BRTS | PMPML | PMC Pune | बीआरटी मार्गातील बसस्थानकाजवळील पादचारी मार्गामध्ये स्पीड टेबल बसवण्याची पीएमपीची मागणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

बीआरटी मार्गातील बसस्थानकाजवळील पादचारी मार्गामध्ये स्पीड टेबल बसवण्याची पीएमपीची मागणी

| महापालिकेकला पीएमपीचे पत्र

पुणे |. पुणे मनपा हद्दीमधील बीआरटी मार्गातील बसस्थानकाजवळील पादचारी मार्गामध्ये स्पीड टेबल बसवण्याची व स्पीड टेबलच्या दोन्ही बाजूस ५० फुट अंतरावर थर्मोप्लास्टिक मार्किंग करण्याची मागणी पीएमपी प्रशासनाने महापालिका प्रशासनाकडे केली आहे. याबाबत पीएमपी कडून महापालिकेला पत्र देण्यात आले आहे.

पीएमपीच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका हद्दीमधील संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते आपले घर आणि स्वारगेट ते कात्रज या बीआरटी मार्गामध्ये परिवहन महामंडळामार्फत बीआरटी बसेसचे संचलन सुरू आहे. पुणे मनपा हद्दीमधील सर्व बीआरटी बसस्थानके हि रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे रस्ता ओलांडताना प्रवाशांना धोकादायकरित्या रस्ता ओलांडावा लागत आहे. दैनदिन तपासणी करताना असे निदर्शनास आले आहे की पादचारी मार्गामध्ये स्पीड टेबल नसल्यामुळे तसेच अपुऱ्या सुरक्षाविषयक उपाययोजनांमुळे बीआरटी मार्गामध्ये वारंवार अपघात होत आहेत.  प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता सर्व बीआरटी बसस्थानकाजवळ स्पीड टेबल व स्पीड टेबलच्या दोन्ही बाजूस ५० फुट अंतरावर थर्मोप्लास्टिक मार्किंग करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच सदर ठिकाणी ब्लिंकर सिग्नल आणि सुरक्षाविषयक माहितीफलक बसविणे देखील गरजेचे आहे.

त्यामुळे  प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील बीआरटी धर्तीवर पुणे मनपा हद्दीमधील सर्व बीआरटी बसस्थानकाजवळ स्पीड टेबल आणि वरील नमूद सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात यावेत. अशी मागणी करण्यात आली आहे.