PMC Pune Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या ई लर्निंग स्कुल मध्ये शिपायापासून ते शिक्षक पदांसाठी भरती! 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

PMC Pune Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या ई लर्निंग स्कुल मध्ये शिपायापासून ते शिक्षक पदांसाठी भरती!

| 8 ते 14 जून पर्यंत करू शकता अर्ज

PMC Pune Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) राजीव गांधी ई लर्निंग स्कुल (Rajiv Gandhi E learning school) मध्ये विविध पदांसाठी सहा महिने मुदतीसाठी मानधन तत्वावर भरती (PMC Recruitment) करण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून (PMC Éducation department) याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 42 शिक्षक पदे 15 शिक्षकेतर पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये शिपायापासून ते शिक्षक पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार यासाठी 8 ते 14 जून या कालावधीत अर्ज करू शकतात. अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune Bharti 2023)

पुणे महानगरपालिका संचलित राजीव गांधी ॲकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन, या सी.बी.एस.ई. बोर्ड मान्यता प्राप्त कायम विनाअनुदानीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी सहा महिने मुदतीसाठी एकवट मानधनावर करार पध्दतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. ह्या नियुक्त्या दरमहा एकवट मानधनवर नेणूका करणेत येणार आहेत. उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज ८ ते १४ जून, २०२३ या कालावधीत शासकीय सुट्टी वगळून राजीव गांधी ॲकॅडमी ऑफ ई- लर्निंग स्कूल, शिवदर्शन, पुणे ४११००९ येथे शाळेच्या कामकाजाच्या काळात सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत या वेळेत समक्ष जमा करावेत. या कालावधीनंतर उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (PMC Pune recruitment 2023)

या वेबसाईट वर अर्ज मिळेल
https://www.pmc.gov.in/sites/default/files/recruitment/RJ.pdf
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी सहा महिने मुदतीसाठी दरमहा एकवट मानधन करार पध्दतीने भरावयाची पदे
शिक्षक पदे 
पदनाम                  पदे
शाला प्रमुख           1
पर्यवेक्षक               1
दुय्यम शिक्षक
  (माध्यमिक).       35
दुय्यम शिक्षक
(प्रायमरी).               5
शिक्षकेतर पदे 
 कनिष्ठ लिपिक         2
पूर्णवेळ ग्रंथपाल         1
प्रयोगशाळा सहायक
कॅम्पुटर लॅब                1
प्रयोगशाळा सहायक
विज्ञान प्रयोगशाळा      1
शिपाई                       10
सर्वसाधारण अटी या असतील 
१) शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक या पदाचे इच्छुक उमेदवारांचे पूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमामध्ये झालेले असणे आवश्यक आहे.
२) सर्वसाधारण खुल्या गटासाठी वयो र्गादा ही ४० वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांस शासकीय नियमानुसार वयो र्गादा ही ४५ वर्षे राहील.
३) मागासवर्गीय उमेदवारांच्या नावाचा जातीचा दाखला व वैधताप्रमाणपत्र असणे आवश्यक.
४) या जाहिर प्रकटनातील शिक्षक पदासमोर दर्शविण्यात आलेल्या दरमहा एकवट मानधन करार पध्दतीने सहा महिने मुदतीसाठी शैक्षणिक मेरीट / गुणात्मक्तेने नेणूकीसाठी उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज दिनांक ८ ते १४ जून, २०२३ या कालावधीत राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन, पुणे ४११००९ येथे शाळेच्या कामकाजाच्या काळात सकाळी ८ ते ११ ते दुपारी ३ पर्यंत या वेळेत समक्ष जमा करावेत. या कालावधीनंतर उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
५) अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रमाणीत केलेल्या छायामुद्रांकीत/ झेरॉक्स प्रती जोडण आवश्यक आहे. तसेच अर्ज पडताळणीसाठी सर्व छायामुद्रांकीत प्रतींच्या मूळ प्रती दाखविणेआवश्यक असल्याने येताना त्या घेऊन याव्यात. अपूर्ण अर्ज असल्यास बाद करणेत येऊन तो कार्यालयीन कागदपत्र म्हणून जमा करणेत येईल.
६) उमेदवार निवडीचे आणि काही कारणाने कोणताही बदल करण्याचे सर्व अधिकार मा. महापालिका आयुक्तांना आहेत.
७) उमेदवार निवडीसाठी कोणताही राजकीय, पदाधिकारी, अधिकारी यांचा दबाव आणल्यास सदर उमेदवारास अपात्र ठरविले जाईल याची नोंद घ्यावी.
८) निवड झालेल्या उमेदवाराची नेमणूक ही करारपध्दतीने एकवट मानधनावर आणि ठराविक मुदतीसाठी आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येणार असून उमेदवारास कोणत्याही स्वरुपाचे कायम नेणुकीविषयी हक्क सांगता व मागता येणार नाही. तसेच नियमित सेवकाचे कोणतेही फायदे लागू राहणार नाही. (Pune Mahanagarpalika Bharti 2023)
——
News Title | PMC Pune Bharti 2023 | Pune Municipal Corporation’s e-learning school recruitment for the posts from soldier to teacher!

Rajeev Gandhi E learning School | राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा!

Categories
Breaking News Education PMC पुणे

Rajeev Gandhi E learning School | राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा!

 Rajeev Gandhi E Learning School | गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या देशातील पहिल्या  राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने   (Rajeev Gandhi E learning school) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालात (12th Results)!यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. (PMC Pune Rajeev Gandhi e learning school)
 महाराष्ट्रातील महानगरपालिकेत पहिल्यांदाच 93 टक्के गुण संपादन करणारे विद्यार्थी राजीव गांधी इ लर्निंग कनिष्ठ महाविद्यलयात घडत आहेत याचा अभिमान असून यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे माजी उपमहापौर आबा बागुल (Former Deputy mayor Aaba Bagul) यांनी अभिनंदन केले आहे.
 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  बारावी परीक्षेला २८३  विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी  चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.  अनुष्का टेमगिरे  [ ९३  टक्के ] सानिका देवकुळे [ ९१ टक्के ] विराज चिंटा  [ ९० टक्के ]  या विद्यार्थ्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच महानगरपालिकेच्या विद्यालयात  वर्षिका मुथ्था हिने गणितात शंभर पैकी शंभर तर मल्टिस्किल या विषयात अनस बैग याने शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलमध्ये आर्थिक दुर्बल घटकासह मध्यमवर्गीयांची मुले शिक्षण घेतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे.    शाळेची स्थापना माझ्या पुढाकारातून झाली. स्थापनेपासून  सलग उत्कृष्ट निकालाची परंपरा राखण्यात यश मिळाले आहे.केवळ दहावी -बारावीमध्येच नाही तर आयआयटीमध्येही या शाळेतील विद्यार्थी टॉपर ठरले आहेत.  विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यासाठी   शिक्षकवर्ग , सर्व लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे असेही  आबा बागुल यांनी नमूद केले. (12th results)
—-
News title | Rajeev Gandhi E learning School | राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा!