Pramod Nana Bhangire | महापुरुषांच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

Categories
Breaking News Political social पुणे

Pramod Nana Bhangire | महापुरुषांच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

 

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service)  – गेल्या काहीच दिवसांपूर्वी हडपसर मधील ससाणे नगर येथे असलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करून पोलीस निरीक्षकांना तातडीने या प्रकारा मागच्या आरोपीवर कडक कारवाई करण्याचे सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची होणारी विटंबना ही अत्यंत निंदनीय व महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या भावना प्रक्षुब्ध करणारी आहे, महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण करणे ही शासनाबरोबरच आपली ही नैतिक जबाबदारी समजून महापुरुषांच्या होणाऱ्या विटंबनेच्या घटनेतून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.  अशा प्रकारांनी समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो, अशा घटनांना कायमचा पायबंद घालावा म्हणून शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करणारी कोणतीही घटना भविष्यात घडू नये. यासाठी ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाभोवती सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून घडलेल्या प्रकाराचा जलदगतीने तपास करून तत्काळ समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे.

Sassoon Pune | ससून रुग्णालयातील गैर प्रकारांची तातडीने चौकशी करा: प्रमोद नाना भानगिरे

Categories
Breaking News Political आरोग्य पुणे

Sassoon Pune | ससून रुग्णालयातील गैर प्रकारांची तातडीने चौकशी करा: प्रमोद नाना भानगिरे

 

Pramod Nana Bhangire Shivsena Pune – (The Karbhari News Service) –  मागील काही दिवसांपासून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील अनेक गैरप्रकार समाज माध्यमांद्वारे उघडकीस आले. रुग्णालयात गोरगरीब रुग्णांकडून पैसे उकळले जाण्याच्या घटना समोर आल्या.

रुग्णांची शस्त्रक्रिया सरकारी योजनेमार्फत मोफत झालेले असताना सुद्धा रुग्णांकडून पैसे घेतले गेले, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून साहित्य आणायला सांगितले गेले, खाजगी औषधालयांमधून औषधे, शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदी करण्याची जबरदस्ती रुग्णांच्या नातेवाईकांवर करण्यात आली तसेच न्यूरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरने एका रुग्णाच्या नातेवाईकाकडून तब्बल २४ हजार पाचशे रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांद्वारे समोर आला व असे अनेक गैरप्रकार रुग्णालयात घडत असल्याचे दाखले देणारे पुरावे समोर आले. या घडलेल्या गैरप्रकारांवर प्रश्न विचारल्यास रुग्णालयाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

याच घटनांचा पाठपुरावा करण्यासाठी शिवसेना पुणे शहराचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी रुग्णालयाला पत्र लिहून रुग्णालयात घडत असलेल्या गैरप्रकारांबद्दल विचारणा केली व गोरगरीब रुग्णांवर अन्याय करून त्यांना त्रास देणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी वजा सूचना दिल्या व ते न केल्यास शिवसेनेकडून रुग्णालयाविरुद्ध आंदोलनाचा इशाराही दिला.

Pune Rain | Pramod Nana Bhangire | तीव्र पावसामुळे पुणे शहरात झालेल्या पडझड व इतर नुकसानीबाबत तात्काळ मदत देण्याची शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Rain | Pramod Nana Bhangire | तीव्र पावसामुळे पुणे शहरात झालेल्या पडझड व इतर नुकसानीबाबत तात्काळ मदत देण्याची शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची मागणी

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – तीव्र पावसामुळे पुणे शहरात झालेल्या पडझड व इतर नुकसानीबाबत तात्काळ मदत देण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

भानगिरे यांच्या पत्रानुसार शहरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहून रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. ते खड्डे रहदाऱ्यांना दिसत नसल्याने ते जीव धोक्यात टाकणारे ठरत आहेत.

भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, पुणे शहरातील विविध ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन फुटली आहे, झाडांची पडझड होत आहे. झाडे पडून काही लोक जखमी झाल्याच्या घटना देखील या दिवसात समोर आल्या आहेत. एकंदरीत या मुसळधार पावसामुळे पुणेकर नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून या अडचणी तितक्याच धोकादायक ही ठरत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था ही या पावसामुळे आलेल्या अडचणींमुळे खोळंबली आहे. तरी पावसामुळे पुणे शहरावर ओढावलेल्या या समस्यांचे निवारण करण्यासाठी त्वरित आपल्या आपात्कालीन यंत्रणा व मदतकार्य कार्यान्वित करावे जेणेकरून शहरातील नागरिक सुटकेचा श्वास घेऊ शकतील.
|

हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पारित नियंत्रण कक्षामध्ये काम करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून द्या  | भानगिरे

भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे कि, मागील काही दिवसांपासून पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी देखील आहेत तरी
पावसाळ्याच्या कालावधीमध्ये हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे पूर्णवेळ अधिकचा एक जेसीबी निय यावा, सेटिंग मशीन, टायगर मशीन पूर्ण वेळ उपलब्ध करून मिळाव्यात.  तसेच मुख्य खात्याकडे ड्रेनेज
लाईन देखभाल दुरुस्ती विभागाचे टेंडर असल्यामुळे त्यांचे इंजिनीयर आणि कंत्राटी कर्मचारी हे देखील हडपसर क्षेत्रीय कार्यालयात पूर्ण वेळ उपलब्ध असले पाहिजेत.
त्याचप्रमाणे हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाची हद्द मोठी असल्यामुळे व हडपसर क्षेत्रीय कार्यालयात नव्याने गावे समाविष्ट झालेली असून पूर्णवेळ दोन उपअभियंता आवश्यक आहेत. परंतु आपल्या कार्यालयाकडे एकही उपअभियंता नाही तरी आपल्या कार्यालयास पूर्ण वेळ दोन उपाभियंता त्वरित
मिळावा. तसेच हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातून तीन कनिष्ठ अभियंत्यांची बांधकाम विभागात बदली झाली परंतु त्यांच्या जागी सेवक वर्ग विभागातून तीन अभियंता आले नाहीत.  त्यामुळे विकास कामांवर मोठा परिणाम होत असून नागरिकांच्या तक्रारी देखील वाढत आहेत. तरी आपण तीन कनिष्ठ अभियंता हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयास देण्यात यावे. अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे.
—–

Pramod Nana Bhagire | रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करून सांस्कृतिक राजधानीवर लागलेला डाग कायमचा पुसून टाका | प्रमोद नाना भानगिरे

Categories
Breaking News Political पुणे

Pramod Nana Bhagire | रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करून सांस्कृतिक राजधानीवर लागलेला डाग कायमचा पुसून टाका | प्रमोद नाना भानगिरे

 

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – पुणे शहर व जिल्ह्यातील बेकायदा पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करून सांस्कृतिक राजधानीवर लागलेला डाग कायमचा पुसून टाका. अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पत्र लिहून भानगिरे यांनी  तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. (Pramod Nana Bhangire Shivsena Pune)

पुण्यात अल्पवयीन मुलाकडून झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे शहर सुन्न पडले आहे. रात्री उशिरा पब व बारमधून मद्यधूंद अवस्थेत तरुणाई बाहेर पडते आणि बेधुंदपणे वाहने चालवल्यामुळे असे प्रकार घडतात असे उघडकीस आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत चालणारे सर्व अनधिकृत पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करावेत. अशी विनंती पुण्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे पोलीस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

भानगिरे यांनी पत्रात म्हटले आहे कि, काहीच दिवसांपूर्वी अल्पवयीन तरुणाकडून बेदरकार पद्धतीने वाहन चालवित अपघात केल्यामुळे पुणेकर सुन्न झाले आहेत . पार्लर याला हुक्का पुणे शहर व जिल्ह्यातील बेकायदा पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणारे पब , बार व कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील तरुणाई मोठ्‌या संख्येने याला बळी पडत असून मद्यधुंद अवस्थेत पब व बार मधून बाहेर पडतांना अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे . पुणे शहर व जिल्ह्याचे समाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी व पुणे शहराचे नावलौकिक शिक्षण , संशोधन व सांस्कृतिक राजधानी हाच असावा याकरिता शहरातील तरुणाईला व्यसनाधीनतेच्या विळख्यात टाकणाऱ्या या पब व हुक्का पार्लर संस्कृतीला तातडीने पायबंद घालणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे शहरात भान हरवून वावरणाऱ्या दिशाहीन तरुण पिढीला शिस्त लागावी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Pune Pubs | Pune Shivsena | पुणे शहरातील पब व बार रात्री बारा वाजेच्या आत बंद करा |  पुणे शहर शिवसेना

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Pubs and Bar  | Pune Shivsena | पुणे शहरातील पब व बार रात्री बारा वाजेच्या आत बंद करा |  पुणे शहर शिवसेना

 

Pune Pub News – (The Karbhari News Service) – शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्री बारापर्यंतच शहरातील पब व बार बंद करण्याची मागणी पुणे शहर शिवसेनेने (Pune Shivsena) केली आहे.

परवाच कल्याणी नगर परिसरात हिट अँड रनच्या प्रकारात मद्यधुंद अवस्थेत आलिशान गाडी बेफामपणे चालवत तरुण-तरुणींना बेदरकार पद्धतीने उडविल्याबाबत कल्याणी नगर येथे गुन्हा नोंदविलेला आहे सदर अपघात हा रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब व बार संस्कृतीमुळे घडला असून पुणे शहरातील सार्वजनिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी शहरातील पब व बार संस्कृतीला आळा घालण्यात अत्यंत आवश्यक आहे शहरातील सर्व अधिकृत बार व पब हे रात्री 12 नंतर पूर्णपणे बंद असावेत जेणेकरून घडणाऱ्या घटना टाळता येतील अशी मागणी आज पोलीस आयुक्तांना शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे, पुणे पोलिसांच्या माध्यमातून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्या बाबतही पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.पत्रावर शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, युवासेना सचिव किरण साळी, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे यांच्या सह्या आहेत.

Pramod Nana Bhangire | पुणे शहरातील निर्जीव झालेल्या झाडांची छाटणी व पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन स्वच्छता मोहीम राबवावी | प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे

Pramod Nana Bhangire | पुणे शहरातील निर्जीव झालेल्या झाडांची छाटणी व पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन स्वच्छता मोहीम राबवावी

| प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pre Monsoon work in Pune – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील निर्जीव झालेल्या झाडांची छाटणी व पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन स्वच्छता मोहीम राबवावी. अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana  Bhangire Shivsena) यांची महापालिका आयुक्तांकडे (PMC Commissioner) केली आहे. यावर अंमल नाही झाला तर आंदोलन करण्याचा इशारा भानगिरे यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
भानगिरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार गेल्या काही दिवसात पुणे शहरात अचानक मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाला ज्यात अनेक ठिकाणी निर्जीव असलेले वृक्ष उन्मळून पडलेले, तसेच ड्रेनेज लाईन तुंबलेली आढळून येत आहे. हडपसर मतदार संघातील प्रभाग क्रमांक 26 विविध ठिकाणी मोठ्‌या प्रमाणावर निर्जीव व जीर्ण वृक्षांची संख्या मोठ्‌या प्रमाणावर असून अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष कोसळून जीवित हानी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 26 मधील विविध ठिकाणी जीर्ण झालेल्या वृक्षांची कटाई तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या मोठ्या झाडांची छाटणी करणे अत्यावश्यक आहे.
भानगिरे यांनी म्हटले आहे कि, तातडीने या संदर्भात संबंधितांना सुचित करावे. तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर आलेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबलेली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. तरी तातडीने पुणे महानगरपालिकेच्या वतीने ड्रेनेज लाईन स्वच्छता मोहीम हडपसर मतदार संघात राबविण्यात यावी जेणेकरून पावसाळ्यापूर्वीच ड्रेनेज लाईन स्वच्छता मोहीम पूर्ण होवून नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात येणार नाही.
अनेक वेळा प्रशासनाच्या विलंबामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी संपूर्ण पूणे शहरातील तात्काळ निर्जीव झालेल्या वृक्षांची छाटणी
तसेच ड्रेनेज लाईन स्वच्छतेबाबत संबंधितांना तातडीने सूचना कराव्यात. अन्यथा पुणे शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.

Hadapsar Vidhansabha Constituency | नरेंद्र मोदी सभा : हडपसर विधानसभा मतदार संघातून 6 हजाराहून अधिक लोक उपस्थित राहणार! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती 

Categories
Breaking News Political पुणे

Hadapsar Vidhansabha Constituency | नरेंद्र मोदी सभा : हडपसर विधानसभा मतदार संघातून 6 हजाराहून अधिक लोक उपस्थित राहणार!

| शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती

Hadapsar Vidhansabha Constituency- (The Karbhari News Service) – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन येत्या 29 एप्रिल रोजी वानवडी येथील रेस कोर्स मैदान येथे करण्यात आले आहे. या सभेसाठी हडपसर विधानसभा मतदार संघातून 6 हजाराहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे हे सगळे लोक सोसायटी मधील असणार आहेत. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी दिली. (Pune Loksabha Election)
 पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून  रेसकोर्स याठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या माध्यमातून महायुतीच्या चारही उमेदवारांची ही महाविजय संकल्प सभा असणार आहे. 128 एकरांमध्ये ही सभा होणार असून या सभेला 2 लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत.  भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. 21 विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार आहेत.
दरम्यान यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघ सज्ज झाला आहे. याबाबत भानगिरे यांनी सांगितले कि शिवसेना पक्षाच्या वतीने नुकतीच मतदारसंघातील सोसायट्याध्ये नागरिकांसोबत बैठका घेण्यात आल्या. यात नागरिकांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार सोसायट्यामधील 6 हजारहून अधिक नागरिक या सभेला उपस्थित राहणार आहेत.

Mahamadwadi Water Issue | महंमदवाडी कौसरबाग परिसरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्या वरून शिवसेना करणार आंदोलन | शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Mahamadwadi  Water Issue | महंमदवाडी कौसरबाग परिसरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्या वरून शिवसेना करणार आंदोलन

| शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती

Pramod Nana Bhangire- (The Karbhari News Service) प्रभाग क्र.२६ महंमदवाडी कौसरबाग  मध्ये कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने 10 एप्रिल रोजी महापालिका भवन मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत प्रशासनाला सोमवार पर्यंतची मुदत दिली आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली. तसेच याबाबत महापालिका प्रशासनासोबत देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. (PMC Water Supply Department)

भानगिरे यांच्या निवेदनानुसार प्रभाग क्र.२६, महंमदवाडी कौसरबाग हा प्रभाग लोकसंखेच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टिने सर्वात मोठा प्रभाग आहे. बऱ्याच महिन्यापासून प्रभागात पाणीपुरवठा कमी दाबाने व अवेळी होत आहे. अनेक भागांमध्ये मध्यरात्री, अपरात्री, पहाटे पाणीपुरवठा  केला जातो. अवेळी पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोराबजी परिसर, क्लाऊड नाईन, चिंतामणी नगर, गुलाम आली नगर, ससाणे
वस्ती,काळेपडळ,बडदे मळा, दुगड चाळ, हांडेवाडी रोड,ईसीपी वास्तू ड्रीम इस्टेट, ग्रीन सिटी, नमो विहार, ईशरथ बाग,पांगारे मळा, सनश्री साळुंखे विहार, काळेपडळ, महंमदवाडी गावठाण, संपूर्ण हांडेवाडी रोड व इतर भागांमध्ये पाणी वेळेवर न येणे व कमी दाबाने येत आहे.

भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, विभागातील संबधित अधिकारी यांना वारंवार सूचना देऊन देखील याबाबतीत कोणत्याही समस्येचे निवारण केलेले नाही. या कारणास्तव सर्व नागरीक अतिशय त्रस्त झाले आहेत. बऱ्याच वेळा आम्ही तक्रार करुन काही निष्पन्न झाले नाही. माझ्या प्रभागामध्ये सर्व परिसरातील सोसायटी नागरिक नियमित टॅक्स भरत असतात तरीही त्यांना पानी पुरवठा सुरळीत होत नाही. टँकर देखील अपुरे दिले जातात. तरी प्रभाग क्र 26 महंमदवाडी- कौसरबाग चा पाणी पुरवठा येत्या सोमवार पर्यंत सुरुळीत न केल्यास तसेच वाढीव नाही दिल्यास आपल्या कार्यालयावर शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईल नुसार भव्य मोर्चा काढून कार्यालयास टाळे ठोकले जातील व आपणास घेराव घालुन जाब विचारल्याशिवाय नागरीक राहणार नाहीत. आम्ही आंदोलन प्रसंगी होणाऱ्या परिणामास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील. असेही भानगिरे यांनी म्हटले आहे.

34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठी 18 लोकप्रतिनिधींची समिती | जाणून घ्या 18 सदस्यांची यादी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठी 18 लोकप्रतिनिधींची समिती | जाणून घ्या 18 सदस्यांची यादी

34 Villages Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत ( Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. हा प्रश्न मागील काही दिवसांपासून गंभीर होत चालला आहे.  आता यावर तोडगा काढण्यात आला असून यासाठी विभागीय आयुक्तांच्या (Pune Divisional Commissioner) अध्यक्षतेखाली १८ लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान यासाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी पाठपुरावा केला होता.

पुणे महापालिका (PMC Pune) हद्दीत 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहराच्या हद्दीत वाढ झाली आहे. तसेच या गावांना महापालिकेचे सर्व नियम लागू झाले आहेत. मिळकत कराची (PMC Pune property Tax) वसुली देखील सुरु झाली आहे. मात्र या गावांमध्ये मूलभूत सुविधाचा अभाव आहे.  यावर  नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) देखील चर्चा झाली होती.  मंत्री उदय सामंत यांनी ह्या विषयाबाबत दखल घेतली होती. शासनाकडून 34 गावातील लोकप्रतिनिधी मिळून विभागीय आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून समिती ताबडतोब नेमली जाईल व त्या समितीमार्फत निधी देऊन कामे होतील असे अधिवेशनात सांगितले होते. (PMC Pune village news)

आता या समाविष्ट ३४ गावांतील मूलभूत सोयी सुविधा आणि विकास कामे या समितीद्वारे केली जातील. यामुळे ३४ गावांचा खोळंबलेला विकास मार्गी लागण्याची शक्यता आहे. १८ लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यासंबंधीचे आदेश नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी (Priyanka Kulkarni) यांनी जारी केले आहेत.

 

२०१७ मध्ये ११ तसेच २०२१ मध्ये २३ अशा एकूण ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेच्या हद्दीत करण्यात आला. मात्र, या समावेशानंतर ताबडतोब म्हणजेच मार्च २०२२ मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर महापालिका निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वाधिक फटका या ३४ गावांना बसत आहे.

या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर त्यांची महापालिकेनुसार त्यांची प्रभाग रचना आणि अन्य गोष्टी वादात सापडल्या. या सर्वाचा परिणाम म्हणजे ३४ गावांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधीच नाही अशी स्थिती आहे. मात्र, आता शासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

प्रमोद नाना भानगिरे यांनी लावून धरला होता विषय

पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट 34 गावांच्या (Merged 34 villages) समस्या सोडवण्यासाठी “लोकप्रतिनिधी समिती” (Representative Committee) नियुक्त करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून (State Government) देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याचा कुठलाही अध्यादेश नव्हता. याकडे शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे (Shivsena City President Pramod Bhangire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे लक्ष वेधले होते. तसेच समाविष्ट गावांना न्याय देण्याची मागणी भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार आता ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांचा रचनाबद्ध विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी समिती गठीत होणे आवश्यक होते. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करत होतो. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आली असून गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे. 

प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना शहर प्रमुख, पुणे 

: गाव आणि लोकप्रतिनिधी यादी 

1. मांजरी बुद्रुक  – अमर राजू घुले 

2. साडे सतरा नळी – उल्हास दत्तात्रय तुपे 

3. केशवनगर मुंढवा – विकी शिवाजी माने 

4. सुसगाव – बाळासाहेब रामदास चांदेरे 

5. लोहगाव – सुनील बबन खांदवे 

6. शिवणे गाव – सचिन विष्णू दांगट 

7. धायरी गाव – अश्विनी किशोर पोकळे 

8. बावधन – स्वाती अनंता टकळे 

9. उंडरी – पीयुषा किरण दगडे 

10. होळकरवाडी – राकेश मारुती झाम्बरे 

11. आंबेगाव खुर्द – श्रीकांत मारुती लिपार्ने 

12. पिसोळी – मछिंद्र काळुराम दगडे 

13. वाघोली – संदीप सोमनाथ सातव 

14. मांजरी बु – बाळासाहेब वसंत घुले 

15. साडेसतरा नळी – भूषण माउली तुपे 

16. केशवनगर – वंदना महादेव कोद्रे 

17. उंड्री – राजेंद्र काशिनाथ भिंताडे 

18. पिसोळी – स्नेहल गणपत दगडे 

Pramod Nana Bhangire | महंमदवाडी परिसरातील सोसायट्यांचा पाणी प्रश्न सुटणार! | आढावा बैठकीत प्रमोद नाना भानगिरे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना केल्या सूचना

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pramod Nana Bhangire | महंमदवाडी परिसरातील सोसायट्यांचा पाणी प्रश्न सुटणार!

| आढावा बैठकीत प्रमोद नाना भानगिरे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना केल्या सूचना

Pune – (The Karbhari News Service) – महंमदवाडी परिसर आणि परिसरातील सोसायट्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र ही समस्या आता कायमस्वरूपी सुटणार आहे. याबाबत शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्या सोबत आढावा बैठक घेऊन समस्या सोडवण्याबाबत सूचना केल्या आहेत. (Pramod Nana Bhangire Shivsena Pune)

याबाबत भानगिरे यांनी सांगितले कि, परिसरात महापालिकेकडून 9 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र त्या चालू करण्यात आल्या नाहीत. मात्र आता Sangriya Society बूस्टर येथून नाविन पाइप लाइन टाकून raheja vista Society परिसरात पाणीपरवठा करणेसाठी कामे करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पाणीपरवठा विभाग अधिकारी यांचे समवेत बैठक घेण्यात आली.  तसेच दोराबजी येथील बांधून पूर्ण असलेल्या तीन टाक्याचे अनुषंगाने पाणीपरवठा करण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. लवकरच ही कामे मार्गी लागणार असून परिसरातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. असे भानगिरे यांनी सांगितले मी.

आढावा बैठकीला नंदकिशोर जगताप ,मुख्य अभियंता पाणीपुरवठा, रणदिवे, अधिक्षक अभियंता लष्कर, वायदंडे, अधिक्षक अभियंता समान पाणीपुरवठा, पावरा, कार्यकारी अभियंता लष्कर,  बोरसे उपअभियंता लष्कर, वासकर कनिष्ठ अभियंता लष्कर असे अधिकारी उपस्थित होते.