Tag: pmc General body
PMC Budget 2024-25 | पुणे महापालिका आयुक्त 7 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!
– स्थायी समिती समोर प्रस्ताव
आवश्यक आहे. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यात बदल करून बजेट मुख्य सभेला सादर करतात. मुख्य सभेत चर्चा होऊन हे बजेट 31 मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक असते. त्यांनतर त्यावर अंमल करता येतो. दरम्यान महापालिका आयुक्तांनी बजेट सादर करण्याची तयारी सुरु केली होती. सर्व विभागाकडून आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. मात्र महापालिका आयुक्तांना अपरिहार्य कारणास्तव उचित कालावधीत बजेट सादर करणे शक्य झाले नाही. आता 7 मार्च ला बजेट सादर करण्याबाबत प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती मार्फत मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे.
Vikram Kumar PMC Commissioner | मुख्य सभेचे ठराव धाब्यावर बसवणाऱ्या महापालिका आयुक्तांची बदली करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
| विवेक वेलणकर यांनी केली मागणी
मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कि, सर्वसाधारण सभेने केलेल्या ठरावाला धाब्यावर बसवून अर्थसंकल्पासारख्या महत्वाच्या विषयाचं गांभीर्य घालवणाऱ्या पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांची तातडीने बदली करावी.
PMC Officers Promotion | General Body Meeting | मुख्य अभियंता पदावर बढती देण्यास मुख्य सभेची मंजूरी |
PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा 1 लाख 60 हजार करण्यास स्थायी समितीची मान्यता | मुख्य सभेसमोर प्रस्ताव
PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या (PMC Pune )शहरी गरीब वैद्यकीय सहायता योजनेत (Urban poor medical support scheme) आता महापालिका प्रशासनाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी प्रशासनाने ऑनलाईन (Online) सुविधा तयार करत बोगस लाभार्थ्यांना लगाम घातला होता. या योजनेत आता पर्यंत 1 लाखांपर्यंत उत्पन्न मर्यादा (Income Limit) असलेल्या कुटूंबानाच सभासद होता येत होते. मात्र, ही उत्पन्न मर्यादा आता 1 लाख 60 हजार रूपये केली जाणार आहे. राज्यशासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या (Mahatma Jyotiba Phule Health scheme) धर्तीवर ही उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. दरम्यान आता आधी महात्मा फुले योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे. तो नाही मिळाला तरच शहरी गरिबचा लाभ दिला जाईल. तसेच शहरात परिमंडळ स्तरावर नवीन 5 सेंटर तयार केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (Standing Committee) समोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला समितीने नुकतीच मंजूरी दिली आहे. हा प्रस्ताव आता मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे. यावर पुढील बैठकीत चर्चा केली जाईल. (PMC Shahari Garib Yojana)
| पुणे महापालिकेची शहरी गरीब योजना काय आहे? (what is PMC Punes Urban poor medical support scheme)
महापालिकेने 2008-09 पासून ही योजना सुरू केली आहे. शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य असले तरी, महापालिकेकडून केवळ वैद्यकीय केंद्र चालविले जातात. तर काही ठराविक दवाखाने वग़ळता महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये शस्त्रक्रिया, उपचार, तपासण्या होत नाहीत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना खासगी दवाखान्यांमद्ये भरमसाठ पैसे मोजून उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे नागरिकांसाठी पालिकेने 2008-09 पासून ही वैद्यकीय सेवा योजना सुरू केली आहे. त्यात, प्रमुख निकष संबधित कुटूंब महापालिका हद्दीतील असावे तसेच त्यांचे उत्पन्न 1 लाखांच्या आत असावे हे आहे. तर या योजनेसाठी महापालिकेने शहरातील खासगी रूग्णालयांचे पॅनेल तयार केले असून या रूग्णालयात या योजनेत 1 लाखांपर्यंतचे तर इतर काही आजारांसाठी 2 लाखांपर्यंत उपचार दिले जातात. मात्र, 1 लाखांच्यावर 1 रूपया अधिक उत्पन्न असले तरी अनेकांना आर्थिक दुर्बल असूनही उपचार मिळत नाहीत. त्यामुळे, पालिकेने आता उत्पन्न मर्यादा 1 लाख 60 हजार रूपये करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune Municipal Corporation)
नवीन 5 सेंटर तयार केले जाणार
शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यासाठी महापालिकेकडून महापालिका भवनात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र काही लोकांना महापालिका भवनात येण्यासाठी कसरत करावी लागते. याबाबत काही लोकप्रतिनिधींनी महापालिकेकेला शहरात सर्व ठिकाणी सेंटर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 5 परिमंडळ स्तरावर 5 सेंटर तयार केले जाणार आहेत. यासाठी प्रति वर्ष 24 लाखाचा खर्च केला जाणार आहे. (PMC Pune News)
PMPML Deficit | PMC General Body | संचलन तुटी पोटी पीएमपीला 217 कोटी देण्यास मुख्य सभेची मान्यता
| 8 समान हफ्त्यात दिली जाणार रक्कम
शासन निर्णयानुसार सन २०१३-१४ या वर्षापासून PMPML संस्थेस येणारी तुट संबंधित महानगरपालिकेने आपल्या स्वामित्व हिश्श्यानुसार PMPML संस्थेस आदा करणेबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार PMPML संस्थेला प्रतिवर्षी संचलन तुटीपोटी पुणे महानगरपालिकेस देय होणारी रक्कम कळविण्यात येते व त्यानुसार पुणे महानगरपालिकेकडून सदरची रक्कम प्रतिमहा PMPML संस्थेस आदा करण्यात येते. (Pune Municipal Corporation News)
PMC Pune Employees Promotion | अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी पदोन्नती | दुरुस्तीच्या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता
| महापालिका आता प्रस्ताव सरकारकडे पाठवणार
| महापालिकेने मागवले होते मार्गदर्शन
PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी पदी पदोन्नती
| महापालिका आयुक्तांनी जारी केले आदेश
पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ नुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदाच्या मंजूर पदांपैकी ३ पदे नामनिर्देशनाने/सरळसेवेने व ४ पदे वैद्यकिय अधिकारी / निवासी वैद्यकिय अधिकारी या संवर्गातून पदोन्नतीने भरणेची तरतुद करण्यात आलेली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) सुधारित आकृतीबंधानुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी या संवर्गाची एकूण ७ पदे मंजूर करण्यात आलेली असून ५ पदे आरोग्य विभागाकरिता व २ पदे घनकचरा व्यवस्थापन विभागाकरिता मंजूर करण्यात आलेली आहेत. नामनिर्देशनाने / सरळसेवेने मंजूर करण्यात आलेल्या ३ पदांपैकी २ पदे यापुर्वी भरलेली असून सद्यस्थितीत १ पद रिक्त आहे. तसेच पदोन्नतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या ४ पदांपैकी ३ पदे (तात्पुरत्या/ तदर्थ पदोन्नतीने) भरलेली असून सद्यस्थितीत १ पद रिक्त होते. (Pmc Pune news)
PMC Pune Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात आता 187 नवीन पदे | पदनिर्मितीस राज्य सरकारची मंजूरी
| 160 कर्मचाऱ्यांना कायम केले जाणार
पुणे महानगरपालिका (PMC Pune) क्षेत्रात केंद्र शासन, राज्य शासन यांच्या विविध कल्याणकारी योजना (Social Welfare Schemes) तसेच, महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी, महिला व बाल कल्याण, युवक कल्याणकारी, दिव्यांग कल्याणकारी या योजनेअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे महत्वाचे कामकाज समाज. विकास विभागामार्फत केले जाते. यासाठी पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) समाज विकास विभागात व्यवसाय गट ” मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समुपदेशक, समूहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, स्वच्छता स्वयंसेवक या पदांवर मासिक एकवट मानधन तत्वावर कर्मचारी काम करीत आहेत. मात्र या पदांची पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागास (PMC Social Devlopment Department) आवश्यकता असल्याने, पुणे महानगरपालिका च्या वतीने या पदांची पदनिर्मिती करणे व त्या पदांवर या सेवकांना सामावून घेण्याबाबत मुख्य सभेने (PMC Général Body) मान्यता दिली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी समाज विकास विभागात १८७ पदांची पदनिर्मितीस मंजूरी मिळणे व त्या पदांवर १६० कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेणेबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलेला होता. कारण पुणे महानगरपालिकेच्या सर्व पदांच्या आकृतीबंध मध्ये या पदांचा समावेश नव्हता. त्यामुळे सदर पदांची निर्मिती करणे आवश्यक होते. त्यानुसार राज्य सरकारने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. (Pune Municipal Corporation News)
PMC Pune Assistant Commissioner | महापालिका सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार केला जातोय बदल
| वर्ग 3 मधील पदविका (Diploma) मिळवलेला कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक महापालिका आयुक्त
| विधी समिती समोर प्रस्ताव
त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील सहाय्यक आयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी होती. 50% पदोन्नती ही महापालिका कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठेतेनुसार केली जात होती. (Pune Municipal Corporation)
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
2. निवड पद्धतीने पदोन्नती – ५०%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१, २ व ३ मधील किमान ५ वर्षाचा अनुभव धारण करणारे कर्मचारी यांच्या मधून परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार निवड पद्धती नियुक्तीने.
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पूर्ण वेळ पदवी/पदविका
2. निवड पद्धतीने पदोन्नती – ५०%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पूर्ण वेळ पदवी/पदविका धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१, २ व ३ मधील किमान ५ वर्षाचा अनुभव धारण करणारे कर्मचारी यांच्या मधून परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार निवड पद्धती नियुक्तीने.