PMC Pune Property Tax Bill | तुमच्या कामाची बातमी | प्रॉपर्टी टॅक्स च्या बिलांबाबत अडचणी असतील तर ही माहिती जाणून घ्या! 

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

PMC Pune Property Tax Bill | तुमच्या कामाची बातमी | प्रॉपर्टी टॅक्स च्या बिलांबाबत अडचणी असतील तर ही माहिती जाणून घ्या!

PMC Pune Property Tax Bill | पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) केवळ निवासी मिळकतींना (Residential Property) स्वः वापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत कायम करण्यात आली आहे. २०२३-२४ मध्ये पाठवण्यात आलेल्या देयकाबाबत मिळकतधारकांमध्ये मिळकतकर भरणेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत. नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत ही माहिती महत्वाची आहे. महापालिका टॅक्स विभागाकडून हा खुलासा करण्यात आला आहे. चला ही माहिती जाणून घेऊया. (PMC Pune Property Tax Bill)

०१.०४.२०१९ पूर्वी मिळकतीची आकारणी झाली असल्यास :-

ज्या निवासी व बिगरनिवासी मिळकतींची आकारणी  ०१.०४.२०१९ पूर्वी झाली आहे अशा मिळकतींना वार्षिक करपात्र रकमेत देण्यात येणारी देखभाल दुरुस्ती सवलतीत ०१.०४.२०२३ पासून ५% ने वाढवण्यात आली आहे.  ०१.०४.२०१९ पूर्वी निवासी मिळकतीना करपात्र रकमेत ४०% सवलत देण्यात येत होती.  त्यामुळे ०१.०४.२०१९ पूर्वी आकारणी झालेल्या निवासी मिळकतधारकांनी पुन्हा ४०% सवलतीकरिता PT-३ फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. (PMC Property tax department)

 ०१.०४.२०१९ नंतर मिळकतीची आकारणी झाली असल्यास :-

ज्या निवासी मिळकतींची आकारणी दि. ०१.०४.२०१९ नंतर झाली आहे त्या सर्व मिळकतधारकांना  २०२३-२४ च्या देयकात करपात्र रकमेत ४०% सवलत देण्यात आली आहे.  मिळकतीचा वापर स्वः वापराकरिता होत असल्यास मिळकतीच्या आकारणी दिनाकापासून ते आजपर्यंत ४०% सवलत प्राप्त करणेकरिता सर्व मिळकतधारकांनी सन २०२३ २४ चा मिळकतकर भरून PT-३ अर्ज १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत नजीकच्या संपर्क कार्यालय/क्षेत्रिय कार्यालय/मुख्य कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक/विभागीय निरीक्षक यांचे कार्यालयात किमान दोन रहिवासी पुराव्यासह जमा करावा. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षांच्या देवकातून समायोजित करण्यात येईल.
विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वः वापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल व त्यांना पुढील कालावधीत फरकाचे देयक दिले जाईल. (PMC Pune Property tax News)

जी. आय. एस. सर्वे अंतर्गत ०१.०४.२०१८ पासून सवलत काढून घेतली असल्यास :-

ज्या मिळकतींची ४०% सवलत जी. आय. एस. सहें अंतर्गत दि.०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ दिनांक ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात आला आहे.
वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना ०१.०४.२०१८ पासून दि. ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत दि. ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज नजीकच्या संपर्क कार्यालय क्षेत्रिय कार्यालय मुख्य कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक/ विभागीय निरीक्षक यांचे कार्यालयात किमान दोन रहिवासी पुराव्यासह जमा करावा. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षांच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक
स्वः वापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल व त्यांना पुढील कालावधीत फरकाचे देयक दिले जाईल. (PMC Pune Marathi News)
संगणकावर दर्शवण्यात आलेली २०२३ ३ व २०२३ ४ हि ह्यापूर्वी पाठवण्यात आलेली ४०% फरकाची रक्कम असून मिळकतदार मिळकतीत स्वतः राहत असल्यास दर्शवण्यात आलेल्या थकबाकीमधील रक्कम सोडून उर्वरित रक्कम भरावी, PT-३ (PT 3 Application) अर्ज भरून दिलेनंतर मागील थकबाकीबाबत कार्यवाही करण्यात येईल. मिळकतदार मिळकतीत स्वःरहिवास करीत नसल्यास संगणकावर दर्शवण्यात आलेली संपूर्ण थकबाकीसह रक्कम मिळकतधारकास भरणे बंधनकारक राहील.

सवलत प्राप्त करणेकरिता PT-३ अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे : (PT 3 Application form)

मिळकतीचा वापर स्वतः राहण्यासाठी करित असल्याबाबत सोसायटीचे नाहरकत पत्र, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅस कार्ड, रेशनकार्ड (यापैकी कोणतेही दोन सक्षम पुरावे) व पुणे शहरात अन्य ठिकाणी निवासी मिळकत असल्यास त्या मिळकतीच्या मिळकतकराच्या बिलाची प्रत PT-३ अर्जासोबत वरील सक्षम पुराव्याचे कुठलेही दोन कागदपत्रे व २५ रु. चलन फी भरून नजीकच्या संपर्क कार्यालय/क्षेत्रिय कार्यालय / मुख्य कार्यालय/नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक/विभागीय निरीक्षक यांचेकडे अर्ज जमा केलेनंतर पेठ निरीक्षक/विभागीय निरीक्षक यांचेकडून कागदपत्रांची तपासणी करून करआकारणी व करसंकलन प्रमुख यांचेकडून प्रकरण अंतिम करणेत येईल.
——
News Title | PMC Pune Property Tax Bill | News of your work If you have problems with property tax bills, know this information!

MLA Ravindra Dhangekar | पुणे शहरातील ५०० चौ. फुट पर्यंतच्या सदनिकांना मिळकत करात सूट देण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

MLA Ravindra Dhangekar |  पुणे शहरातील ५०० चौ. फुट पर्यंतच्या सदनिकांना मिळकत करात सूट देण्याची मागणी

| आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी

MLA Ravindra Dhangekar | (Author: Ganesh Mule) : पुणे शहरातील (Pune city) ४६.४५ चौ मीटर (५०० चौ. फुट) पर्यंतच्या अथवा त्या पैकी कमी क्षेत्रफळ असलेल्या सदनिकांना मिळकत करातून सूट (Property Tax Discount) देण्याची मागणी काँग्रेस चे पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. याबाबत आमदार धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. (MLA Ravindra Dhangekar News)
आमदार धंगेकर यांच्या पत्रानुसार मुंबई महानगर पालिकेच्या (BMCC) हद्दीतील निवासी इमारतीमधील ५०० चौ. फुट पर्यंत चटई क्षेत्र असलेल्या सदनिकांना मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी सन २०२१ मध्ये घेतला आहे. पुणे मनपा (PMC pune) ने सदनिका धारकांना देण्यात येणारी मिळकत करातील ४० टक्के सवलत रद्ध केली होती. याचा फटका हजारो पुणेकरांना बसला होता. याबाबत मी देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ मध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून पुणेकरांची व्यथा मांडली होती. (Pmc Pune news)
पुणे शहरात सर्व सामान्य नोकरदार व मध्यमवर्गीय वर्ग ५०० चौ. फुट अथवा त्यापेक्षा कमी जागेत मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांना मालमत्ता कर भरणे अत्यंत जिकरीचे होत आहे.  आपणांस विनंती आहे कि, मुंबईच्या धर्तीवर पुणे महानगर क्षेत्रातील ५०० चौ. फुट किंवा त्यापेक्षा कमी जागेत असलेल्या सदनिकांना मालमत्ता करातून मुक्त करण्यात यावे, व त्या बाबतचा निर्णय तातडीने घ्यावा. असे धंगेकर यांनी म्हटले आहे. (Pmc pune property tax)