Tag: PMC Budget
Pune Municipal Corporation Budget | पुणे महापालिकेच्या बजेट विषयी माजी स्थायी समिती अध्यक्षांना काय वाटते?
शहराच्या विकासाला आणखीन गती देणारा अर्थसंकल्प | हेमंत रासने
भारतीय जनता पक्षाने आपल्या महापालिकेतील शासन काळामध्ये पुणे शहराच्या विकासाला गती देण्यासाठी अनेक योजना राबवल्या. आज महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शहराच्या विकासाला आणखीन गती देणारा कोणतीही करवाढ न केल्याबद्दल पुणेकरांच्या वतीने प्रशासनाचे आभार मानतो. तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांनी पुणे शहराकरीत १५०० बसेस मंजूर केल्या होत्या. त्यात आता ५०० बसेस ची वाढ होणार आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा होईल आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील.
जेनेरिक औषधांची १९ नवीन दुकाने उभारण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. यामुळे नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार औषधे उपलब्ध होतील. तर पुणे महानगरपालिकेने चालू वर्षात ३० अभिनव शाळा निर्माण करण्याचा निर्णय शिक्षणाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत या निर्णयाने अजून गतिमान शिक्षणाची तरतूद पुणे महापलिकेने उपलब्ध करून दिली आहे. याचबरोबर 600 एकरामध्ये टीपी स्कीम राबवून लाेकल एरिया प्लॅन अंतर्गत 400 कोटीचे मिळणारे अनुदान हे शहराच्या नियोजन आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. अशाप्रकारे पुणे शहराच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प पुणे महापालिका प्रशासनाने सादर केला आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.
———–
जमाच नाही तर खर्च कुठे ? विकासाची होणार बोंबाबोब : आबा बागुल
PMC Budget By IAS Vikram Kumar | अंदाजपत्रकातील महापालिका आयुक्तांनी केलेलं निवेदन | पुणे शहराविषयी आयुक्तांना काय वाटते? वाचा सविस्तर
Pune – (The Karbhari News Service) – PMC Budget by IAS Vikram Kumar | पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी आज महापालिकेचे आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा अर्थसंकल्प (PMC Budget 2024-25) सादर केला. 11 हजार 601 कोटींचे हे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला (PMC Standing Committee) सादर केले. महापालिकेत प्रशासकच सर्वेसर्वा असल्याने आयुक्तांनी अर्थात स्थायी समितीने हे अंदाजपत्रक मान्य देखील केले. स्थायी समितीला बजेट सादर करताना आयुक्त भाषण अर्थात आपले निवेदन करत असतात. त्यात पुणे शहराविषयी, महापालिकेविषयी त्यांची भूमिका याचा अंतर्भाव असतो. या बजेटमध्ये आयुक्तांनी काय निवेदन केले, हे आम्ही तुमच्यासाठी सविस्तर देत आहोत. (Pune Municipal Corporation Budget 2024-25)
महापालिका आयुक्त यांचे निवेदन:
मला पुणे महानगरपालिकेचे चौथे अंदाजपत्रक सादर करण्याची व प्रशासक म्हणून दुसरे अंदाजपत्रक सादर
करण्याची जी संधी प्राप्त झाली, त्याचा मला आनंद होत आहे. पुणे शहर जागतिक व देशातील इतर अग्रगण्य शहरापैकी एक असून सर्वांना आकर्षित करणारे आहे. चांगले जीवनमान व राहण्यास सुयोग्य शहर असल्याने तसेच रोजगाराच्या संधी, दर्जेदार शिक्षण, जगातील नाविन्यपूर्ण गोष्टी तत्परतेने आत्मसात करणारे वातावरण असल्याने शहराचे मोठ्याप्रमाणात नागरिकीकरण वाढत आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट गावे झाल्याने पायाभूत सोयी सुविधांवर दिवसेंदिवस ताण वाढत आहे. या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करुन सर्व समावेशक विकास करण्याची अंतिमतः जबाबदारी प्रशासनावर असते.
स्थानिक स्वराज्य संस्था या शासन व नागरिक यांना जोडणारा दूवा आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिक मनुष्यजीवनाचा प्रारंभ जन्मापासून स्थानिक संस्थेशी जोडला जात असतो व पुढेही सर्व सोयी सुविधांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत व संपर्कात असतो व अशा गोष्टींबाबत प्रशासनाकडून प्रतिसाद मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळेच नागरिकांची सुप्रशासन, विकास पारदर्शकपणा व गतिमानता अशा सर्व कामांच्या पातळ्यांवर पुणे महानगरपालिकेशी बांधिलकी निर्माण होते. या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विचार करुन व शहराच्या विकासाची दिशा निश्चित करुन अंदाजपत्रक मा. स्थायी समितीस सादर करीत आहे.
Pune Municipal Corporation (PMC) Commissioner will present the PMC budget on March 7!
– Proposals before the Standing Committee
PMC Budget 2024-25 | पुणे महापालिका आयुक्त 7 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!
– स्थायी समिती समोर प्रस्ताव
आवश्यक आहे. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यात बदल करून बजेट मुख्य सभेला सादर करतात. मुख्य सभेत चर्चा होऊन हे बजेट 31 मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक असते. त्यांनतर त्यावर अंमल करता येतो. दरम्यान महापालिका आयुक्तांनी बजेट सादर करण्याची तयारी सुरु केली होती. सर्व विभागाकडून आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. मात्र महापालिका आयुक्तांना अपरिहार्य कारणास्तव उचित कालावधीत बजेट सादर करणे शक्य झाले नाही. आता 7 मार्च ला बजेट सादर करण्याबाबत प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती मार्फत मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे.
PMC Chief Finance and Account Officer | उल्का कळसकर यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी केला!
| महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी
PMC Chief Accounts and Finance Department | पुणे मनपाच्या लेखा व वित्त विभागाकडे 80% कर्मचारी वाणिज्य शाखेची पदवी नसलेले! | लेखा विभागाने मागितली 138 नवीन पदे!
| ही मागितली आहेत नवीन पदे
PMC Pune Budget | नागरिकांनो महापालिकेच्या बजेट मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या परिसरात 75 लाखापर्यंत कामे सुचवा
| 31 ऑगस्ट पर्यंत नागरिक देऊ शकतात कामे
त्यांच्या प्रभागात करावयाच्या कामांबाबतच्या सूचनांचा अंदाजपत्रकामध्ये समावेश करून घ्यायचा आहे. त्यासाठी प्रशासक तथा महापालिका आयुक्त (प्रभाग समिती अध्यक्ष) यांचे अध्यक्षतेखाली प्रभाग समितीची बैठक प्रस्तुत प्रयोजनाचे विचारार्थ बोलविण्यात यावी, त्या बैठकीमध्ये नागरिकांच्या अंदाजपत्रक सहभागाबाबत चर्चा घडवून आणावी. नागरिकांच्या सहभागातून अंदाजपत्रक तयार करणेबाबतचा प्रारूप कार्य आराखडा तयार करण्यात यावा. प्रभाग समितीने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार दैनिक वृत्तपत्रात जाहीर आवाहन करून नागरिकांकडून
पाठविण्यात यावे. तसेच प्रभाग समितीच्या मान्यतेनंतर महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व प्रभागाची एकवट माहिती, नियतकालिक अर्थसंकल्प विचारार्थ महापालिका आयुक्त यांचेकडे 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावी. असे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation News)
समान पाणीपुरवठा आणि आवास योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य
| आयुक्तांनी बजेट मध्ये केली भरीव तरतूद
पंतप्रधान आवास योजना आणि समान पाणीपुरवठा या दोन योजना नव्या आर्थिक वर्षात पूर्ण होतील. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलमापक बसविणे, पाण्याच्या टाक्यांची उभारणी, जलवाहिन्या टाकणे ही कामे पूर्ण होणार असून जलमापकाप्रमाणे पाणीपट्टी वसुली पुढील आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.
आगामी आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी शुक्रवारी अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. समान पाणीपुरवठा योजनेत प्रामुख्याने टाक्या बांधणे, मुख्य दाब नलिका टाकणे, अस्तित्वातील वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, पंपिंग स्थानके बांधणे, तसेच नागरिकांच्या नळजोडणीवर जलमापक बसविणे अशी कामे प्रस्तावित आहेत. पाण्याच्या साठवण टाक्या बांधणे, मुख्यदाब नलिका टाकणे यांसाठी प्रत्येकी एक, तर शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रनिहाय पाच अशी सात निविदांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
नव्या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी जादा तरतूद करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२४ पर्यंत समान पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील आर्थिक वर्षात जलमापकाप्रमाणे पाणीपट्टी वसूल केली जाईल. तसेच पंतप्रधान आवास योजनांतर्गत सर्व प्रकल्प लवकरच पूर्ण केले जातील, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.
शहरात समान पाणी पुरवठा करण्याबरोबराच समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा पाणी पुरवठ्यासाठी एक हजार ३२१ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून या वर्षी समान पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचा मनोदय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
शहरातील समान पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. मध्यंतरी कोविडमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात या प्रकल्पाचा गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मार्च २०२४ पर्यंत या प्रकल्पातंर्गत ७० पाणी साठवण टाक्या कार्यान्वित करणे, त्याशिवाय ३५० किलोमीटर लांबीची नवीन वितरण व्यवस्था निर्माण करणे आणि दीड लाख जलमापक मीटर बसवण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. तर पाणी पुरवठ्या करण्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या शहरातील १४१ झोनपैकी ६५ झोनचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
या शिवाय समाविष्ट ३४ गावांत ही योजना राबविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात बावधन बुद्रुक, सुस, म्हाळुंगे गावांच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये बावधन बुद्रुक येथे पाच टाक्यांचे बांधकाम व सुमारे ३५ किलोमीटरलांबीची पाण्याची लाइन विकसित करण्यात येणार आहे. तर सुस व म्हाळुंगे येथे सहा टाक्या व ७७ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे.