Pune City Traffic Police | दुसऱ्यांदा नो पार्किंग ला गाडी दिसल्यास बसणार जबरदस्त भुर्दंड

Categories
Breaking News social पुणे

Pune City Traffic Police | दुसऱ्यांदा नो पार्किंग ला गाडी दिसल्यास बसणार जबरदस्त भुर्दंड

| पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

Pune City Traffic Police | पुणे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक समस्या आणि वाहतूक कोंडी हा प्रश्न खूप गंभीरपणे घेतला आहे.  नो पार्किंगमध्ये (No Parking) लावलेल्या गाड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते. त्यामुळे पुणे वाहतूक पोलीसांनी नो पार्किंगला गाड्या लावणाऱ्या वाहनचालकांवरील दंड वाढवला आहे. दुसऱ्यांदा गाडी नो पार्किंगला दिसल्यास  वाहनचालकास चांगलाच भुर्दंड बसणार आहे. (Pune city traffic police)

पुणे शहर वाहतूक पोलीस विभागातर्फे (Pune City Traffic Police) दंडाच्या रकमेत वाढ केल्याचे सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्या पत्रानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून (Two Wheeler) पहिल्यांदा टोइंगसह 785 रुपये आकारण्यात येतील. एकदा दंड भरल्यानंतर जर दुसऱ्यांदा वाहन नो पार्किंगमध्ये लावले तर दुचाकीस्वारांना 1,785 रुपये आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मोटारचालकांनाही (Four Wheeler) हे नवीन नियम लागू केले आहे. त्यानुसार पहिल्यांदा नो पार्किंगमध्ये मोटारगाडी लावल्यास 1,071 रुपये दंड आकारण्यात येणार असून दुसऱ्यांदा लावल्यास 2,071 रुपये दंड भरावा लागणार आहे. (Pune Traffic police news)

शहरातील वाहन व मोटार चालक सर्रास नियम मोडताना दिसतात. सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न वापरणे, माल ओव्हरलोड करणे आणि मालवाहू वाहनांमध्ये प्रवाशांची ने-आण करणे यासारख्या प्रकारांवर बंदी असताना चालक नियमांना धाब्यावर बसवून प्रवास करत असतात. यापुढे मात्र अशा सर्व बेशिस्त चालकांचे लगाम पुणे शहर वाहतूक पोलीसांकडे असणार आहेत.
सध्या पुण्यात प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस उभे असतात. त्यात अनेक दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्राची विचारपूस करतात.
त्यानंतर हेल्मेट सक्ती असताना हेल्मेट (Helmet) न वापरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. आता नो पार्किंगला वाहन लावणाऱ्या चालकावर धडक कारवाई करण्यात येणार आहे. पार्किंग संदर्भात हे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात आले आहे. (Pune Traffic police Marathi news)

——-

News Title | Pune City Traffic Police |  If you see a car or two wheeler at No Parking for the second time, you will be very upset |  Decision of Pune Traffic Police

PMPML | पीएमपीएमएल बसेस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 300 ऐवजी 500 रुपयाचा दंड | १० मार्च पासून होणार कार्यवाही.

Categories
Uncategorized

पीएमपीएमएल बसेस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 300 ऐवजी 500 रुपयाचा दंड 

१० मार्च  पासून होणार कार्यवाही.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या तरतुदीस अनुसरून रक्कम रु. ३००/- दंड वसूल करण्यात येतो. तसेच प्रवाशांनी कोणत्याह
ी प्रकारच्या सवलतीच्या प्रवासी पासमध्ये खाडाखोड, दुरुपयोग अशा प्रकारे गैरप्रकारे जे प्रवासी पासचा गैरवापर करून प्रवास करताना आढळल्यास त्या प्रवाशांकडून रक्कम रु. ५००/- दंड वसूल करण्यात येतो.

 

दिनांक १०/०३/२०२३ पासून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आळा व महामंडळाचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रक्कम रु. ३००/- ऐवजी रक्कम रु.५००/- इतका दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने दिनांक १६/०२/२०२३ रोजी मान्यता दिली असून विनातिकीट प्रवासी रक्कम रु.५००/-  दंड आकारणी दिनांक १०/०३/२०२३ पासून करण्यात येणार आहे.

| प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत बस प्रवास.

 

 

​जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना मोफत प्रवास देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने दि. ०६/०३/२०१९ रोजी मा. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दर महिन्याच्या ८ तारखेस महिलांना तेजस्विनी बसमध्ये मोफत बस प्रवास करू देण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने परिवहन महामंडळामार्फत खास महिलांसाठी २३ मार्गावर २८ तेजस्विनी बसेस सुरू करण्यात आल्या होत्या तथापि, कोविड – १९ मुळे महिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने सदरच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या.

​सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याने व सर्व मार्गावर पूर्ण क्षमतेने बस संचलन सुरू करण्यात आल्याने महिला तेजस्विनी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या आहेत. सध्या प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस ‘तेजस्विनी’ बस मधून मोफत प्रवास सेवा हि दि. ८ मार्च २०२३ पासून पूर्ववत करण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्विनी बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करण्याचे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

 

CFC | Property Tax | मिळकत करावरील शास्ती टाळा | सुट्टीच्या दिवशी ही टॅक्स भरणा करण्यासाठी CFC राहणार सुरु 

Categories
Breaking News PMC social पुणे

मिळकत करावरील शास्ती टाळा | सुट्टीच्या दिवशी ही टॅक्स भरणा करण्यासाठी CFC राहणार सुरु

| महापालिका कर विभागाचे आवाहन

पुणे | सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील दुसरी सहामाही भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. द्वितीय सहामाहीस १ जानेवारी २०२३ पासून २% शास्ती दरमहा आकारली जाणार आहे. ही शास्ती टाळण्याचा प्रयत्न करा. असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. त्यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील नागरी सुविधा केंद्र (CFC) केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. (pune municipal corporation)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) कर आकारणी व करसंकलन विभागामार्फत (Property tax dept) सन २०२२-२३ करीताचे देयके ह्यापूर्वीच पाठवण्यात आली आहेत. वार्षिक देयकाची दोन सहामाहीत विभागणी असून प्रथम सहामाही दि.१/०४/२०२२ ते दि. ३०/०९/२०२२ व द्वितीय सहामाही दि. १/१०/२०२२ ते दि. ३१/०३/२०२३ पर्यंत आहे. प्रथम सहामाहीस १ जुलै पासून २% शास्ती दरमहा आकारली जात आहे. द्वितीय सहामाहीस दि. १ जानेवारी २०२३ पासून २% शास्ती दरमहा आकारली जाणार आहे. तरी सर्व मिळकत कर थकबाकीधारकांना आवाहन करण्यात येते की आपला मिळकत कर त्वरित जमा करावा.
मिळकतधारकांच्या सोयीकरिता शनिवार दि. ३१/१२/२०२२ रोजी सर्व क्षेत्रीय कार्यालय व संपर्क कार्यालय सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत सर्व नागरी सुविधा केंद्र येथे रोख, चेक व डी.डी. ने भरणा करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत सुट्टीच्या दिवशी देखील सर्व नागरी सुविधा केंद्र सुरु असणार आहेत.

Unauthorized Flex : PMC : अनधिकृत जाहिरात फलक लावल्यास आता इतका दंड होणार : महापालिकेने बनवले धोरण

Categories
Breaking News PMC पुणे

अनधिकृत जाहिरात फलक लावल्यास आता 50 हजाराचा दंड

: महापालिकेने बनवले धोरण

पुणे : पुणे महानगरपालिका परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४, २४५ व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या जाहिरात व फलक नियंत्रण नियम २००३ अन्वये पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये खाजगी जागेत उभारल्या जाणा-या जाहिरात फलकांना परवानगी व नुतनीकरण देणेत येते. महानगरपालिकेकडून वेळोवेळी निश्चित केलेल्या दरानुसार जाहिरात शुल्क बसुली करण्यात येते. त्याचबरोबर अनधिकृत जाहिरात फलकाबाबत ही दंडाची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेने एक धोरण बनवले आहे. त्याला नुकतीच महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

: असे आहे धोरण

(१) अनाधिकृत जाहिरात फलक निष्कासन कारबाई खर्च वसुली बाबतः-

(अ) नियमन्वित न होणा-या जाहिरात फलकांबाबतः-

१. अनधिकृत जाहिरात फलकावर बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या धोरणानुसार रक्कम रूपये ५० हजार
प्रति जाहिरात फलक दंड वसुलीची रक्कम निश्चित करणे,
२. सदरचा खर्च अनधिकृत जाहिरात फलक लावणा-या संस्था/व्यक्ती कडून वसुल करणेस,
३. सदर संस्थेने / व्यक्तीने खर्च विहीत मुदतीत न भरल्यास संबंधीत जागा मालकाकडून खर्च बमुल
करणे,
४, जागा मालक याने सदर खर्च विहीत मुदतीत न भरल्यास सदरची रक्कमेचा बोजा जागा मालक च्या मिळकत करामध्ये समाविष्ट करून मिळकत कर वसुली धोरणानुसार कारवाई करणे.

नियमन्वित होणा-या जाहिरात फलकांबाबतः-

१. अनाधिकृत जाहिरात फलक नियमान्वीत करताना आकारणी योग्य शुल्क + तेवढेच शुल्क जाहिरात
फलक जागेवर लावलेल्या दिनांकापासून आकारून नियमान्वीत करणेस,
(२) परवानगी दिलेल्या जाहिरात फलकधारकांकडून विलंब शुल्क / तडजोड शुल्क वसुल करणे बाबतः-
१. जाहिरात फलक, नामफलक नुतनीकरणाचा अर्ज, जाहिरात फलक, नामफलक शुल्क मुदत संपल्यानंतर
३ महिने पर्यंत उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या २५%, ६ महिने पर्यंत उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या ५०% आणि त्यापुढे उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या १००% इतके विलंब शुल्क / दंड आकारणेस,
२.  महापालिका आयुक्त ठ.क्र. ६/७६७ दि. ०९.०१.२००९ चे विलंब शुल्क / तडजोड शुल्क धोरणा ऐवजी या नवीन धोरणात मध्ये जाहिरात फलक, नामफलक नुतनीकरण अर्ज, जाहिरात
फलक, नामफलक शुल्क मुदत संपल्यानंतर ३ महिने पर्यंत उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या २५%, ६ महिने पर्यंत उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या ५०% आणि त्यापुढे उशीर झाल्यास मासिक आकारणी योग्य शुल्काच्या १००% इतके विलंब शुल्क / दंड आकारणे, त्या नुसार मागील सर्व थकबाकी नियमन्वित करणेस,

(३) अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, झेंडे इ. निष्कासन खर्च वसुल व दंड आकारणी बाबतः-

१. सुमारे १ ते १० बोर्ड लावणा-यांकरीता कमीत कमी १००० रूपये दंड वसुल करणेस, तसेच त्यापेक्षा जास्त बोर्ड, बॅनर लावणा-यांवर जास्तीत जास्त ५००० रूपये दंड वसुल करणेस, तरी, उपरोक्त नमुद केल्यानुसार आपले क्षेत्रिय कार्यालयाकडून जाहिरात फलक, नामफलक शुल्क आकारणी,विलंब शुल्क / तडजोड शुल्क, अनधिकृत जाहिरात फलक निष्कासन कारवाई खर्च वसुली, अनाधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, इ. निष्कासन खर्च वसुल व दंड वसुली बाबत कार्यवाही करण्यात यावी. असे आदेश देण्यात आले आहेत. 

New Traffic Rules : हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर….! काय आहेत वाहतुकीचे नवीन नियम? 

Categories
Breaking News महाराष्ट्र

हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर….!

काय आहेत वाहतुकीचे नवीन नियम?

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसवा यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानुसार हेल्मेट किंवा सीटबेल्ट नसेल तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. विनापरवाना वाहन चालवल्याचा दंड पाच पटीने वाढवून १० हजार करण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने हे बदल केले जाणार आहेत. परिवहन विभागाने त्यास मंजुरी दिली आहे.

फॅन्सी नंबर प्लेटवरही होणार कारवाई

अनेकांना दादा, मामा, बाबा अशा नावानी नंबर प्लेट गाड्यांना लावण्याची सवय असते. मात्र, बाईकस्वारांना आता या सवयीला मुरड घालावी लागणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावणे वाहनचालकांना महागात पडणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट असल्यास वाहनचालकांनाही १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद नव्या नियमामध्ये करण्यात आली आहे. फॅन्सी नंबर प्लेटसाठी, रिफ्लेक्टर, टेल लॅम्प नसल्यास, हेल्मेट नसल्यास तसेच सीटबेल्ट नसल्यास चालकांना १ हजार रुपये दंड आकारला जाईल. विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा परवाना तीन महिन्यासाठी रद्दही केला जाणार आहे. नवीन नियमांची नोटीस जारी केली जाईल, असे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

…तर १० हजार रुपये दंड

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर न्यायालयीन कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. नवीन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ६ महिने तुरुंगवास आणि किंवा १० हजार रुपये दंड ठोठावला जाण्याची तरतूद आहे. तर दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा गुन्हा केल्यास २ वर्षे तुरुंगवास आणि किया २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला जाणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाच्या आधारे नवीन नियम लागू होणार आहेत.