Central Gov Employees | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी 

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी 

मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांना जून-जुलैमध्येच अनेक आनंदाचे क्षण एकत्र येणार आहेत. जुलैमध्ये महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता यासह ४ भत्ते देखील वाढणार आहेत.

३४ टक्के DA नंतर, मोदी सरकार घरभाडे भत्ता, ग्रॅच्युइटी, शहर भत्ता आणि प्रवास भत्ता यांसारखे भत्ते वाढवणार आहे. माहितीनुसार, जर आपण ३४ टक्के महागाई भत्त्याबद्दल बोललो तर आता मोदी सरकारकडून ३ टक्के घरभाडे भत्ता आणि ३ टक्के प्रवास भत्ता सोबत शहर भत्ता देखील वाढवला जाऊ शकतो. जर आपण समान भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीबद्दल बोललो तर त्यात वाढ होणार आहे. कर्मचार्‍यांवर नजर टाकली, तर मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाणार आहे, अशा परिस्थितीत, महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे, पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये वाढ निश्चित मानली जाते. जुलैमध्ये यावर निर्णय होण्याची शक्यता असून लवकरच कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे. सध्या कर्मचार्‍यांवर नजर टाकली तर २७ टक्के, १८ टक्के आणि ९ टक्के दराने HRA दिला जात आहे. माहितीनुसार, एक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा विचार केला तर एचआरएमध्ये ३ टक्के, वाई श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या एचआरएमध्ये २ टक्के आणि झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या एचआरएमध्ये १ टक्का वाढ होण्याची शक्यता आहे. .
-यानंतर ते २७ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढेल, तथापि हे तेव्हाच होईल जेव्हा DA ५० टक्के पार करेल. यामुळे वार्षिक HRA २० हजार ४८४ रुपयांनी वाढणार आहे.सातव्या वेतन मॅट्रिक्सनुसार, कर्मचार्‍यांचे कमाल मूळ वेतन ५६ हजार ९०० रुपये आहे, जर HRA २७ टक्के असेल तर पगारात २० हजारांचा फायदा होणार आहे.उदाहरणार्थ, जर घरभाडे भत्ता रु 56900 x 27/100 = रु १५ हजार ३६३ प्रति महिना झाला, तर 30% HRA असल्यास रु. 56,900 x 30/100 = रु. १७ हजार ७० प्रति महिना होईल. म्हणजे एकूण फरक: रु. १७०७ प्रति महिना होईल. त्याचा वार्षिक HRA २०४८४ रुपयांनी वाढणार आहे. हे दर प्रदेश आणि शहरानुसार बदलतात, सध्या तिन्ही श्रेणींसाठी किमान एचआरए रुपये ५ हजार ४००, ३ हजार ६०० आणि रुपये १ हजार ८०० आहे.

PMC : समाविष्ट २३ गावातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बुधवारी मिटणार 

Categories
Breaking News PMC पुणे

समाविष्ट २३ गावातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बुधवारी मिटणार

: उपायुक्त राजेंद्र मुठे यांची मुख्य सभेत माहिती

पुणे : महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र गेल्या ५ महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. याबाबत सोमवारच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठवला. यावर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला. उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले कि, बुधवारी जिल्हा परिषदेकडून सर्व कर्मचाऱ्यांची यादी आपल्याला मिळणार आहे. त्यांनतर तत्काळ वेतन दिले जाईल.

: गेल्या ५ महिन्यांपासून वेतन नाही

समाविष्ट २३ गावातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही. याबाबत भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या कर्मचाऱ्यांना तत्त्काळ वेतन देण्याची मागणी केली. त्यांनतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी हाच विषय मांडला. नगरसेवक बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, सिद्धार्ध धेंडे, सचिन दोडके, वसंत मोरे, यांनी या विषयावर भाषणे केली. अमोल बालवडकर म्हणाले कि, याबाबत राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याकडे पाठपुरावा करत  प्रशासनाने यात लक्ष घालावे.  लोकांना न्याय देण्यात यावा. बाबुराव चांदेरे म्हणाले, यात महापालिकेची चूक नाही तर जिल्हा परिषदेची आहे.   गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले कि, गेल्या ५ महिन्यापासून वेतन न मिळणे ही गंभीर बाब आहे. महापालिकेने  तत्काळ लक्ष घालावे आणि कामगारांना वेतन देण्यात यावे. विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ म्हणाल्या, याबाबत मी वारंवार आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. मात्र तरी लक्ष दिले गेले नाही. या गावावर का अन्याय करता? आतातरी या लोकांना न्याय द्या. यावर यावर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला. उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले कि, बुधवारी जिल्हा परिषदेकडून सर्व कर्मचाऱ्यांची यादी आपल्याला मिळणार आहे. त्यांनतर तत्काळ वेतन दिले जाईल.