Tag: pmc pune water supply department
Water Consumption Discipline for Punekar | पुणेकरांना पाणी वापराची शिस्त लावणार महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग!
| विभाग प्रमुखांचे सर्व अधीक्षक अभियंत्यांना आदेश
Pune Water cut | नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे
| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
Sus, Mhalunge Water Issue | सुस, म्हाळुंगे गावांचा पाणी प्रश्न सुटणार! 26 कोटींचा येणार खर्च
Pune Water Cut New Timetable | पुणे शहराच्या या भागात होणार एक दिवसाआड पाणीपुरवठा!
Pune Water Cut New Timetable | पुणे शहरातील (Pune City) पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार शहरात सध्या दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा (Pune water cut on Thursday) बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग क्र ४ खराडी (Kharadi) मधील काही भागात अपुऱ्या पाणीपुरवठा विषयक तक्रारी येत आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने खराडी मध्ये एक दिवसआड (Alternate Day water cut) पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. शनिवार १०/०६/२०२३ पासून प्रभाग क्र ४ खराडी मध्ये खालील प्रमाणे एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याबाबतची नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या (PMC Pune water supply department) वतीने करण्यात आले आहे. (Pune Water cut New Timetable)
एक दिवसआड पाणीपुरवठा होणारा भाग व वेळ
शुक्रवार, रविवार, मंगळवार
शनिवार, सोमवार, बुधवार
वृंदावन सोसायटी, राघवेंद्रनगर, यशवंतनगर,
तुकराम नगर, सितारा बेकरी, साई पार्क,
शेजवल पार्क,साईबाबा मंदिर.
PMC Pune Water Supply Department | होळकर जलशुद्धीकरण केंद्रापासून चिखलवाडी स्टेडीयम (बोपोडी) पर्यंत पुणे मनपा हद्दीबाहेर उच्चदाब जलवाहिनी टाकली जाणार
| 5.33 कोटींचा खर्च येणार
प्रशासनाच्या प्रस्तावानुसार समान पाणी पुरवठा प्रकल्पाच्या अंतर्गत चिखलवाडी (बोपोडी) येथे स्टेडियम मध्ये ३.५ एम एल क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरु आहे. मान्य डीपीआर व Hydraulic Design प्रमाणे बोपोडी झोनच्या अंतर्गत सन २०३२ साली एकूण लोकसंख्या ७४८०९ येत असून त्यांची पाण्याची मागणी १७.०१ एम एल डी राहील. तसेच सन २०४७ साली ७७६४५ इतकी लोकसंख्या येत असून पाण्याची मागणी १८.८३ एम एल डी येत आहे. त्यासाठी या झोन साठी ६.२.१ एम एल पाण्याची साठवण क्षमता येत आहे. त्या नुसार ३ एम एल व ३.५ एम एल अशा दोन टाक्या प्रस्तावित असून त्यापैकी ३.५ एम एल क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरु आहे. (PMC Pune equal water supply project)
PMC Pune Water Supply Department | action will be taken against the builder and the contractor | Important decision of Pune Municipal Corporation
| It is mandatory to use treated water from STP for construction in Pune city
PMC Pune Water Supply Department | … नाहीतर बिल्डरवर आणि ठेकेदारावर होणार कारवाई | पुणे महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय
| पुणे शहरातील बांधकामासाठी STP मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकार
विकसकांकडून (Builder) पुणे शहरात (Pune city) विविध ठिकाणी चालणाऱ्या बांधकामांमध्ये पुणे महानगरपालिकेचे (PMC Pune) सिवेज ट्रिटमेंन्ट प्लॅन्टस् (Sewage Treatment plant) मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) बंधनकारक केलेले आहे. या विकसकांना STP मधून प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने pmcstpwatertanker हे App विकसित केले असून, , हे सध्या Android Phone साठी विकसित करण्यात आलेले आहे. सदर App मध्ये विकसकांनी त्यांचे बांधकामाचे साईटनिहाय रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. STP चे प्रक्रिया केलेले पाणी पुरविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या टँकर मालकांनी सदर App वर रजिस्ट्रेशन केलेले असून, ज्या साईटवर विकसकांना STP मधून प्रक्रिया केलेले पाणी आवश्यक आहे त्यानुसार सदर App चे माध्यमातून त्यांनी त्यांची मागणी नोंदवावयाची असून, उपलब्ध टँकर मालकांचे यादी मधील टँकरधारक नोंदवायचे असून, App मध्ये नमूद केलेले शुल्क सदर टँकरधारकाला टँकर साईटवर पोहचविण्याचे अनुषंगाने आदा करावयाचे आहे.
——-
News Title | PMC Pune Water Supply Department | … otherwise action will be taken against the builder and the contractor Important decision of Pune Municipal Corporation