New Ward Structure | बदललेल्या प्रभाग रचनेने समाविष्ट गावांवर अन्याय होणार | प्रशांत जगताप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

बदललेल्या प्रभाग रचनेने समाविष्ट गावांवर अन्याय होणार | प्रशांत जगताप

पुणे : राज्य सरकारच्या सत्ता संघर्षानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीचा चुकीचे दिशेने प्रवास चालू करत, निवडणुका चार सदस्य प्रभाग पद्धती प्रमाणे घ्याव्यात असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. हा एकूणच देशातील लोकशाही व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही संपवण्याचे कट कारस्थान आहे असा आमचा थेट आरोप आहे. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

राज्यातील महानगरपालिकांच्या (Corporation) निवडणुका पुढे ढकलून राज्य सरकार ७३ व्या घटना दुरूस्तीने झालेल्या कायद्याचा अवमान करीत आहे. ही भूमिका सर्वोच्च न्यायालयात (Suprme Court Of India) आम्ही मांडली असून या संदर्भातील याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

जगताप म्हणाले, ‘‘आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर येत्या काही दिवसात सुनावणी होईल. देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या या लढ्यामध्ये नक्की यशस्वी होऊ.येत्या काही दिवसात कोर्टाचा निकाल होऊन येत्या दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका होतील. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवनियुक्त सदस्य कारभार पाहतील,असा मला विश्वास आहे.’’

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत पुणेकरांना तब्बल 173 नगरसेवक मिळणार होते परंतु हा नव्याने निर्णय करत असताना यात सात नगरसेवक कमी करण्यात आले आहे त्यामुळे पुणेकरांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळणार नाही. तसेच प्रभागाची संख्या देखील कमी केल्याने या नव्याने समाविष्ट गावांवर निश्चितच अन्याय होणार आहे.

राज्य सरकारचा नव्याने असा प्रयत्न सुरू आहे की, २०१७ सालची प्रभाग रचना व आरक्षण कायम ठेवून त्यावर लवकर निवडणुका घेत असल्याचे कोर्टासमोर दाखवणे. परंतु या रचनेमध्ये नव्याने आलेल्या समाविष्ट गावांचा एकच प्रभाग ते करणार असून , या समाविष्ट ३४ गावांमध्ये तब्बल 15 ते 16 लाख मतदार असून क्षेत्रफळानुसार 50 ते 60 किलोमीटर असा वर्तुळाकार हा प्रभाग करने ही लोकशाहीची एकप्रकारे थट्टाच करण्याचा हा प्रकार चालवला आहे त्याला आमचा विरोध आहे.

सर्व मुद्द्यांचा समावेश असणारी याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली असून या याचिकेद्वारे पुणेसह महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांना दिलासा मिळवून देण्याचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रयत्न आहे. असे ही जगताप म्हणाले.

Ajit Pawar Vs Chandrakant Patil | पुण्यात पाटील विरुद्ध पवार चुरस पाहायला मिळणार 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात पाटील विरुद्ध पवार चुरस पाहायला मिळणार

| चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात गेल्याने पुण्यात भाजप आक्रमक दिसणार

 पुण्यातील एकमेव मंत्रिमंडळ सदस्य म्हणून चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.  पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे पाटील हे त्यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे अजित पवार यांना थेट आव्हान देणार अशी चिन्हे आहेत.  आगामी काळात दोन मोठ्या महापालिका निवडणुका होणार  आहेत. यावेळी भाजप आक्रमक पाहायला मिळणार, असे चित्र दिसते आहे.
 मंगळवारी महाराष्ट्रातील नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील  युती सरकारमध्ये भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे जिल्ह्यातील एकमेव निवडून आलेले आमदार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले पाटील हे पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे.
 महाराष्ट्रात एक  प्रथा आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक मंत्र्यांची नियुक्ती केली जाते आणि त्या जिल्ह्याच्या विकासाकडे मंत्र्याचे वैयक्तिक लक्ष असावे, असे अपेक्षित असते.  सामान्यत: राज्य मंत्रिमंडळातील एखाद्या विशिष्ट जिल्ह्यातील मंत्र्याला त्या जिल्ह्याचे पालकमंत्री केले जाते.  राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व नसेल तर बाहेरच्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते.
 2019 मध्ये, पाटील यांना सहा महिन्यांसाठी पुण्याचे पालकमंत्री करण्यात आले होते.  गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आणि राज्यमंत्रीपद सोडले होते. त्यामुळे पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती.  पाटील पुन्हा पुण्याचे पालकमंत्री झाले तर पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे.
 उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार पडेपर्यंत अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते.  सध्या ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते असून जिल्ह्यातील बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.  अशाप्रकारे, पवार घराण्याचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे पाटील हे त्यांच्या पुणे जिल्ह्यातील बालेकिल्ल्यात पवारांना थेट आव्हान उभे करतील, जे पीएमसी आणि पीसीएमसी या दोन्ही निवडणुका घेण्यास सज्ज आहेत.  2017 ते 2022 पर्यंत चाललेल्या मागील टर्ममध्ये प्रथमच भाजपचे वर्चस्व होते. त्यामुळे आता भाजप आक्रमक होईल, असे मानले जात आहे.

Petition | canceled ward structure | रद्द केलेल्या प्रभाग रचनेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीकडून याचिका दाखल

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

रद्द केलेल्या प्रभाग रचनेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीकडून याचिका दाखल

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने रद्द केलेल्या प्रभाग रचनेच्या विरोधात राष्ट्रवादीकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून पुणे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली आहे.
निवडणुकीत मतदान करणे व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्या त्या परिसरातील विकास कामे करवून घेणे , हा प्रत्येक मतदाराचा मूलभूत हक्क आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषद व नगरपंचायती या ठिकाणी प्रशासक कामकाज पाहत आहेत . ओ.बी.सी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर तात्काळ या सर्व ठिकाणी निवडणुका होणे गरजेचे होते.त्यासाठीची असणारी सर्व तयारी म्हणजेच प्रभाग रचना, प्रभाग निहाय आरक्षण, अंतिम मतदार यादी ही सर्व तयारी पूर्ण झालेली असताना सुद्धा निव्वळ राजकीय हेतूने शिंदे फडणवीस सरकारने ही प्रभाग रचना रद्द केली व राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तब्बल नऊ कोटी नागरिकांना पुन्हा प्रशासक भरोसे कारभारासाठी वाऱ्यावर सोडले, असे जगताप म्हणाले.
जगताप पुढे  म्हणाले,  ही बाब राज्यातील जनतेवर अन्यायकारक असून राज्यातील राज्य संस्थांच्या निवडणुका ताबडतोब व्हाव्यात या हेतूने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे.
आमचा देशातील न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे न्यायव्यवस्था याबाबतचा योग्य तो निर्णय घेत राज्यातील जनतेला दिलासा नक्की देणार असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. असे ही जगताप म्हणाले.

Ward Structure Changes | प्रभाग रचना बदल | राष्ट्रवादी जाणार सर्वोच्च न्यायालयात

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

प्रभाग रचना बदल | राष्ट्रवादी जाणार सर्वोच्च न्यायालयात

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेत शिंदे- फडणवीस सरकारने आज मोठा निर्णय घेत महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली त्यानंतर 2017 मध्ये जी प्रभागरचना होती तीच कायम ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने 2017 प्रमाणे प्रभाग रचना असेल असे जाहीर केले आहे. दरम्यान या निर्णयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

2017 च्या धर्तीवर चार सदस्यीय प्रभागरचना करणं हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. सहा महिने लोकप्रतीनिधी नसताना हाल होत असताना, पुण्यासह राज्यातील इतरही महापालिकांमध्ये वाईट परिस्थीती असतान शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीमंडळाच्या सदस्याविना घेतलेल्या या निर्णयाचा निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व्यक्त करण्यात आला. पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून येणाऱ्या तीन-चार दिवसात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. या निवडणूका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने होत असताना निवडूकात पुन्हा प्रभागरचना बदलणे, चार सदस्यीय प्रभागरचना करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहरप्रमुख प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची सर्व तयारी झाली, आता केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याचीच प्रतिक्षा होती. मात्र, राज्य सरकारने आज घेतलेल्या निर्णयामुळे पुण्यासह राज्यातील सर्व महापालिकेची प्रभाग रचना बदलणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही ओबीसी आरक्षणाचा निकाल देताना ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांची प्रक्रिया जेथे थांबली आहे, तेथून पुढे प्रक्रिया सुरू करा, दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा असे सांगितले होते. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होतील असा अंदाज वर्तविला जात होता. पण आजच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा निवडणूका कधी होणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Again four member wards | पुन्हा चार सदस्यीय प्रभाग | 2017 नुसार वाॅर्ड संख्या

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुन्हा चार सदस्यीय प्रभाग : 2017 नुसार वाॅर्ड संख्या

महापालिका निवडणूक आता अजून लांबण्याची चिन्हे आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने महापालिका निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता 2017 प्रमाणे चारचा प्रभाग असणार आहे. त्यामुळे सध्या तीनच्या प्रभागरचनेनुसार सुरू असलेली निवडणूक तयारी पुन्हा वाया जाण्याची चिन्हे आहेत. याचा भाजपला फायदा होणार असून महाविकास आघाडीला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे.

भाजप सरकारने चारच्या प्रभागानुसार राज्यात 2017 मध्ये अनेक महापालिकांत वर्चस्व मिळवले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने तीनचा प्रभागरचना करून आपल्या सोयीनुसार मतदारसंघ केल्याचा आक्षेप होता. तसेच अनेक महापालिकांत प्रभागांची संख्या महाविकास आघाडी सरकारने वाढवली होती. ही वाढवलेली संख्याही कमी करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आज घेतलेल्या कॅबिनेटमध्ये अधोरेखित केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यातील 18 हून अधिक महापालिकांचे निवडणुकांचे गणित बदलू शकते. अनेक इच्छुकांचा खर्च वाया जाणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थातील नियमबाह्य पद्धतीने वाढवलेली सदस्यसंख्या त्वरीत रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. तेव्हाच शिंदे सरकार जुनीच प्रभाग रचना करण्याच्या मनःस्थिती असल्याचे स्पष्ट झाले होते.

असा आहे सरकारचा निर्णय

नगर विकास विभाग

मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा

मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे ती खालील प्रमाणे :-
३ लाखांपेक्षा अधिक व ६ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ६५ इतकी तर कमाल संख्या ८५ इतकी असेल. ३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १५ हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. ६ लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ८५ इतकी तर कमाल संख्या ११५ इतकी असेल. ६ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक २० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.
३० लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक व २४ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ११५ इतकी तर कमाल संख्या १५१ इतकी असेल. २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १६१ इतकी तर कमाल संख्या १७५ इतकी असेल.
—–०—–

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी ५५ आणि जास्तीत जास्त ८५ अशी सदस्य संख्या अशी आहे. ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान ५० जागा देण्यात येतील. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल.
—–०—–

PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर  | बऱ्याच प्रस्थापित नगरसेवकांना धक्का 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर

| बऱ्याच प्रस्थापित नगरसेवकांना धक्का

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज ओबीसी प्रवर्गासाठी सोडत करण्यात आली. 173 पैकी 46 जागा ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. या आरक्षणामुळे अनेक माजी नगरसेवकांना धक्का बसलेला आहे. विशेषतः यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या नगरसेवकांना त्यांच्या ऐवजी घरातील महिलेला संधी द्यावी लागणार आहे किंवा  दुसऱ्या प्रभागात उमेदवारी मिळवावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दि. २० जुलै, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसुरून  राज्य निवडणूक आयोगाने दि.२२/०७/२०२२ रोजी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी जागा राखून ठेवणे बाबत आदेशित केलेले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती (महिला) यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवल्यामुळे या आरक्षणात कोणताही बदल होत नसल्यामुळे सदर आरक्षण दि. ३१ मे, २०२२ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार राहील. दि. ३१ मे, २०२२ रोजी काढण्यात आलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण याद्वारे रद्द करण्यात येत आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडतीने
जाहीर करण्यात आली आहे.त्यानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला) यांचेकरिता जागा आरक्षित करण्यासाठी शुक्रवार, दि. २९/०७/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा. बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे आरक्षण सोडत आयोजीत करण्यात आलेली होती.

महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार एकूण जागा 173 आहेत. यातील 87 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर 86 या सर्वसाधारण आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण जागा 23 आहेत. त्यातील 12 जागा महिलांसाठी तर 11 जागा सर्वसाधारण आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकूण दोन जागा आहेत. यामध्ये महिलांसाठी 1 आणि सर्वसाधारण 1 जागा आहे. OBC साठी 46 जागा आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 23 आरक्षित आहेत तर उर्वरित 23 या सर्वसाधारण आहेत. तर सर्वसाधारण या 102 जागा आहेत. त्यामध्ये 51 महिलांसाठी आरक्षित आहेत तर 51 या सर्वसाधारण साठी आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग क्र. १ –
धानोरी-विश्रांतवाडी
अ – अनुसूचित जाती ब – अनुसूचित जमाती महिला क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २ –
टिंगरेनगर-संजय पार्क
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३ –
लोहगाव-विमाननगर
अ – अनुसूचित जाती महिला, ब – ओबीसी, क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ४ –
खराडी पूर्व-वाघोली
अ – अनुसूचित जाती महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५ –
खराडी पश्चिम-वडगाव शेरी
अ – ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ६ –
वडगाव शेरी-रामवाडी
अ – ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ७ –
कल्याणीनगर-नागपूर चाळ
अ -अनुसूचित जाती, ब -सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ८ –
कळस-फुलेनगर
अ -अनुसूचित जाती, ब – ओबीसी महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ९ –
येरवडा
अ -अनुसूचित जाती महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १० –
शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी
अ – अनुसूचित जाती महिला, ब -सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ११ –
बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अ -अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १२ –
औंध-बालेवाडी
अ -अनुसूचित जाती, ब – ओबीसी महिला, क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. १३ –
बाणेर-सूस-म्हाळुंगे
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १४ –
पाषाण-बावधन बुद्रुक
अ -अनुसूचित जमाती, ब – ओबीसी महिला, क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. १५ –
गोखलेनगर-वडारवाडी
अ -ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. १६ –
फर्ग्युसन महाविद्यालय-एरंडवणे

अ -ओबीसी महिला, ब -सर्वसाधारण महिला, क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. १७ –
शनिवार पेठ-नवी पेठ
अ – ओबासी महिला, ब -सर्वसाधारण महिला, क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. १८ –
शनिवारवाडा-कसबा पेठ
अ – ओबीसी महिला, ब -सर्वसाधारण महिला, क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. १९ –
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम-रास्ता पेठ
अ -अनुसूचित जाती, ब -ओबीसी महिला, क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. २० –
पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता
अ – अनुसूचित जाती महिला, ब -सर्वसाधारण महिला, क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. २१ –
कोरेगाव पार्क-मुंढवा
अ -अनुसूचित जाती महिला, ब – ओबीसी, क -सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. २२ –
मांजरी बुद्रुक-शेवाळेवाडी
अ -अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण महिला, क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. २३ –
साडेसतरानळी-आकाशवाणी
अ – ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २४ –
मगरपट्टा-साधना विद्यालय
अ -ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. २५ –
हडपसर गावठाण-सातववाडी
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २६ –
वानवडी गावठाण-वैदूवाडी
अ -अनुसूचित जाती महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २७ –
कासेवाडी-लोहियानगर
अ -अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २८ –
महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ
अ -ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २९ –
घोरपडे उद्यान-महात्मा फुले मंडई
अ -ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३० –
जय भवानीनगर-केळेवाडी
अ -ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३१ –
कोथरूड गावठाण-शिवतीर्थनगर
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३२ –
भुसारी कॉलनी-बावधन खुर्द
अ -ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३३ –
आयडियल कॉलनी-महात्मा सोसायटी
अ -ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३४ –
वारजे-कोंढवे धावडे
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३५ –
रामनगर-उत्तमनगर
अ – ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३६ –
कर्वेनगर
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३७ –
जनता वसाहत-दत्तवाडी
अ -अनुसूचित जाती, ब – ओबीसी महिला, क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ३८ – शिवदर्शन-पद्मावती
अ -अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३९ –
मार्केट यार्ड-महर्षिनगर
अ – अनुसूचित जाती महिला, ब – ओबीसी, क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ४० –
बिबवेवाडी-गंगाधाम
अ -ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४१ –
कोंढवा खुर्द-मिठानगर
अ – ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४२ –
रामटेकडी-सय्यदनगर
अ – अनुसूचित जाती महिला, ब – ओबीसी, क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ४३ –
वानवडी-कौसरबाग
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४४ –
काळे-बोराटेनगर-ससाणेनगर
अ -ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४५ –
फुरसुंगी
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४६ –
महंमदवाडी-उरुळी देवाची
अ -अनुसूचित जाती महिला, ब – ओबीसी, क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ४७ –
कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी
अ – अनुसूचित जाती महिला, ब – ओबीसी, क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ४८ –
अपर सुपर इंदिरानगर
अ – अनुसूचित जाती महिला, ब – ओबीसी, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४९ –
बालाजीनगर – शंकर महाराज मठ
अ -ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५० –
सहकारनगर-तळजाई
अ – अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५१ –
वडगाव बुद्रुक-माणिकबाग
अ -ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५२ –
नांदेड सिटी-सनसिटी
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५३ –
खडकवासला-नऱ्हे
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५४ –
धायरी-आंबेगाव
अ -ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५५ –
धनकवडी-आंबेगाव पठार
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५६ –
चैतन्यनगर-भारती विद्यापीठ
अ -ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५७ –
सुखसागरनगर-राजीव गांधीनगर
अ – ओबीसी, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५८ –
कात्रज-गोकुळनगर
अ – ओबीसी महिला, ब – सर्वसाधारण महिला, क – सर्वसाधारण

PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत उद्या  | बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता होणार सोडत कार्यक्रम 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत उद्या

| बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता होणार सोडत कार्यक्रम

पुणे | महापालिका निवडणुकीसाठी याआधी जाहीर केलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार OBC ना देखील आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडतीने जाहीर होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने दि. २० जुलै, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसुरून  राज्य निवडणूक आयोगाने दि.२२/०७/२०२२ रोजी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी जागा राखून ठेवणे बाबत आदेशित केलेले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती (महिला) यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवल्यामुळे या आरक्षणात कोणताही बदल होत नसल्यामुळे सदर आरक्षण दि. ३१ मे, २०२२ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार राहील. दि. ३१ मे, २०२२ रोजी काढण्यात आलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण याद्वारे रद्द करण्यात येत आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडतीने
जाहीर होणार आहे.

त्यानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला) यांचेकरिता जागा आरक्षित करण्यासाठी शुक्रवार, दि. २९/०७/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा. बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे आरक्षण सोडत आयोजीत करण्यात आलेली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या एकूण ५८ प्रभागांपैकी ५७ प्रभाग हे त्रिसदस्यीय असून एक प्रभाग क्र. १. हा द्विसदस्यीय आहे. महाराष्ट्र शासनाने दि. १५/१२/२०२१ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत) नियम, २०२१ मधील तरतुदीनुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार एकूण जागा 173 आहेत. यातील 87 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर 86 या सर्वसाधारण आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण जागा 23 आहेत. त्यातील 12 जागा महिलांसाठी तर 11 जागा सर्वसाधारण आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकूण दोन जागा आहेत. यामध्ये महिलांसाठी 1 आणि सर्वसाधारण 1 जागा आहे. OBC साठी 46 जागा आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 23 आरक्षित आहेत तर उर्वरित 23 या सर्वसाधारण आहेत. तर सर्वसाधारण या 102 जागा आहेत. त्यामध्ये 51 महिलांसाठी आरक्षित आहेत तर 51 या सर्वसाधारण साठी आहेत.

Aundh-Balewadi is the largest ward | औंध-बालेवाडी सर्वात मोठा प्रभाग | दुरुस्तीनंतर धायरी-आंबेगाव मधील 30% मतदार कमी झाले  

Categories
Breaking News PMC पुणे

औंध-बालेवाडी सर्वात मोठा प्रभाग

| दुरुस्तीनंतर धायरी-आंबेगाव मधील 30% मतदार कमी झाले

 पुणे महानगरपालिकेने (PMC) आगामी निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम केल्याने आता औंध-बालेवाडी सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. प्रारूप मतदार यादीत  धायरी-आंबेगाव सर्वाधिक मतदार असलेले मतदार प्रभाग होता. तर आता मगरपट्टा-साधना विद्यालय प्रभागात सर्वात कमी मतदार आहेत.
 पीएमसीने नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवताना आगामी नागरी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर केली होती.  त्याच्या प्रारूप मतदार यादीत, मागील नागरी निवडणुकांच्या तुलनेत शहरातील मतदारांची संख्या आठ लाखांहून अधिक वाढली आहे.  2017 मध्ये, 26,34,798 मतदार वाढले होते, तर आता 34,54,639 मतदार 58 मतदार प्रभागांमध्ये वाढले असून प्रत्येकी तीन नगरसेवक निवडले जातील. एक निवडणूक प्रभाग वगळता ज्यामध्ये दोन नगरसेवक असतील.
 नागरिकांना प्रारुप मतदार यादीची पडताळणी करून त्यांच्या मतदार प्रभागातील मतदार यादीत त्यांची नावे बरोबर असल्याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले होते.  ज्या मतदारांचे नाव भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत आहे परंतु PMC द्वारे प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदार यादीत नाही, त्यांना स्वतःचा समावेश करण्यासाठी जवळच्या क्षेत्रीय  कार्यालयात पोहोचण्यास सांगण्यात आले.
 धायरी-आंबेगाव प्रभागात सर्वाधिक १,०३,९५९ मतदार होते, परंतु ते ३०,१६५ मतदारांनी घटून ७३,७८४ इतके झाले.  अशाप्रकारे, आता सर्वाधिक मतदारांची संख्या औंध बालेवाडी येथे 82,504 मतदार असून त्यानंतर महंमदवाडी-उरुळी देवाची येथे 76,976 मतदार आहेत.  मगरपट्टा-साधना विद्यालय वॉर्ड हा सर्वात कमी मतदारांसह – 33,825 मतदार असलेला निवडणूक प्रभाग राहिला आहे.

Reservation | PMC Election | महापालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर  | ओबीसी आरक्षणाने गणिते बदलली 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

| ओबीसी आरक्षणाने गणिते बदलली

पुणे, नवी मुंबई, वसई-विरारसह 13 महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 29 जुलै रोजी होणार आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. याआधी सोडत काढण्यात आली होती. मात्र ओबीसी आरक्षणामुळे नव्याने सोडत काढण्यात येत आहे. यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.

आणि ज्याअर्थी, मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका (सिव्हील) १९७५६/२०२१ मध्ये दि. २० जुलै, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाने संदर्भाधीन आदेशान्वये महानगरपालिकांच्या सदस्य संख्या प्रभाग रचना व आरक्षण याबाबतचे दि. २८ डिसेंबर, २०२१ चे आदेश सुधारीत केले आहेत. त्यास अनुसरुन आता समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात मात्र एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्यावर जाणार नाही या मर्यादेत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवावयाच्या आहेत. या सुधारणेनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला) अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला) यांच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल होत नाही. मात्र सर्वसाधारण महिलांची सोडत रद्द करून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांची सोडत नव्याने काढणे आवश्यक आहे.

दरम्यान, यासाठी आरक्षण आणि सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
| (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट- ड (मराठी) व परिशिष्ट-इ (इंग्रजी) मधील नमुन्यात जाहीर नोटीस प्रसिध्द करणे. (त्याची स्थानिक वर्तमानपत्र, वेबसाईट, सूचना फलक इ. वर प्रसिध्दी द्यावी.) यासाठी 26 जुलै तारीख देण्यात आली आहे. तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढणे, यासाठी 29 जुलै तारीख देण्यात आली आहे.

सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे त्याची स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी प्रसिद्धी द्यावी यासाठी 30 जुलै  ची मुदत देण्यात आली आहे. तर, प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 30 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत  देण्यात आला असून, आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण सोबतच्या परिशिष्ट-ड मधील नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे यासाठी 5 ऑगस्ट ची मुदत देण्यात आली आहे.

New reservation | PMC election | ५८ पैकी ३४ प्रभागांत नव्याने आरक्षण सोडत करावी लागणार  | निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लवकरच सोडत 

Categories
Breaking News PMC पुणे

५८ पैकी ३४ प्रभागांत नव्याने आरक्षण सोडत करावी लागणार

| निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लवकरच सोडत

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू झाल्याने महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या ५८ पैकी ३४ प्रभागांतील सध्या असलेल्या आरक्षणात पूर्णपणे बदल होणार आहे. या सर्व प्रभागांत नव्याने आरक्षण ठरविण्यात येणार असल्यामुळे यापूर्वीच्या आरक्षणामुळे सुखावलेल्या अनेक इच्छुकांवर पुन्हा टांगती तलवार आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नव्याने सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी दिली.

आगामी महापालिका निवडणुका या तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहेत. यापूर्वीच प्रभागरचना अंतिम करून आरक्षणाची सोडतही काढण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या दोन प्रवर्गाची आरक्षण सोडत ३१ मे रोजी काढण्यात आली. त्यानुसार अनुसूचित जातीच्या २३ जागांपैकी १२ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जमातीच्या २ जागांपैकी एक जागा महिलांसाठी आरक्षित केली आहे. त्यामुळे ५८ प्रभागांपैकी २४ प्रभागांत अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण यापूर्वीच निश्‍चित करण्यात आले आहे. तर ओबीसी आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन निकाल न आल्यामुळे ३४ प्रभागांत सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण या प्रवर्गांतील आरक्षण टाकण्यात आले होते. या आरक्षणामुळे शहरातील अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले होते. तर काही इच्छुकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता.

दरम्यान, काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण लागू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे महापालिकांना पुन्हा आरक्षणाची सोडत काढावी लागणार आहे. या संदर्भात माहिती घेतल्यानंतर ३४ प्रभागांतील आरक्षणाची सोडत नव्याने काढली जाणार आहे. त्यामुळे सध्या या ३४ प्रभागांत जे आरक्षण आहे. त्यामध्ये ओबीसी महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. अ, ब आणि क अशा तीन गटांमध्ये कोणत्या गटात हे आरक्षण पडणार, कोणता प्रभाग खुला तर कुठला ओबीसी महिलांसाठी आरक्षित होणार यावरून आता इच्छुकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. नवीन सोडतीसाठीची तारीख निवडणूक आयोगाकडून निश्चित केली जाणार आहे.