PM Modi Pune Tour Expenditure | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याचा खर्च 1 कोटी 15 लाख! 

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

PM Modi Pune Tour Expenditure | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याचा खर्च 1 कोटी 15 लाख!

| खर्चाचा प्रस्ताव अवलोकनासाठी स्थायी समिती समोर

PM Modi Pune Tour Expenditure | पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे ऑगस्ट महिन्यात पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याचा खर्च 1 कोटी 15 लाख 14 हजार इतका आला आहे. महापालिकेकडून सर्व कामे ही 67 3 k नुसार केली होती. त्यानुसार खर्चाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून (PMC Pune) अवलोकनासाठी स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवला आहे. (Pune Municipal Corporation)
स्थायी समितीच्या प्रस्तावानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा दौरा होऊन एस. पी. कॉलेज मैदान, टिळक रोड येथे सभा आयोजीत करण्यात आली होती. या कॉलेज मधील मैदानामध्ये नवीन डांबरी रस्ते तसेच पार्किंग साठी जागा विकसित करणे अत्यावश्यक होते. त्याकरीता मुरूम, जीएसबी डीबीएम, बीसी ई.ची कामे करणे आवश्यक होते. राज्य शासनाने विहित केलेल्या नियमावली नुसार  कामाची व्याप्ती मोठया स्वरूपाची असल्यामुळे व सदरचे काम तातडीने करावयाचे असल्याने जाहिर निविदा न काढता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ६७ (३) (क) नुसार अति. महापालिका आयुक्त( वि) यांचे तोंडी आदेशानुसार ठेकेदार  धनराज अस्फाल्ट कं, मे. एस ए इन्फ्रा आणि मे. साईलीला कं यांनी वेगवेगळी कामे केली होती. त्यानुसार ठेकेदार  धनराज अस्फाल्ट कं यांना 67 लाख 99 हजार मे. एस ए इन्फ्रा यांना 38 लाख 61 हजार आणि मे. साईलीला कं यांना 9 लाख 31 हजार असे एकूण 1 कोटी 15 लाख देण्यात येणार आहेत. त्यानुसार हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. (PMC Pune News)

Pune Metro | PM Modi Pune Tour | पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट व गरवारे ते रुबी हॉल या मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे

Pune Metro | PM Modi Pune Tour | पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट व गरवारे ते रुबी हॉल या मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ

Pune Metro | PM Modi Pune Tour |पुणे मेट्रोची (Pune Metro) पीसीएमसी ते फुगेवाडी व वनाझ ते गरवारे या मार्गिकेवर मागील वर्षी उदघाटन झाले.  उद्या पंतप्रधान (PM Naredra Modi) यांच्या हस्ते या दोन्ही मार्गिकांचा विस्तार केला जात आहे. या विस्तारित मार्गांमध्ये फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान  नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या शुभहस्ते होत आहे. (Pune Metro | PM Modi Pune Tour)

या नवीन मार्गाच्या लोकार्पणामुळे पीसीएमसी ते सिव्हिलकोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांवर प्रवास करणे शक्य होणार आहे. मेट्रोचे न्यूनतम भाडे १० रुपये असून अधिकतम भाडे ३५ रुपये असणार आहे. पीसीएमसी ते वनाझ असा प्रवास करण्यासाठी ४० मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी ३५ रुपये भाडे लागेल तसेच पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी ३० रुपये भाडे असेल. वनाझ ते रुबी हॉल यासाठी ३५ रुपये भाडे असेल.
विद्यार्थ्यांसाठी भाड्यामधे ३०% सवलत असणार आहे. शनिवार रविवार सर्व नागरिकांसाठी ३०% सवलत असणार आहे तसेच मेट्रो कार्ड धारकांसाठी सरसकट १० % सवलत असणार आहे (मेट्रो कार्ड लवकरच विक्रीस उपलब्ध होणार आहे)

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे ते रुबी हॉल या मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर संध्याकाळी ५:०० वाजेपासून पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट व वनाज ते रुबी हॉल अशी थेट मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू होईल. सिव्हिल कोर्ट इंटरचेंजचे स्थानकाचा वापर करून पीसीएमसी ते वनाज, पीसीएमसी ते रुबी हॉल असा प्रवास करणे शक्य होईल.

पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट या मार्गवरील मेट्रोच्या सेवेची वारंवारता

मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत रोख, क्रेडिट – डेबिट कार्ड डिजिटल वॉलेट, मेट्रो ॲप द्वारे तिकीट खरेदी करता येईल. तिकीट खिडकी, तिकीट वेंडिंग मशीन, व्हाट्सअप इत्यादी पद्धतीने तिकीट प्राप्त केले जाऊ शकते. पीएमपीएमएल द्वारा फीडर बस सेवेचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. ३ कोचची ट्रेन असून त्यातील एक डब्बा महिलांसाठी राखीव आहे. दिव्यांगासाठी मेट्रो कोच मध्ये विशिष्ट जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मेट्रो स्थानक व मेट्रो कोच मध्ये इमर्जन्सी हेल्प बटन ठेवण्यात आली आहे. त्यामाध्यमातून स्टेशन कंट्रोलरशी थेट संपर्क साधता येतो.

पुणे मेट्रो प्रकल्प

१) पीसीएमसी ते स्वारगेट (१७.४ किमी, १४ स्थानके)
वनाझ ते रामवाडी (१५.७ किमी, १६ स्थानके)
एकूण ३३.२ किमी, ३० स्थानके

२) ६ मार्च २०२२ रोजी उदघाटन झालेले भाग
पीसीएमसी ते फुगेवाडी – ७ किमी, ५ स्थानके
वनाझ ते गरवारे – ५ किमी, ५ स्थानके
एकूण १२ किमी, १० स्थानके

३) नवीन उदघाटन होणारे भाग
फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट – ६.९ किमी, ४ स्थानके
गरवारे ते रुबी हॉल क्लिनिक – ४.७ किमी, ७ स्थानके
एकूण ११.६ किमी, ११ स्थानके

४) उर्वरित मार्गांचे नियोजन
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी – सप्टेंबर २०२३
सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट – डिसेंबर २०२३

५) नवीन उदघाटन होणाऱ्या भागांमुळे होणारे फायदे
i) पुणे आणि पिंपरी चिंचवड हि जुळी शहरे मेट्रो द्वारे जोडली जाणार
ii) नवीन मार्ग शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वेस्टेशन, पीएमसी, संभाजी उद्यान, डेक्कन इत्यादी महत्वाच्या भागांना जोडतो त्यामुळे लाखो पुणेकरांना याचा फायदा होणार आहे.
iii) एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमीचे मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित
iv) प्रवासाच्या वेळेमध्ये ५० % घट, पुण्याची वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होणार
v) पुणे रेल्वे स्थानक व शिवाजी नगर येथे भारतीय रेल्वे सोबत एकीकरण
vi) डेक्कन, शिवाजीनगर आणि PMC येथे PMPMLसेवेबरोबर एकीकरण

६) तिकीट घेण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध
तिकीट खिडकी
तिकीट व्हेंटीमशीन
क्रेडिट व डेबिट कार्ड द्वारे, मेट्रो कार्ड द्वारे
मेट्रो अँप, whats App तिकीट
सर्व UPI, Digital Payment द्वारा सुविधा

विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरामध्ये ३०% सवलत
(शनिवार, रविवार सर्वाना ३०% सवलत)
मेट्रो कार्ड धारकांना १०% सवलत

७. सिव्हिल कोर्ट स्थानकाची वैशिष्ठे
i) १८ सरकते जिने व ८ लिफ्टने सज्ज
ii) जमिनीखाली १०८ फूट (३३.१ मी) भारतातील सर्वांत खोल स्थानकांपैकी एक.
iii) थेट फलाटावर सूर्य प्रकाश पडेल अशा रितिने स्थानकाचे बांधकाम
iv) सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक असून दोन्ही मार्गिका येथे एकमेकांना मिळतात.
v) भविष्यात हिंजेवाडी मेट्रो (PMRDA) मार्गिकेचे शिवाजीनगर स्थानक पादचारी पुलाने जोडले जाणार आहे

८) शिवाजीनगर भूमिगत स्थानकाची वैशिष्ठे
i) स्थानकाची रचना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ले आणि तेथिल वास्तू पासून प्रेरणा घेऊन बनविले आहे
ii) भारतीय रेल्वे, पीएमपीएमएल आणि हिंजवडी मेट्रो (पीएमआरडीए) लाईन यांच्या बरोबर एकीकरण
iii) ५ लिफ्ट आणि १० सरकते जिने
iv) सिमला ऑफिस चौक, शिवाजीनगर रेल्वे स्थानक आणि मावळे दवाखाना चौक येथून प्रवाश्याना येण्या-जाण्याची सुविधा उपलब्ध
v) स्थानकाच्या आतील भागाची सजावट पुण्याच्या ऐत्याहासिक वस्तूंपासून प्रेरित


News Title |Pune Metro | PM Modi Pune Tour | Inauguration of metro service on Pune Metro route from Phugewadi to Civil Court and Garware to Ruby Hall

Pune Traffic Update | १ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

Categories
Breaking News social पुणे

Pune Traffic Update | १ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

Pune Traffic Update | पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी कळविले आहे. (Pune Traffic Update)
 १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा. ते दुपारी ३ वा. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील. (PM Modi tour pune)
 वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. (PM Modi Pune Daura)
0000
News Title | Pune Traffic Update | Change in traffic in Pune city on August 1

PM Modi Pune Tour | पंतप्रधान 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर | लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

PM Modi Pune Tour | पंतप्रधान 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर | लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार

PM Modi Pune Tour | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर (PM Modi Pune tour) जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात (Dagadusheth Temple pune)  जाऊन दर्शन घेऊन   पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. (PM Modi Pune Tour)

पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो (Pune Metro) टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. हे विभाग फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडतील. देशभरातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणस्नेही गतिमान शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने हे लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत मेट्रो रेल्वे मार्गावरील काही मेट्रो स्थानकांची रचना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांची रचना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी परिधान केलेल्या पगडी सारखी म्हणजेच ज्याला “मावळा पगडी” देखील म्हटले जाते, या सारखी आहे. शिवाजी नगर भूमिगत मेट्रो स्थानकाची एक विशिष्ट रचना आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची आठवण करून देते.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाणी न्यायालय मेट्रो स्थानक. हे देशातील सर्वात खोलवर असलेल्या मेट्रो स्थानकांपैकी पैकी एक आहे, ज्याचा सर्वात खोल बिंदू 33.1 मीटर आहे. सूर्यप्रकाश थेट फलाटावर पडेल अशा पद्धतीने या स्थानकाचे छत बनवण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाईल. (

सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1280 हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. त्यांनतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे 1190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधानांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा आरंभ टिळक स्मारक संस्थेने 1983 मध्ये केला. देशाची प्रगती आणि विकास यासाठी कार्य केलेल्या तसेच त्या बाबतीत उल्लेखनीय आणि विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्टला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो.

पंतप्रधान या पुरस्काराचे 41 वे मानकरी असतील. हा पुरस्कार मिळालेल्या दिगजांमध्ये डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन आर नारायण मूर्ती, डॉ. ई‌. श्रीधरन या व्यक्तींचा समावेश आहे.


News Title |PM Modi Pune Tour | Prime Minister to visit Pune on August 1 The Prime Minister will be honored with the Lokmanya Tilak National Award

PM Modi Pune Tour | पंतप्रधान देहू इथल्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करणार

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान 14 जून रोजी महाराष्ट्राला भेट देणार

पंतप्रधान देहू, पुणे इथल्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1:45 च्या सुमाराला पंतप्रधान देहू, पुणे येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. संध्याकाळी 4:45 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.

 

पंतप्रधान पुणे येथे

पंतप्रधान देहू, पुणे इथल्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते, जे त्यांचे अभंग आणि अध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ओळखले जातात. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिला मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली असून त्यामध्ये संत तुकाराम महाराजांची मूर्ती देखील आहे.

 

पंतप्रधान मुंबई येथे

पंतप्रधान मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. जल भूषण इमारत हे 1885  सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. या इमारतीचे आयुर्मान संपल्यामुळे ती पाडण्यात आली होती आणि त्या जागी नव्या इमारतीच्या बांधकामाची मंजुरी देण्यात आली होती. भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते ऑगस्ट 2019 मध्ये नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्ये नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत जतन करण्यात आली आहेत.

सन 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. 2019 साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, व्ही. बी. गोगटे, 1946 मधील नौदल क्रांती आणि अन्य क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करते.

पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होतील. 1 जुलै,1822 रोजी फरदुनजी मर्झबानजी यांच्या हस्ते मुंबई समाचारची एक साप्ताहिक म्हणून छपाई सुरु झाली. त्यानंतर 1832  साली ते दैनिक झाले. हे वृत्तपत्र गेली 200 वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाईल.

Congress : PM Modi in Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा अवमान रोखण्यास काँग्रेसला यश : कॉंग्रेसचा दावा

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा अवमान रोखण्यास काँग्रेसला यश

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महापौरांनी तयार केलेल्या फेट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेस काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतल्यावर ती राजमुद्रा काढण्यात आली. राजमुद्रेचा अवमान रोखण्यात कॉंग्रेसला यश आले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

पुणे मेट्रोच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी महापौरांनी खास फेटा तयार करून घेतला होता. त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजमुद्रेचा वापर करण्यात आला होता. राजमुद्रा ही महाराष्ट्राची मानबिंदू आहे. पण महापालिकेतील भाजप आणि महापौरांनी हेतुपुरस्सर राजमुद्रा असलेला फेटा वापरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याची मालिका चालू ठेवली. पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा करण्याचा हा प्रकार होता. यास काँग्रेस पक्षाने निषेध नोंदवून या प्रकाराला विरोध केला. अखेरीस फेट्यावरील राजमुद्रा काढणे भाजपला भाग पडले आणि काँग्रेसच्या लढ्याला यश मिळाले, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे. सत्तेच्या जोरावर मनमानी करणाऱ्या भाजपला काँग्रेसने दणका दिला, असेही जोशी यांनी म्हटले आहे.

PM Modi in pune : पुण्यातील  मुरुडकर झेंडेवाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी बनवला खास फेटा !!!

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

पुण्यातील  मुरुडकर झेंडेवाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी बनवला खास फेटा !!!

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी भाजपने जोरात तयारी केली आहे. मोदींचा सन्मान खास मराठमोळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी फेटा बनवला आहे. त्यासाठी बरीच तयारी चालली होती.

: भाजपने दिले पवारांना उत्तर

दरम्यान मोदींच्या मेट्रो उदघाटनावरून राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी टीका केली होती. शिवाय इशारा ही दिला होता. त्यावर आता भाजपने पवारांना उत्तर दिले आहे. भाजपने म्हटले आहे कि मोदी लोकार्पण आणि उदघाटन असे दोन्ही गोष्टी करतात. तसं पवार तुम्हाला जमलं नाही.
https://twitter.com/bjp4maharashtra/status/1500176426397736961?s=21

: शहराच्या वाहतुकीत होणाऱ्या बदलावरून राष्ट्रवादीचा हमला

दरम्यान आजच्या मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बरेच बदल होणार आहेत. याबाबत महापौरांनी ट्विट केले होते. त्या ट्विट ला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उत्तर दिले आहे. जगताप म्हणाले, मोदी पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आले तेव्हा कुठला प्रोटोकॉल नव्हता, मग पुणेकरांना का त्रास? असा प्रश्न जगताप यांनी विचारला आहे.
https://twitter.com/jagtapspeaks/status/1500206758584717314?s=21

Silent Agitation Against PM Modi : पंतप्रधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्या करणार मूक आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

पंतप्रधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्या करणार मूक आंदोलन

: सकाळी १० वाजता आंबेडकर स्मारक येथे होणार आंदोलन

पुणे : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून सातत्याने सरकारमधील विविध घटक मंत्री, राज्यपाल सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या राज्यघटनेचा अवमान करत आहे, दलितांचा आवाज वारंवार दाबण्याचा प्रयत्न होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमिचा अपमान करत आहे आणि पुन्हा त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुण्यात अनावरण होत आहे, या घटनेच्या निषेधार्थ मूक आंदोलन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उद्या ६ मार्च रोजी ससून हॉस्पिटल जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे शांततेच्या मार्गाने काळे कपडे परिधान करत महात्मा गांधीजी व महापुरुषांची भजने गात मूक आंदोलनासाठी बसणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणाऱ्या पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी मी आज फेसबुक लाईव्ह द्वारे सदर मेट्रो मार्गाची पाहणी केली. अवघ्या पाच किलोमीटरच्या या मेट्रो मार्गाचे काम अर्धवट स्वरूपात असून, हे काम पूर्ण होण्यास किमान तीन महिने लागतील.एस एन डी टी कॉलेज जवळील स्टेअरकेस, पत्रे ,प्लास्टर, पेंटिंग, वेल्डिंग, रेलिंग ही सर्वच काम अर्धवट परिस्थितीत असून ,ही काम पूर्ण नाही झाली तर पुणेकर ही मेट्रो वापरू शकत नाहीत. मेट्रोच्या कामाची अत्यंत दयनीय परिस्थिती असताना ,निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणेकरांची फसवणूक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवण्यात येत आहे. मुळात उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील निवडणुकांमधून मोदींनी युक्रेन मध्ये अडकलेल्या मुलांसाठी वेळ काढला नाही, परंतु अर्धवट स्वरूपात असलेल्या मेट्रोसाठी वेळ काढला. यावरून  भाजपची कामकाजाची पद्धत आपणा सर्वांना दिसून येते. असे ही जगताप म्हणाले.

: शहर कॉंग्रेस कडून देखील होणार निदर्शने

दरम्यान शहर कॉंग्रेस कडून देखील पंतप्रधानाच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. शहर कॉंग्रेस च्या वतीने घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती शहर कॉंग्रेस कडून देण्यात आली.

 

Congress slams on PM Narendra modi pune tour : पंतप्रधान मोदी यांचा दौरा : पालिका निवडणुकीतील पराभवाची भाजपची कबुली : कॉंग्रेस ने केली आलोचना

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

पंतप्रधान मोदी यांचा दौरा : पालिका निवडणुकीतील पराभवाची
भाजपची कबुली

-. माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पाच वर्ष निष्क्रीय राहिल्याने महापालिका निवडणुकीत पराभव होण्याची भिती वाटू लागल्याने पुण्यातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा ठरविला आहे. पण हा भाजपचा प्रयत्न केविलवाणा आहे,अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

मेट्रो रेल प्रकल्प २० टक्केही पूर्ण झालेला नाही तरीही मेट्रोच्या उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प लांबला आणि आता महापालिका निवडणूक जवळ आल्याने पंतप्रधानांना बोलावून कामाचा देखावा उभा केला जात आहे. पुणेकरांना वास्तव लक्षात आल्याने भाजपची केविलवाणी धडपड पुणेकर पहात आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

महापालिकेच्या २०१७ रोजी झालेल्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपचे १०० नगरसेवक निवडून दिले. त्यापूर्वी भाजपचे खासदार आणि सहा आमदारही निवडून दिले. एवढे यश पदरात टाकले असतानाही भाजपने निष्क्रीयता दाखवून पुणेकरांचा भ्रमनिरास केला. आपल्या या कारभारामुळे जनमत विरोधात जात आहे याची जाणीव भाजपला झाली असून पराभव दिसू लागल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना बोलाविण्याचा खटाटोप चालला आहे, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

PM Modi PMC tour : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नगरसेवकांना उपस्थित राहण्याची संधी  : 250 जणांना परवानगी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नगरसेवकांना उपस्थित राहण्याची संधी

: 250 जणांना परवानगी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पतुळ्याचे अनावरण पुणे मनपा आवारात होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी महापालिका भवनात येणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमासाठी अवघ्या 25 ते 30 जणांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यातही नगरसेवकांनाही या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यावर त्यावरून वाद सुरू झाला होता. मात्र, या वादावर अखेर पडदा पडला आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे 200 ते 250 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. त्यामुळे नगरसेवकांसह अधिकारी तसेच कार्यक्रमाशी संबधित कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी महापालिकेत उपलब्ध असलेली जागा व पंतप्रधानांचा ताफा याचा विचार करता सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्‍या उपस्थितांत हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबधित कार्यक्रम भाजप अल्प उपस्थितीत करत असल्याची टीका सुरू झाली होती. मात्र, अखेर सुरक्षा यंत्रणेशी चर्चा करून नगरसेवकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू देण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच महापालिकेचे व्यवस्थेतील अधिकारी, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्पीकर, सजावट, मांडव यासह इतर कामासाठी असलेले कर्मचारी यांना पास दिले जाणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.