Water Meter in Pune | महापौर बंगल्यावर पाण्याच्या लाईनवर मीटर शोभेपुरताच! 

Categories
Breaking News PMC social पुणे

Water Meter in Pune | महापौर बंगल्यावर पाण्याच्या लाईनवर मीटर शोभेपुरताच!

– विवेक वेलणकर यांनी उजेडात आणला प्रकार

Water Meter in Pune – (The Karbhari News Service) – बऱ्याच पाठपुराव्या नंतर महापौर बंगल्यावर (Pune Mayor Bungalow) पाण्याच्या लाईनवर मीटर बसला खरा; पण घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातून (PMC Ghole Road Ward office) घेतलेल्या दुसऱ्या लाईन मधूनच पाण्याचा वापर सुरु असल्याचे समोर आणले आहे. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर (Vivek Velankar Pune) यांनी हा प्रकार उजेडात आणला आहे. (PMC Water Supply Department)
The karbhari - pmc water supply department
 याबाबत वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि,  गेल्या दीड वर्षापासून आम्ही पाणीपुरवठा विभागाशी पाठपुरावा करतोय की महापालिका आयुक्त बंगला, महापौर बंगला , जिल्हाधिकारी बंगला येथे अन्य पुणेकरांप्रमाणे पाणी मीटर बसवा म्हणजे त्यांचा पाणीवापर किती आहे हे कळेल.  आज थोड्या वेळापूर्वी महापौर बंगल्यावर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलो असता, असे दिसून आले की तिथे येणाऱ्या पाण्याच्या लाईनवर मीटर बसला आहे, मात्र त्यातून पाणीपुरवठा होत नाही.  तर शेजारच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातून घेतलेल्या दुसऱ्या लाईन मधूनच पाणी पुरवठा होतो. याचाच अर्थ मीटर शोभेचाच आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
वेलणकर यांनी पुढे म्हटले कि, पाणीपुरवठा विभागास तातडीने आदेश देऊन महापालिका आयुक्त बंगला, जिल्हाधिकारी बंगला, अन्य वरीष्ठ सरकारी / निमसरकारी बंगले या ठिकाणी तत्काळ पाणी मीटर बसवण्यास सांगावे. ही सर्व मंडळी दरडोई दरदिवशी १५० लिटरपेक्षा कमी पाणी वापरतात असे उदाहरण आकडेवारी सह पुणेकरांपुढे ठेवावे. अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

Dr. Rajendra Bhosle IAS is the new commissioner of Pune Municipal Corporation | Transfer of Vikram Kumar IAS 

Categories
Breaking News PMC पुणे

Dr. Rajendra Bhosle IAS is the new commissioner of Pune Municipal Corporation | Transfer of Vikram Kumar IAS

 Vikram Kumar IAS |  Dr Rajendra Bhosale IAS – (The Karbhari News Service) – Pune Municipal Commissioner and Administrator Vikram Kumar has finally been transferred.  Now the new commissioner of Pune Municipal Corporation will be Dr. Rajendra Bhosale.  Orders in this regard have been issued by the state government.
 Vikram Kumar has been transferred to the vacant post of Additional Metropolitan Commissioner, Mumbai Metropolitan Region Development Authority as per the order of Additional Chief Secretary Nitin Gadre, Secretary to the State Government.  Now the government has appointed Dr. Rajendra Bhosale as Pune Municipal Commissioner in place of Vikram Kumar.
 There was a discussion that Vikram Kumar will be transferred for a long time.  Also recently MLA Ravindra Dhangekar also accused the commissioner.  Also, some political people also demanded the transfer of Vikram Kumar.  Vikram Kumar has finally left for Mumbai after completing his nearly 4-year tenure and presenting the budget of the Pune Municipal Corporation.

PMC Engineering Cadre | उप अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती! | महापालिका आयुक्तांनी जारी केले आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Engineering Cadre | उप अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती!

| महापालिका आयुक्तांनी जारी केले आदेश

PMC Engineering Cadre – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) अभियंता संवर्गातील 6 उप अभियंत्याना (वर्ग 2) कार्यकारी अभियंता (वर्ग 1) या पदावर पदोन्नती (Engineer Promotion) देण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून पदस्थापना करण्यात आली असून त्यांना   नेमणुका देखील देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune PMC News)
कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये एकनाथ गाडेकर, हेमंत मोरे, दिलीप पावरा, अनिल सोनवणे, विलास नवाळी आणि कन्हैयालाल लखानी यांचा समावेश आहे.
एकनाथ गाडेकर हे बांधकाम विभागात होते. त्यांना पाणीपुरवठा विभागात पदोन्नती देण्यात आली आहे. हेमंत मोरे हे बांधकाम विभागात होते. त्यांना पाणीपुरवठा विभागात पदोन्नती देण्यात आली आहे. परिमंडळ 4 ला असणाऱ्या दिलीप पावरा यांना पथ विभागात पदोन्नती देण्यात आली आहे. अनिल सोनवणे हे बांधकाम विभागात होते. त्यांना पथ विभागात पदोन्नती देण्यात आली आहे. प्रकल्प कार्यालय 2 मध्ये असणाऱ्या विलास नवाळी यांना बांधकाम विभागात पदोन्नती देण्यात आली आहे. तर जिल्हा नियोजन व विकास समितीत काम करणाऱ्या कन्हैयालाल लखानी यांना बांधकाम विभागात पदोन्नती देण्यात आली आहे.

PMC Ward no 2 | प्रभाग २ मधील विकासकामांना आयुक्तांचा हिरवा कंदील | भरघोस निधीची तरतूद ; माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे यशस्वी प्रयत्न

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Ward no 2 | प्रभाग २ मधील विकासकामांना आयुक्तांचा हिरवा कंदील

| भरघोस निधीची तरतूद ; माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे यशस्वी प्रयत्न

The Karbhari News Service | पुणे महापालिकेच्या प्रभाग २ मधील रस्ते विकसित करणे, नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, सीसीटीव्ही बसविणे आदींसह विविध कामांसाठी आयुक्त विक्रम कुमार यांनी भरघोस निधींची तरतूद केली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे प्रभागातील विकासकामांना गती मिळणार आहे. या कामांसाठी निधीची तरतूद करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर निधीसाठी आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक राजवट आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिक समस्या घेऊन येत आहेत. काही ठिकाणी विकासकामे रखडली आहेत. प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनेक कामांना गती देणे गरजेचे होते. यासाठी डॉ. धेंडे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. त्या बाबत आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. धेंडे यांनी सुचविलेल्या कामांना निधींची तरतूद करून दिली आहे.

या कामांमध्ये विविध गोष्टींचा समावेश आहे. या मध्ये बीएसयुपी अंतर्गत येणाऱ्या चंद्रमानगर, येरवडा येथील नागरिकांच्या घरांचा प्रश्न आठ वर्षांपासून रखडला होता. त्यासाठी निधींची तरतूद करण्यात आली आहे. येरवडा पोस्ट कार्यालय ते मेंटल कॉर्नर दरम्यान असणाऱ्या येरवडा जेलसमोरील रस्ता विकसित करणे. तसेच कॉमरझोन चौक ते महिला बाल विकास कार्यालय रस्ता विकसित करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. प्रभागातील सर्व झोपडपट्टयांमधील रस्ते विकसित करणे तसेच ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. शांतीरक्षक चौक ते सह्याद्री हॉस्पिटल दरम्यान ६०० मिमी मलवाहिनी टाकन्यात येणार आहे. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड एलटाईप, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड एमटाईप, बैठी चाळ, नागपूर चाळ, तक्षशिला विहारासमोर, पंचशील नगर मधील गणपती मंदिर समोर ड्रेनेजलाईन टाकणे व कॉक्रिट करन्यात येणार आहे. जाधवनगर देवी मंदिरासमोरील ड्रेनेज लाईन टाकणे व कॉक्रिट करणे. श्रमिक वसाहत येथील ड्रेनेज लाईन टाकणे व कॉक्रिट करणे. शांतीनगर देवी मंदिर समोरील ड्रेनेज लाईन टाकणे व कॉक्रिट करणे. विविध उद्यानांमधील विकासाची कामे करणे. विविध ठिकाणचे सीसीटीव्ही देखभाल व दुरूस्ती करणे. विविध समाजमंदिराची देखभाल व दुरूस्ती करणे आदी कामांसाठी निधींची तरतूद करण्यात आली आहे. शहरात मागासवर्गीय कल्याण निधीसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. येरवडा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी वरील कामांबाबत आयुक्तांकडे पत्रव्यहार करून निधीच्या तरतुदीबाबत सुचविले होते. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रभागातील विकासकामांना गती मिळणार आहे.

——
पुणे महापालिकेच्या प्रभाग २ मधील विविध विकासकामांना आयुक्तांनी सकरात्मक प्रतिसाद देत महापालिका अर्थसंकल्पात भरघोस निधी दिला आहे. या पूर्वी मी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे कामे सुचवून निधीची मागणी केली होती. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर निधीसाठी पाठपुरावा केला. प्रभागाच्या जनहिताच्या आणि विकासाच्या कामासाठी दोघांनीही घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
———————

Pune PMC News | पुणे महापालिकेच्या मागासवर्गीय अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न | पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचा आरोप

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune PMC News | पुणे महापालिकेच्या मागासवर्गीय अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न

| पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचा आरोप

Pune – (The Karbhari News Service) – Pune PMC News |  पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) मागासवर्गीय अधिकाऱ्याला  एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून फसवणूक करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप पुणे महापालिका कर्मचारी संघटनेच्या (Pune Mahanagarpalika Magasvargiy Karmchari Sanghatana) वतीने करण्यात आला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करू नये. अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे (Rupesh Sonawane) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation News)

सोनवणे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिलेल्या निवेदनानानुसार पुणे महानगरपालिकेच्या भवन विभागातील मागासवर्गीय अभियंता  सुशिल मोहिते यांचे
कार्यालयातील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये अज्ञान व्यक्तिने शिलबंद असलेला बॉक्स ठेवलेला होता. त्यावेळी एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने व त्याच्या सहकाऱ्याने मोबाईल रेकॉर्डिंग करून ड्रॉव्हरमधून बॉक्स बाहेर काढून स्वतःच तो उघडत त्यातील नोटांची बंडले बाहेर काढत सुशिल मोहिते (अभियंता) यांना दमदाटी करताना दिसून येत आहे. प्रत्यक्षात सुशिल मोहिते यांना बॉक्समध्ये नोटा होत्या हे माहितीही नव्हते. तसेच त्या नोटांवर माहिते यांच्या बोटांचे ठसे दिसून येत नाहीत. ती रेड अॅन्टीकरप्शेन यांचीही नव्हती.

सोनवणे यांनी पुढे म्हटले आहे कि, यावरून लक्षात येते की, मागासवर्गीय अधिकाऱ्याला जाणीव पुर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत  सुशिल मोहिते यांचेवर प्रशासनाने कोणतीही कारवाई करू नये.

Traffic in Dhayari |  धायरी फाटा येथील वांजळे उड्डाण पुलाला वाय फाटा करण्याची मागणी 

Categories
PMC Political social पुणे

Traffic in Dhayari |  धायरी फाटा येथील वांजळे उड्डाण पुलाला वाय फाटा करण्याची मागणी

| शिवसेना ठाकरे गटाच्या महेश पोकळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Traffic in Dhayari | पुणे | (The Karbhari Online) – वाहतूक कोंडी टाळण्यासाठी धायरी फाटा येथील स्व. रमेश भाऊ वांजळे उड्डाण पुलाला (Ramesh Wanjle Flyover) वाय फाटा करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महेश पोकळे (Mahesh Pokale Pune Shivsena) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे.

पोकळे यांच्या निवेदनानुसार वाहतूक कोंडी टाळण्यासाठी धायरी फाटा येथील स्व. रमेश भाऊ वांजळे उड्डाण पुलाला वाय फाटा करण्यास पुणे मनपा प्रशासनाने मान्यता दिली असून त्यासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात १० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र या कामाची निविदा काढून कामास लवकरच सुरवात करण्यात येणे गरजेचे असतानाही कामास सुरुवात झाली नाही.
मागील वर्षी महापालिकेचे प्रकल्प अधिकारी, शहर सुधारणा समितीचे पदाधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी सदर प्रकल्पाची पाहणी सुद्धा केली होती. धायरी फाटा येथील स्व. रमेश भाऊ वांजळे उड्डाण पुलाचा उपयोग धायरी नऱ्हे या गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना होत नाही. उड्डाण पुलाचा वापर पूर्णपणे होत नाही. तसेच उड्डाणपुलाखालील सर्विस रस्त्यावरून धायरी गावाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढून येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. याचा पादचाऱ्यांना देखील त्रास होत आहे.
यावर कायम स्वरूपी उपाय म्हणून सध्या असलेल्या स्व. रमेश भाऊ वांजळे उड्डाणपुलाला वाय फाटा करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे धायरी फाटा येथील वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेले नागरिक मोकळा श्वास घेतील व नागरिकांना दिलासा मिळेल. पुणे महानगरपालिकेने लवकरात लवकर सदर प्रकरणी निविदा प्रक्रिया राबवून तातडीने वाय पुलाचे काम करण्यात यावे. असे पोकळे यांनी म्हटले आहे.

PMC pune Employees | समाविष्ट गावातील कर्मचारी समावेशनामुळे मूळ कर्मचाऱ्यांवर अन्याय | कर्मचाऱ्यांची आयुक्तांकडे तक्रार

Categories
Breaking News PMC पुणे

PMC pune Employees | समाविष्ट गावातील कर्मचारी समावेशनामुळे मूळ कर्मचाऱ्यांवर अन्याय | कर्मचाऱ्यांची आयुक्तांकडे तक्रार

PMC Pune Employees | पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) २३ ग्रामपंचायतीचे (23 Including villages) कर्मचारी यांचा समावेश करून त्यांना वरिष्ठ लिपिक पदी पदस्थापना देण्यात आलेली आहे.  सेवकांचे एकवट  वेतनावरील आदेश प्रसूत करण्यात आलेले आहेत. सदर आदेशातील सेवकांचे पुणे मनपाचे आस्थापनावर समावेश करताना पुणे महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियम २०१४ मधील शैक्षणिक अर्हता धारण केल्याचे आढळून येत नाही. असे आरोप महापालिका कर्मचाऱ्यांनी केले आहेत. यासंदर्भात सेवकांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धती विषयी तीव्र नाराजी वाढली असून प्रशासनाने यावर ठोस निर्णय घ्यावा अन्यथा सेवकांच्या वतीने प्रशासनाच्या कार्यपद्धती विषयी जाहीर निदर्शने / आंदोलने केली जातील याची प्रशासनाने दखल घ्यावी. असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. (PMC Pune News)

कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेच्या शेड्यूल मान्य पदावर सध्या कार्यरत सन २०११ आणि २०१२ मधील नियुक्त लिपिक टंकलेखक व वरिष्ठ लिपिक पदासाठी लागणारी शैक्षणिक तसेच इतर अर्हता जसे की पदवी विभागीय परिक्षा उत्तीर्ण, मराठी व इंग्रजी टंकलेखन, संगणक पात्रता इ. धारण केलेली असून ते सेवक अद्याप पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असून त्यांना पदोन्नती न देता ग्रामपंचायतीकडील सेवकांना समायोजन करताना किमान शैक्षणिक अर्हताच्या आधारे तसेच एखादा कर्मचारी विहित शैक्षणिक अगर तदनुषंगिक आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता धारण करीत नसेल त्यांना विहित अटी शर्तीच्या अधीन राहून वरिष्ठ लिपिक पदी समावेशन केलेले आहे. ही बाब पुणे मनपाच्या मुळ कामगारांवर अन्याय करणारी आहे. (Pune PMC Employees)

पत्रात पुढे म्हटले आहे कि, तसेच लेखा परीक्षण अहवाल २०१६-२०१७ ते २०१७-२०९८ लेखा परीक्षण अहवालानुसार काढलेल्या आक्षेपानुसार ग्रामपंचायत सेवकांना पुणे मनपा मध्ये समावेशन करताना आक्षेप नुसार ग्रामपंचायतकडील aसेवकांना समावेशन करताना सदर कर्मचाऱ्यास महानहानगरपालिकेतील इतर कर्मचान्याप्रमाणे पात्र वेतनश्रेणीनुसार वेतन भत्ते अदा करण्याबाबत अनुपालन अहवाल प्राप्त झाले नाही असा आक्षेप काढलेला आहे. प्रकरणी अहवाल समाविष्ट केला आहे. लोकसंख्येच्या वर्गवारी नुसार ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी आकृतिबंधात लिपिक / वसुली कारकून, शिपाई, पाणीपुरवठा / दिवाबत्ती कर्मचारी, सफाई कामगार असे पदनाम नमूद असून कोठेही वरिष्ठ लिपिक व इतर पदांचे पदनाम दिसून येत नाही. असे असताना पुणे मनपा प्रशासनाने कोणत्या आधारे ग्रामपंचायतीकडील सेवकांचे वरिष्ठ लिपिक व इतर पदांवर समावेशन केले. तसेच आकृतीबंधात शासनाकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ५०% किमान वेतनाची रक्कम दिली जात आहे याचा आधार घेऊन सदर कर्मचारी शासनाचे कर्मचारी आहेत, अशी मागणी करता येणार नाही असे आकृतीबंधात नमूद केले आहे.
एकंदरीत २३ ग्रामपंचायतीतील सेवकांचे समावेशन करताना कागदपत्रे पडताळणी, शैक्षणिक पात्रतेचे निकष यासंदर्भात त्रुटी आढळून येत आहेत. या संदर्भात पुणे महानगरपालिकेतील शेड्यूल मान्य पदावर कार्यरत असलेल्या सेवकामध्ये तीव्र नाराजी आहे. तरी प्रशासनाने संपूर्ण शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या पुणे मनपातील कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सेवकांची वरिष्ठ लिपिक या पदी विहित कालावधीमध्ये पदोन्नती करण्यात यावी तसेच समाविष्ट १२ गावातील ८ सेवकांची आणि २३ गावातील २८ सेवकांची वरिष्ठ लिपिक पदी किमान शैक्षणिक अर्हतेच्या आधारे तसेच विहित अटी-शर्तीच्या अधीन राहून नियमबाह्य केलेल्या नेमणुकीस तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच यास स्थगिती देण्यात यावी अशी सर्व सेवकांची मागणी आहे. समाविष्ट ११ गावातील ८ सेवकांची आणि २३ गावातील २८ सेवकांची वरिष्ठ लिपिक पदी नेमणूक केलेल्या आदेशा संदर्भात पुणे मनपा सेवकांनी प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला असून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यासंदर्भात सेवकांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धती विषयी तीव्र नाराजी वाढली असून प्रशासनाने यावर ठोस निर्णय घ्यावा अन्यथा सेवकांच्या वतीने प्रशासनाच्या कार्यपद्धती विषयी जाहीर निदर्शने / आंदोलने केली जातील याची प्रशासनाने दखल घ्यावी. तसेच प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आम्हास लेखी स्वरुपात देण्यात यावा.असे ही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
——

Ramesh Shelar News | PMC | रमेश शेलार प्रकरणात आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा! | अभिप्राय देण्याबाबत अपिल उप समितीत ठराव 

Categories
Breaking News PMC पुणे

Ramesh Shelar News | PMC | रमेश शेलार प्रकरणात आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा!

| अभिप्राय देण्याबाबत अपिल उप समितीत ठराव

Ramesh Shelar News | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात (PMC Solid Waste Management Department) रमेश शेलार (Ramesh Shelar) हे पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) म्हणून काम पाहत आहेत. मात्र अकार्यकारी पद हे प्रशासनाच्या चुकीमुळे माझ्यावर लादले गेले आहे. असे रमेश शेलार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच आपल्याला दिली गेलेली शिक्षा रद्द करावी, याबाबत स्थायी समिती (PMC Standing Committee) आणि अपील उप समिती (PMC Appellate Sub Committee) कडे अपील केले होते. अपील उप समिती च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला कि याबाबत आयुक्तांनी अभिप्राय द्यावा. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग आयुक्तांच्या माध्यमातून अभिप्राय देणार आहेत. या अभिप्राया बाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. (Pune Municipal Corporation)
अकार्यकारी पद देताना प्रशासनाने चुकीचा संदर्भ दिला आहे, असे शेलार यांनी प्रशासनास याआधीच निदर्शनास आणून दिले आहे. तसेच दोन महिने कार्यकारी पद देऊन पुन्हा अकार्यकारी पद प्रशासनाने दिले, हे माझ्यावरच्या आकसापोटी केले असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला आहे. तसेच आता तरी प्रशासनाने आपली चूक सुधारून कार्यकारी पद द्यावे, अशी मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे आधीच केली आहे. (Pune Municipal Corporation)
त्यानंतर प्रशासनाला शेलार यांनी दुसरे पत्र दिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे कि मुख्य  सुरक्षा अधिकारी” (वर्ग-१) पदावरून अकार्यकारी पदभार समकक्ष पद हे वर्ग- २ “सुरक्षा अधिकारी” या पदाशी समकक्ष यादी तत्कालीन महापालिका आयुक्त यांजकडेस मान्यतेसाठी तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे मार्फत तत्कालीन उपआयुक्त सामान्य प्रशासन विभागामार्फत ठेवली होती. वास्तविक माझी निवड “मुख्य सुरक्षा अधिकारी” (वर्ग – १) पदी सरळसेवेने झालेली आहे व हे पद खातेप्रमुखांचे आहे. (PMC Pune News)
खातेनिहाय चौकशी आज्ञापत्रक ३१/०८/२०१९ रोजी पारित झालेनंतर मी सेवेमध्ये पुर्नस्थापीत झालो. तदनंतर तत्कालीन उप आयुक्त सामन्य प्रशासन विभागाने समक्ष चर्चा करून (वर्ग-२) पदांची यादी केली. म्हणजेच मला (वर्ग -१) पदावरून (वर्ग -२) समकक्ष पदावरती अकार्यकारी कामकाज सोपविले यामधून मला पुन्हा जबरी शिक्षा केली अशी माझी धारणा झाली आहे. माझी शैक्षणिक अर्हता त्यावेळी D.C.E,BE(old) Civil, L.L.B, अशी होती कारण माझी सन २००९ रोजी सरळसेवा नेमणूक पद “मुख्य सुरक्षा अधिकारी”पदासाठी L.L.B पदवीस प्राधान्य होते म्हणूनच झालेली आहे. ०१/१०/२०१९ चे निवेदनावरती तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी “GAD मधून हजर करून अकार्यकारी पदावर नियुक्ती देणेबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करणे उचित राहील”. असा शेरा नमूद केलेला आहे. त्यांस तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी मान्य असे नमूद केलेले आहे. (PMC Pune Marathi News)
वास्तविक त्यावेळी मी सेवेमध्ये कार्यकारी म्हणून “मुख्य सुरक्षा अधिकारी” कामकाज पाहत होतो. ‘मानीव निलंबन’ निलंबन झालेले वर्ग -१ चे अधिकारी सेवेमध्ये आलेनंतर कार्यकारी म्हणून कामकाज पहात आहे. एल.बी.टी विभागाने प्रसिद्ध झालेली संकेतस्थळावरील माहिती व प्रमाणपत्र हा त्याचा भाग आहे. या  सर्व प्रकारामुळे माझे सह महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त चा पदावरती पदोन्नतीचा परिणाम झाला आहे.  तसेच इतर समकक्ष पदावर (मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव, मुख्य अभियंता, उप आयुक्त अतिक्रमण व समाज विकास अधिकारी इत्यादी.) सुद्धा कामकाज करता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार होऊन “कार्यकारी” पदावरती (वर्ग -१) समकक्ष काम करण्याचे आदेश दिले जावेत. असे शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
दरम्यान आपली शिक्षा रद्द करावी यासाठी शेलार यांनी  स्थायी समिती आणि अपील उप समिती कडे अपील केले होते. अपील उप समिती च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला कि याबाबत आयुक्तांनी अभिप्राय द्यावा. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग आयुक्तांच्या माध्यमातून अभिप्राय देणार आहेत. या अभिप्राया बाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
—-

Zika Virus in Pune | झिकाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करा | मुरलीधर मोहोळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

Zika Virus in Pune | झिकाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करा | मुरलीधर मोहोळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

 

Zika virus in Pune | झिकाचा(Zika virus) प्रसार रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्याची मागणी माजी महापौर मुरलीधर मोहोळ (former Mayor Murlidhar Mohol) यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)

मोहोळ यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिका हद्दीत झिका विषाणूचे रुग्ण आढळत असल्याचे स्पष्ट झाले असून झिका व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी, त्यावर उपाययोजनांची दिशा ठरवण्यासाठी एका विशेष टास्क फोर्सची निर्मिती करणे आवश्यक आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूची पार्श्वभूमी पाहता, यावर योग्यवेळी आवर घालणे आणि नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.

येरवडा येथील प्रतीकनगर येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय महिलेला झिका विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे बाधित भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्स नियुक्त करावी. यासोबतच या संसर्गजन्य विषाणूसंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्या.  याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. असेही मोहोळ यांनी म्हटले आहे.

PMC General Administration Department | सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांकडून दुजाभावाची वागणूक | रमेश शेलार यांचा आरोप

Categories
Breaking News PMC पुणे

PMC General Administration Department | सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांकडून दुजाभावाची वागणूक | रमेश शेलार यांचा आरोप

| अन्याय दूर करण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी

PMC General Administration Department | बेहिशोबी मालमत्ता प्रकरण समान असताना फौजदारी गुन्हा दाखल झाल्यामुळे निलंबित करण्यात आलेले वर्ग- १ चे अधिकारी यांना उप आयुक्त सामान्य प्रशासन विभाग यांचेकडून वेगवेगळी वागणूक देण्यात येत आहे. असा आरोप पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) रमेश शेलार यांनी केला आहे. एका अधिकाऱ्याला कार्यकारी पद दिले जाते तर मला अकार्यकारी पद दिले जाते. त्यामुळे माझ्यावरील अन्याय दूर करावा. अशी मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)

शेलार यांनी महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) लिहिलेल्या पत्रानुसार या प्रकरणी माझेवरती अन्यायकारक वागणूक उप आयुक्त सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका यांचे कडून होत असल्याचे आढळून येत आहे.  बेहिशोबी मालमत्ता फौजदारी गुन्हा दाखल असलेले वर्ग १ चे अधिकारी उपायुक्त विजय लांडगे हे कार्यकारी कामकाज पाहत असलेलेबाबत आढळून येत आहे. याबाबत रजा मंजुरी आदेशामध्ये ठळकपणे दिसून येत आहे. वास्तविक त्यांचे निलंबन हे मानीव या सदरात येत असून पुर्नस्थापना होताना शासन निर्णय चा भंग झालेला आहे. (PMC Pune News)

शेलार यांच्या पत्रानुसार मी वर्ग- १ चा अधिकारी असून माझे निलंबन अंतिम अभियोग दाखल परवानगी देवून लगेच निलंबित करणेत आले. शिक्षा देवून पुर्नस्थापना झाली. शासन निर्णयचा वापर करून वर्ग २ चे पद समकक्ष दर्शवून अकार्यकारी पदी नियुक्ती केली या आदेशात शासन निर्णय तारीख १४/११/२०२३ अशी नमूद केलेली आहे. याबाबत विनंती अर्ज केला असता  उप आयुक्त सामान्य प्रशासन यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी विषयांची निकड लक्षात घेऊन व न्यायालयीन बाब प्रलंबित असलेने तसे आदेश काढले आहेत असे नमूद केले आहे. यावरून मउप आयुक्त सामान्य प्रशासन पुणे महानगरपालिका यांचे कडून फौजदारी प्रकरण समान असताना वेगवेगळे निर्णय घेऊन वेगवेगळी वागणूक देण्यांत येत आहे. त्यामुळे याबाबत  अवलोकन करून  योग्य तो न्याय द्यावा. अशी मागणी शेलार यांनी केली आहे.