PMC Pune | खोदाई शुल्का पोटी मनपा तिजोरीत चालू आर्थिक वर्षात 254 कोटी जमा | अजून 100 कोटी जमा होण्याची अपेक्षा

Categories
Breaking News PMC पुणे

खोदाई शुल्का पोटी मनपा तिजोरीत चालू आर्थिक वर्षात 254 कोटी जमा

| अजून 100 कोटी जमा होण्याची अपेक्षा 
महापालिकेच्या पथ विभागाला खोदाई शुल्कातून चालू आर्थिक वर्षात 254 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. आगामी महिन्याभरात अजून 100 कोटी मिळतील, असा विश्वास महापालिका पथ विभागाला आहे. दरम्यान मागील वर्षीपेक्षा हे उत्पन्न जास्त आहे. मागील वर्षी पालिकेला खोदाई शुल्कातून 226 कोटी मिळाले होते. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
शहरात विविध संस्था/एजन्सी मार्फत सेवा वाहिन्या टाकण्याची कामे करण्यात येतात.  यामध्ये एम.एन.जी.एल. , एम.एस.ई.डी.सी.एल. , बी.एस.एन.एल., ओएफसी कंपन्या व खाजगी व्यावसायिक या सर्व संस्थांना  रस्ते खोदाई
पुणे मनपाच्या पथ विभागामार्फत परवानगी दिली जाते. रस्ता पुनः स्थापना दरात या सरकारी संस्थांना सवलत दिली जाते.
 : प्रति रनिंग मीटर र रु.१२,१९२/- रु इतका दर
महापालिका आयुक्त यांचे  ठरावान्वये मान्यता मिळाल्यानुसार आजमितीस ओएफसी कंपन्या व खाजगी व्यावसायिकां करिता कोणतीही सवलत न देता प्रति रनिंग मीटर र रु.१२,१९२/- रु इतका दर आकारण्यात येतो. याव्यतिरिक्त एच.डी.डी.पध्दतीने खोदाई करावयाची झाल्यास र.रु. ४०००/- प्रति र.मी. एवढे पुर्नःस्थापना शुल्क आकारण्यात येते. तसेच दुरुस्तीसाठी ठराविक अंतरावर पीट्स आवश्यक असल्याने त्याचा दर र.रु. ६१६०/- प्रति चौ.मी. आकारण्यात
येतो.
दरम्यान पावसाळ्यात खोदाई बंद असते. पावसाळा संपल्यानंतर खोदाई ला परवानगी दिली जाते. मे महिन्याच्या अखेरपर्यंत खोदाई करण्याला परवानगी दिली जाते. या शुल्कातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. विभागाला खोदाई शुल्कातून चालू आर्थिक वर्षात 254 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. आगामी महिन्याभरात अजून 100 कोटी मिळतील, असा विश्वास महापालिका पथ विभागाला आहे. दरम्यान मागील वर्षीपेक्षा हे उत्पन्न जास्त आहे. मागील वर्षी पालिकेला खोदाई शुल्कातून 226 कोटी मिळाले होते. दांडगे यांच्या माहितीनुसार गेल्या 10 ते 12 वर्षात पालिकेला या शुल्कातून सुमारे 1448 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामध्ये 2015-16 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 303 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. मात्र चालू वर्षात यापेक्षाही जास्त म्हणजे 350 कोटी उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे.

SKADA system | पथ विभाग निविदा वाद | स्काडा यंत्रणेशिवाय काम केल्याचा आरोप | अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्यावर कारवाई करण्याची अरविंद शिंदे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

पथ विभाग निविदा वाद | स्काडा यंत्रणेशिवाय काम केल्याचा आरोप

| अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्यावर कारवाई करण्याची अरविंद शिंदे यांची मागणी

पुणे | पुणे शहरात (Pune City) विविध ठिकाणी रस्ते दुरुस्ती तसेच पुनःडांबरीकरण करण्याबाबत पथ विभागाच्या (PMC Road Dept) वतीने काही निविदा (Tenders) मागवल्या आहेत. मात्र यावरून वादंग निर्माण झाले आहे. यामधून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत शहर कॉंग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे (Congress City President Arvind Shinde) यांनी पॅकेज 1,2,3,4,5 सर्व निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच आतापर्यंत  जवळपास 25% काम skada यंत्रणेशिवाय केल्याची खातरजमा झाली असल्याने याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे.

अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनानुसार या पॅकेज संस्कृतीला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध केलेला आहे. वस्तुतः शेकडो कोटी ची कामे करणारे ठेकेदार पुणे शहरात मोजकेच आहेत . एवढी मोठी टेंडर रद्द करून स्पर्धात्मक दर काढल्यास स्पर्धात्मक दर व वेगवान काम दोन्ही गोष्टी शक्य झाल्या असत्या पर्यायाने करदात्या पुणेकरांचे कोट्यावधी रुपये वाचू शकले असते.  निविदा प्रक्रियेतील ATR इन्फ्रा व SMC इन्फ्रा या ठेकेदारांच्या पात्रते- अपात्रतेसाठी मनपाचे 2 माजी सभागृहनेते ,2 आमदार,3 माजी नगरसेवक जिवाच्या आकांताने भांडत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच लाखो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हाताळणारे राज्याचे प्रमुख व उपप्रमुख कारभाऱ्यांच्या नावाचा खरा अगर खोटा नाट्यमय वापर ठेकेदारांच्या पात्र अपात्रतेसाठी केला जात असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. सदर निविदा प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने निविदा भरणे अंतिम दिनांक पूर्व तारखेचे नसलेले SMC इन्फ्रा यांचे अवैध कागदपत्रे पात्र करण्यासाठी एक माजी सभागृह नेते पथ विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यावर प्रचंड दबाव आणत आहेत. माध्यमामधून  याबाबत मोठी वृत्ते प्रकाशित झालेली आहेत. यामुळे पर्यायाने मनपाची, पुणे शहराची प्रतिमा मलिन होत आहे.

शिंदे यांच्या निवेदनानुसार पॅकेज 1,2,3 ची कामे सदद्यस्थितीत सुरू आहेत. या कामांच्या निविदा अटी मध्ये ठेकेदारास स्काडा यंत्रणा असणे, राबविणे,मनपा सर्व्हर ला जोडणे बंधनकारक आहे. हि प्रामाणिकतेची जाचक व कामाच्या दर्जाची संबंधित बाब असणे निविदा अटींमध्ये नमूद केल्याने बहुतांशी ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला नाही. Skada यंत्रणा मनपा सर्व्हर ला जोडणे बंधनकारक केल्याने संबंधित ठेकेदारांच्या बॅच मिक्स प्लँट येथे निर्माण होणाऱ्या डांबरी मालाच्या दर्जावर थेट नियंत्रण ठेवण्यास शक्य होणार होते . मात्र आतापर्यंत जवळपास 25% काम skada यंत्रणेशिवाय केल्याची आम्ही खातरजमा केली आहे . कामावर नेमलेले कन्सल्टंट व ठेकेदार यांनी दुय्यम दर्जाचा माल G 20 कामाची घाईगडबडीचा फायदा घेऊन वापरला आहे. सायबर सिटी म्हणून गाजावाजा करून घेणाऱ्या पुणे शहरातील मनपाकडे skada यंत्रणा जोडण्या साठी स्वतः सर्व्हर उपलब्ध नाही हा अजून धक्कादायक भ्रष्टाचाराचा प्रकार आम्ही गांभीर्य पूर्वक आपल्या नजरेसमोर आणत आहोत. कामाच्या दर्जा संबंधित अत्यंत महत्वाची असलेली skada यंत्रणा ठेकेदाराने कन्सल्टंटला हाताशी धरून जाणीवपूर्वक जोडलेली नाही.  प्रकार जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर करणारी असून फौजदारी गुन्ह्यास पात्र आहे.असे शिंदे यांनी म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, पुणे मनपाने ठेकेदारांच्या बॅच मिक्स प्लँट ला पथ विभागाच्या सर्व्हर ला जोडण्यासाठी कोणतीही तयारी का केली नाही, याबाबत सर्वच वरिष्ठ अधिकारी संशयास्पद मौन बाळगत आहेत. याबाबत कामावरील कनिष्ट अभियंता, उप अभियंता कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला.  अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्या आर्थिक संगनमताने घडत असलेल्या उघड भ्रष्टाचार प्रकरणी आपण जबाबदारी निश्चित करून अधिकारी यांचेवर कारवाई करावी व कन्सल्टंट यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. स्काडा यंत्रणेशिवाय निविदा क्र. ३२९,३३०,३३१ मध्ये डांबरीकरण करणेस परवानगी कारणमीमांसचा खुलासा मला आयुक्त स्तरावरून मला तातडीने उपलब्ध करून द्यावा.  पॅकेज 1,2,3,4,5 सर्व निविदा रद्दबातल करण्यात याव्यात. या प्रकरणी प्रशासकीय यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचे करदात्यां पुणेकरांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने निविदा रद्द करणेची ठोस कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच निविदा प्रक्रीयेची भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार करून योग्य ती कायदेशीर दाद मागण्यात येईन. असे ही शिंदे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Road Dept Tenders | पथ विभागाकडून मागवण्यात आलेल्या निविदा रद्द कराव्यात | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

Categories
Breaking News PMC पुणे

पथ विभागाकडून मागवण्यात आलेल्या निविदा रद्द कराव्यात

| कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

पुणे | पथ विभागाच्या (PMC Road Dept) वतीने काही निविदा (Tenders) मागवल्या आहेत. यामध्ये  पुणे शहरात विविध ठिकाणी पुनः डांबरीकरण व तदुषनिक कामे करणे (पॅकेज ४) आणि पुणे शहरात विविध ठिकाणी पुनः डांबरीकरण व तदुषनिक कामे करणे (पॅकेज ५) यांचा समवेश आहे. मात्र या निविदेवरून राजकारण होताना दिसत आहे. त्यामुळे या निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (congress city president Arvind Shinde) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram kumar) यांच्याकडे केली आहे.

याबाबत अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. शिंदे यांची निवेदनानुसार निविदा प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप, पात्र अपात्रतेच्या अटी शर्ती , अटी शर्तीच्या भंग केला असतानाही ठेकेदारांच्या पात्रतेसाठी लोकप्रतिनिधी यांनी आणलेला दबाव यामुळे माध्यमातून मोठी वृत्ते प्रकाशित झालेली आहेत. यामुळे पर्यायाने मनपाची, पुणे शहराची प्रतिमा मलिन होत आहे .वस्तुतः शेकडो कोटी ची कामे करणारे ठेकेदार पुणे शहरात मोजकेच आहेत .एवढ्या मोठी टेंडर रद्द करून विभाघून काढल्यास स्पर्धात्मक दर व वेगवान काम दोन्ही गोष्टी शक्य झाल्या असत्या. (PMC pune)

निविदा प्रक्रियेत राजकीय दबावाखाली अपात्र ठेकेदारांना पात्र ठरविले जात आहे .बहुतांशी ठेकेदारांनी टेंडर सबमिशन डेट पूर्वीचे हॉटमिक्स प्लँट गूगल लोकेशन, वैध करारनामा, बीड कप्यासिटी , खरे अनुभव दाखले जोडलेले नाहीत. मे SMC इन्फ्रास्ट्रक्चर यांनी जोडलेले कागदपत्रे आक्षेपार्ह असून वर्तमानपत्रामध्ये देखील याबाबत सविस्तर वृत्ते प्रकाशित झाली आहेत.  निविदेतील सर्व सहभागी ठेकेदारांच्या पात्रतेची खातरजमा आयुक्त स्तरावर करण्यात आल्यास गैरव्यवहाराची व्याप्ती आपल्या निदर्शनास येईन .
पॅकेज 1,2,3,4,5 सर्व निविदा रद्दबादल करण्यात याव्यात. सदर प्रकरणी प्रशासकीय यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचे करदात्यां पुणेकरांचे आर्थिक नुकसान होत आहे .सदर प्रकरणी प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. तसेच  योग्य ती कायदेशीर दाद मागण्यात येईल. असे ही शिंदे यांनी म्हटले आहे. (Pune Municipal corporation)

Road Repairing | PMC Pune | 50 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणार 193 कोटी! | 50 कोटी वर्गीकरणाने तर 143 कोटी 72 ब नुसार उपलब्ध केले जाणार

Categories
Breaking News PMC पुणे

50 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणार 193 कोटी!

| 50 कोटी वर्गीकरणाने तर 143 कोटी 72 ब नुसार उपलब्ध केले जाणार

पुणे | शहरातील (pune city) ५० रस्त्यांवर साधारणपणे १४० ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीची (Road repairing) आवश्यकता आहे. रस्त्याची सदयस्थिती रस्त्यांवरील वाहतुक शहरातील महत्वाचे लिंक रोड, वर्दळीचे रस्ते याचा विचार करुन कोणते रस्ते डांबरीकरण करावयाचे, कोणते रस्ते कॉक्रीट करावयाचे आणि कोणते रस्ते यु.टी.डब्ल्यु.टी. करावयाचे हे निश्चित करण्यात आलेले आहे. यासाठी 193 कोटींची आवश्यकता आहे. त्यातील 50 कोटी हे वर्गीकरणाने उपलब्ध केले जाणार आहेत. तर 143 कोटी हे 72 ब नुसार उपलब्ध केले जाणार आहेत. महापालिका प्रशासनाकडून (PMC official) याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.  (PMC Pune)
प्रशासनाच्या प्रस्तावानुसार चालु वर्षीच्या पावसाळयाच्या कालावधीमध्ये सलग पाऊस, विविध सर्व्हिसेस करिता म्हणजेच ड्रेनेज, 24*7 च्या पाण्याच्या लाईन्स, केबल खोदाई यामुळे शहरातील काही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य वर्दळीचे रस्ते जे खराब झालेले आहेत अथवा रस्त्याचा काही भाग खराब झालेला आहे. अशा सर्व ठिकाणांची पाहणी करुन त्या अनुषंगाने सविस्तर रस्त्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे.
सदयस्थितीत एकुण १४०० कि.मी. लांबीचे प्राथमिक टप्प्यातील सर्व्हेक्षण पुर्ण झालेले असून सदर सर्व्हेक्षण हे व्हिज्युअल इन्स्पेक्शन व रफो मिटर या दोन्ही पध्दतीने करण्यात आलेले आहे. या सर्व्हेक्षणामध्ये प्रथम टप्प्यामध्ये जिथे रस्ता खराब झालेला आहे अथवा रस्त्याचा काही भाग खराब झालेला आहे अशा सुमारे १४० ठिकाणांची व एकुण १४८ कि.मी. लांबीची रस्त्यांच्या खराब भागांची ठिकाणे प्रथम टप्प्यामध्ये निश्चित केलेली आहेत. (Pune Municipal corporation)
शहरातील ५० रस्त्यांवर साधारणपणे १४० ठिकाणी रस्त्यांच्या दुरुसतीची आवश्यकता आहे. रस्त्याची सदयस्थिती रस्त्यांवरील वाहतुक शहरातील महत्वाचे लिंक रोड, वर्दळीचे रस्ते याचा विचार करुन कोणते रस्ते डांबरीकरण करावयाचे, कोणते रस्ते कॉक्रीट करावयाचे आणि कोणते रस्ते यु.टी.डब्ल्यु.टी. करावयाचे हे निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार ७ कॉक्रीट व यु.टी.डब्ल्यु.टी. रस्ते व ४३ डांबरीकरणाचे रस्ते दुरुस्तीसाठी निश्चित करण्यात आलेले आहे. कामाच्या सोईनुसार  ३ पॅकेजेस निश्चित करण्यात आलेले आहे. (PMC Road Department)पॅकेज क्र. १ – ७ रस्ते – ६६,९९,६६, ४०७.६५/-रु

पॅकेज क्रं. २ – १४ रस्ते – ६३, ४७, ६५, ३९९.५४/-रु
पॅकेज क्रं. ३ –  २९ रस्ते – ६२,९९,७९, ८७९.८०/-रु
एकुण   – ५० रस्ते – १९३,४७, ११,६८६.९९/-रु

Safe transport | Dr. Siddharth Dhende | सुरक्षित वाहतूक अंतर्गत पुणे प्रभाग दोन बनला स्मार्ट |अर्बन ९५ संस्था, पुणे मनपातर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सुरक्षित वाहतूक अंतर्गत पुणे प्रभाग दोन बनला स्मार्ट

|अर्बन ९५ संस्था, पुणे मनपातर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

– पदपथ, रंगीत दिशादर्शक फलकांनी समतानगर, लुम्बिनी चौकाचे सुशोभीकरण

वाहतुकी बाबत जनजागृती करण्यासाठी सुरक्षित वाहतूक झोन अंतर्गत अर्बन ९५ संस्था, पुणे महापालिकेमार्फत प्रभाग दोन स्मार्ट करण्यात आला आहे. या प्रभागातील समतानगर लुंबिनी, जेष्ठ नागरिक चौकाचे आकर्षक सुशोभीकरण करून त्याचे उद्घाटन माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पुणे वाहतुक अतिरिक्त पोलिस आयुक्त मुल्ला सय्यद, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune Municipal corporation)

या कार्यक्रमाला अर्बन ९५ संस्थेचे प्रकाश पॉल, संदीप दीक्षित, आमिर पटेल, बाळासाहेब कांबळे आदींसह त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच प्रभाग दोन परिसरातील बालवाडी ( नर्सरी) चे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, प्रेरणा जेष्ठ नागरिक संघ व चैतन्य हास्य योगचे नागरिक तसेच परिसरा मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (Urban 95 organization)

वाढते शहरीकरण व वाहतुक समस्यामुळे चौकात लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व आजारी रुग्ण यांना जीव मुठीत घेउन रस्ता व चौक पार करावा लागतो. हे टाळण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन लहान बालकांना ‘सुरक्षित वाहतुक झोन ही योजना राबविली आहे. पुणे मनपा, अर्बन ९५’ या संस्थेच्या वतीने प्रभाग २ स्मार्ट करण्यात आला आहे. प्रभाग दोन मधील समतानगर, लुम्बिनी या चौकात ५०० मिटर परिसरामधे चार उद्यान, तीन विद्यालय, मनपाचा शिवराय दवाखाना, आधार कार्ड सेंटर, जेष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र, बस स्टॉप, भाजी मंडई, बँक तसेच ६ बालवाडी आहेत. या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मुले, महिला, दिव्यांग नागरिक व जेष्ठ नागरिकांची या चौकात मोठी वर्दळ असते. वाहने देखील वेगाने ये जा करतात. परिणामी अपघाताच्या शक्यता टाळण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी योग्य खबरदारी घेत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्दळीच्या या चौकात नागरिक, लहान बालके, महिला, वयोवृद्ध यांचे चालणे सुरक्षित झाले असल्याचे, डॉ. धेंडे यांनी सांगितले. (PMC Pune)

पुणे वाहतुक अतिरिक्त पोलिस आयुक्त मुल्ला सय्यद म्हणाले की, नागरिकांना वाहतूक शिस्त लागणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती करायला पाहिजे. बालवाडीपासूनच मुलांना वाहतूक शिस्त, नियम या बाबत माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरून ते या बाबत सतर्क होतील आणि वाहतूक शिस्त पाळणारे जबाबदार नागरिक देखील तयार होतील असे सय्यद म्हणाले.

चौकात या सुविधा असणार –

हा चौक बालस्नेही चौक म्हणुन विकसित करावा, यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे पाठपुरावा केला. प्रभागामधील सर्व नागरिकांच्या सहभागाने हा चौक विकसित करण्यात आला. यामध्ये पदपथ, रंगीत वाहतुक दिशादर्शक फलक, वाहतुकीचे माहिती फलक, लहान मुलांना बसण्याची व्यवस्था, नागरिकांना चालण्यासाठी पर्यायी मार्ग, रिक्षा व बस स्टैंडला राखीव जागा असे अनेक उपाय करण्यात आले आहेत.

School travel improvement plan | ९ शाळांमध्ये घेतली जाणार वाहतूक सुधारणा आराखड्याची ट्रायल!

Categories
Breaking News Education PMC social पुणे

९ शाळांमध्ये घेतली जाणार वाहतूक सुधारणा आराखड्याची ट्रायल!

|विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महापालिकेच्या पथ विभागाचे पाऊल

पुणे | शालेय विद्यार्थ्यांचा शाळेत जातानाचा प्रवास सुखकारक व्हावा, तसेच त्यांना शाळेत एकटे जाताना वाहतुकीची कसलीही अडचण येऊ नये आणि विद्यार्थ्याने वाहतुकीसाठी कुणावरही अवलंबून राहू नये, यासाठी महापालिका (PMC Pune) प्रयत्नशील आहे. त्यासाठी महापालिका शाळा वाहतूक आराखडा (School travel improvement plan) तयार करणार आहे. यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने (PMC Road dept) खाजगी वास्तुरचना काराकडून प्रस्ताव मागवले होते. त्यातील तीन जणांचे प्रस्ताव अंतिम करण्यात आले आहेत. त्यानुसार ९ शाळांमध्ये त्याची ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत ट्रायल घेतली जाणार आहे. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. इथे खूप शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे देश विदेशातून इथे विद्यार्थी शिकायला येत असतात. शिक्षणाच्या बाबतीत देश पातळीवर पुण्याचे नाव घेतले जाते. मात्र पुणे शहरात वाहतुकीची समस्या खूपच मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र त्या अपुऱ्या पडताना दिसून येतात. महापालिकेकडून करोडो खर्च करूनही वाहतूक समस्या तशीच आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाताना या समस्येला सामोरे जावे लागते. सायकलवर अथवा घरातून चालत शाळेत जाणे देखील पालकांना आणि विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटते. त्यामुळे पालक पैसे खर्च करून आपल्या पाल्याला स्कूल van ने शाळेत पाठवतात. तसेच अपघाताचे देखील प्रकार पाहायला आढळतात. हीच समस्या महापालिकेच्या पथ विभागाने ओळखून त्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विद्यार्थी कुठल्याही अडचणी शिवाय आणि कुणावरही अवलंबून न राहता बिनधास्तपणे शाळेत जाऊ शकेल. यासाठी पथ विभागाकडून आराखडा तयार केला जाणार आहे. (School travel improvement plan)

याबाबत पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले कि, विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेऊन आम्ही हा प्रकल्प राबवणार आहेत. विदेशात school safe zone नावाची संकल्पना राबवली जाते. त्याच धर्तीवर आम्ही हा प्रकल्प साकारणार आहोत. यामध्ये शाळेच्या परिसरातील १ किमी चा परिसर आम्हाला विकसित करायचा आहे. ज्यामध्ये ५ ते १२ वी पर्यंतचा कुठलाही विद्यार्थी आरामात सायकलवर किंवा चालत देखील आपल्या शाळेत जाऊ शकेल. यासाठी शहरातील ९ झोन आम्ही तयार केले आहेत. त्यानुसार खाजगी वास्तुरचना काराकडून प्रस्ताव मागवले होते. या ९ झोन मध्ये डेक्कन जिमखाना, हडपसर, लोहगाव-धानोरी, कोथरूड, वडगाव बुद्रुक, पर्वती-बिबवेवाडी, पाषाण, कोंढवा, आणि खराडी अशा झोन चा समावेश आहे. त्यानुसार प्रमुख तीन प्रस्ताव अंतिम केले गेले आहेत. (School travel improvement plan)

महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार यांनी सांगितले कि, खराडी परिसरासाठी अभिजित कोंढाळकर आणि टीम काम करणार आहे. तर डेक्कन परिसरासाठी अर्चना कोठारी आणि टीम तसेच पर्वती परिसरासाठी रोहित गादिया आणि टीम आराखडा बनवण्याचे काम करतील. या तीनही परिसरातील प्रत्येकी तीन अशा ९ शाळामध्ये ट्रायल घेतली जाईल. ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत ही ट्रायल घेण्यात येईल. याबाबत पालक आणि विध्यार्थ्यांना सूचित करण्यात आले आहे. तसेच पुणे पोलिसांचा देखील यात सहभाग असणार आहे. (School travel improvement plan)