Affidavit | Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर १० कोटींचे मालक | शपथ पत्रात नमूद केली माहिती

Categories
Breaking News Political पुणे

रवींद्र धंगेकर १० कोटींचे मालक | शपथ पत्रात नमूद केली माहिती

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba peth Byelection) महा विकास आघाडीकडून काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या शपथ पत्रामध्ये आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता ५ कोटी ८८ लाख ९७ हजार १०७ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ८० हजार ६० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या नावाने स्थावर जंगम मालमत्ता ४ कोटी ३५ लाख ३६ हजार ८९२ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ३ लाख ५० हजार रुपये इतकी आणि १५ तोळे सोने आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्ब्ल १० कोटी २४ लाख ३३ हजार ९९९ इतकी आहे. तसेच त्यांच्या नावावर गुन्हेगारी, फौजदारी स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

 

रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. ते स्वतः सोने-चांदीचे कारागिरीचा व्यवसाय करत आहेत. तर त्यांच्या पत्नी या शेती तसेच बांधकाम व्यवसाय करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची विशेष करून दौंड तालुक्यातील पिंपळगाव आणि हवेली तालुक्यातील नांदोशी येथे जवळपास दहा एकर शेतजमीन तर पुणे शहरातील कोथरूड येथे पाच गुंठे जागा आहे. रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर अशी दोघांच्या नावे १० एकरहून अधिक जमीन आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील मंगळवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे प्रत्येकी एक फ्लॅट देखील आहे.

रवींद्र धंगेकर यांनी आपले वार्षिक उत्पन्न ३ लाख ३६ हजार ९४० रुपये रुपये तर पत्नी प्रतिभा ३ लाख ९८ हजार ४०० रुपये इतके दाखवले आहे. तसेच रवींद्र धंगेकर यांच्याकडे एक होंडा ऍक्टिव्हा, एक रॉयल एनफिल्ड अशी एक दुचाकी वाहन आहे.

Property Declaration | मालमत्ता विवरणपत्र देण्यास महापालिका क्लास वन अधिकाऱ्यांची उदासीनता 

Categories
Breaking News PMC पुणे

मालमत्ता विवरणपत्र देण्यास महापालिका क्लास वन अधिकाऱ्यांची उदासीनता

महापालिका कायद्यानुसार (MMC Act) पालिकेच्या १ ते ३ ऱ्या गटातील सर्व कामगार व अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील (Property decraration) सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दरवर्षी ३१ मे पूर्वी ही माहिती द्यावी लागते. वर्ग तीन आणि 2 मधील कर्मचाऱ्यांनी ही माहिती सादर केली आहे. मात्र वर्ग 1 (claas one) मधील अधिकाऱ्यांनी अजूनही माहिती सादर केली नाही. त्यामुळे तात्काळ माहिती सादर करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.  (Pune Municipal corporation)

 – महापालिका कायद्यानुसार तपशील देणे बंधनकारक आहे

 महानगरपालिकेच्या इमारतीत आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 20 हजारांहून अधिक कामगार काम करतात.  श्रेणी 1 ते श्रेणी 4 कर्मचारी यामध्ये काम करतात.  राज्य सरकारच्या सूचनेनुसार श्रेणी 4 वगळता सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे.  त्याअंतर्गत पालिका त्यावर अमल करत आहे.  या तपशिलाचा अहवाल ३१ मेपूर्वी सादर करण्याच्या सूचना महापालिकेच्या प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत.  तरीही त्यांच्या मालमत्तेचा तपशील पालिका कर्मचारी व अधिकारी मांडत नाहीत. दरम्यान वर्ग तीन आणि 2 मधील कर्मचाऱ्यांनी ही माहिती सादर केली आहे. मात्र वर्ग 1 मधील अधिकाऱ्यांनी अजूनही माहिती सादर केली नाही. त्यामुळे तात्काळ माहिती सादर करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. (PMC Pune)