PMC Pune Cycle Rally | पुणे महापालिकेच्या सायकल फेरीत  २ हजार २०० नागरिक सहभागी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Cycle Rally | पुणे महापालिकेच्या सायकल फेरीत  २ हजार २०० नागरिक सहभागी

| जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन

PMC Pune Cycle Rally | पुणे येथे होणाऱ्या जी-२० ‘डिजिटल इकॉनॉमी’ (G 20 Summit Pune) कार्य गट बैठकीच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने (PMC Pune Cycle Club) लोकसहभागासाठी सायकल फेरीचे (Cycle Rally) आयोजन करण्यात आले. ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा’ हा संदेश घेऊन आयोजित सायकल रॅलीचा शुभारंभ अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्या हस्ते करण्यात आला. सायकल फेरीमध्ये सुमारे २ हजार २०० नागरिक सहभागी झाले. (PMC Pune Cycle Rally)

पुणे मनपा मुख्य भवन, मॉडर्न कॅफे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा मार्गे मनपा भवन येथे सायकल फेरीचा समारोप झाला. उत्साहाच्या वातावरणात विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांनी या सायकल फेरीत सहभाग घेतला. सहभागी सर्व सायकल स्वारांना पदक प्रदान करण्यात आले. (Pune Municipal Corporation)

सायकल फेरीचे नेतृत्व पुणे मनपा सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी (PMC Cycle Club co-ordinator Suresh Pardeshi) यांनी केले. महिला गटाचे नेतृत्व नेहा भावसार (Neha Bhavsar) यांनी केले.

यावेळी मनपा उपायुक्त चेतना केरुरे, माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे , अधीक्षक अभियंता राजेंद्र तांबे, सुरक्षा अधिकारी राकेश विटकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000

News Title | PMC Pune Cycle Rally | 2 thousand 200 citizens participated in the bicycle round of Pune Municipal Corporation | Organized bicycle tour in the background of G-20 meeting

PMC Pune Cycle Rally | पुणे महापालिकेच्या G 20 सायकल रॅलीत तुम्ही देखील सहभागी होऊ शकता | वाचा सविस्तर

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Cycle Rally | पुणे महापालिकेच्या G 20 सायकल रॅलीत तुम्ही देखील सहभागी होऊ शकता | वाचा सविस्तर

PMC Pune Cycle Rally | पुणे महानगरपालिका सायकल क्लब (PMC Pune Cycle club) च्या वतीने G20 च्या निमित्ताने भव्य सायकल रॅली (Pune cycle rally) शनिवार दिनांक 10 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.  सोबत दिलेल्या लिंक वर आपण मोफत नोंदणी करून G 20 रॅलीमध्ये (G 20 cycle rally) सहभागी होऊ शकता. रॅलीमध्ये सहभागी सर्व सायकल स्वारांना G 20 टी-शर्ट, टोपी, मेडल देण्यात येणार आहे. तसेच रॅली समाप्तीनंतर अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली आहे.  G20 निमित्त आयोजित याभव्य सायकल रॅलीमध्ये सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे. असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले
आहे. (PMC Pune cycle rally)
सहभागी होण्याची लिंक
https://bit.ly/G20CycleRally
यांना संपर्क करा
मुख्य समन्वयक
सुरेश परदेशी 9689931094.
पुणे महानगरपालिका सायकल क्लब.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रशांत गवळी 8668712382
विशाल भोसले
9689937275
विशाल पाटील
9921976938
उमाकांत डीग्गीकर
9689931777
महेश कारंडे
9689939798
अभिमन्यू गाडे
9689931514
पुनम दर्डीगे
7020973954
SR नेहा भावसार
8459326684
News Title | PMC Pune Cycle Rally | You can also participate in Pune Municipal Corporation’s G 20 Cycle Rally Read in detail