PMC Solid Waste Management | स्वच्छता कर्मचार्‍यांची  सुरक्षितता व प्रतिष्ठा याबाबत ५३ मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण संपन्न

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Solid Waste Management | स्वच्छता कर्मचार्‍यांची  सुरक्षितता व प्रतिष्ठा याबाबत ५३ मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण संपन्न

 

PMC Solid Waste Management | वॉश सेक्रेटरीएट आणि युनिसेफ (UNISEF) च्या सहाय्याने व पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) सहयोगाने ५३ मास्टर ट्रेनर्सचे ३ दिवसांचे प्रशिक्षण राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे येथे  ११ ते १३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम सहभागी झाले होते. हे सर्व मास्टर ट्रेनर्स पुढील कालावधीत पुणे महानगरपालिका मधील सर्व स्वच्छता कर्मचार्‍यांना (Sanitation Workers) या विषयाबाबत प्रशिक्षित करतील. अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या (PMC Pune Solid Waste management Department) वतीने देण्यात आली.

 

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (नागरी) टप्पा २.० च्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुसार महाराष्ट्र राज्यात मिशनची अंमलबजावणी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत सुरू आहे. यामध्ये ‘सफाईमित्र’ हे अत्यंत महत्वाचे सहयोगी आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छता कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण, क्षमता बांधणी, माहिती, शिक्षण व संवाद या उपक्रमाच्या माध्यमातून सफाईमित्रांची/ स्वच्छता कर्मचार्‍यांची व्यावसायिक सुरक्षा आणि प्रतिष्ठा यावर भर द्यावयाचा आहे. यासाठी  विभागीय नागरी आणि पर्यावरण अभ्यास केंद्र (RCUES), अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई (AIILSG) येथे युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहयोगाने सेक्रेटरीएट महाराष्ट्र अर्बन वॉश आणि एनवारमेंटल सॅनिटेशन कोएलिशन स्थापन करण्यात आले आहे. या वॉश सेक्रेटरीएट आणि युनिसेफ च्या सहाय्याने पुणे महानगरपालिकेच्या सहयोगाने ५३ मास्टर ट्रेनर्सचे ३ दिवसांचे प्रशिक्षण राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे येथे दिनांक ११ ते १३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम सहभागी झाले होते. (Pune Municipal Corporation)

हे सर्व मास्टर ट्रेनर्स पुढील कालावधीत पुणे महानगरपालिका मधील सर्व स्वच्छता कर्मचार्‍यांना या विषयाबाबत प्रशिक्षित करतील. या प्रशिक्षणाच्या समापन सत्रात या सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हे समापन सत्र श्रीमती. जलपा रत्ना, चीफ फील्ड सर्व्हिसेस, युनिसेफ, इंडिया कंट्री ऑफिस , श्रीमती. राजेश्वरी चन्द्रशेखर,  चीफ फील्ड ऑफिस, युनिसेफ, महाराष्ट्र, श्री. संदीप कदम, उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन ) पुणे महानगरपालिका , श्री. आनंद घोडके, वॉश ऑफिसर, युनिसेफ महाराष्ट्र आणि श्रीमती. उत्कर्षा कवडी, वरिष्ठ कार्यकारी संचालिका, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई, (संचालिका, सेक्रेटरीएट, महाराष्ट्र अर्बन वॉश आणि एनवारमेंटल सॅनिटेशन कोएलिशन), संचालिका, वॉश सेक्रेटरीएट,  यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले. (PMC Pune)


News Title |PMC Solid Waste Management | Completed training of 53 Master Trainers on safety and dignity of sanitation workers

PMC Pune Employees Union | अतिक्रमण विभागातील मारहाणीचा सर्व महापालिका संघटना उद्या करणार निषेध! 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees Union | अतिक्रमण विभागातील मारहाणीचा सर्व महापालिका संघटना उद्या करणार निषेध!

 

PMC Pune Employees Union | पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि अतिक्रमण निरीक्षक (Encroachment Inspector) यांना कर्त्तव्य बजावत असतांना मारहाण करण्यात आली. त्याचा उद्या सकाळी 11 वा. हिरवळीवर शांततामय मार्गाने निषेध केला जाणार आहे. यात सर्व संघटना सहभागी होणार आहेत. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व संघटना कडून करण्यात आले आहे. (PMC Pune Employees Union)

पुणे महापालिका कामगार यूनियन (मान्यताप्राप्त), पी एम सी एम्प्लॉईज युनियन, पुणे महानगरपालिका अभियंता संघ, पुणे महानगरपालिका अधिकारी संघ, डॉक्टर असोसिएशन, पुणे महापालिका मागासवर्गीय संघटना अशा सर्व संघटना यात सहभागी होणार आहेत. काल अतिक्रमण विभागात महापालिका कर्मचारी आणि RTI कार्यकर्ता यांच्या मारहाण झाली. अशा घटना घडत असल्याने महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे काम करणे अवघड झाले आहे. याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात  येणार आहे. असे संघटना कडून सांगण्यात आले. (PMC Pune News)


News Title | PMC Pune Employees Union | All municipal organizations will protest the beating in the encroachment department tomorrow!

Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक

Warje DP Road | PMC Pune |  पुणे : महामार्गावरून (Highway) वारजे कर्वेनगर कोथरूड (Warje, Karvenagar, Kothrud) परिसरात येण्यासाठी पर्यायी मार्ग ठरू शकणाऱ्या वारजे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर या चोवीस मीटर रुंद  डीपी रस्त्याचे (DP Road) काम त्वरित व्हावे यासाठी आज महापालिकेत (Pune Municipal Corporation) महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या रस्त्यात काही घरमालक व जागा मालकांच्या जागा बाधित होत आहेत. या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर या रस्त्याच्या कामाला वेग येणार त्यामुळे या संदर्भात माजी नगरसेवक बाबा धुमाळ (Pradeep Baba Dhumal) यांनी पुढाकार घेत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्या समवेत बांधकाम विभाग, पथ विभाग, भूमी जिंदगी व भूसंपादन विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर सदर बाधित जागा मालकांना घेवून बैठक घेतली. पाच ते सहा बाधित जागा मालक यावेळी उपस्थित होते. यामध्ये काहींची घरे जात आहेत तर काहींच्या जागा बाधित होत आहेत. (PMC Pune News)
जागा मालकांना योग्य तो मोबदला देऊन जागा ताब्यात घेऊन रस्ता पूर्ण करावा यावर अधिकारी, जागा मालक व बाबा धुमाळ यांच्यात चर्चा झाली. या जागा मालकांना योग्य तो मोबदला लवकर दिला जाईल अशी सकारात्मक चर्चा यावेळी झाली.
या डीपी रस्त्यासाठी प्रशासनाने निधी उपालब्ध करून नव्याने टेंडर काढले आहे. जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात घतल्यास लवकरच हा रस्ता पूर्णत्वास येऊन नागरिकांसाठी वापरास खुला होऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला वेग मिळावा यासाठी बाबा धुमाळ यांनी या बैठकीचे नियोजन केले होते.
महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर रस्ता व्हावा यासाठी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर दरम्यान काही टप्प्यातील काम ही झाले आहे. ज्या बाधित जागा येत आहेत त्या जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात आल्यास या रस्त्याच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा होणार आहे.
महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर रस्ता हा वारजे, कर्वेनगर, कोथरूड वासियांसाठी महत्वाचा पर्यायी मार्ग ठरणार आहे. महामर्गवरून डुक्कर खिंडीतून सरळ तिरुपतीनगर पुढे वारजे आंबेडकर चौक, कर्वेनगर व पुढे कोथरूडकडे जाता येणार आहे. यासाठी वारजे हायवे चौकात किंवा चर्च पासून कॅनॉल रस्त्याने येण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी हा रस्ता तातडीने पूर्ण व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.
—-
News Title | Warje DP Road | PMC Pune | Important meeting in Pune Municipal Corporation regarding alternative road to come to Warje, Karvenagar, Kothrud area

PMC Retired Employees Pension | गेल्या 10 दिवसांत 100 हून अधिक पेन्शन प्रकरणे मार्गी | अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा इशारा आला कामी

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Retired Employees Pension | गेल्या 10 दिवसांत 100 हून अधिक पेन्शन प्रकरणे मार्गी | अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा इशारा आला कामी

PMC Retired Employees Pension | सद्यस्थितीत पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन प्रकरणे (PMC Pension Cases) मोठ्या प्रमाणावर विविध कारणास्तव प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त यांनी खाते प्रमुख यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसेच पेन्शन प्रकरणे निकाली काढण्यासाठी एक मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार गेल्या 10 दिवसांत 103 पेन्शन प्रकरणे वेगवेगळ्या खात्याकडून निकाली काढण्यात आली आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
काही सेवानिवृत्त सेवकांचा मृत्यू होतो, तरीही पेन्शन मिळत नाही. यामुळे सेवकांच्या वारसांना त्रास सहन करावा लागतो. यापुढे वारसांची गैरसोय होऊ नये म्हणून पेन्शन प्रकरणे निकाली काढण्यासाठी 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत विशेष मोहीम (Special Campaign) राबवली जावी,याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी दिले होते. अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार प्रलंबित पेन्शन प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी यापूर्वी विविध विभागांना सुचित करण्यात आले होते, परंतु अद्यापी पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत. याबबात खातेप्रमुख, पगारपत्रक / पेन्शन लेखनिक हे गांभिर्याने दखल घेत नसल्याने सेवानिवृत्त सेवकांची/ मयत सेवकांच्या वारसांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे खाते प्रमुख यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील अतिरिक्त आयुक्तांनी देखील दिला होता. त्यानुसार सर्व विभाग कामाला लागले आहेत. (Pune Municipal Corporation)
एकूण 564 प्रलंबित पेन्शन प्रकरणांपैकी गेल्या 10 दिवसांत 103 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. काही विभागातील कर्मचाऱ्यांनी शनिवार आणि रविवारी देखील काम केले. दरम्यान पेन्शन प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांच्या कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व खाते प्रमुखांनी उपस्थित राहणे, बंधनकारक करण्यात आले आहे. (PMC Pune News)
——
News Title | PMC Retired Employees Pension | Over 100 pension cases cleared in last 10 days Additional Commissioner’s warning of action came to fruition

PMC Sky Sign Department | परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचे निलंबन

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Sky Sign Department | परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचे निलंबन

| उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

PMC Sky Sign Department | पुणे – नियमांचे उल्लंघन करून टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे होर्डिंग (Hoardings) उभारणीचे काम सुरू होते. मात्र त्याकडे कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तीन परवाना निरीक्षकांचे (Licence Inspector) निलंबन करण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिली. यामध्ये परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचा समावेश आहे. (PMC Sky Sign Department)
महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागातर्फे (Pune Municipal Corporation Sky Sign Department) संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानग्या दिल्या जातात. पण अनेकदा कागदावर सगळे योग्य असले तरी प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन केलेले असते. असाच प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागात संभाजी पोलिस चौकीच्या (Sambhaji Police Chowki) मागे उभारलेल्या होर्डिंगमुळे उघडकीस आला आहे. या ठिकाणी तीन होर्डिंगला परवानगी दिल्यानंतर त्यामध्ये नियमानुसार एक मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक होते. पण संबंधित व्यावसायिकाने सलग १०० फुटांचे होर्डिंग उभारले आहेत. हे काम सुरू असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात होते. याबाबत भाजप नेते तुषार पाटील यांनी देखील तक्रार केली होती. यावर अतिरिक्त  आयुक्त डॉ. खेमनार, उपायुक्त माधव जगताप, अविनाश सकपाळ यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परवाना निरीक्षकांना यावर कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते. पण त्यांनी खुलासा सादर केला नाही. होर्डिंग व्यावसायिकाला होर्डिंगवर जाहिरात लावण्यास मनाई केलेली असतानाही तेथे जाहिरात लावण्यात आली आहे. त्याकडेही परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या तिघांना निलंबित करण्याचा आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी काढला आहे. (Pune Municipal Corporation)

| या कारणांमुळे केले निलंबित

 होर्डिंगमध्ये एक फुटाचे अंतर न ठेवता १०० फूट लांबीचे एकच होर्डिंग उभारले. संभाजी पुलाच्या भरावाला छेद देऊन होर्डिंग उभारले आहे. होर्डिंग उभारताना वृक्षतोड करण्यात आली, पण त्याच्या परवानगीबाबत स्पष्टता नाही. जागा नदीपात्रात असूनही पूर रेषेबाबत पाटबंधारे विभागाचा अभिप्राय नाहीजागेचा मोजणी नकाशा नाही. पोलीस  विभागाचा अभिप्राय नाही. जमीन महापालिकेच्या मालकीची आहे की नाही याची खात्री नाही. (PMC Pune)
—–
News Title | PMC Sky Sign Department | Suspension of license inspectors Rajendra Kevate, Surendra Raut, Laxmikant Shinde Information of Deputy Commissioner Madhav Jagtap

PMC Encroachment Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात बाचाबाची  | अतिक्रमण विभागातील टेबल फोडले 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Encroachment Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात बाचाबाची

| अतिक्रमण विभागातील टेबल फोडले

PMC Encroachment Department | पुणे | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) आज सायंकाळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी (Encroachment Department Officer) आणि आरटीआय कार्यकर्ता (RTI Activist) यांच्यात बाचाबाची झाली. संबंधित कार्यकर्त्याने कार्यालयातील काचेचे टेबल फोडले. याबाबत महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र माहिती अधिकार कार्यकर्ते असे त्रास देत असतील तर आम्ही काम कसे करायचे, असा प्रश्न हे अधिकारी विचारत आहेत. (Pune Municipal Corporation)
वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरटीआय कार्यकर्ता यांनी खात्याची माहिती बाबत अतिक्रमण अधिकाऱ्याला फोन केला होता. मात्र फोनवरच दोघात बाचाबाची झाली. अधिकाऱ्याला शिवीगाळ देखील झाली. त्यानंतर संबंधित कार्यकर्ता अतिक्रमण विभागात आला. तिथे अधिकारी आणि कार्यकर्ता यांच्यात हाणामारी आणि शिवीगाळ झाली. त्यानंतर हा कार्यकर्ता उपायुक्त माधव जगताप यांच्या केबीन जवळ असलेल्या केबिन मध्ये घुसला. तिथल्या अधिकाऱ्याला त्याच्याकडून अरेरावी झाली. त्यानंतर त्याने खुर्ची टेबल वर आपटली. त्यात टेबलचे काच देखील फुटले. नंतर हे प्रकरण उपायुक्त माधव जगताप यांच्यापर्यंत पोहोचले. महापालिकेकडून संबंधित व्यक्ती वर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे. (PMC Pune News)
दरम्यान नुकतेच आमदार राणे यांनी महापालिका अधिकाऱ्या बाबतीत एकेरी भाषा वापरून त्यांचा अवमान केला होता. त्याविरोधात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नुकतेच आंदोलन केले होते. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते वेळोवेळी त्रास देत असतात, अशी तक्रार कर्मचाऱ्याकडून केली जात असते. अशा परिस्थितीत काम कसे करायचे, असा प्रश्न अधिकारी आणि कर्मचारी विचारत आहेत. (Pune Municipal Corporation)
News Title |PMC Encroachment Department | An altercation between the officials of the encroachment department of the Pune Municipal Corporation and the RTI activist | The table in the encroachment section was broken

PMC Pune Workshop | मानसिक आरोग्य विषयक कार्यशाळेचा महापालिकेच्या ४०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Pune Workshop | मानसिक आरोग्य विषयक कार्यशाळेचा महापालिकेच्या ४०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ

 

PMC Pune Workshop | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशिक्षण प्रबोधिनी व पुणे महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी (PMC Employees and officers) यांना मानसिक आरोग्य (Mental Health) विषयक जागरूकता निर्माण करणे आणि पॅरामेडिकल्सचे ज्ञान (Paramedical Knowledge) वाढविणे याबाबत प्रशिक्षण/ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर प्रशिक्षणाचा लाभ ४०० अधिकारी /कर्मचारी यांनी घेतला. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी, एनएएम, जीएनएम यांना ‘मानसिक आजाराची लक्षणे, कारणे व उपाययोजना याबद्दल प्रशिक्षण डॉ. स्मिता पानसे व डॉ. सनद पवार यांचेकडून देण्यात आले .तसेच दुपारच्या सत्रात 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी  मानसिक आरोग्य आणि वैय्यक्तिक कल्याण याबाबत चे प्रशिक्षण डॉ. अनघा लवळेकर यांनी दिले. त्या नंतर  ‘ताणतणावाचे व्यवस्थापन करून कामाची परिणामकारकता व गती कशी वाढवावी’ याबाबतचे मार्गदर्शन श्री राजीव नंदकर, (उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका यांचेकडून देण्यात आले. श्री नंदकर यांनी यावेळी महानगरपालिकेचे २०० अधिकारी यांची वेलनेस स्कोअर व तणाव चाचणी स्कोअर तपासणी करून घेतली. त्या अनुषंगाने त्यांनी कामकाजात गतिमानता कशी आणावी याबाबत टिप्स त्यांनी दिल्या. (PMC Pune News)

यावेळी डॉ. सीमा उपळेकर यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे ‘मानसिक आरोग्य माहिती पुस्तकेचे केलेले मराठी भाषांतर बाबत माहिती सर्वांना देऊन ती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यशाळेमुळे  पुणे महानगरपालिका प्रशासन कार्यक्षमतेने व परिणामकारक रीतीने चालविणे व प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता येण्यासाठी अधिकारी / कर्मचा-यांना उपयोग होईल. या कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या प्र.आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, श्री राजीव नंदकर,(उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका, पुणे महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती केतकी कुलकर्णी व डॉ. सीमा उपळेकर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा उपळेकर यांनी केले.


News Title | PMC Pune Workshop | 400 officers and employees of the Municipal Corporation benefited from the workshop on mental health

Pune Municipal Corporation | पुणे महापालिका अधिकाऱ्यांना दिले जाणार कायद्याचे ज्ञान!

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिका अधिकाऱ्यांना दिले जाणार कायद्याचे ज्ञान!

| विधी विभागाकडून तीन दिवसाची कार्यशाळा

Pune Municipal Corporation | पुणे | महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागातील अधिकाऱ्यांना  आता कायद्याचे ज्ञान (Law knowledge) दिले जाणार आहे. त्यासाठी विधी विभागाकडून (PMC Law Department) तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. महापालिका पॅनल वरील वकील यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. (Pune Municipal Corporation)
महापालिकेच्या विविध विभागाच्या कायदेविषयक बाबी असतात. काही लोक महापालिकेच्या विरोधात कोर्टात जातात. कधी कधी महापालिकेच्या विरुद्ध निकाल लागतात. हे टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेविषयक ज्ञान असणे आवश्यक आहे. यासठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कायद्याची इत्यंभूत माहिती देणे, महापालिकेच्या विरुद्ध लागणाऱ्या निकालाची कारणे आणि उपाय शोधणे, तसेच अद्ययावत न्यायालयीन निवाडे याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation News)
13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत ही कार्यशाळा होईल. यामध्ये 13 सप्टेंबर ला करविषयक मार्गदर्शन, 14 ला भूसंपादन विषयक तर 15 सप्टेंबर ला महाराष्ट्र महापालिका अधिनियम विषयक माहिती दिली जाईल. वडके हॉल मध्ये दुपारी 3 ते 5 या कालावधीत ही कार्यशाळा होणार आहे. (Pune Municipal Corporation News)
——

PMC Pune Encroachment Action | शिवाजी नगर भागात हॉटेल वर कारवाईचा पुन्हा धडाका

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Encroachment Action | शिवाजी नगर भागात हॉटेल वर कारवाईचा पुन्हा धडाका

PMC Pune Encroachment Action  | पुणे पेठ शिवाजीनगर भागातील भांडारकर रोड वरील हॉटेल स्कोल तसेच कमला नेहरू पार्क समोरील भारत बाजार, कॅफे स्टोरी अल इराण व कॅफे स्ट्रीट बिन कॉफी याठिकाणी बांधकाम विकास विभाग झोन ६ या विभागाकडून कारवाई करण्यात आली. (Pune Municipal Corporation)

यावेळी सुमारे का 3100 चौरस फुट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या मध्ये बांबू, पत्रा , लोखंडी अँगल ई चे सहाय्याने बांधलेल्या शेड, लोखंडी अँगल आणि पत्रा यांचे सहाय्याने बांधलेली खोली ई. चा समावेश आहे. कार्यकारी अभियंता श्री. बिपिन शिंदे, यांचे मार्गदर्शन खाली उप अभियंता श्री. सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समिर गढई यांनी, एक गॅस कटर घरपाडी विभागाकडील १० बिगारी, एक पोलिस गट ई च्या सहाय्याने कारवाई पूर्ण केली. यापुढेही कारवाई चालू राहणार आहे असे सुनिल कदम उप अभियंता यांनी सांगितले. (PMC Pune Building Permission Department)

PMC Contract Employees | Diwali Bonus | कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा तीव्र करणार | कामगार युनियन चा प्रशासनाला इशारा 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Contract Employees | Diwali Bonus | कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा तीव्र करणार | कामगार युनियन चा प्रशासनाला इशारा

PMC Contract Employees | Diwali Bonus अखिल भारतीय म्युनिसिपल फेडरेशन संलग्न (AICCTU) महानगरपालिका / नगरपालिका कंत्राटी कामगारांचा हक्क दिन कंत्राटी कामगारांच्या बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवण्याकरता महापालिका कामगार युनियन (pune Mahanagarpalika Kamgar union) च्या वतीने इशारा मोर्चा काढून साजरा केला. तसेच यंदा दिवाळी बोनस कंत्राटी कामगारांना मिळवून देण्यासाठी आपला लढा तीव्र करणार आणि एकजुटीच्या ताकदीवर आपला दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळवूया असा निर्धार यावेळी करण्यात आला. (PMC Contract Employees | Diwali Bonus)
याबाबत कामगार युनियन च्या वतीने अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार गेल्या 3 वर्षांपासून पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) कंत्राटी कामगारांचा दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन  बेकायदेशीर पद्धतीने बंद केला आहे. गेल्या 3  वर्षांपासून प्रशासन पातळीवर दिवाळी बोनस, रजावेतन, घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी सातत्याने लढत आहोत. अवघ्या दोन महिन्यांवर दिवाळी सण येऊ घातला आहे. (PMC Pune)
यावर्षीपासून तरी कंत्राटी कष्टकरी कामगारांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी आपण आज “इशारा मोर्चा” द्वारे पुणे महानगरपालिका भवन येथे कंत्राटी कामगारांची निदर्शने केली. दिवाळी बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन मिळेपर्यंत लढा उभारण्याचा निर्धार मोर्चा मध्ये करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज या निदर्शनास जाहीर पाठिंबा दर्शविला.
पुणे शहराचे आरोग्याचे रक्षण करताना, स्वतःच्या आरोग्याची हानी करून प्रसंगी जीव देऊन काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सरकारने तसेच पुणे मनपा प्रशासनाने वार्‍यावर सोडलेले आहे. पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने मनपा प्रशासनाच्या पातळीवर बोनस, घरभाडे भत्ता, रजावेतन हे प्रश्न सोडवावेत, अन्यथा दिवाळीपूर्व तीव्र आंदोलन करण्याचा तयारीला आपण सुरुवात करणार आहोत. जर 10 ऑक्टोबर पर्यंत या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर 11 ऑक्टोबर पासून बेमुदत निदर्शने करण्याची हाक कंत्राटी कामगारांना देण्यात आली.
——
News Title | PMC Contract Employees | Diwali Bonus | Contract workers will intensify their fight to get Diwali bonus Labor union warning to the administration