Pune News | गावठाण भागातील  इमारतीसाठी १८ मी.खोलीची अट शिथिल करा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune News | गावठाण भागातील  इमारतीसाठी १८ मी.खोलीची अट शिथिल करा

| हेमंत रासने यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

 

Pune News पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील दाट वस्ती आणि गावठाण भागातील बांधकामाच्या सामायिक अंतरामध्ये (पुढील सामायिक अंतर वगळून) सवलत देऊन हार्डशिप आकारणी करावी अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन केली. (PMC Pune News)

 

रासने यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, UDCPR नियमावलीमध्ये दाट लोकवस्ती भागातील मिळकतीसाठी 6.1.1 नियमावली आहे,सदर गावठा ण भागातील अनेक मिळकतीचे पुनर्विकसन अत्यंत आवश्यक आहे.तेथे भाडेकरूंचेही पुनर्वसानासोबत मिळकत धारकांचेही प्रश्न गंभीर आहेत.हा भाग नागरी सुविधांपासून वंचित आहेच तसेच अनेक ठिकाणी वास्तू धोकादायकही झालेल्या आहेत.५ जानेवारी २०१७ रोजीच्या वि.नि.नियमावली व विकास आराखड्यान्वये या भागात अनुज्ञेय FSI हि कमी झाला होता.प्रस्तावित रस्ता रुंदीही बऱ्याच ठिकाणी रद्द झाली आहे.

गावठाण भागामध्ये विकसनाचे काम करणेस अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याची आपणास कल्पना आहेत. आजपावेतो,इमारतींना कोणतेही साईड मार्जिन न सोडता नकाशांना मंजुरी मिळत होती. परंतु वरील विनिमयान्वे १५ मि.उंचीच्या वरील इमारत असेल तर त्या इमारतीसाठी १ मी.साईड मार्जिनचे बंधन आहे.अनेक ठिकाणी इमारतींचे नकाशे कोणतेही साईड मार्जिन न सोडता मंजूर झाले आहे. In situ – FSI / TDR घेणेच्या वेळेस सदर १ मीटर साईड मार्जिनची अडचण झाली आहे.
या नियमांमध्ये बदल करणे संदर्भात शासनाकडे पत्र व्यवहार केला होता.त्यास अनुसरून म.न.पा.ने हि  २४/०९/२०२१ रोजी अभिप्राय दिलेला होता, ज्या अन्वये वरील १ मीटर साईड मार्जिनची आवश्यकता नसल्याचे कळविले होते. १५/०५/२०२३ रोजी शासनस्तरावरून एक आदेश या बाबत प्रसृत झाला आहे.त्यानुसार UDCPR 2.4 अन्वये स्पष्ट निदर्शक अडचण ( Demonstrable Hard Ship ) उदभवत असल्यास अशा ठिकाणी शिथिलता देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत असे स्पष्ट केलेले आहे.
आपलेकडून या सर्व बाबींचा विचार करून वरील संदर्भीय परिपत्रक पारित केले आहे. परंतू हि सवलत पुरेशी होत नाही, कारण या परिपत्रकान्वये सदरची सवलत फक्त १८ मी. खोलीपर्यंतच्या म्हणजेच ६० फुट खोली असणाऱ्या मिळकतीनांच लागू होते.

गावठाणामध्ये १०० फुट ते १५० फुट खोलींच्या जास्तीत जास्त ईमारती,वाडे आहेत. प्रचलित वि.नि. नियमावलीनुसार १५ मी.उंची वरील ईमारतींना Fire Act नुसार Provisional ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे.तसेच भोगवटापत्रा पूर्वी सदर अग्निशमन विभागाकडून अंतिम ना हरकत दाखला घेणेचे बंधन आहे, ज्या योगे ईमारतींमध्ये कायद्यानुसार आवश्यक आग प्रतिबंधक यंत्रणा बसवली जाते. या बाबींचा विचार करून वरील  परिपत्रकातील १८ मी.खोलीची अट शिथिल करावी व नवीन परिपत्रक पारित करावे.

Pune Bhide Wada Memorial | CM Eknath Shinde | भिडे वाडा स्मारकाच्या कामाला लवकर सुरूवात | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे महाराष्ट्र

Pune Bhide Wada Memorial | CM Eknath Shinde | भिडे वाडा स्मारकाच्या कामाला लवकर सुरूवात | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Pune Bhide Wada Memorial | CM Eknath Shinde | पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात (Pune Bhide Wada) दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक (Bhide Wada Will be the National Memorial) होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी (Pune Collector) आणि महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले.

पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. भावी पिढीने देखील त्यातून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी यासाठी या वाड्याचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

स्मारकासाठी झालेल्या भूसंपादनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वाड्यातील भाडेकरूंनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत वाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यामुळे स्मारकासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून स्मारकाच्या कामाला गती येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारकासंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. गेल्या वर्षी नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली होती. त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता खंडाळा)येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सर्व बाबींची पूर्तता करून स्मारकाच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

PMC Shahari Garib Yojana  | शहरी गरीब योजनेची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवा | शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Shahari Garib Yojana  | शहरी गरीब योजनेची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवा | शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या  शहरी गरीब योजनेच्या (PMC Shahari Garib Yojana) उपचारांची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवण्यात यावी. तसेच दुर्धर आजारांसाठी अडीच लाखापर्यंत उपचार देण्यात यावेत. अशी राष्ट्रवादी काँग्रेस कडून (NCP Pune) शहर अध्यक्ष दीपक मानकर (Dipak Mankar) आणि प्रवक्ते भैयासाहेब जाधव (Bhaiyyasaheb Jadhav) यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे. (Pune Municipal Corporation)
आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार महापालिकेकडून (PMC Pune) शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठीची उत्पन्न मर्यादा 1 लाखांवरून 1 लाख 60 हजार रूपये केली आहे. त्यामुळे शहरातील गरजू व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. महापालिकेने 2011 मध्ये सुरू केलेल्या या योजनेत अद्यापही नागरिकांना 1 लाख रूपयां पर्यंतचे उपचार महापालिकेच्या पॅनेलवरील रूग्णालयात मिळतात. तर काही दुर्धर आजारांसाठी 2 लाखांचे उपचार मिळतात. मात्र, वैद्यकीय उपचाराचा वाढलेला खर्च तसच महागाई लक्षात घेऊन उपचाराच्या खर्चाची मर्यादाही वाढविणे आवश्‍यक असून या योजनेतील कार्डधारकांना सरासकट 2 लाखांचे उपचार मिळावेत तसेच दुर्धंर आजारासाठी अडीच लाखां पर्यंत उपचार केले जावेत. महापालिकेत लोकप्रतिनिधीं नसल्याने शहराचे प्रशासक म्हणून आपल्या पातळीवर हा निर्णय घेतल्यास सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा मिळणार असून याबाबत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी करणार आहोत. असे निवेदनात म्हटले आहे.
—-

PMC Kamgar Uinon Vs PMC Employees Union | “पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन” आमची सहयोगी संघटना नाही | कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे महापालिका आयुक्तांना पत्र

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Kamgar Uinon Vs PMC Employees Union | “पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन” आमची सहयोगी संघटना नाही | कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे महापालिका आयुक्तांना पत्र

PMC Kamgar Uinon Vs PMC Employees Union  | पुणे महानगरपालिका कामगार युनियन (Pune Mahanagarpalika Kamgar Union) (मान्यताप्राप्त) संघटनेची “पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन” (कारकून विभाग), (PMC Employees Union) या सहयोगी संघटना नाही. असे पत्र कामगार युनियन (मान्यताप्राप्त) कडून महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) देण्यात आले आहे. पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियनच्या कार्यपद्धतीत बदल होईपर्यंत आम्ही त्यांना सहयोगी मानणार नाही, असे पत्राद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) संघटनेच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका कामगार युनियन ही गेल्या 81 वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत
कार्यरत असून पुणे महानगरपालिकेमध्ये एकमेव MRTU ACT अंतर्गत मान्यताप्राप्त संघटना आहे. एवढ्या प्रदीर्घ कार्यकाळात सर्व सेवकांचे प्रश्न सोडवताना औद्योगिक शांततेचा भंग होणार नाही याची जाणीव ठेवून पुणे महानगरपालिका कामगार युनियन ने कामकाज चालवले आहे. हे कामकाज करत असताना अधिकारी, अभियंता, डॉक्टर असोसिएशन हे विभाग पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे सहयोगी राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे कारकून विभागातील काही विशिष्ट प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन याची स्थापना पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली व एक सहयोगी संघटना म्हणून ते आज पर्यंत कार्यरत होते. (PMC Pune)
पत्रात पुढे म्हटले आहे कि, परंतु अलीकडील काळात पी.एम.सी एम्प्लॉईज युनियन मध्ये पदाधिकारी बदल झाला आहे व हा बदल झाल्यापासून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आमच्यामध्ये विसंवाद निर्माण झाला आहे. अशा स्थितीत आम्ही सुचित करतो की पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियनच्या कार्यपद्धतीत बदल होईपर्यंत व त्याबाबत आम्ही  लेखी पत्र देऊन अवगत करेपर्यंत आम्ही पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियन बरोबरचे आपले सहयोगी संघटना म्हणून संबंध स्थगित केले आहेत. असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
————-
News Title | PMC Kamgar Uinon Vs PMC Employees Union | “PMC Employees Union” is not our Affiliate Union Letter from Labor Union (Recognised) to Municipal Commissioner

Pramod Nana Bhangire | पुणे शहरातील रस्त्यावरील खड्ड्याबाबत अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करा  | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pramod Nana Bhangire | पुणे शहरातील रस्त्यावरील खड्ड्याबाबत अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करा  | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची मागणी

Pramod Nana Bhangire | पुणे | पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) यापूर्वी शहरात जिथे खड्डे (Pune Potholes) बुजवण्याचे काम केले होते त्याच ठिकाणी खड्यांची पुनर्निर्मिती होवून रस्त्यावर खड्यांची आहे तशीच परिस्थिती स्थिती निर्माण झाली आहे. तरी महानगरपालिकेने तातडीने संबंधित विभागाचे खातेप्रमुख (HOD) व ठेकदारांवर ( कठोर कारवाई करून कामाच्या योग्य नियोजनातून प्रशस्त आणि सुधारित पक्क्या रस्त्यांचे वेळीच कामकाज सुरू करावे. अशी मागणी शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Shivsena Pune President Pramod Nana Bhangire) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corportion)
भानगिरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार  जुलै महिन्यात पुणे महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी सुमारे तीनशे कोटींची निविदा काढून रस्त्यांचे खड्डे बुजविले होते. त्यावर ऑगस्ट महिन्यातच खड्डे होवून खड्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. पुन्हा आता सप्टेंबर महिन्याच्या पावसाने पुन्हा एकदा पुण्यातील विविध भागातील रस्ते उखडून रस्त्याच्या बांधकामातील खडी रस्त्यावर सर्वत्र पसरली आहे. अनेक रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. यामुळे वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत असून कात्रज- कोंढवा चौकात (Katraj-Kondhwa Chowk) मोठे खड्डे पडून रस्त्यांची चाळण झालेली असून मोठे खड्डे पडले आहेत. मोठ्या खड्यांमुळे अपघात होत असून त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. (Pune Potholes News) 

भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, महानगरपालिकेने यापूर्वी शहरात जिथे खड्डे बुजवण्याचे काम केले होते त्याच ठिकाणी खड्यांची पुनर्निर्मिती होवून रस्त्यावर खड्यांची आहे तशीच परिस्थिती स्थिती निर्माण झाली आहे. तरी महानगरपालिकेने तातडीने संबंधित विभागाचे खातेप्रमुख व ठेकदारांवर कठोर कारवाई करून कामाच्या योग्य नियोजनातून प्रशस्त आणि सुधारित पक्क्या रस्त्यांचे वेळीच कामकाज सुरू करावे.  तसेच वाहतूक कोंडी तसेच खड्यांमुळे नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवर वेळीच उपायोजना करावी. अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे.
—-

Mahatma Phule Memorial Bhavani Peth |  महात्मा फुले स्मारक परिसरात झालेली अस्वच्छता व असामाजिक तत्वांचा उच्छाद तातडीने बंद करा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Mahatma Phule Memorial Bhavani Peth |  महात्मा फुले स्मारक परिसरात झालेली अस्वच्छता व असामाजिक तत्वांचा उच्छाद तातडीने बंद करा

| शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

 

Mahatma Phule Memorial Bhavani Peth |भवानी पेठेतील महात्मा फुले स्मारकाच्या (Mahatma Phule Memorial Bhavani Peth) परिसरात झालेली अस्वच्छता व असामाजिक तत्वांचा उच्छाद तातडीने बंद करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे.

याबाबत भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार स्त्री  शिक्षणाचा जागर करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai phule) स्मारकाच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. स्मारकाच्या अनुषंगाने त्यांचे विविध विचार समाजात रुजू करण्याचे मोठे कार्य सुरू असताना गेल्या काही दिवसापासून भवानी पेठ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच काही असामाजिक तत्वे सामाजिक सलोखा बिघडावा या उद्देश्याने तेथे मोठ्या प्रमाणावर बाटल्यांचा खच, दुर्गंधीचे साम्राज्य आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हे विद्येचे व ज्ञानाचे आदान प्रदान करणारे ज्ञानमंदिर ठरावे यासाठी पुणे महानगरपालिका (Pune municipal Corporation) सातत्याने प्रयत्नरत असली पाहिजे. या पत्राद्वारे आम्ही विनंती करतो की तात्काळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने तिथे सुरक्षा रक्षक नेमून त्या परिसरात कोणतेही असमाजिक तत्वे सक्रिय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. स्मारकाच्या परिसरात जानार्जन करण्यासाठी विद्यार्थ्याना पुस्तके व अभ्यासिकेची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, आम्ही पुन्हा आपणांस विनंती करतो की स्मारकाच्या परिसरात असामाजिक तत्वे सक्रिय होऊ नये, यासाठी आपण तातडीने कारवाई करावी. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.


 

News Title | Immediately stop the unsanitary and anti-social elements in the Mahatma Phule memorial area | Shiv Sena city chief Pramod Nana Bhangire’s demand to Municipal Commissioner

Swarajya Party | Pune Potholes | सोमवार पर्यंत खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन करू | स्वराज्य पक्षाचा पुणे महापालिका आयुक्तांना इशारा

Categories
Breaking News PMC Political पुणे

Swarajya Party | Pune Potholes | सोमवार पर्यंत खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन करू | स्वराज्य पक्षाचा पुणे महापालिका आयुक्तांना इशारा

Swarajya Party | Pune Potholes | पुणे शहर आणि उपनगर परिसरात खड्यांचे साम्राज्य (Pune Potholes) वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाकडून याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. सोमवार पर्यंत खड्डे नाही बुजले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव (General Secretary Dr Dhananjay Jadhav) यांनी दिला आहे. (Swarajya Party | Pune Potholes)

डॉ जाधव यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार महापालिकेने दावा केल्याप्रमाणे खड्डेमुक्त पुणे कुठेही नसून अजूनही मोठ-मोठे खड्डे पुणे शहर आणि उपनगरात दिसत आहे. नुकतेच आम्ही पुणे शहर व उपनगरात RTO चौक ते जुना बाजार रस्ता, अलका चौक, जकात नाका ते साठे वस्ती रोड (धानोरी), पोरवाल रोड या सर्व ठिकाणी खड्डे बुजवा, जीव वाचवा’ आंदोलन केले असून आपणास ते निदर्शनास आणून देत आहोत. तरी लवकरात लवकर त्यावर कार्यवाही करावी. अन्यथा येत्या सोमवारी स्वराज्यच्या वतीने आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा डॉ जाधव यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation)
—–
News Title | Swarajya Party | Pune Potholes | Fill the potholes till Monday otherwise we will protest strongly Swarajya Party’s warning to Pune Municipal Commissioner

PMC Hospitals | पुणे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन नेमा अन्यथा आंदोलन करू  | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा महापालिकेला इशारा 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Hospitals | पुणे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन नेमा अन्यथा आंदोलन करू

| शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा महापालिकेला इशारा

PMC Hospitals | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन (Liftman) नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ लिफ्टमन नेमण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते पृथ्वीराज सुतार (Shivsena Leader Prithviraj Sutar) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. तसेच नेमणूक नाही झाली तर आंदोलनाचा इशारा देखील सुतार यांनी दिला आहे. (PMC Hospitals)

सुतार यांच्या निवेदनानुसार  मनपाची स्वतःची पुणे शहरामध्ये विविध भागात हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलमध्ये रोज हजारो रूग्ण येत असतात. त्यातील जास्तीत जास्त रूग्ण हे झोपडपट्टी व वस्ती भागातील असतात. या हॉस्पिटलच्या ईमारती बहुमजली आहेत; म्हणून  रूग्णांच्या सोयीसाठी लिफ्ट बसविल्या आहेत. त्या लिफ्ट चालविण्यासाठी टेंडर काढून लिफ्टमन कंत्राटी पध्दतीने घेतले आहेत. या लिफ्टमनमुळे रुग्णांचे जाणे-येणे सोयीचे होते. (PMC Pune News)

परंतु आता आपल्या विद्युत विभागाने (PMC Electrical Department) या लिफ्टमनची आवश्यकता नाही, रूग्ण लिफ्ट चालवतील, लिफ्टमनचे टेंडर काढणार नाही, असा फतवा काढला आहे. हॉस्पिटलामध्ये लिफ्टमन नाहीत त्यामुळे येणाऱ्या रुग्णांची, नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. त्यामुळे त्वरीत लिफ्टमनची नेमणूक करावी, अन्यथा आम्हाला आमच्या शिवसेना पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करावे लागेल. असे सुतार यांनी म्हटले आहे.


News Title | PMC Hospitals | Liftman in Pune Municipal Hospital or else we will protest | Shiv Sena leader Prithviraj Sutar’s warning to the Municipal Corporation

National Commission for scheduled castes | राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महापालिका आयुक्तांना पुन्हा फटकारले!

Categories
Breaking News PMC social पुणे

National Commission for scheduled castes |  राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महापालिका आयुक्तांना पुन्हा फटकारले!

| 15 दिवसांत अहवाल देण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश

National Commission for scheduled castes | पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) लेखनिकी संवर्गातील (Clerical Cadre) अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी आणि तसेच अन्य पदांच्या पदोन्नती (Promotion) रखडली आहे. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. महापालिका प्रशासनाच्या या कामकाजाला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी महापालिकेची तक्रार भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे (National Commission for scheduled castes) केली होती. याबाबत आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच महापालिका आयुक्तांना (PMC commissioner) चांगलेच सुनावले होते. 30 दिवसांत यावर योग्य कार्यवाही करण्याचे आदेश आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले होते. मात्र याबाबत निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा तक्रार केली. त्यामुळे पुन्हा आयोगाने फटकारले आहे. तसेच 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.  (National Commission for scheduled castes) 
महानगरपालिकेतील प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक”, उपअधीक्षक, (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (वर्ग-२) या पदावर तात्पुरती पदोन्नतीदेण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या कित्येक महिन्यापासून प्रलंबित आहे. याबाबत महापालिका कर्मचाऱ्याकडून 25 मे ला याबाबत तक्रार करण्यात आली होती. भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (National Commission for scheduled castes) याची तात्काळ दखल घेत 1 जून ला महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले होते. आयोगाने म्हटले होते कि, कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे भारतीय आयोग घटनेच्या कलम ३३८ अन्वये आयोगाला बहाल केलेल्या अधिकारांच्या अनुषंगाने, आम्ही तपास करण्याचे ठरवले आहे. यात सुधारणा होईल, अशी आशा आहे.  आणि आयोगाला याबाबत केलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली जाईल. अशी आशा आहे, असे आयोगाने म्हटले होते. आयोगाने आयुक्तांना ३० दिवसांच्या आत आयोगाकडे याबाबत योग्य कार्यवाही करून निवेदन सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र याबाबत कुठली कार्यवाही न झाल्याने कमर्चाऱ्यांनी पुन्हा 26 जून ला पत्र पाठवले. त्यानुसार याची दखल घेत आयोगाने पुन्हा महापालिका आयुक्तांना फटकारले आहे. याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल पाठवण्याचे आदेश आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.  (Pune Municipal Corporation)
—-
News title | PMC Pune Employees Promotion | National Commission for Scheduled Castes rebuked the Municipal Commissioner again!

Vetal Tekadi | वेताळ टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ म्हणून जाहीर करण्याच्या मागणीला जोर | खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थन 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Vetal Tekadi | वेताळ टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ म्हणून जाहीर करण्याच्या मागणीला जोर | खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थन

Vetal Tekadi | पुणे शहरातील वाहतूक कोंडी (Pune Traffic) कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) वेताळ टेकडीवर रस्ता व बोगदा तयार केला जाणार असल्याने पुणेकरांचा याला विरोध होत आहे.  टेकडीवरील प्रकल्प रद्द करून वेताळ टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ, विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. याचे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील समर्थन केले आहे. याबाबत सुळे यांनी महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) पत्र लिहीत पर्यावरण तज्ज्ञांशी चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी केली आहे. (Vetal Tekadi)

 सुप्रिया सुळे  १८ एप्रिल २०२३ रोजी वेताळ टेकडीवर जाऊन पाहणी केली. या प्रकल्पाअंतर्गत बालभारती ते पौड फाटा रस्ता आणि कोथरुड, पाषाण आणिसेनापती बापट रोड यांना जोडणारे दोन बोगदे तयार केले जाणार आहेत. यासाठी वेताळ टेकडी फोडून त्या जागेवर दोन बोगदे आणि एक पूल बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्यामुळे वेताळ टेकडी बचाव कृती समिती व पुणेकरांचा याला विरोध आहे. (Pune News)

विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे देखील गरजेचे आहे. वेताळ टेकडी बचाव कृती समितीने टेकडीवरील प्रकल्प रद्द करून वेताळ टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ, विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. तरी स्थानिक नागरिक, पर्यावरण तज्ञ, तांत्रिक तज्ञ यांच्याशी चर्चा सर्वमान्य मार्ग काढावा. असे सुळे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)
News Title | Vetal Tekadi | Demand to declare Vetal hill as a natural heritage site Support of MP Supriya Sule