Draft DP of 11 villages | PMC Pune | समाविष्ट 11 गावांचा प्रारूप विकास आराखड प्रसिद्ध करण्यासाठी 1 मार्च पर्यंत मुदतवाढ!

Categories
Breaking News PMC social पुणे

Draft DP of 11 villages | PMC Pune | समाविष्ट 11 गावांचा प्रारूप विकास आराखड प्रसिद्ध करण्यासाठी 1 मार्च पर्यंत मुदतवाढ!

| महापालिका सरकारला पाठवणार प्रस्ताव

| निवडणूक आचारसंहिता व टाळेबंदी चे आले अडथळे

Draft DP of 11 villages | PMC Pune | पुणे | महापालिका हद्दीत (Pune Municipal Corporation Limits) 2017 साली आसपासची 11गावे समाविष्ट झाली होती. त्याचा इरादा प्रशासनाने 2018 ला जाहीर केला होता. विकास आराखडा तयार करून हरकती सूचना मागविण्यासाठी महापालिकेला दोन वर्ष ची मुदत देण्यात आली होती. मात्र मधील काळात तीन निवडणुकांच्या आचारसंहिता (Election Code of conduct) आणि कोविड महामारीमुळे (Covid) महापालिका विहित मुदतीत आराखडा बनवू शकली नाही. त्यामुळे महापालिकेने  25 जून 2022 पर्यंत चा वेळ मागितला होता. मात्र याही कालावधीत आराखडा प्रसिद्ध झाला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता 1 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ मागितली आहे. तसा एक प्रस्ताव सरकार ला पाठवला जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला असून तो शहर सुधारणा समिती (City Improvement Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Draft DP of 11 villages | PMC Pune)

: 2017 साली समाविष्ट झाली होती गावे

महानगरपालिका हद्दीमध्ये  ११ गावांचा४.१०.२०१७ रोजी समावेश करण्यात आला आहे. यामध्ये १) लोहगाव (उर्वरित), २) मुंढवा (उर्वरित केशवनगर), ३) हडपसर (साडेसतरानळी), ४) शिवणे (उत्तमनगर), ५) शिवणे, ६) आंबेगाव खु., ७) उंड्री, ८) धायरी, ९) आंबेगाव बु., १०) फुरसुंगी, ११) उरुळी देवाची यांचा समावेश आहे.  महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २३ अन्वये सदर ११ गावांचा प्रारुप विकास आराखडा तयार करणेबाबतचा इरादा ४.१०.२०१८ रोजी शासकीय राजपत्रात व दैनिक वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात आला. समाविष्ट ११ गावांचे विद्यमान जमीन वापराचे नकाशे व अहवाल तयार करण्याचे कामाकरीता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २५ नुसार ३०.६.२०२० पर्यंत मुदतवाढ प्राप्त झाली होती. सदर मुदतीत विद्यमान जमीन वापर सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. विकास आराखडा नागरिकांच्या हरकती व सूचनांकरीता प्रसिध्द करणेसाठीची मूळ मुदत कलम २३ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २६(१) अन्वये. इरादा जाहिर केल्यापासून दोन वर्षांपर्यंत आहे. तथापि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १४८(अ) नुसार विकास आराखड्याचे कामकाजाच्या अनुषंगाने मुदत कालावधी विचारात घेताना निवडणुक आचारसंहितांचा कालावधी मुदतीमधून वगळण्याची तरतुद आहे. तसेच दि. ३१.८.२०२० रोजीच्या एमआरटीपी अॅक्ट १९६६ चे कलम १४८(अ) मधील सुधारणा अधिसूचनेनुसार राज्यामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही महामारीच्या किंवा साथीच्या रोगाच्या फैलावास किंवा आपत्तीजन्य परिस्थितीस प्रतिबंध करणेकरीता  राज्य शासनाने केलेल्या कोणत्याही मार्गदर्शक तत्वांच्या किंवा टाळेबंदी उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे सदर कालावधी मुदतीमधुन वगळण्याची तरतुद करण्यात आली आहे. महापालिकेने काही दिवसापूर्वी पूर्ण बारा महिने मुदतवाढ न घेता त्यापैकी सहा महिने म्हणजे २६.१२.२०२१ पासून पुढे सहा महिने म्हणजे  २५.६.२०२२ अखेर मुदतवाढीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. मात्र याही कालावधीत आराखडा प्रसिद्ध झाला नाही. (Pune Municipal Corporation News)

738 दिवस वगळावे लागणार

शहर सुधारणा समितीच्या प्रस्तावानुसार कोरोना महामारीच्या अनुषंगाने टाळेबंदी. २४.३.२०२० पासून देशभरात लागू झाली. त्यानुसार   २४ मार्च २०२० पासून ३१ मार्च २०२२ पर्यंतचा कालावधी टाळेबंदीचा
कालावधी ग्राह्य धरण्यात आला आहे. एकूण दिवस ७३८ आहेत. ते या कालावधीतून वगळण्यात येतील. दरम्यान राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांची नगर रचना अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती. परंतु सदर नगर रचना अधिकारी हे वयोपरत्वे ३१.०७.२०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचे ऐवजी नव्याने नगर रचना अधिकारी म्हणून अधिक्षक अभियंता युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh) यांची नगर रचना अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सर्वंकष वाहतुक आराखड्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभोवती वर्तुळाकार रस्ता प्रस्तावित केला आहे. या नियोजित बाह्य वर्तुळाकार रस्त्याची अंतिम ६५ मी. रुंदी व आखणी पुणे महानगरपालिकेस दि.११.०५.२०२३ रोजी प्राप्त झाली. वर्तुळाकार रस्त्याच्या आखणी ११ गावांपैकी धायरी, आंबेगाव खु., उरुळी देवाची, फुरसुंगी, लोहगाव या
गावांमधून जाते. त्यामुळे सदर ६५ मी. वर्तुळाकार रस्त्याची आखणी ११ गावांच्या प्रारूप विकास आराखड्यात घेणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार  समाविष्ट ११ गावांचा प्रारुप विकास आराखडा नमुद वस्तुस्थितीमुळे मूळ मुदत अधिक अनुज्ञेय मुदतवाढीच्या
कालावधीत म्हणजेच १.३.२०२४ अखेर प्रसिध्द करता येऊ शकेल. असे प्रस्तावात म्हटले आहे. त्यानुसार या प्रस्तावाला शहर सुधारणा आणि मुख्य सभेची मान्यता घेऊन सरकारकडे पाठवला जाईल. सरकारने मान्यता दिल्यानंतर यावर हरकती सूचना घेऊन आराखडा प्रसिद्ध केला जाईल. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Pune News)
—-
समाविष्ट ११ गावांचा प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यासाठी 1 मार्च ची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला शहर सुधारणा आणि मुख्य सभेची मान्यता घेऊन सरकारकडे पाठवला जाईल. सरकारने मान्यता दिल्यानंतर यावर हरकती सूचना घेऊन आराखडा प्रसिद्ध केला जाईल.
युवराज देशमुख, नगर रचना अधिकारी तथा अधिक्षक अभियंता 
—–
News Title | Extension of time till March 1 to publish the development plan of the 11 villages involved! The proposal will be sent to the Municipal Government

PMC Pune Water Supply Department | होळकर जलशुद्धीकरण केंद्रापासून चिखलवाडी स्टेडीयम (बोपोडी) पर्यंत पुणे मनपा हद्दीबाहेर उच्चदाब जलवाहिनी टाकली जाणार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Water Supply Department | होळकर जलशुद्धीकरण केंद्रापासून चिखलवाडी स्टेडीयम (बोपोडी) पर्यंत पुणे मनपा हद्दीबाहेर उच्चदाब जलवाहिनी टाकली जाणार

| 5.33 कोटींचा खर्च येणार

PMC Pune Water Supply Department | समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत (PMC Equal water supply project) होळकर जलशुद्धीकरण केंद्रापासून (Holkar Water treatment plant) चिखलवाडी स्टेडीयम (बोपोडी) पर्यंत पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेर खडकी येथील इतर शासकीय संस्थांच्या मालकीच्या २८३० मी लांबीच्या रस्त्यामधून ६१० एम एम व्यासाची उच्चदाब जलवाहिनी टाकली जाणार आहे. या प्रकल्पीय कामासाठी 5.33 कोटी इतका खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) शहर सुधारणा समिती (City improvement committee) समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Pune water supply department)

प्रशासनाच्या प्रस्तावानुसार समान पाणी पुरवठा प्रकल्पाच्या अंतर्गत चिखलवाडी (बोपोडी) येथे स्टेडियम मध्ये ३.५ एम एल क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरु आहे. मान्य डीपीआर व Hydraulic Design प्रमाणे बोपोडी झोनच्या अंतर्गत सन २०३२ साली एकूण लोकसंख्या ७४८०९ येत असून त्यांची पाण्याची मागणी १७.०१ एम एल डी राहील. तसेच सन २०४७ साली ७७६४५ इतकी लोकसंख्या येत असून पाण्याची मागणी १८.८३ एम एल डी येत आहे. त्यासाठी या झोन साठी ६.२.१ एम एल पाण्याची साठवण क्षमता येत आहे. त्या नुसार ३ एम एल व ३.५ एम एल अशा दोन टाक्या प्रस्तावित असून त्यापैकी ३.५ एम एल क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरु आहे. (PMC Pune equal water supply project)

२४× ७ पाणीपुरवठा प्रकल्प विभागाच्या (PMC Pune 24*7 water supply project) अंतर्गत पुणे शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्या टाकणे पकेज ७ अंतर्गत समान पाणी पुरवठा प्रकल्पाच्या मान्य डीपीआरप्रमाणे वरील टाक्यांना पाणी पुरविण्यासाठी होळकर प्लांट पासून चिखलवाडी बोपोडी पर्यंत ६१० एम एम व्यासाची एम एस उच्च दाब जल वाहिनी टाकणे नियोजित आहे. जलवाहिनी ही होळकर प्लांटच्या बाहेर आल्यावर मुळा रोडने जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर येऊन त्यानंतर ती पुढे  पुणे-मुंबई महामार्ग व रेल्वे लाईन ओलांडून अम्युनिशन फॅक्टरी व संरक्षण विभागाच्या जागेतून बोपोडी मधील चिखलवाडी स्टेडीयमकडे जाते. या जलवाहिनीची एकूण लांबी ही ४९०० मीटर असून पुणे शहराच्या बाहेर अम्युनिशन फॅक्टरी, खडकी छावणी परिषद व संरक्षण विभागामध्ये खडकी भागात या जल वाहिनीची एकूण लांबी सुमारे २८३० मीटर आहे. (PMC Pune News)

२४× ७ पाणीपुरवठा प्रकल्प विभागाच्या अंतर्गत पुणे शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्या टाकणे पकेज ७ अंतर्गत एकूण र.रु. ६४.४७ कोटीच्या पूर्वगणन किमतीस तांत्रिक समितीची  मान्यता घेण्यात आलेली आहे. वरील एकूण ४९०० मीटर लांबीसाठी मूळ कामाच्या पूर्वगणित रक्कम ६४.४७ कोटीपैकी या ४९०० मीटर लांबीपैकी पुणे महानगरपालिका हद्दीच्या बाहेर असलेल्या २८३० मी लांबीच्या ९.२२ कोटी अंदाजित खर्च येत आहे. जलवाहिनीच्या अनुषंगाने व तेथे असणाऱ्या आवश्यक त्या आयटेमनुसार रु. ९.२२ कोटीपैकी सुमारे ५.३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. २४x ७ पाणीपुरवठा प्रकल्प विभागाच्या अंतर्गत पुणे शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्या टाकणे पकेज ७ अंतर्गत एकूण र.रु. ६४.४७ कोटी हा खर्च  चालू आर्थिक वर्षाच्या तरतुदीमधून करण्यात येणार आहे. या कामात भाववाढ सूत्राचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation News)
रेल्वे लाईनला असलेल्या समांतर रस्त्यावरून पाईप लाईन टाकण्यास खडकी भागात अॅम्युनिशन फॅक्टरी यांनी व डिफेन्स इस्टेट ऑफिसर पुणे विभाग यांनी परवानगी दिली आहे. खडकी छावणी परिषद यांच्याकडून जलवाहिनी टाकणे संदर्भात परवानगी मिळण्यासाठी आवश्यक ते प्रशासकीय शुल्क भरणेबाबत त्यांनी पुणे महानगरपालिका यांना पत्र दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. (PMC Pune Marathi News)
समान पाणीपुरवठा प्रकल्पीय कामाची निकड लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीच्या बाहेर हे काम करावयाचे असल्याने व या कामावर होणारा प्रकल्पीय खर्च महानगरपालिकेच्या मान्यतेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कोणत्याही प्रयोजनासाठी शहराबाहेर करता येईल अशी तरतूद या अधिनियमाच्या कलम ८९ मध्ये नमूद केली आहे. त्यानुसार हे काम केले जाणार आहे. यावर शहर सुधारणा समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल. (PMC water supply department)
—–
News title | PMC Pune Water Supply Department | A high pressure pipeline will be laid outside Pune municipal limits from Holkar water treatment plant to Chikhalwadi Stadium (Bopodi).