Pune Municipal Corporation | PMC Water Supply Department | फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण होणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम फक्त 60% पूर्ण!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation | PMC water supply department | फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण होणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम फक्त 60% पूर्ण!

| मुदतवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देताना ठेकेदाराला जबरी दंड ठोठावण्याची मागणी

Pune Municipal Corporation | PMC water supply department | कामाचा स्कोप २५% नी कमी करुनही समान पाणीपुरवठा योजनेचे (Equal Water Supply Scheme) काम पाच वर्षांत फक्त ६०% पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये हे काम पूर्ण होणे आवश्यक होते. आता याबाबत पुणे महापालिका प्रशासनाने  (Pune civic body) १६ महिने मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला असून त्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास जबरी दंडाची तरतूद करण्यात यावी. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (President of Sajag nagrik manch Vivek Velankar) यांनी महापालिका आयुक्ताकडे केली आहे. (Pune Municipal Corporation (PMC) )
याबाबत वेलणकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यानुसार   पुणेकरांना २४*७ पाणीपुरवठा करण्यात येईल असे गाजर दाखवून पुणे महापालिकेने ” घर घर मीटर” ( झोपडपट्टी सोडून) बसवणारी दोन हजार कोटी रुपये खर्चाची महत्वाकांक्षी योजना आणली जी फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरु झाली आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. यासाठी २०१८ सालापासून दरवर्षी पाणीपट्टीत १५% वाढ पुणेकरांच्या माथी मारण्यात आली. नंतर आम्ही २४*७ पाणीपुरवठा करणं कसं अशक्य आहे ते दाखवून दिल्यावर महापालिकेने साळसूदपणे *या योजनेचे नावच बदलून ” समान पाणीपुरवठा योजना” असे केले*. (PMC Pune news)
कालच्या सोमवारच्या माहिती अधिकार दिनात या योजनेच्या सद्यस्थितीची माहिती घेतली असता अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आला. (PMC equal water supply scheme)
१) या योजनेचा स्कोपच जवळपास २५% ने कमी करण्यात आला. 1656 किमी नवीन पाइपलाइन टाकणार होते ते कमी करुन 1300 किमी पाइपलाइन टाकण्याचे ठरवले. 3,18,564 पाणीमीटर घराघरात बसवणार होते ते उद्दिष्ट 2,39,673 मीटर वर आणण्यात आले. 82 नवीन टाक्या बांधणार होते ते उद्दिष्ट 67 टाक्यांवर आणण्यात आले.
२) कामाचा स्कोप कमी करूनही पाच वर्षे पूर्ण झाली तरी आज रोजी पाइपलाइन टाकण्याचे काम ६६% , मीटर बसवण्याचे काम ४५% , पाणीपुरवठा टाक्यांचे काम ६६% पूर्ण झाले आहे.
3) मूळ काम २३ फेब्रुवारी २०१८ ला सुरू झाले आणि ते पाच वर्षांत म्हणजे २३ फेब्रुवारी २०२३ ला संपणे आवश्यक होते . कामाचा स्कोप २५% ने कमी केला म्हणजे खरं तर हे काम २५% कमी वेळेत म्हणजेच पावणेचार वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते.
४) काम रखडले म्हणून आजवर कंत्राटदाराला जेमतेम सव्वादोन कोटी रुपये दंड झाला आहे.
५) एवढं सगळं होऊनही आता कंत्राटदाराला आणखी १६ महिने मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे.
(Pune Municipal Corporation)
—–
 आमची विनंती आहे की मुदतवाढीचा प्रस्ताव मान्य करताना त्या नंतरही वेळेत काम पूर्ण झाले नाही तर नंतर प्रतिदिन २ कोटी रुपये अशा जबरी दंडाची अट नमूद करावी जेणेकरून किमान यानंतर तरी काम वेळेत पूर्ण होईल.
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे
—-
Pune Municipal Corporation (PMC) |  Only 60% of work on the same water supply scheme to be completed in February 2023!