Tag: PMC News
On the occasion of Pune Municipal Corporation’s anniversary, three days of various cultural programs for employees and officers!
Action by Pune Municipal Corporations (PMC) building devlopment Department in Pashan area
PMC Illegal Construction Action | पाषाण परिसरात महापालिका बांधकाम विभागाकडून कारवाई
PMC Illegal Construction Action | पाषाण येथे HEMRL च्या प्रतिबंधित क्षेत्रातील विनापरवाना फर्म हाऊस वर कारवाई करण्यात आली. यावेळी 1500 चौरस फुट मापाचे RCC चे सुरू असलेले पक्के बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. (Pune Municipal Corporation (PMC)
11 ते 12 बांधकामांना नोटिस देण्यात आली असून त्यावर पुढील आठवड्यात कारवाई करण्यात येणार आहे. यातील काही मिळकत चे मालकांनी नी में. उच्च न्यायालय कडून स्थगिती आदेश प्राप्त केले आहेत. स्थगिती आदेश उठल्यावर त्यावरही कारवाई केली जाणार आहे. असे उप अभियंता सुनिल कदम यांनी सांगितले. (PMC Building Devlopment Department)
ही कारवाई कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, उप अभियंता सुनिल कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे , समीर गढई यांनी एक JCB, गॅस कटर , ब्रेकर, 10 बिगारी व पोलिस बंदोबस्त चे मदतीने पूर्ण केली.
PMC Employees Promotion | विभागीय परीक्षा नाही, पदवी नाही, टायपिंग नाही तरीही सेवाजेष्ठता यादीत वरचे स्थान!
| महापालिकेच्या मूळ कर्मचाऱ्यांनी समाविष्ट गावातील आणि शिक्षण मंडळाकडून आलेल्या कर्मचाऱ्या बाबत घेतला आक्षेप
पुणे महानगरपालिकेत शिक्षण मंडळ आणि ग्रामपंचायत यांचा समावेश झाला आहे. परंतु समावेशन करताना मुळ सेवकांवर प्रशासनाने अन्याय केला आहे. कमी काळ सेवा झालेले सेवक तसेच शैक्षणिक अर्हता पूर्ण नाही व विभागीय परिक्षा उत्तीर्ण नसताना त्यांना सेवाजेष्ठाता यादीत अव्वल स्थान पुणे मनपाच्या काही अधिकाऱ्यांच्या मेहरबानीने दिले गेल्याचे दिसुन येत आहे. प्रशासनाने या बाबत गांभीर्याने लक्ष घालुन सेवाजेष्ठाता यादीत दुरुस्ती न केल्यास सर्व कामगार लेखणी बंद आंदोलन करतील. याची दक्षता घ्यावी.
PMC is positive about providing homes to transgender employees!
| A proposal to be made by the PMC Security Department
Finally, the PMC officers in the engineering cadre have been promoted to the post of Superintending Engineer (Civil)!
| PMC Commissioner’s orders issued
PMC Officers Promotion | अखेर अभियांत्रिकी संवर्गातील अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता (स्थापत्य) पदी पदोन्नती!
| महापालिका आयुक्तांचे आदेश जारी
Also Read this News | हक्काची पदोन्नती उशिरा मिळते; आणि मिळाली तर वरिष्ठाकडून आदेश द्यायला वेळ लावला जातो
Sanitary Napkins in PM Schools | पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशन कडून पुणे महापालिका शाळेत विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटप
| प्रथम कर्तव्य समजून पुण्यातील महापालिकेच्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटणार- प्रमोद नाना भानगिरे
Sanitary Napkins in PMC Schools | पुणे शहरातील महापालिकेच्या शाळेतील (PMC Pune Schools) विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिन चा पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे विद्यार्थिनींची होणारी गैरसोय, आरोग्याची अडचण टाळण्याकरित पुणे शहर शिवसेना (Pune Shivsena) व एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या (Eknath Shinde Foundation) वतीने सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले. अशी माहिती शहर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire Pune Shivsena) यांनी दिली.
प्रमोद नाना भानगिरे पुढे म्हणाले की पुणे महानगरपालिकेत गेल्या तीन वर्षापासून सॅनिटरी नॅपकिन चे वाटप झालेले नाही. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये व आर्थिक अडचण लक्षात घेता आम्ही हे अभियान संपूर्ण पुण्यात राबविणार आहोत. शहरातील महापालिकेच्या शाळेतील किशोरवयीन 25 हजार 695 विद्यार्थिनींना या अभियानाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन पुरवले जाणार आहेत. पालिकेच्या यंत्रणेला वेळ लागतोय आणि यामुळे मुलींची गैरसोय होता कामा नये हा या मागचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटरी नॅपकिन चा पुरवठा शिवसेनेतर्फे करण्यात येणार असल्याचे भानगिरे यांनी जाहीर केले. पुणे महानगरपालिकेने गेल्या चार वर्षापासून मुलींच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सॅनिटरी नॅपकिन दिलेले नाहीत. मागील दोन वर्षात ठेकेदाराच्या वादात निविदा रद्द करण्यात आल्या. तसेच दरवर्षी 26000 नॅपकिन पालिकेकडून पुरवल्या जातात. मात्र दोन वर्षापासून हा पुरवठा झालेला नसल्या कारणाने विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर, शहर प्रवक्ते अभिजित बोराटे, माजी नगरसेविका सोनालीताई लांडगे, शहर समन्वयक शंकर संगम, महिला उपशहर प्रमुख श्रद्धा शिंदे,श्रुती नाझिरकर, विधानसभा प्रमुख संतोष लांडगे, सुनीता उकिरडे,नेहा शिंदे,आकाश शिंदे, आकाश रेणुसे व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.