PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा 

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा

PMC Teachers Agitation Update | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात (PMC Education Department) काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९3 शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास (Agitation) बसले आहेत. या आंदोलनाला काँग्रेस आणि भाजपने पाठिंबा दिला आहे. तसेच महापालिका प्रशासनासोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी केली आहे.   (PMC Teachers Agitation Update)

काँग्रेस कडून सकाळी आमदार रविंद्र धंगेकर(MLA Ravindra Dhangekar), मोहन जोशी (Mohan Joshi), अभय छाजेड (Abhay Chajed) या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच प्रशासनासोबत चर्चा करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली. तर दुपारी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City President Jagdish mulik) यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. मुळीक यांनी देखील प्रशासना सोबत चर्चा केली. तसेच याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. (Pune Municipal Corporation)

आंदोलनकर्त्यांनी सांगितले कि, पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पुणे महापालिकेच्या प्रशासनाने अति तत्परता दाखवत तब्बल २१९ शिक्षकां साठी एकतर्फी व पती-पत्नी अंतर्गत आंतर जिल्हा बदलीने सदर २१९ शिक्षकांना पुणे महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले आहे.पुणे महापालिकेचे प्रशासन या २१९ शिक्षकांसाठी पायघड्या घालून त्यांचे स्वागतासाठी सज्ज आहेत.. त्यांना विशेष ट्रीटमेंट दिली जात आहे. परंतु  याच पुणे महापालिकेच्या शाळेत गेली सुमारे १५ वर्षापासून ६००० रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर शिकवणारे ९३ रजा मुदत शिक्षकांकडे दुर्लक्ष करण्यामागे नक्की काय दडलय हा संशोधनाचाच विषय आहे. असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. (PMC Pune News)
93 शिक्षकांनी त्यांची नियमित तीन वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली.  पण त्यांचे निवेदनाला कोणीही दाद दिली नाही म्हणून या 93 शिक्षकांनी गेल्या पंधरा वर्षात अनेक वेळा निदर्शने,धरणे ,उपोषण या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याची खूप प्रयत्न केले. सदर शिक्षकांना प्रशासनाने कागदपत्रांचा ससेमिरा मागे लावत एकदा महापालिकेच्या आस्थापना विभागात ,शिक्षण विभागात व नगर विकास विभागात अनेक वेळा पत्र व्यवहार करून नियमित  सेवेत घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. परंतु पुणे मनपाचे ढीम्म प्रशासनाने सदर शिक्षकांना कुठलीही खबरदात किंवा त्यांची दखल घेतली नाही अखेर या शिक्षकांनी मुंबई  उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्यावरती झालेला अन्याय दूर करण्याबाबत याचिका दाखल केली होती . मुंबई उच्च न्यायालयाने सदर 93 शिक्षकांवरती खूप अन्याय झालेला आहे व यांना तात्काळ सहा आठवड्याच्या आत महापालिकेच्या सेवेत समावून घेऊन वेतनश्रेणीवर नियमित वेतन अदा करण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा गेली चार महिन्यापासून सदर पुणे मनपाचे प्रशासन याकडे जाणून बुजून कानाडोळा करत आहे. असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला. (PMC Pune Education Department)
News Title | PMC Teachers Agitation Update | Congress, BJP support hunger strike of education workers during leave period

Education Commissioner | शिक्षण आयुक्तांनी पुणे महापालिका शिक्षण विभागाला दिले हे महत्वाचे आदेश 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

Education Commissioner | शिक्षण आयुक्तांनी पुणे महापालिका शिक्षण विभागाला दिले हे महत्वाचे आदेश

Education Commissioner | राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhre) यांनी नुकतीच पुणे महापालिकेच्या काही शाळात (Pune Municipal Corporation Schools) भेट दिली. त्यावेळी त्यांना विद्यार्थ्यांच्या क्षमता बाबत मार्गदर्शनाचा अभाव जाणवला. यानंतर त्यांनी महापालिका शिक्षण विभागाला (PMC Education Department) काही मौलिक सूचना केल्या आहेत. (Education Commissioner)

याबाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले कि,  पुणे महापालिका क्षेत्रातील एका समुपदेशन कार्यक्रमास उपस्थित राहिलो. एकंदरीत पाहता विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, आजारपण, शाळेतील विषय निरस वाटणे तसेच बिनचूक मार्गदर्शनाचा अभाव अशा कारणांमुळे विद्यार्थी किमान क्षमता प्राप्त करू शकत नाहीत, असे मला त्यांच्या बोलताना जाणवले. या पार्श्वभूमीवर पुढील कार्यवाही करणे गरजेचे आहे. (Pune Education News)

१. सर्व विद्यार्थ्यांची जुलै मधील परीक्षेसाठी नोंदणी करावी

२. विद्यार्थ्यांची विषयावर विभागणी करून स्वतंत्र वर्ग त्या त्या विषय शिक्षकांनी घ्यावेत

३. हे वर्ग घेताना नेमक्या कोणत्या कारणाने विद्यार्थी क्षमता प्राप्त करू शकले नाहीत त्याचे निदान करावे व तसे उपचार करावेत

४. किमान आवश्यक गुण प्राप्त होतील तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कॅप्सुल कोचिंग करावे या विद्यार्थ्यांपैकी जास्तीत जास्त विद्यार्थी आगामी परीक्षेत क्षमता प्राप्त करतील त्या शिक्षकांचा विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करणेत येईल. (PMC Pune News)


News Title |Education Commissioner The Commissioner of Education gave this important order to the Pune Municipal Education Department

PMC Pune Teachers Promotion | पुणे महापालिका शाळांतील 138 उपशिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती | मात्र शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक

Categories
Breaking News Education PMC पुणे

PMC Pune Teachers Promotion | पुणे महापालिका शाळांतील  138 उपशिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती

| मात्र शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक

PMC Pune Teachers Promotion | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील (PMC Pune Education Department) शाळांमधील  उपशिक्षकांच्या (Deputy Teachers) आणि मुख्याध्यापकांच्या (Headmaster) पदोन्नत्या (Promotion) रखडल्या होत्या. मात्र आता महापालिका प्रशासनाकडून (PMC civic body ) सेवाज्येष्ठनेते नुसार 138 उप शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना आगामी 5 वर्षात शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम (Diploma in education Management) पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच महापालिका प्रशासनाने 25 मुख्याध्यापकांना पर्यवेक्षक पदी पदोन्नती दिली आहे. याबाबतचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त (PMC Additional commissioner) यांच्याकडून नुकतेच जारी करण्यात आले आहेत. (PMC Pune Teachers promotion)
पुणे महापालिकेत (PMC Pune) एकूण ३४ गावे समाविष्ट झाली. या गावातील जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) शाळेतील शिक्षक पुणे महापालिकेत आले. त्यामुळे या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता नोकरीच्या पहिल्या दिवसापासून ग्राह्य धरायची की पुणे महापालिकेत गावे समाविष्ट झाली तेव्हापासून यावरून प्रश्न निर्माण झाला होता. त्याविरोधात काही शिक्षक संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने गेल्या पाच वर्षापासून सेवा ज्येष्ठता यादी तयारच झाली नाही. सर्वाच्च न्यायालयाने ज्या दिवसापासून शिक्षकांचा नोकरी सुरू केली तो दिवस सेवा ज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरावा असा निकाल दिला. त्यानंतर पुणे महापालिकेच्या प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या मदतीने शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी तयार केली. त्यामुळे समाविष्ट गावातून आलेल्या शिक्षकांना याचा फायदा झाला. पुणे महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षकांची जबाबदारी महत्त्वाची असते. यासाठी ३९ जागा असल्या तरी संपूर्ण शहराची जबाबदारी ५ जणांकडेच होती. या पदोन्नतीमुळे आणखी २५ पर्यवेक्षक मिळणार आहेत. (PMC Pune Marathi News)
दरम्यान शासन निर्णय नुसार शैक्षणिक वर्ष २००४-२००५ पासून नियुक्त होणाऱ्या उप मुख्याध्यापक व मुख्याध्यापकांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तयार केलेला व त्यांच्या मार्फतच पत्रद्वारा राबविण्यात येणारा १ वर्षाचा शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पुढील ५ वर्षात अथवासेवानिवृत्तीपूर्वी जो कालावधी कमी असेल त्या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक तसेच आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्या बाबतची नोंद संबंधित सेवकांच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)
——
News title | PMC Pune Teachers Promotion |  Promotion of 138 deputy teachers of Pune municipal schools to the post of principal

PMC Pune Education Department | प्राथमिक शिक्षक सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे थांबविण्याची मागणी 

Categories
Breaking News Education PMC पुणे

PMC Pune Education Department | प्राथमिक शिक्षक सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे थांबविण्याची मागणी

| राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख सभा यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

PMC Pune Education Department | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्राथमिक शिक्षण विभागाकडील मराठी माध्यम मुख्याध्यापक व मराठी माध्यम उपशिक्षक या पदावरील सेवाज्येष्ठता यादी (Seniority List) अंतिम करून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र याबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख सभा संघटनेने आक्षेप घेतला आहे. ही यादी जाहीर करणे थांबवून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली आहे. (PMC Pune Education Department)

याबाबत संघटनेचे अध्यक्ष विकास काटे (Vikas kate) यांनी सांगितले कि, १९९९ साली पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील शिक्षकांना त्यांच्या मूळ तारखेनुसार सेवाज्येष्ठता देणे बाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याचवेळी नंतर पुणे मनपा मधून वगळलेली गावांमधील शिक्षक पुन्हा जिल्हापरिषदेकडे गेले आणि सेवाज्येष्ठता न देणेबाबत शपथपत्र देवून सन २००९ साली पुन्हा पुणे मनापा सेवेत आले. अशा शिक्षकांना सेवाज्येष्ठता देणेबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निकालात कोठेही म्हंटलेले नाही. तसेच हा निर्णय फक्त याचिकाकर्त्यांसाठी लागू असल्याने सन २००९ मध्ये आलेल्या शिक्षकांना मूळ सेवाज्येष्ठता देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाने या शिक्षकांना तारखेपासून
मूळ सेवाज्येष्ठता देण्याचा घाट घातला जात आहे. याविरोधात संघटना उच्च न्यायालयात दाद मागत आहे. तरी उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत मुख्याध्यापक पदोन्नत्या करण्यात येवू नयेत. असे काटे यांनी म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)

 प्राथमिक शिक्षक सेवाज्येष्ठता यादी गुणवत्ताक्रमानुसार करा

काटे यांनी पुढे सांगितले कि, मराठी माध्यमाच्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी महाराष्ट्र शासनाच्या २२/०६/२०२१ च्या अधिसूचनेच्या नियमावलीनुसार केलेली आहे.  शासन निर्णयानुसार आज्ञापत्रातील गुणवत्ताक्रम लक्षात घेवून कर्मचाऱ्याची सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात यावी. परंतु शिक्षण विभागाने (प्राथमिक) मराठी माध्यम प्राथमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता तयार करताना आज्ञापत्रातील गुणवत्ताक्रमाचा विचारच केला नसल्याने ही यादी सदोष आहे. (जुने आज्ञापत्रे आणि गुणवत्तायादी शोधण्याची तसदी पडू नये म्हणून जन्मदिनांकानुसार सेवाज्येष्ठता यादी तयार केली आहे.) त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार आहे. तरी ही सदोष यादी रद्द करवून आज्ञा पत्रातील गुणवत्ता क्रमानुसार यादी करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी आयुक्त यांच्याकडे केली आहे. (PMC Pune Marathi News)
—-
News title | PMC Pune Education Department | Demand to stop publication of primary teacher seniority list| State Graduates, Primary Teachers and Center Pramukh Sabha demand to Municipal Commissioner

Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन | प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास वेळ न दवडण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

Categories
Breaking News PMC पुणे

Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन | प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास वेळ न दवडण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

| आयुक्तांनी मंजूरी दिल्यांनतरही प्रस्ताव पुढे जाईना 

PMC Pune Education Department | राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर  मंडळ हा एक महापालिकेचा (PMC Pune) विभाग करण्याचे ठरले. असे असले तरी महापालिकेत या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. वेतन श्रेणी पासून पदोन्नती (promotion) पर्यंतच्या या अडचणी आहेत. दरम्यान महापालिका सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव आयुक्त यांच्या समोर ठेवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. मात्र यात कालावधी वाया जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर यादी प्रसिद्ध करून समायोजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिकासेवा (PMC pune new) प्रवेश नियमावली २०१४ नुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे शिडी प्रमाणे त्यांना संधी मिळणार आहे. आज मितीस माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील ळांतील शिक्षकेतर सेवकांच्या बदल्या/बढत्या या पुणे महानगरपालिका आस्थापनेवर करण्यात येत नाही. तसेच त्या शिक्षकेतर सेवकांची सेवाज्येष्ठता ही स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. पुणे मनपाकडील अन्य विभाग जसे मुख्यलेखापरीक्षण विभाग, नगरसचिव कार्यालय, मुद्रणालय विभाग या कार्यालयाकडील सर्व संवर्गाच्या सेवकांच्या देखील सेवाजेष्ठता याद्या व रोस्टर स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडील (तत्कालीन शिक्षण मंडळाकडील) सेवकांच्या सेवाज्येष्ठता यादी एकत्रित केल्यास पुणे महानगरपालिकेच्या मुळ संवर्गातील सेवकांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होऊन त्यास मूळ संवर्गातील सेवकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तसेच सदर शिक्षकेतर सेवकांच्या सेवाजेष्ठता पुणे महानगरपालिका आस्थापनेत विलिन करावयाच्या झाल्यास मनपा आस्थापनेवरील मंजूर पद संख्येत बदल करावे लागतील . मनपा आस्थापनेवरील मंजूर पदांवर प्राथमिक शिक्षण विभागातील शिपाई, रखवालदार पदावरील रोजंदारी कर्मचारी सामावून घेण्याची मागणी देखील करण्याची शक्यता होती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने समायोजनाचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला होता. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी नुकतीच मंजूरी दिली आहे. (Pune Municipal Corporation News)
आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्याने आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत.  त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून  प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर येणाऱ्या हरकतींचा निपटारा करून बदल्या केल्या जातील. मात्र आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतरही ही प्रक्रिया करण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर यादी प्रसिद्ध करून समायोजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कर्मचारी पदोन्नती बाबतच्या काही तांत्रिक बाबी आणि कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्यामुळे प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास वेळ लागणार आहे. मात्र हे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया कर्मचाऱ्यांना दिलासा दिला जाईल.
– सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.
—-
Pune PMC Education Department |  Education Department Adjustment |  Demand of employees not to waste time in releasing the draft list

PMC Pune Education Department | आता शिक्षण विभागातील कामचुकार सुरक्षा रक्षकावर राहणार करडी नजर 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Education Department | आता शिक्षण विभागातील कामचुकार सुरक्षा रक्षकावर राहणार करडी नजर

| पुणे महापालिकेकडून जबाबदार अधिकारी नियुक्त

PMC Pune Education Department | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्राथमिक शिक्षण विभागाकडे (Primary education department) कार्यरत असलेल्या कायम सुरक्षा रखवालदार व रोजंदारी सुरक्षा रखवालदार यांचेवर आता महापालिकेची करडी नजर राहणार आहे. काही लोक कामचुकारपणा करत असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.  या लोकांवर  परिणामकारक नियंत्रण ठेवणेसाठी  राकेश य. विटकर, सुरक्षा अधिकारी पुणे महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation News)

 राकेश विटकर, यांनी खालील  बाबींच्या अनुषंगाने कामकाज करावयाचे आहे. असे आदेशात म्हटले आहे. 
१) प्राथमिक शिक्षण विभागाकडील सुरक्षा रखवालदारांची नेमणूकीच्या ठिकाणांची तपासणी करुन मान्य संख्येमधूनच सर्व प्राथमिक शाळांना सुरक्षा रक्षक उपलब्ध करुन देण्याची दक्षता घ्यावी.
२) कोणतीही प्राथमिक शाळा विना सुरक्षा रखवालदार राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
३) प्रत्येक शाळेतील सुरक्षा रखवालदार यांच्या कामाची जबाबदारी निश्चित करुन देण्यात यावी.
४) सदर सुरक्षा रखवालदार यांची तिनही पाळ्यांमध्ये उपस्थिती तपासावी, तसेच सदर सुरक्षा रखवालदार विहीत वेळेत पूर्णवेळ उपस्थित असतात अगर कसे ? याबाबत तपासणी करावी.
५) सदर सुरक्षा रखवालदार हे मान्य गणवेश परिधान करीत आहेत अगर कसे? याबाबत तपासणी करावी.
६) सुरक्षा विभाग, पुणे महानगरपालिका यांचेकडे कार्यरत असलेल्या प्रभारी सहाय्यक सुरक्षा अधिकारी व प्रभारी सुरक्षा जमादार यांचेमार्फत प्राथमिक शिक्षण विभागाकडील सुरक्षा रखवालदार यांचे कामकाजावर देखरेख करणे, नियंत्रण ठेवणे, तसेच वेळोवेळी कामकाजाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देण्याची कार्यवाही करावी.
७) वरिल बाबींच्या अनुषांने केलेल्या कामकाजाचा अहवाल श्री. राकेश विटकर यांनी दरमहा अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पुणे महानगरपालिका, यांचेकडे सादर करावा. असे आदेशात म्हटले आहे.
——
PMC Pune Education Department |  Now the evil eye will be on the security guard in the education department

PMC Pune Employees | सेवानिवृत्त सेवक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Pune Retired Employees | सेवानिवृत्त सेवक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे महानगरपालिकेला निर्देश

PMC Pune Retired Employees| पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त (Retired Employees of PMC pune) झालेल्या सेवक, प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) कार्यवाही करुन फरकाची रक्कम मे अखेर अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांनी दिले. (PMC Pune Retired Employees)

शासकीय विश्रामगृह येथे पुणे मनपा सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे मनपा प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत, तसेच महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष संभाजी भोसले यांच्यासह निवृत्त सेवक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (PMC Pune News)

पुणे महापालिकेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील एकूण २ हजार ५५३ सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून तर सन २०१६ पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी १ हजार ९४३ आहेत. १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत एकूण ३५० सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विवरणपत्रे तयार केलेली आहेत. त्याअनुषंगाने तांत्रिक अडचणी, वेतन निश्चितीतील त्रुटी पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावर सर्व अडचणी मेअखेरपर्यंत दूर करुन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिल्या. (PMC Pune Education Department)

महापालिकेअंतर्गत सेवकांची एकूण १०७ निवृत्तीवेतन प्रकरणे असून त्यातील त्रुटीची पूर्तता करून निवृत्तीवेतन धारकांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत २०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १० महिन्याचा फरक व वेतन आयोगाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्याप्रमाणे २०१६ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्व लाभ देण्यात आले आहेत, अशीही माहिती मनपाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. सदरचे कामदेखील तातडीने पूर्ण करुन हे अखेरपर्यंत ७ वा वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावी. तसेच दोन महिन्यांनंतर सेवा उपदानाची रक्कम देखील अदा करावी, अशा सुचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या. (Pune Municipal Corporation)

पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचे सर्व प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. (Pune Civic Body)