PMPML Location Base QR Code | पीएमपीएमएल च्या सर्व सेवक व अधिकारी यांची ‘Location Base क्युआर कोड’ द्वारे हजेरी

Categories
Breaking News पुणे

PMPML Location Base QR Code | पीएमपीएमएल च्या सर्व सेवक व अधिकारी यांची ‘Location Base क्युआर कोड’ द्वारे हजेरी

| ‘Location Base क्युआर कोड’ मोबाईल अॅप मध्ये स्कॅन करून होणार उपस्थितीची नोंद

 | प्रवाशी नागरिकांना योग्य व खात्रीशीर सेवा मिळण्यासाठी सर्व कार्यालये व डेपोमध्ये सुरुवात

PMPML Location Base QR Code |PMPML सेवकांनी व अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या वेळेतच उपस्थित राहून महामंडळाच्या कामकाजाच्या सोईच्या दृष्ठीने, प्रवाशांना योग्य व खात्रीशीर सेवा देण्याच्या दृष्ठीकोनातून ‘Location Base क्युआर कोड’ द्वारे हजेरीची नोंद महामंडळाच्या सर्व कार्यालये व डेपोमध्ये सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMPML Pune)

महामंडळाने कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी तयार केलेल्या ‘RTMS कार्गो एफएल’ मोबाईल एप मध्ये महामंडळातील सर्व सेवक व अधिकारी यांनी कामावर हजर होते वेळी दैनिक हजेरी या सदराखाली कामावर येण्याचा वेळेस व कामाची सुट्टी झाल्यावर जाण्याच्या वेळेस सर्व कार्यालयाच्या व सर्व डेपोच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेले ‘Location
Base क्युआर कोड’ स्कॅन करून उपस्थितीची नोंद करावयाची आहे. त्या नोंदी नुसार सर्व सेवक व अधिकारी यांचे पगार अदा करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना योग्य व खात्रीशीर सेवा मिळणार आहे.

PMPML Cashless Payment | पीएमपीएमएलने मेट्रो सोबत यंत्रणा कनेक्ट करावी | पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

Categories
Breaking News Political social पुणे

PMPML Cashless Payment | पीएमपीएमएलने मेट्रो सोबत यंत्रणा कनेक्ट करावी | पालकमंत्री चंद्रकांत पाटील

| पीएमपीएमएलच्या कॅशलेस सुविधेचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

 

PMPML Cashless Payment |पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक (Pune Public Transport) बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असून त्यामुळे नागरिकांना आपली वाहने घेऊन बाहेर पडावे लागणार नाही. तसेच एकाच तिकीट यंत्रणेमध्ये पुणेकर प्रवाशांना पीएमपीएमएल (PMPML) व मेट्रोमध्येही (Pune Metro)  सोयीस्करपणे प्रवास करता यावा यासाठी पीएमपीएमएलनेही मेट्रो सोबत यंत्रणा कनेक्ट करावी. असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

 

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कॅशलेस पेमेंट सुविधेचा (PMPML Cashless Payment Facility) शुभारंभ  १ ऑक्टोबर रोजी महामंडळाच्या कोथरूड आगार येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह, सहव्यवस्थापकीय संचालक  नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार – पवार, माजी नगरसेवक गणेशभाऊ वरपे, . नवनाथभाऊ जाधव, . अजयभाऊ मारणे, किरण दगडे-पाटील, अल्पनाताई वरपे, मा. श्री. दिलीप वेढे-पाटील, डॉ. संदीपजी बुटाला बाळासाहेब डेमकर, मा. श्री. नितीनजी शिंदे, वैभव मुरकुटे,  मंदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ई – तिकीट मशीन मध्ये कॅशलेस पेमेंट द्वारे तिकीट काढून सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी पुढे बोलताना  पाटील म्हणाले की, “डिजिटल व्यवहार वाढणे बाबत लोकांची खूप मोठी मागणी होतीतसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांचा आग्रह आहे, त्यानुसार तिकिटासाठी पीएमपीएमएलने ही आज कॅशलेस पेमेंट सुविधा सुरु केली आहे. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असून त्यामुळे नागरिकांना आपली वाहने घेऊन बाहेर पडावे लागणार नाही. तसेच एकाच तिकीट यंत्रणेमध्ये पुणेकर प्रवाशांना पीएमपीएमएल व मेट्रोमध्येही
सोयीस्करपणे प्रवास करता यावा यासाठी पीएमपीएमएलनेही मेट्रो सोबत यंत्रणा कनेक्ट करावी असे ते म्हणाले.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा.  सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले की,“ गेल्या तीन महिन्यापासून पीएमपीएमएल नागारीकांना चांगली सुविधा देण्यासाठी बरेच प्रयत्न करीत आहे, याबाबत
पालकमंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांनीही दोन वेळा येऊन आढावा घेतला, पीएमपीएमएलमध्ये प्रवासी संख्या वाढवण्यासाठी काय उपाययोजना करता येथील यासाठी आम्ही बसेस मधून प्रवास करून नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व प्रवासीभिमुख सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अनेक प्रवासी नागरिकांनी कॅशलेस पेमेंट द्वारे तिकीट मिळण्याची मागणी केली त्यानंतर बाणेर डेपो येथे यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आजपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये आजपासून कॅशलेस (युपिआय) पेमेंट द्वारे तिकीट सेवा सुरु केली आहे. पुढील तीन महिन्याचा
आतमध्ये नऊशे ते बाराशे बस मध्ये प्रवाशी नागरिकांना बसेसचे लाईव्ह लोकेशन देऊ शकणार आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे पीएमपीएमएल च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रज्ञा पोतदार – पवार यांनी प्रास्ताविक केले.

युपीआय पेमेंटमुळे प्रवाशांना व महामंडळास खालीलप्रमाणे फायदे होणार आहेत.

1. तिकीट घेण्यासाठी सुट्या पैशांची समस्या संपुष्ठात येणार आहे.
2. वाहकाकडील कॅश व्यवहार कमी होऊन कामाची गतिशीलता वाढणार आहे.
3. महामंडळाकडील कॅश व्यवहार कमी होऊन बँकेत पैसे तत्काळ जमा होणार आहेत.
4. लवकरच महामंडळाचे मोबाईल अॅपद्वारे बस ट्रॅकिंग, प्रवासाचे नियोजन व मोबाईल टिकिटिंग सुविधा महामंडळाकडून सुरु करण्यात येणार आहे.
5. डिजिटल इंडिया या संकल्पनेला हातभार.

या पद्धतीने होणार कॅशलेस पेमेंट

1. वाहकाकडे ऑनलाईन क्युआर कोडची मागणी करणे.
2. क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करणे.
3. वाहकाकडून निर्माण होणारे आपले तिकीट प्राप्त करणे.

Divyang PMPML Free Pass | ग्रामीण भागातील दिव्यांगांना पीएमपी चा मोफत बस पास देण्याबाबत उदासीनता 

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

Divyang PMPML Free Pass | ग्रामीण भागातील दिव्यांगांना पीएमपी चा मोफत बस पास देण्याबाबत उदासीनता

| पीएमपी सीएमडीनी मागणी करूनही दोन्ही मनपा आणि पीएमआरडीए कडून प्रतिसाद नाही

Divyang PMPML Free pass | ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिना (Divyang In Rural Area) पीएमपीएमएलचा  (PMPML) मोफत बस प्रवास पास (Free Bus Pass)  मिळणेबाबत वेगवेगळ्या संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे. मनविसे देखील (MNVS) याची मागणी पीएमपीकडे (PMPML pune) केली आहे. त्या अनुषंगाने  पुणे (PMC Pune) व पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpari Chinchwad Municipal Corporation) आणि पीएमआरडीए (PMRDA) कडे याबाबतचे धोरण तयार करण्याची मागणी पीएमपीचे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया (PMPML CMD Omprakash Bakoria) यांनी केली आहे. मात्र तिन्ही संस्थांकडून याबाबत कुठलाही प्रतिसाद अजून पीएमपीला मिळालेला नाही. यावरून दिव्यांगांबाबतची उदासीनता दिसून येत आहे. (Divyng PMPML free pass)

पुणे व पिंपरी महानगरपालिकेकडील समाज विकास विभागाचे (Social Devlopment Department) धोरणानुसार त्या त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहाणाऱ्या दिव्यांग व्यक्तीनां दरवर्षी महामंडळामार्फत १००% अनुदानीत पासेस देण्यात येतात. याकरीता दोन्ही महानगरपालिकांमार्फत मार्च महिन्याच्या अखेरीस वर्तमानपत्रात जाहिर प्रकटन देवून ऑनलाईन अर्ज मागविणेत येतात. त्यानुसार त्या त्या महानगरपालिकांकडून प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे(PMPML) पाठविणेत येते. सदर यादीनुसार त्या त्या मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तिनां महामंडळामार्फत वार्षिक मोफत बस प्रवास पास देणेत येतो. तसेच त्या त्या मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तिचे वार्षिक मोफत बस पास पोटीचे १००% अनुदान दरवर्षी त्या त्या महापालिकांकडून महामंडळास प्राप्त होते. (PMPML Pune News)
तथापि ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास दयावयाचा झालेस या पासेस पोटीचे अनुदान पीएमपी महामंडळास मिळणे आवश्यक आहे. सद्य स्थितीत दोन्ही महानगरपालिकांकडून ग्रामीण
भागातील दिव्यांग व्यक्तिंचे मोफत बस प्रवास पास पोटीचे कोणतेही अनुदान प्राप्त होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिीनां सदया मोफत बस प्रवास पास सवलत देणेत येत नाही. (PMP bus pass News)
ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास देणे बाबत वारंवार मागणी होत असल्याने याअनुषंगाने दोन्ही महापालिकांना महामंडळामार्फत नुकताच लेखी पत्र व्यवहार करणेत आलेला आहे. परंतु
दोन्ही महापालिकांकडून अद्याप याबाबतचे धोरण प्राप्त झालेले नाही. तरी पुणे व पिंपरी चिंचवड मनपाचे हद्दीतील दिव्यांग व्यक्तिनां देणेत येणारे मोफत बस पासचे धोरणाप्रमाणेच ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास दयावयाचा झालेस सदर पासेस पोटीचे अनुदान पीएमआरडीएकडून महामंडळास मिळाल्यास महामंडळामार्फत ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास देणेस हरकत नाही. यास्तव ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास दयावयाचा झालेस सदर पासेसपोटीचे अनुदान पीएमआरडीएकडून महामंडळास मिळणेबाबतचे धोरण निश्चित करून महामंडळास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करणे विषयी विनंती आहे. जेणे करून याबाबतची पुढील कार्यवाही करणे महामंडळास शक्य होईल. असे पीएमपीचे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया यांनी मागणी केली होती. मात्र याबाबत कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पुणे जिल्हा आणि बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी शिकण्यासाठी पुण्यात येतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह  राज्यातील अंध व अपंग विद्यार्थी व नागरिकांना मोफत बस सेवा दिली पाहिजे. अशी मनविसे ने मागणी केली आहे.
प्रशांत कनोजिया, मनविसे 
—–
News Title | Divyang PMPML Free Pass | Indifference towards providing free bus pass of PMP to disabled people in rural areas| There is no response from both Municipalities and PMRDA despite demand by PMP CMD