PMPML Employees Diwali Bonus | पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची इंटक ची मागणी | सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षीस २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याबाबत सीएमडीना दिले पत्र

Categories
Breaking News PMC social पुणे

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची इंटक ची मागणी

| सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षीस  २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याबाबत सीएमडीना दिले पत्र

PMPML Employees Diwali Bonus  | पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (PMPML) सर्व कायम, बदली सेवकांना सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षिस  २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याची मागणी पीएमटी कामगार संघ अर्थात इंटक ने पीएमपीच्या सीएमडी (PMPML CMD) कडे केली आहे. याबाबत संघटनेकडून सीएमडीना पत्र देण्यात आले आहे. दरम्यान आजच पुणे महापालिका सेवकांना (PMC Employees) बोनस देण्याबाबत परिपत्रक (Bonus Circular) जारी झाले आहे. त्याचप्रमाणे पीएमपी सेवकांना दिलासा दिला जाणार का, असा प्रश्न पीएमपी कर्मचारी विचारत आहेत. )PMPML Employees Diwali Bonus)

इंटक च्या पत्रानुसार आजतागायत सानुग्रह अनुदान व बक्षिस थकित फरकाच्या रक्कमा परिवहन महामंडळातील कामगारांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही महानगर पालिका त्यांचे सेवकांना सानुग्रह अनुदान व बक्षिस रक्कम देते. त्याचप्रमाणे महामंडळाच्या सर्व कायम व बदली सेवकांना सदरच्या रक्कमा द्यावयाची प्रथा पूर्व परिवहन उपक्रमापासून अस्तित्वात होती. कंपनी कायद्याखाली महामंडळाची स्थापना झाल्यानंतर मागील १६ वर्षांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना १/८ सानुग्रह अनुदान व बक्षिसाची रक्कम दोन्ही महानगर पालिकांकडून उपलब्ध झालेल्या निधितून देण्यात आलेली होती व आहे. (PMPML Pune)

सन १९९७ च्या करारातील मागणी क. ६ मधील मान्य तडजोडीप्रमाणे सानुग्रह अनुदान व बधिस देणे पीएमपीवर  पुणे म.न.पा. च्या सेवकांप्रमाणे बंधनकारक आहे. तसेच इंडस्ट्रियल डिस्प्युट अॅक्ट चॅप्टर-४ प्रमाणे कस्टमरी प्रथा कायद्याखाली येत आहे. औदयोगिक न्यायालय व  उच्च न्यायालय यांनीही बंधनकारक केलेले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील कर्मचारी जगातील सर्वाधिक गर्दिच्या शहरात ऊन, वारा पाऊस याचा विचार करता रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य निष्ठेने बजावित आहेत. (PMPML News)

पत्रात पुढे म्हटले आहे कि, उत्पन्नात वाढ होवून दरमहा १५ ते २० कोटी रू. उत्पन्न वाढलेले असून संचलन तुट कमी झालेली आहे. सदरचे उत्पन्न कर्मचारी व अधिकारी यांनी परिवहन महामंडळात आपले आवाहनाला प्रतिसाद देवून आपले रक्ताचे पाणी करून रात्रंदिवस कष्ट करून वाढविलेले आहे. हि बाब आपणास ज्ञात आहे. तरी परिवहन महामंडळाकडील सर्व कायम व बदली सेवकांची व त्यांच्या कुटूंबाची दिवाळी गोड करण्याकामी त्वरीत सकारात्मक निर्णय घेवून मनपा सेवकांप्रमाणे सर्व कायम बदली सेवकांना सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षिस र.रु. २९०००/- (र. रू. एकविस हजार) दिवाळीपूर्वी आपले स्तरावर पाठपुरावा करून देण्यात यावे अशी संघटनेच्या वतीने  मागणी करण्यात आली आहे.
———

PMPML Recruitment | पद भरती बाबत पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले हे आवाहन!

Categories
Breaking News social पुणे

PMPML Recruitment | कर्मचारी पद भरती बाबतच्या अफवावर कोणीही विश्वास ठेऊ नये | PMPML Administration 

PMPML Recruitment | पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) कोणतेही कर्मचारी पद भरती प्रक्रिया (PMPML Recruitment) राबविली नसून अशा अफवावर विश्वास ठेऊ नये. फसवणूक टाळावी असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML Pune) करण्यात आले आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या निगडी आगारामध्ये ०७/१०/२०२३ रोजी दुपारी ०३:०० वाजता एक तरुण नेमणूक आदेश घेऊन रुजू होणेबाबत आला. त्यानंतरनिगडी कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांनी चौकशी केली असता महामंडळाकडून कोणतीही भरती झाली नसल्याचे व संबंधित नेमणूक आदेश बनावट असल्याचे  त्यातरुणाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. (PMP Pune) 

त्यांनंतर निगडी आगाराचे आगार व्यवस्थापक  यांनी  ०७/१०/२०२३ रोजी निगडी पोलीस स्टेशन येथे बनावट आदेश देणाऱ्या विरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठीतक्रार दाखल केली आहे.

तरी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोणतेही कर्मचारी पद भरती प्रक्रिया राबविली नसून अशा अफवावर विश्वास ठेऊ नये व फसवणूक टाळावी असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

—–

PMPML Pune | Pune Ganesh Utsav 2023 | गणेश उत्सव काळात पीएमपी कडून ज्यादा बसेसचे नियोजन | जाणून घ्या बसमार्ग

Categories
Breaking News cultural social पुणे

PMPML Pune | Pune Ganesh Utsav 2023 | गणेश उत्सव काळात पीएमपी कडून ज्यादा बसेसचे नियोजन | जाणून घ्या बसमार्ग

PMPML Pune | Pune Ganeshotsav 2023 | गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई,सजावट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर प्रवासी नागरीकांचे सोयीकरिता दरवर्षी प्रमाणे यंदाही पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यामध्ये 20 व 21 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर रोजी 168 बसेस जादा म्हणुन व दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवाशी गरजेनुसार 22, 26 आणि 28 सप्टेंबर या कालावधीत 654 जादा बसेसचे गणेशोत्सवाकरीता नियोजन करण्यात आलेले आहे. (Extra Buses From PMPML For Pune Ganeshotsav 2023)

नागरिकांचे वाहतुकीचे सोयीसाठी खाली नमूद केलेल्या स्थानकावर प्रवासी गर्दीनुसार या कालावधीत खास बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • दैनंदिन संचलन गणेशोत्सव कालावधीमध्ये रात्री 10.00 नंतर बंद राहणार असून रात्री 10.00 नंतर सर्व बसेस यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहणार आहेत.
  • रात्री 10.00 नंतर बससेवेसाठी प्रचलित दरामध्ये रूपये 5 रुपये जादा दर आकारणी करण्यात येईल.
  • गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्री बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांना रात्री 12.00 वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत. (Extra Buses From PMPML For Pune Ganeshotsav 2023)
  • गणेशोत्सव कालावधीत शहर विभागातील रस्ते सायंकाळी पोलीस खात्याकडून बंद ठेवले जातात. त्यामुळे शहराच्या आतील भागातील बससेवा पर्यायी मार्गाने चालू ठेवण्यात येईल.

गणेशोत्सव कालावधीत खालील बसस्थानकांवरून त्या समोर दर्शविलेल्या ठिकाणांपर्यंत रात्री गरजेनुसार बससेवा देण्यात येणार आहे.

  1. स्वारगेट बस स्थानक – कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, नऱ्हे, आंबेगाव, जांभुळवाडी, अप्पर इंदिरानगर, मार्केटयार्ड, सांगवी, आळंदी.
  2. नटराज हॉटेल / सिंहगड रोड – वडगांव, धायरी व गरजेनुसार सिंहगड, खानापूर.
  3. स्वारगेट डेपो बस स्थानक- हडपसर, कोंढवा हॉस्पीटल.
  4. महात्मा गांधी बस स्थानक – कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक , साळुंके विहार.
  5. हडपसर गाडीतळ बस स्थानक – स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, ऊरूळी कांचन, मांजरी, थेऊर, फुरसुंगी, देवाची उरुळी.
  6. मोलेदिना हॉल / ससून रोड बस स्थानक – विश्रांतवाडी, लोहगाव, वाघोली, विमाननगर, वडगाव शेरी, आळंदी.
  7. डेंगळेपुल बस स्थानक – लोहगांव, वडगांवशेरी, मुंढवागांव/केशवनगर, शुभम सोसायटी, आनंद पार्क, तळेगांव ढमढेरे, हडपसर.
  8. म.न.पा.भवन मुख्य बसस्थानक व पेट्रोल पंप – भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देवगाव, विश्रांतवाडी, पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे गाव, तळेगाव दाभाडे, सांगवी, पिंपळे गुरव, आकुर्डी रेल्वे स्टेशन.
  9. काँग्रेस भवन बस स्थानक -कर्वेनगर, माळवाडी, एनडीए 10 नं. गेट, कोथरूड डेपो.
  10. डेक्कन जिमखाना / संभाजी पूल कॉर्नर – कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, गोखले नगर, कोथरूड डेपो.
  11. कात्रज बस स्थानक – स्वारगेट करीता.
  12. म.न.पा. पंप बस स्थानक – बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुसगांव करीता.
  13. अप्पर डेपो बस स्थानक – स्वारगेट करीता.
  14. धनकवडी बस स्थानक – स्वारगेट करीता.
  15. निगडी बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
  16. भोसरी बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
  17. चिंचवडगांव बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
  18. पिंपरी मेट्रो स्टेशन – चिंचवड, डांगे चौक, निगडी, पिंपरी, काळेवाडी, चिखली.

दि. 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक हा बंद होत असल्याने स्वारगेट चौकातील बस थांबे खालील प्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आले आहेत.

मूळ बसस्थानाचे नाव – मार्ग – तात्पुरते बसेस सुटण्याचे ठिकाण

  1. शाहु महाराज स्थानक (स्वारगेट) – सातारा रोडने कात्रज , मार्केटयार्ड करीता लक्ष्मी नारायण चौक
  2. नटराज बस स्थानक – सिंहगड रोडकडे जाणे करिता – पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) बस थांबा
  3. स्वारगेट स्थानका बाहेर – सोलापूर रोडने पुलगेट, हडपसर करिता – वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ)
  4. स्वारगेट स्थानका बाहेर – भवानी पेठ, नानापेठ, रास्तापेठ करिता – वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ)

रात्री 2.00 वाजेपर्यंतच जादा बसेसचे संचलन सुरु राहील.

दि.22 ते 28 सप्टेंबर पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार स्वारगेट ते निगडी अशा रात्री (यात्रेकरिता) जादा बसेस सोडण्यात येतील.

गणेशोत्सव कालावधीत गणेश भक्तांच्या सोयीसाठी वरील प्रमाणे जादा बस संचलन करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मुख्य रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवसभराच्या संचलनामध्ये नेहमीच्या शिवाजीरोड, बाजीरावरोड, लक्ष्मीरोड, टिळक रोड या रस्त्यांवरून संचलनात असलेल्या बसेसच्या मार्गामध्ये आवश्यकते नुसार बदल करण्यात येणार आहे, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

PMPML Bus Pass | पीएमपीने 40 रुपयात पुणे मनपा हद्दीत दिवसभर फिरा

Categories
Breaking News social पुणे

PMPML Bus Pass | पीएमपीने 40 रुपयात पुणे मनपा हद्दीत दिवसभर फिरा 

| पीएमपीएमएल च्या संपूर्ण संचलन क्षेत्रासाठी दैनिक व मासिक पास सुविधा सुरू

PMPML Bus Pass | पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (PMPML) पुणे व पिंपरीचिंचवड शहरांसह (Pune and Pimpari Chinchwad) पी एम.आर.डी.हद्दीत (PMRDA Limit) बससेवा पुरविण्यात येतेसध्या एका मनपा हद्दीसाठी दैनिकी पास  रूपये ४० व मासिक पास रूपये ९०० तर दोन्ही मनपा हद्दीसाठी दैनिक पास रूपये५० व मासिक पास रूपये १२०० असे पास वितरीत करण्यात येत असून सदरची सुविधा सुरूच राहणार आहे. या व्यतिरिक्त पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता दैनिक पास रू. १२० व मासिक पास रू. २७०० अशी पास सुविधा नव्याने सुरू करण्यात आली आहे. (PMPML Bus Pass) 

पी.एम.आर.डी.. संचलन क्षेत्रातील नोकरदारमहिला व लोकप्रतिनिधी यांनीपी.एम.आर.डी.. हद्दीतील प्रवाशांकरीता पूर्वीच्या संपूर्ण संचलन क्षेत्रासाठी असलेल्यापासच्या दरात काही प्रमाणात दरवाढ करून पूर्वीप्रमाणेच दैनिक पास व मासिक पाससुरू करणेबाबत वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे.

त्यास अनुसरून पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता दैनिक पास रू. १२० व मासिक पास रू. २७०० सुरू करणेस मा. संचालक मंडळाचे बैठकीत निर्णय झालेला आहे. (PMPML Pune) 

मासिक पाससाठी प्रवाशांनी परिवहन महामंडळाचे नजीकचे पास केंद्रावर जाऊन  आधार कार्डची झेरॉक्स प्रत व फोटो देऊन प्रवाशी ओळखपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. तसेच दैनिक पाससाठी आधार कार्डपॅन कार्डड्रायव्हिंग लायसन्सपासपोर्ट इत्यादी पैकी कोणतेही एक ओळखपत्र बसमधील वाहकाला दाखवून वाहकांकडून  दैनिक पास घेता येईलसदरील पास सुविधा दि. ०४/०९/२०२३ पासून सुरू करण्यात आली आहे.

तरी जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता सुरूकरण्यात येत असलेल्या दैनिक व मासिक पास सुविधेचा लाभ घ्यावाअसे आवाहन पुणेमहानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

PMP Bus | RakshaBandhan | रक्षाबंधन सणानिमित्त पीएमपीला ४ कोटीहून अधिक उत्पन्न 

Categories
Breaking News cultural social पुणे

PMP Bus | RakshaBandhan | रक्षाबंधन सणानिमित्त पीएमपीला ४ कोटीहून अधिक उत्पन्न

 

PMP Bus | RakshaBandhan | पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पी.एम.आर.डी.ए. (PMRDA) हद्दीत बससेवा पुरविण्यात येते. रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दरवर्षी प्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल कडून दि. ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी नियोजित १८३७ शेड्युल व्यतिरिक्त ९६ जादा बसेसचे नियोजन करून सदर बसेस गर्दीच्या मार्गांवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पीएमपीएमएल च्या बससेवेला  ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (PMP Bus | RakshaBandhan)

० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजीची  प्राप्त उत्पन्न खालीलप्रमाणे

तारीख               बस संख्या         उत्पन्न
३० ऑगस्ट           १९३०           १,९५,२७,३८४
३१ ऑगस्ट           १९०१            २,१६,४४,८५३

रक्षाबंधन सणानिमित्त विशेषतः महिला प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेतला. ३० ऑगस्ट ला १३ लाख ७३ हजार ८१९ प्रवाशांची नोंद झाली. तर ३१ ऑगस्ट ला १४ लाख ९६ हजार २८२ प्रवाशांची नोंद झाली. पीएमपीएमएल च्या बससेवेला असाच प्रतिसाद द्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.


News Title | PMP Bus | Raksha Bandhan | More than 4 crore income to PMP on the occasion of Rakshabandhan festival

PMPML Bus Live Location | PMPML बसचं गुगलवर दिसणार लाइव्ह लोकेशन

Categories
Breaking News social पुणे

PMPML Bus Live Location | PMPML बसचं  गुगलवर दिसणार लाइव्ह लोकेशन

PMPML Bus Live Location | पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) प्रायोगिक तत्त्वावर २० बसमध्ये गुगल लाइव्ह (Google Live) यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची चाचणी पुढील आठवड्यात सुरू केली जाणार असून, सप्टेंबर अखेरपर्यंत २० बसचे लाइव्ह लोकेशन प्रवाशांसाठी सुरू केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने बसचे गुगलवर लाइव्ह लोकेशन (Google Live Location) कळणार आहे. (PMPML Bus Live Location)

पीएमपीच्या बसचे गुगलवर लाइव्ह लोकेशन दिसावे, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा सुरू होत नव्हती. पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार घेतल्यानंतर बसचे गुगलवर लाइव्ह लोकेशन कळण्यासाठी दिसणारी सेवा सुरू करण्यासाठी पदाधिकारी व गुगलसोबत बैठक घेतली. तसेच, हे काम वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. (PMP Bus) 

त्यानुसार गुरुवारी पीएमपी व गुगलचे अधिकारी, ठेकेदारांचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. आतापर्यंत चार बस गुगलवर लाइव्ह लोकेशन यंत्रणा सुरू करण्यासाठी तयार झाल्या आहेत. येत्या काही दिवसात आणखी १६ बसमध्ये ही यंत्रणा बसवून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर २० बसमध्ये गुगल लाइव्ह यंत्रणेची चाचणी घेतली जाईल. सप्टेंबर अखेरपर्यंत २० बस प्रवाशांसाठी गुगलवर लाइव्ह दिसतील, अशा पद्धतीने काम केले जात आहे. त्यानंतर १०० बसच्या टप्प्याने त्यादेखील गुगलवर लाइव्ह दिसण्यासाठी काम केले जाणार आहे. (PMPML Pune) 

——-
News Title | PMPML Bus Live Location | Live location of PMPML bus will be visible on Google

PMPML Contractor Strike | पीएमपी म्हणते ठेकेदारांचा संप म्हणजे आडमुठे धोरण

Categories
Breaking News social पुणे

PMPML Contractor Strike | पीएमपी म्हणते ठेकेदारांचा संप म्हणजे आडमुठे धोरण

| पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांकडील चालकांचा संप 

PMPML Contractor Strike | २५ ऑगस्ट रोजी पीएमपीएमएलच्या (PMPML) काही खासगी बस ठेकेदारांकडील चालकांनी विशेषतः इलेक्ट्रिक बसेस (Electric Bus) ठेकेदारांकडील चालकांनी सकाळच्या सत्रात प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आडमुठे धोरण स्वीकारून (Blind Policy) संप पुकारला आहे. अशी भूमिका पीएमपी प्रशासनाने (PMPML Administration) घेतली आहे. दरम्यान खासगी ठेकेदारांकडील चालकांनी पुकारलेला संप मागे घ्यावा यासाठी पीएमपीएमएल प्रशासन व संबंधित ठेकेदार यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. (PMPML Contractor Strike) 

पीएमपी प्रशासनाने म्हटले आहे कि, खासगी बस ठेकेदारांकडील चालकांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे निर्माणझालेली परिस्थिती हाताळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालक यांच्या असलेल्या साप्ताहिकसुट्ट्या रद्द करून पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाकडून नियमित मार्गस्थ होणारे जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ करण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्यात आले.

परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रतापसिंह व सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी विशेष करून साप्ताहिक सुट्टी असताना देखील जे चालक व वाहक कामावर रुजू झाले त्यांचे  इतर सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. पीएमपीएमएल ची बससेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने व या बससेवेवर सर्व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.त्यामुळे महामंडळाकडील काही खासगी बस ठेकेदारांकडील चालकांनी पुकारलेला संप इतर कोणत्याही कारणामुळे निर्माण झालेली कोणतीही परिस्थिती हाताळून प्रवाशीसेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी पीएमपीएमएल कटिबद्ध आहे हे आजच्या सार्वत्रिक प्रयत्नातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 


News Title | PMP says strike of contractors is a blind policy | PMPML private bus contractors strike

Katraj-Kondhwa Road | Pune Project | कात्रज- कोंढवा रस्ता वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी महापालिका व पोलिसांनी एकत्रित काम करावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Categories
Breaking News PMC social पुणे

Katraj-Kondhwa Road | Pune Project | कात्रज- कोंढवा रस्ता वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी महापालिका व पोलिसांनी एकत्रित काम करावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

| पीएमपीएमएलच्या डिझेलवरील बसेस सीएनजीवर रुपांतरीत कराव्यात

 

Katraj-Kondhwa Road | Pune Project | प्रदुषणावर मात करण्यासाठी हरित ऊर्जेचा वापरावर भर देणे आवश्यक असून त्यादृष्टीने पीएमपीएमएलच्या (PMPML) डिझेलवरील सर्व बसेस सीएनजी इंधनावर रूपांतरित कराव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant patil) यांनी दिले. कात्रज- कोंढवा रस्त्यावरील (Katraj-Kondhwa Road) वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी महानगरपालिका तसेच शहर पोलीस वाहतूक शाखेने (Pune City Traffic Police)  एकत्रित उपाययोजना करुन अंमलबजावणी करावी. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी प्रयत्न करा, असेही पालकमंत्री श्री.पाटील यावेळी म्हणाले. (Katraj-Kondhwa Road | Pune Project)

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) येथे पीएमपीएमएल (PMPML), पाणीपुरवठा, जायका प्रकल्प (JICA Project), पुणे शहरातील रस्ते दुरुस्ती (Pune Road Maintaince), कात्रज- कोंढवा रस्ता तसेच वाघोली येथील समस्यांच्या अनुषंगाने आढावा बैठकांचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी पीएमपीएमएलचे मनुष्यबळ, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी व इतर आर्थिक बाबींचा आढावा घेतला. पीएमपीएमएलच्या मालकीच्या डिझेल इंधनावरील कार्यरत १२३ बसेस तसेच बंद स्थितीतील ५० बसेस अशा सर्व बसेस येत्या दोन महिन्यात टप्प्याटप्प्याने सीएनजीवर रुपांतरीत करण्यात याव्यात, जेणेकरुन पीएमपीएमएल ही संपूर्ण बसेस सीएनजी व ई-बसेसच्या रुपात हरित उर्जेवर आधारित सेवा होईल. चालू बसेस बंद पडण्याचे प्रमाण शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.

यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचींद्र प्रताप सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीस आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते.

२४ x ७ समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा

यावेळी २४ x ७ समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना टाक्यांची कामे, दाब जलवाहिन्या, वितरण नलिकांच्या कामांची सद्यस्थितीची माहिती पालकमंत्री श्री. पाटील यांनी घेतली. सर्व कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सादरीकरण केले. या प्रकल्पांतर्गत ८२ साठवण टाक्यांची कामे प्रस्तावित होती. त्यातील ४४ टाक्या पूर्ण झाल्या असून २० टाक्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ५ टाक्या लगतच्या झोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ५ टाक्यांचे नव्याने कार्यादेश देण्यात आले असून तेवढ्याच टाक्यांची नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे. १०७ कि.मी. च्या मुख्य दाब नलिकांपैकी ७४ कि.मी.चे काम पूर्ण करण्यात आले असून वितरण १२०० कि.मी.च्या वितरण नलिकांपैकी ८३६ कि.मी. चे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित कामही गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत २ लाख ८२ हजार एएमआर मीटर बसविण्यात येणार असून आतापर्यंत १ लाख २७ हजार मीटर बसविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पाची पूर्णत्वाची मुदत २०२५ अखेरची असून प्रक्रिया होणारे पाणी बांधकाम, उद्योग, उद्याने, शेती जलसिंचन आदींना देण्याच्यादृष्टीने मागणी- पुरवठ्याबाबत अहवाल तयार करावा, असे ते म्हणाले.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदारांकडूनच करुन घेतले जात असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकऱ्यांनी यावेळी सांगितले.

 

वाघोली येथील विकासकामांचा आढावा

वाघोली येथे पुणे-अहमदनगर रस्त्यास बाह्यवळण करुन जुळणारा रस्ता करण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने या रस्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद पुणे महानगरपालिकेने करावी, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. वाघोलीसह पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाबाबत एकात्मिक तसेच टप्पेनिहाय आराखडे तयार करावेत. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत, असेही ते म्हणाले.

रस्त्यावर अनियंत्रितरित्या उभ्या राहणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसेससाठी जागा निश्चित करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. वाघोलीसाठीच्या नवीन वीज उपकेंद्रासाठी जागा उपलब्धतेबाबत गतीने कार्यवाही करावी आदी निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

बैठकीस पीएमआरडीएचे आयुक्त राहूल महिवाल, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे मनपा तसेच पीएमआरडीएचे अधिकारी तसेच वाघोलीचे नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.


News Title |Katraj-Kondhwa Road | Pune Project | The municipality and the police should work together to resolve the Katraj-Kondhwa road traffic jam Guardian Minister Chandrakantada Patil

PMPML Employees | पीएमपीएमएल च्या रेकॉर्ड खराब असलेल्या 36 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई | गैरहजर राहिलेल्या एकूण १४२ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र 

Categories
Breaking News पुणे

PMPML Employees | पीएमपीएमएल च्या रेकॉर्ड खराब असलेल्या 36 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई | गैरहजर राहिलेल्या एकूण १४२ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र

| २ ड्रायव्हर व वर्कशॉप विभागाकडील एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई

PMPML Employees | पीएमपीएमएलच्या (PMPML) एकूण १५ डेपोंमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ३६ कर्मचाऱ्यांवर त्यांचे मागील रेकॉर्ड खराब असल्याने निलंबनाची (Suspension) कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये ३० कंडक्टर व ६ ड्रायव्हर्सचा समावेश आहे. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता २२/०७/२०२३ रोजी गैरहजर राहिलेल्या एकूण १४२ कर्मचाऱ्यांना आरोपपत्र देण्यात आले असून यामध्ये ७८ कंडक्टर व ६४ ड्रायव्हर्सचा समावेश आहे. याबरोबरच २ ड्रायव्हर व वर्कशॉप विभागाकडील एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या (PMPML Administration) वतीने देण्यात आली. (PMPML Employees)
पीएमपीएमएलच्या प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळावी, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, पीएमपीएमएलच्या ताफ्यातील जास्तीत जास्त बसेस मार्गावर संचलनात उपलब्ध व्हाव्यात, कामात कसून करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाणास आळा बसावा या दृष्टीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांना चोख व उत्तम सेवा मिळावी या उद्देशाने पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह (CMD Sachindra Pratap Singh) यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी प्रवासी दिन डेपोनिहाय पालक अधिकारी अशा उपक्रमांचा समावेश आहे. (PMPML Pune)
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी प्रवासी दिन हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत प्रवाशी त्यांच्या अडी-अडचणी, तक्रारी, सूचना नजीकच्या डेपोमध्ये, पास केंद्रावर किंवा बसस्थानकांवर जाऊन नोंदवू शकतात. तसेच सर्व डेपोंसाठी डेपोनिहाय पालक अधिकारी नेमलेले असून हे पालक अधिकारी प्रत्येक शनिवारी पहाटे ५.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत डेपोमध्ये समक्ष पाहणी करून प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करतात व त्यानंतर सकाळी ८.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत गर्दीच्या मार्गांवर स्वतः बसमध्ये प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधतात. पीएमपीएमएलच्या प्रवाशांना उत्तम सेवा मिळावी यासाठी अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होवू नये व त्यांना सौजन्यपूर्ण सेवा मिळावी या हेतूने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

— 

News Title | PMPML Employees | Suspension action against 36 employees of PMPML with bad records Charge sheet against a total of 142 employees who were absent

PMPML Bus Shelters | पीएमपीएमएल प्रवाशांच्या सोयीसाठी ३०० बसशेल्टर्स लवकरच उभारणार

Categories
Breaking News social पुणे

PMPML Bus Shelters | पीएमपीएमएल प्रवाशांच्या सोयीसाठी ३०० बसशेल्टर्स लवकरच उभारणार

 

PMPML Bus Shelters | पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) कडून निविदा प्रक्रियेद्वारे (Tender Process) लवकरच ३०० बस शेल्टर्स (Bus Shelters) उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMPML Bus Shelters)

सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी साधे, पुणे पॅटर्न, स्टेनलेस स्टील व बी.आर.टी. बस शेल्टर्स असे एकूण मिळून ११३० आच्छादित बसशेल्टर्स आहेत.
तसेच ज्या ठिकाणी बसशेल्टर्स नाहीत अशा ठिकाणी बी.ओ.टी. तत्वावर बसशेल्टर्स उभारण्याच्या निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाले असून नव्याने ३०० बसशेल्टर्स उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होणार आहे. (PMPML Pune News)


News Title |PMPML Bus Shelters | PMPML will soon set up 300 bus shelters for the convenience of passengers