PMPML’s bus services | ‘पीएमपीएमएल’ ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा | १३ लाख प्रवाशांनी केला पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर

Categories
Breaking News social पुणे

‘पीएमपीएमएल’ ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा

| १३ लाख प्रवाशांनी केला पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर

पीएमपीएमएलने दैनंदिन उत्पन्नात  १४ नोव्हेंबर २०२२ रोजी २ कोटी रूपयांचा टप्पा पार केला. १३ लाख प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेवर विश्वास दाखवून बससेवेचा वापर केल्याने २ कोटी रूपये इतक्या विक्रमी उत्पन्नाचा टप्पा पार केला. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

१४ नोव्हेंबर रोजी १६५७ बसेस संचलनात होत्या. यापूर्वी ४ जानेवारी २०१६ रोजी २ कोटी रूपयांचे दैनंदिन उत्पन्न पार करण्यात पीएमपीएमएल ला यश आले होते. वाहतूक कोंडीचा विचार करता पीएमपीएमएल च्या ताफ्यात असणाऱ्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा वापर शहरवासियांनी व शहरात येणाऱ्या प्रवाशांनी वाढविला आहे. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी १३ लाख प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर केल्याने दैनंदिन उत्पन्नात २ कोटी रूपयांचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली पीएमपीएमएलची बससेवा ही किफायतशीर, सुरक्षित व विश्वासार्ह असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

मजूर, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेवर नेहमीच विश्वास
दाखवला आहे. त्याचबरोबर शहरातील शाळा व कॉलेज पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. दैनंदिन प्रवाशी संख्या व दैनंदिन उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेवर दाखविलेला विश्वास आहे. प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले आहे.