PM SVAnidhi Scheme | PMC Pune | पुणे महापालिकेकडून PM SVAnidhi चे 53% काम पूर्ण!
| बँकांना सहकार्य करण्याचे महापालिकेचे आवाहन
PM SVAnidhi Scheme | PMC Pune | प्रधानमंत्री स्वनिधी योजने ( PM SVAnidhi Scheme) अंतर्गत १०,०००,२०,००० व ५०,००० हजार रुपया पर्यंत कर्ज वाटप (Loan Distribution ) करण्याचे काम राष्ट्रीयकृत बँकांच्या पुणे महापालिकेकडून सुरु आहे. 30 ऑक्टोबर पर्यंत महापालिकेने 53% काम पूर्ण केले आहे. अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान यात बँकांनी चांगले सहकार्य करावे, असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (PM SVAnidhi Scheme | PMC Pune)
PM SVAnidhi अंतर्गत शहरातील 62489 फेरीवाल्याना कर्ज देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारकडून महापालिकेला देण्यात आले आहे. यामध्ये बँकांना देखील जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका हे काम करत आहे. महापालिकेने आतापर्यंत 33235 फेरीवाल्याना कर्ज वाटप केले आहे. म्हणजे 53.19% काम पूर्ण झाले आहे. 33235 लोकांना 10 हजाराचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 4702 लोकांना 20 हजाराचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर 752 लोकांना 50 हजाराचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जवळपास 46 कोटीहून अधिक रक्कम या लोनच्या माध्यमातून वितरित करण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वी महापालिकेकडून शहरातील सर्व बँक अधिकारी व कर्मचारी यांची प्रधानमंत्री स्वनिधी योजने संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पुणे शहरातील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, व छोटे मोठे सर्व व्यवसायिक यांना कळविण्यात आले आहे कि प्रधानमंत्री आत्मनिर्भर (पी.एम. स्वनिधी ) योजने अंतर्गत ज्या लाभार्थींनी १०००० रु.चे कर्जासाठी अर्ज केला आहे. त्यांना लोन देण्यासाठी हे नियोजन केले होते. दरम्यान काही बँकांची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहान महापालिकेकडून करण्यात आले आहे.
| फेरीवाल्याना विविध योजनांचा लाभ
दरम्यान हे काम करत असतानाच महापालिका फेरीवाल्याना विविध योजनांचा देखील लाभ देत आहे. PM Suraksha Bina Yojana 17920 लोकांना लाभ देण्यात आला आहे. PM Jeevan Jyoti Bima Yojana 12058 लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. PM Jan Dhan Yojana 4315 लोकांना याचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. PM Shram Yogi Mandhan Yojana 2940 लोकांना याचा लाभ देण्यात आला आहे. one Nation one Ration Card 251 लोकांना याचा लाभ देण्यात आला आहे. Janani Suraksha Yojana 66 लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. Registration under BoCW 27 लोकांना याचा लाभ मिळाला आहे. तर PM Matru Vandana Yojana 3 लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.