Pune Municipal Corporation Employees | अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला महापालिका आयुक्त कार्यालयाकडूनच हरताळ! 

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation Employees | अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला महापालिका आयुक्त कार्यालयाकडूनच हरताळ!

Pune Municipal Corporation Employees | महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) विविध खात्यातील जवळपास 800 कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या (PMC Employees Transfer) करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही बरेच कर्मचारी आपल्या मूळ खात्यातच काम करत होते. याबाबत अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी कडक धोरण अवलंबले. बदलीच्या जागी रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते. तसेच हे करण्यास कुचराई झाली तर खाते प्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांच्या या आदेशाला महापालिका आयुक्त कार्यालयाकडूनच (PMC commissioner Office) हरताळ फसल्याचे समोर येत आहे. (Pune Municipal Corporation Employees)
महापालिकेच्या (PMC Pune) काही विभागांनी यात पळवाट शोधल्याचे दिसून येत आहे. महापालिका आयुक्त कार्यालयाकडून देखील लिपिक टंकलेखक पदावरील सेवकास अजून बदली खात्यात रुजू केलेले नाही. याबाबत आयुक्त कार्यालयाचीच उदासीनता समोर येत आहे. तसेच अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जुमानत नसल्याचे देखील समोर आले आहे. संबंधित कमर्चारी आणि खात्यावर कारवाई केली जाणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (PMC Pune news)

| काय होते अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

आदेशानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील व प्राथमिक शिक्षण विभागाकडील विविध हुद्यावरील अधिकारी / कर्मचारी यांची  पदस्थापनेने नियुक्ती व नियतकालिक बदली करण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधितांनी पदस्थापनेच्या व बदलीच्या खात्यामध्ये तात्काळ हजर होणेबाबत आज्ञापत्रांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तथापि, असे निदर्शनास आले आहे की संबंधित अधिकारी / कर्मचारी सदर आज्ञापत्रांनुसार पदस्थापनेच्या व बदलीच्या खात्यामध्ये हजर न होता अजूनही त्यांच्या मूळ खात्यात कामकाज करीत आहेत. ही  बाब गंभीर असून वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणारी आहे. (Pune Municipal Corporation)

त्यामुळे  पदस्थापनेच्या व बदलीच्या खात्यामध्ये हजर होण्याकरिता आजच्या आज कार्यमुक्त करून त्याबाबतचा खात्याचा नावासह पदनिहाय अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करावयाचा आहे. तसेच संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या / बदलीच्या खात्यामध्ये हजर व्हावयाचे असून, सदर सेवक हजर न झाल्यास त्यांचे महिने महाचे वेतन संबंधित खातेप्रमुखांनी अदा करू नये. या प्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकारी / कर्मचारी व खातेप्रमुख यांचे कोणतेही म्हणणे न ऐकता त्यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. असे आदेशात म्हटले होते. (Pune Municipal Corporation News)

| काही खात्यांनी अजून अहवालच दिला नाही

अतिरिक्त आयुक्तांनी बदली झालेल्या खात्यात रुजू होण्याबाबत आणि त्याचा अहवाल देण्याबाबत 20 एप्रिल ला आदेश जारी केले होते. मात्र महिना उलटून गेला तरी अजूनही आस्थापना विभागाकडे काही विभागांनी अहवाल सादर केले नाहीत. याबाबत आता अतिरिक्त आयुक्त अशा विभागावर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
—-
News Title | Pune Municipal Corporation Employees | The order of the additional commissioner was rejected by the municipal commissioner’s office!