्ये वारीला जात असताना मुक्कामी येतात. पुणेकर देखील त्यांची सेवा मनोभावे करतात. यथोचित आदरातिथ्य करतात. यंदा या पालख्या सोमवारी पुण्यात येत असून, सिंहगड रस्त्यासह पुण्यातील काही भागात पाणी पुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येतो. परंतु, पालख्यांचे आगमन पाहता, हा पाणीपुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी मंजुषा नागपुरे यांनी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता पावसकर यांच्याकडे केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन अनिरुद्ध पावसकर यांनी दिले. असे नागपुरे यांनी सांगितले. (Pune water cut News)
—-
News Title | Pune Water Cut Update | Cancel Monday water cut in Pune city during Palkhi stay | Demand of former corporator Manjusha Nagpure

Pandharpur Aashadhi wari | G 20 summit pune | जी-२० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार आषाढी वारी 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Pandharpur Aashadhi wari | G 20 summit pune | जी-२० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार आषाढी वारी

Pandharpur Aashadhi wari | G 20 summit pune | जी-२० चे प्रतिनिधी (G 20 conference representative)  मंडळ आषाढी वारीच्या (Aashadhi wari) काळात पुण्यात येणार आहे. त्यांना पंढरपुरची वारी (Pandharpur wari) आणि त्या अनुषंगाने या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या प्रतिनिधींना आपल्या संस्कृतीतील या वैशिष्ट्यपूर्ण अशा वारीचे दर्शन घडवा, त्यासाठी उत्तम नियोजन करा, असे मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) सांगितले. (Pandharpur Aashadhi wari | G 20 summit pune)

वारीच्या नियोजनासाठी पालखी मार्ग आणि पंढरपूरसह, वारी मार्गावरील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन नियोजनाची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (G 20 summit pune)

बैठकीत पुणे विभागीय आयुक्त श्री. राव यांनी पालखी मार्ग तसेच वारीच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावर्षी वारीकरिता ६० टक्क्यांनी अधिकचे मनुष्यबळ तसेच पाण्याकरिता टँकर्सची संख्याही दुप्पट करण्यात येत असल्याची माहिती श्री. राव यांनी दिली. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या सहकार्याने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाच्या सचिव सोनिया सेठी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनुटिया आदी उपस्थित होते. (Pandharpur Aashadhi wari palkhi sohla)

 

पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे यासाठी विशेष सुविधा करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Pandharpur Aashadhi wari news)

पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत पाच वरून दहा कोटींची आणि ग्रामपंचायतींकरिता पंचवीस वरून पन्नास लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोहोंनीही दिले.

वारी मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना देण्यात येणारा निधी दुप्पट केला आहे, तत्काळ वितरीत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. पंढरपूर आणि परिसरातील रस्ते वारीसाठी सुस्थितीत व्हावेत यासाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून होणारी कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत यासाठी मंत्रालयीन स्तरावरील नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी प्रत्यक्ष पंढरपूर आणि क्षेत्रीयस्तरावर पोहचून देखरेख व संनियत्रण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

पंढरीच्या आषाढीच्या वारीच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पुणे विभागीय आय़ुक्त सौरभ राव, अक्षय महाराज भोसले तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवा. यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करा. विभागातील आजुबाजुच्या महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या यंत्रणाचीही मदत घ्या. वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभे राहतील, पंखे आणि सावली याकरिता काळजी घ्या. वैद्यकीय पथके त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवा. औषधे, पिण्याचे पाणी, अन्य आरोग्य सुविधा याबाबत वेळीच नियोजन करा. पंढरपूरमधील रस्त्यांसाठी निधी दिला आहे. त्यातून पंढरपूर नगरपालिका आणि आजुबाजुच्या रस्त्यांचे डांबरीकरण करा. त्यामध्ये नगरपालिकेचा रस्ता, ग्रामपंचायतीचा रस्ता असे हद्दीच्या विषयातून रस्त्यांची कामे मागे ठेवू नका. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर चिखल किंवा राडा-रोडी दिसता कामा नये याची दक्षता घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालखी मार्गासह वारीत येणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देशही संबंधित जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले. ते म्हणाले की, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागू नये यासाठी पोलीस विभागाने स्टीकर्स किंवा पासेसच्या माध्यमतून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून, वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये असे नियोजन करावे. पालखी मार्गावरील टोल नाके सुरु होणार नाहीत. त्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

०००००

News Title | Pandharpur Aashadhi wari | G 20 summit pune | The delegation of G-20 will experience Ashadhi Vari