Tag: PMC Pune Employees promotion
PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : शारीरिक तपासणी आवश्यक | गुरुवारी होणार तपासणी
PMC Employees Transfer | पुणे महापालिका कर्मचाऱ्याची मंत्रालयात बदली! | राज्य सरकार अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप
PMC Pune Employees Promotion | अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा! | महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजूरी
| पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा
| महापालिकेने सरकार कडून मागवले होते मार्गदर्शन
पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने या विषयाचा वारंवार पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे महापालिकेतील 300 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल आम्ही उपायुक्त सचिन इथापे यांचे आभार व्यक्त करतो.
– रुपेश सोनावणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना—पदोन्नती बाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्ही आता अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु करणार आहोत.– सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.—–
Pune Municipal Secretary Department | पुणे महापालिका नगरसचिव विभागातील उपनगरसचिव सह 8 पदे ‘प्रमोशन’ च्या प्रतिक्षेत! | नगरसचिव पद देखील 3 वर्षांपासून रिक्तच!
| बढती प्रक्रिया सुरु करण्याची मनपा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी
Pune Municipal Secretary Department | पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिव विभागाकडील (Pune Municipal Secretary Department) उपनगरसचिव (Deputy Municipal Secretary) या बढतीच्या पदासह इतर 8 पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांची बढती प्रक्रियाच (Promotion) होऊ न शकल्याने ही पदे 3 ते 9 वर्षांपासून रिक्तच आहेत. या पदांना सेवाप्रवेश नियमावली २०१४ मध्ये मान्यता मिळाली असून अद्यापही भरती झालेली नाही. त्यामुळे अन्याय होत असल्याची भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत. दरम्यान रिक्त पदांची बढती प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याची मागणी पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून (Pune Mahanagarpalika Magasvargiy Karmchari Sanghatana) महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune Municipal Secretary Department)
अशी आहेत रिक्त पदे
उपनगरसचिव. -. 3 वर्ष
महापौर यांचे सचिव. -. 6 वर्ष
समारंभ प्रमुख. -. 9 वर्ष
अति. कार्यालय अधिक्षक. -. 1 महिना
विरोधी पक्षनेते – सचिव. -. 6 वर्ष
ज्येष्ठ समिती लेखनिक – २ पदे – 3 वर्ष
Commission for Scheduled Castes rebuked the Pune Municipal Commissioner again!
| Municipal Commissioner ordered to report within 15 days
National Commission for scheduled castes | राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महापालिका आयुक्तांना पुन्हा फटकारले!
| 15 दिवसांत अहवाल देण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश
Computer Operator Promotion | PMC | संगणक ऑपरेटर पदाच्या पदोन्नतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
| 31 जुलै पर्यंत अर्ज घेता येणार | 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार
पुणे महानगरपालिका (PMC Pune) प्रशासनाकडील माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील “संगणक ऑपरेटर” या पदाच्या एकूण संख्येच्या ५०% जागा पुणे महानगरपालिकेमधील कार्यरत कर्मचा-यांमधून (Pune Municipal Corporation Employees) सेवाज्येष्ठता वगुणवत्ता या आधारे कर्मचा-यांमधून भरल्या जातात. मान्यतेनुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील कार्यरत कर्मचा-यांमधून ज्या सेवकांची ३०.०६.२०२० किंवा तत्पूर्वी शेड्युलमान्य पदावर नेमणूक करण्यात आली आहे व ज्या सेवकांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण केली आहे. अशा सेवकांनी विहित नमुन्यातील अर्ज आस्थापना विभागाकडे ३१.०७.२०२३ अखेरपर्यंत स्वत: येवून प्राप्त करून घ्यावयाचे आहेत. (Pune Municipal Corporation News)
नामनिर्देशनाने विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कार्यरत कर्मचाऱ्यामधून किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. अशी पदोन्नतीची पात्रता आहे. तसेच यासाठी संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. (PMC Pune Employees Promotion)
आस्थापना विभाग कार्यालयाकडे १५.०८.२०२३ अखेर अर्ज सादर करावेत. संबंधित सेवक विहित केलेल्या मुदतीमध्ये साक्षांकित कागदपत्रांसह खातेप्रमुख
यांचेमार्फत अर्ज सादर करणार नाहीत वा अपूर्ण अर्ज / कागदपत्रे सादर करतील त्यांचा “संगणक ऑपरेटर” या पदाच्या यादीमध्ये विचार केला जाणार नाही याची संबंधित सेवकांनी नोंद घ्यावी. असे देखील परिपत्रकात म्हटले आहे.