PMC Pune Fireman Bharti Physical Exam | फायरमन पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेसाठी मैदान निश्चित | पुणे मनपा कडून जाहीर प्रकटन प्रसिद्ध

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Fireman Bharti Physical Exam | फायरमन पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेसाठी मैदान निश्चित | पुणे मनपा कडून जाहीर प्रकटन प्रसिद्ध

Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदासाठी पात्र झालेल्या 575 उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत  घेण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवारांची शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग, पाषाण, पुणे यांचे कार्यालयांतर्गत असलेल्या मैदानावर होणार आहे.  यासाठी जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Bharti 2023)
पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरत आहेत. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा  ही 26, 27 आणि 28 ऑक्टोबरला घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)

| असे आहे जाहीर प्रकटन

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग- १ ते वर्ग-३ च्या रिक्त जागा भरणेकामी जाहिरात क्र. १/१३६२ दि. ०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने अग्निशामक विमोचक / फायरमन या पदाच्या उमेदवारांची शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा दि. २६ ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घेणेत येणार आहे. या करिता बोलविलेल्या उमेदवारांची यादी, वेळापत्रक व उमेदवारांसाठी सूचना पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (PMC Website) प्रसिद्ध केलेल्या आहेत.

त्यानुसार उमेदवारांची शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग, पाषाण, पुणे यांचे कार्यालयांतर्गत असलेल्या मैदानावर होणार आहे. सदर चाचणीसाठी उमेदवारांनी सकाळी ०६.०० वाजता यादीनुसार नेमून दिलेल्या दिवशी मैदानावर उपस्थित राहावयाचे आहे. तसेच मैदानी चाचणीनंतर याच उमेदवारांची पोहणे व अग्निशमन साहित्याची ओळख यांची चाचणी परीक्षा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण भवन, विद्याविकास शाळेजवळ, सहकारनगर पुणे येथे पूर्ण होईल.
सविस्तर माहिती, सूचना, वेळापत्रक व उमेदवारांची यादी या साठी वेळोवेळी पुणे महानगरपालिकेचे
संकेतस्थळ pmc.gov.in यावर खातरजमा करावी.

———

Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023 | फायरमन पदासाठी पात्र झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा या तारखांना घेण्याचे नियोजन | तारखा जाणून घ्या

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023 | फायरमन पदासाठी पात्र झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा या तारखांना घेण्याचे नियोजन  | तारखा जाणून घ्या

Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023 Physical Exam | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदाचा निकाल याआधीच घोषित करण्यात आला आहे. तसेच पात्र झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यानुसार आता 575 उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा (Physical Exam) 26, 27 आणि 28 ऑक्टोबरला घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Bharti 2023)
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अग्निशामक विमोचक / फायरमन वर्ग-३ संवर्गातील रिक्त जागा भरणेसाठी जाहिरात ०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार  २२/०६/२०२३ रोजी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाल याआधीच प्रसिद्ध करण्यात आला आहे. (PMC Pune Bharti Results 2023)
संबंधित बातमी वाचा : https://www.thekarbhari.com/tag/fireman-results/
याबाबत महापालिका उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले कि, पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरत आहेत. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा  ही 26, 27 आणि 28 ऑक्टोबरला घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. असे इथापे यांनी सांगितले.
—-
फायरमन पदासाठी 26, 27, 28 ऑक्टोबर 2023 रोजी शारीरिक चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. त्याबाबत स्थळ आणि सत्र बाबतचे जाहीर प्रकटन लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
सचिन इथापे, उपायुक्त, पुणे महापालिका. 
——-

PMC Pune Bharti | पुणे महापालिका भरती | 6 महिने होऊनही नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी अटी पूर्ण केल्या नाहीत! 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Bharti | पुणे महापालिका भरती | 6 महिने होऊनही नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी अटी पूर्ण केल्या नाहीत!

PMC Pune Bharti | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडून नुकतीच 448 पदांची भरती करण्यात आली होती. यात  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक व लिपिक टंकलेखक या हुद्यावर सरळसेवा भरती करून सेवकांना नियुक्त करण्यात आले. मात्र या कर्मचाऱ्यांनी 6 महिने उलटूनही महापालिकेच्या अटींची पूर्तता केलेली नाही. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आता सामान्य प्रशासन विभागाने कडक पाऊल उचलले आहे. याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखावर सोपवली असून माहिती देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. (PMC Pune Bharti)

नवनियुक्त  सेवकांची नेमणूक महानगरपालिका सेवाविनियमातील क्र. १० (अ) नुसार दोन वर्षासाठी परिविक्षाधीन पद्धतीने करण्यात आलेली आहे. त्यानुसार सेवकांना पुणे महानगरपालिकेकडे रुजू करून घेताना आज्ञापत्रात नमूद अटींच्या अधीन राहून रुजू करून घेतलेले असूनही सेवकांनी सहा महिने होऊनही अद्याप अटींची पूर्तता न केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे
वरिष्ठांचे आदेशाची अंमलबजावणी न करणे ही बाब गंभीर व वरिष्ठांचे आदेशाचे उल्लंघन करणारी असून, प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरत नाही. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation)

त्यामुळे संबंधित खातेप्रमुख यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून सरळसेवेने भरती करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक व लिपिक टंकलेखक हुद्यावरील सेवकांची म माहिती भरून द्यावयाची आहे. तसेच माहितीच्या अनुषंगाने सदर सेवकाच्या कागदपत्रांच्या प्रती संकलित करावयाच्या आहेत. तसेच परिविक्षाधीन कालावधीतील सहा महिन्याचे मूल्यमापन करून एकत्रितपणे सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावयाचे आहे. १५ दिवसाच्या मुदतीत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात यावे. असे आदेश उपायुक्त सचिन इथापे यांनी दिले आहेत. (PMC Pune News)
—-/
News Title |PMC Pune Bharti | Pune Municipal Recruitment | Even after 6 months, the newly appointed employees have not fulfilled the conditions!

PMC Pune Bharti 2023 | 9 पदांच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठीचे वेळापत्रक महापालिकेकडून जाहीर

Categories
Breaking News Education PMC social पुणे

PMC Pune Bharti 2023 |   9 पदांच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठीचे वेळापत्रक महापालिकेकडून जाहीर

PMC Pune Bharti 2023 |  पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) 320 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. परीक्षेचे निकाल घोषित केल्यानंतर महापालिकेकडून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. नुकतीच फायरमन पदाची कागदपत्र पडताळणीची छाननी पूर्ण झाले.  उर्वरित सर्व पदांच्या कागदपत्र पडताळणीसाठी प्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 27 जुलै, 28 जुलै आणि 1 ऑगस्ट या दिवशी पडताळणी केली जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. तसेच संबंधित दिवशी छाननी पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी छाननी केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी स्वखर्चाने मुक्कामाच्या तयारीने यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनकडून करण्यात आले आहे. (PMC Pune Bharti 2023)
पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील श्रेणी – १ ते श्रेणी- ३ या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेकरीता ०६/०३/२०२३ रोजी जाहिरात देऊन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरातीनुसार प्राप्त अर्जातील महाराष्ट्रातील एकूण ५ शहरांमध्ये वेगवेगळ्या परिक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा IBPS संस्थे मार्फत घेण्यात आली आहे. IBPS संस्थेकडून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे कामी संबंधित उमेदवारांची शैक्षणिक व इतर अर्हता / पात्रतेबाबतची मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रांची तपासणी करणेकामी छाननी पथक नियुक्त करण्यात आले आहे. (PMC Pune Recruitment 2023)
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, औषध निर्माता या पदाच्या उमेदवाराच्या कागदपत्रांची छाननी 27 जुलै ला होणार आहे. जुना जीबी हॉल, डॉ आंबेडकर सभागृह येथे छाननी होईल. आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर पदासाठी 1 ऑगस्ट ला जुना जीबी हॉल मध्ये छाननी होईल. तर उप संचालक (प्राणी संग्रहालय), पशु वैदयकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) या पदांसाठी 28 जुलै ला स्थायी समिती सभागृहात छाननी होईल. (Pune Mahanagarpalika Bharti 2023) 

—-
एका पदास तीन याप्रमाणेच उमेदवारांना बोलवण्यात आलेले असल्यामुळे संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नवीन यादीत असलेल्या उमेदवारांनीच उपस्थित राहायचे  आहे.
 – सचिन इथापे, उपायुक्त, पुणे महापालिका 
—-
News Title | PMC Pune Bharti 2023 | The schedule for scrutinizing the documents of candidates for 9 posts has been announced by the Municipal Corporation

PMC Pune Bharti 2023 | चुकीची कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाईचा पुणे महापालिकेचा पात्र उमेदवारांना इशारा | दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Bharti 2023 | चुकीची कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाईचा पुणे महापालिकेचा पात्र उमेदवारांना इशारा

| भरतीबाबत महापालिका प्रशासनाकडून उमेदवारांना आवाहन

PMC Pune Bharti 2023 |  पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) 320 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. परीक्षेचे निकाल घोषित केल्यानंतर महापालिकेकडून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान यामध्ये उमेदवारांनी चुकीची कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडून देण्यात आला आहे. (PMC Pune Bharti 2023)

दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये

महापालिकेच्या आवाहनानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी (Pune Mahanagarpalika Bharti 2023) वेळोवेळी स्थानिक दैनिक वर्तमानपत्रांत सविस्तर जाहिरात देऊन तसेच महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येऊन कर्मचारी निवड समितीच्या अहवालानुसार पारदर्शकरीत्या पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. याद्वारे सर्व नागरिकांना/उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही मध्यस्थ/दलाल/परिचित/अपरिचित व्यक्तींशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरूपाची देवाण-घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी. (PMC Pune Recruitment 2023)

तसेच, याद्वारे सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, कागदपत्रे पडताळणीकामी अयोग्य अगर चुकीची कागदपत्रे सादर करू नयेत. अशी कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवारांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. (PMC Pune Bharti)
—–
News title | PMC Pune Bharti 2023 | Pune Municipal Corporation warns eligible candidates of criminal action if they submit wrong documents

PMC Pune Bharti Results | फायरमन पदाच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी महापालिकेकडून छाननी पथक नियुक्त 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Bharti Results | फायरमन पदाच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी महापालिकेकडून छाननी पथक नियुक्त

PMC Pune Bharti Results | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) 320 पदांची भरती प्रक्रिया (PMC Recruitment) राबवण्यात येत आहे. यातील सर्वच पदांचे नुकतेच निकाल घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार आता प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. फायरमन (Fireman) पदांच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी 30 लोकांचे छाननी पथक म्हणजे 10 टीम तयार करण्यात आल्या आहेत. तर या टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी 7 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान उमेदवारांनी १९ ते २१ जुलै या कालावधीत पडताळणी साठी सकाळी १० वाज्लेपासून महापालिकेत उपस्थित राहायचे आहे. (PMC Pune Bharti Results)

पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील श्रेणी – १ ते श्रेणी- ३ या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेकरीता ०६/०३/२०२३ रोजी जाहिरात देऊन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरातीनुसार प्राप्त अर्जातील महाराष्ट्रातील एकूण ५ शहरांमध्ये वेगवेगळ्या परिक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा IBPS संस्थे मार्फत घेण्यात आली आहे. IBPS संस्थेकडून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे कामी संबंधित उमेदवारांची शैक्षणिक व इतर अर्हता / पात्रतेबाबतची मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रांची तपासणी करणेकामी खालीलप्रमाणे छाननी पथक नियुक्त करण्यात आले आहे. अग्निशमन विमोचक / फायरमन श्रेणी – ३ या पदासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री देवेंद्र पोटफोडे (अग्निशमन विभाग ) यांचे नियंत्रणाखाली 10 पथकांनी प्रमाणपत्रे / कागदपत्रांच्या पडताळणीचे कामकाज करावयाचे आहे. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Mahanagarpalika Bharti 2023)

 छाननी पथकाने उद्या  जुना जी.बी. हॉल येथे दुपारी १२.०० वाजता प्रशिक्षणास उपस्थित राहून संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीकरिता १९ जुलै, २० जुलै आणि २१  जुलै म्हणजे येत्या बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार रोजी जुना जी.बी. हॉल येथे सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहून संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करावयाची आहे. छाननी पथकाने केलेल्या अर्जाच्या छाननीचा अहवाल रोजचे रोज मा उप आयुक्त (सा.प्र.) यांचेकडे सादर करावयाचा आहे आणि नियुक्त केलेल्या छाननी पथकाने उमेदवारांच्या कागदपत्रा आधारे केलेल्या छाननीचा अंतिम अहवाल दोन दिवसात सदस्य सचिव, कर्मचारी निवड समिती तथा उप आयुक्त (सामान्य प्रशासन) यांचे मार्फत मा. अति. महापालिका आयुक्त (ज) यांना सादर करावयाचा आहे.  उमेदवाराने सादर केलेली शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबतची कागदपत्रे काळजीपूर्वक तपासण्याची जबाबदारी ” प्रशासन अधिकारी, अधिक्षक, वरिष्ठ लिपिक व लिपिक टंकलेखक ” संवर्गातील सेवकावर आहे.  उमेदवाराने केलेला अर्ज, जात प्रमाणपत्र, वय, समांतर आरक्षणाचा दावा, नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र, अधिवास बाबतचे प्रमाणपत्र इ. बाबतची कागदपत्रे तपासून अर्ज पात्र होतो अगर कसे याची पडताळणी लेखनिकी संवर्गातील प्रशासन अधिकारी, अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपीक टंकलेखक यांनी करावयाची आहे. प्रशिक्षणास संबंधितानी वेळेवर उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी. जे सेवक प्रशिक्षणास व प्रत्यक्ष कामकाजास अनुपस्थित राहतील त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करणेत येईल. असा इशारा देखील देण्यात आला आहे.
—–
News Title |PMC Pune Bharti Results | Scrutiny team appointed by Municipal Corporation to verify the documents of eligible candidates for the post of Fireman

Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेकडून भरती प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील सर्वच पदाचा निकाल घोषित!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेकडून भरती प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील सर्वच पदाचा निकाल घोषित!

Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदाचा निकाल याआधीच घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर काल रात्री बाकी सर्व पदांचा निकाल घोषित करण्यात आला आहे. महापालिकेच्या वेबसाईट (PMC Website) वर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Bharti Results 2023)
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अग्निशामक विमोचक / फायरमन वर्ग-३ संवर्गातील रिक्त जागा भरणेसाठी जाहिरात ०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार उपरोक्त पदाची २२/०६/२०२३ रोजी परीक्षा घेण्यात आली आहे. परीक्षेचा निकाल याआधीच प्रसिद्ध करण्यात आला आहे. (PMC Pune Bharti Results 2023)
त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) वर्ग-१,वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी वर्ग-२, उप संचालक (प्राणी संग्रहालय ) ( उप उद्यान अधीक्षक (झू) वर्ग-२, पशु वैद्यकीय अधिकारी वर्ग-२, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक वर्ग-३, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर वर्ग-३, कनिष्ठ अभियंता (विद्युत) वर्ग-३, वाहन निरीक्षक/व्हेईकल इन्स्पेक्टर वर्ग-३, मिश्रक / औषध निर्माता वर्ग-३, पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) वर्ग-३ या संवर्गाच्या रिक्त जागा भरणेसाठी ०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
त्यानुसार या पदांच्या २२/०६/२०२३ व ०२/०७/२०२३ रोजी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. परीक्षेचा निकाल व कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानुषंगाने कागदपत्रे तपासणीसाठी स्वतंत्ररीत्या वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

: या संकेतस्थळावर पहा निकाल

https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html
News Title | Pune Mahanagarpalika Bharti Results 2023 | Pune Municipal Corporation announced the results of all the posts in the recruitment process!

PMC Pune Bharti Exam 2023 | 5 पदांसाठी 3247 उमेदवारांनी दिली परीक्षा!

Categories
Breaking News Education PMC पुणे

PMC Pune Bharti Exam 2023 | 5 पदांसाठी 3247 उमेदवारांनी  दिली परीक्षा!

PMC Pune Bharti Exam 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने ३२० पदासाठी भरती प्रक्रिया (PMC Recuitment) राबवण्यात येत आहे. त्यानुसार यातील ६ पदासाठी २२ जूनला परीक्षा (PMC Bharti exam) घेण्यात आली आहे. त्यानंतर आज 5 पदांसाठी परीक्षा झाली.  3 शहरात 8 ठिकाणी परीक्षा झाली.  पहिल्या सत्रात 76% तर दुसऱ्या सत्रात 85% उमेदवारांनी  परीक्षा दिली. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली.  (PMC Pune Bharti Exam 2023)

पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात (PMC recruitment 2023) येणार आहे. महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  ३२० पदांसाठी महापालिकेकडे 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (PMC Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ पदांची परीक्षा ही २२ जून ला झाली.  तर 5 पदांची परीक्षा ही २ जुलै ला झाली. यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर, सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर, व्हेईकल इन्स्पेक्टर, व्हेटर्नरी ऑफिसर आणि फार्मासिस्ट या पदांचा समावेश होता. यासाठी 8 परीक्षा केंद्रावर महापालिकेकडून 41 परीक्षा केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले होते. 3 शहरात 8 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रात ही परीक्षा घेतली. सकाळच्या सत्रात 4008 उमेदवार होते. त्यापैकी 3072 उमेदवारांनी म्हणजे 76% उमेदवारांनी परीक्षा दिली.  तर दुपारच्या सत्रात 206 उमेदवार होते. त्यापैकी 175 उमेदवारांनी म्हणजे 85% उमेदवारांनी परीक्षा दिली.  (Pune Mahanagarpalika Bharati 2023)


News Title | PMC Pune Bharti Exam 2023 | 3247 candidates appeared for 5 posts!

Pune Mahanagarpalika Shikshak Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये 260 पदांची शिक्षक भरती

Categories
Breaking News Education PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Shikshak Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये 260 पदांची शिक्षक भरती

| इंग्रजी माध्यम करार पद्धतीवरील शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध

Pune Mahanagarpalika Shikshak Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्राथमिक शिक्षण विभागाच्या (Primary Education Department) इंग्रजी शाळांमध्ये (English School) 260 पदांसाठी शिक्षक भरती (PMC Teacher Recruitment) करण्यात येणार आहे. सहा महिने कालावधीसाठी मानधन तत्वावर उमेदवार घेण्यात येणार आहेत. महापालिकेकडून याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Mahanagarpalika Shikshak Bharti 2023)

शिक्षण विभाग (प्राथमिक), पुणे महानगरपालिका (PMC Pune Primary Education Department) संचलित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी सन २०२३-२४ करिता तात्पुरत्या स्वरुपात केवळ सहा महिनेपेक्षा कमी कालावधीकरिता दरमहा एकवट मानधन  २००००/- (वीस हजार रुपये फक्त) वर करार पद्धतीवरील इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक या पदाकरिता निवड, प्रतीक्षा यादी, शैक्षणिक
व व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुणानुक्रमे नेमणूक करण्यात येणार आहे. (PMC Pune Recruitment)

● शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व प्राधान्यक्रमाने खालीलप्रमाणे निश्चित केली जाईल.

१) इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड. / बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
२) इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड./ बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
३) इ. १ली ते १० वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड/बी. एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
४) इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. / बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
५) वर नमूद उल्लेखित सर्व उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी/सीटीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. टीईटी/ सीटीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. एकूण पदे – २६० (Pune Municipal Corporation)

उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून ५ दिवसापर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते २.०० या वेळेपर्यंत अर्ज शिक्षण विभाग (प्राथमिक), कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५ येथे समक्ष हस्ते पोहोच सादर करावेत. पोस्टाने / टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज सादर करतेवेळी उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत घेवून यावीत. सविस्तर माहिती, अर्जाचा नमुना व जाहिरात https://www.pmc.gov.in/en/recruitments या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी वरील संकेतस्थळाचे अवलोकन करावे. असे महापालिका प्रशासनकडून सांगण्यात आले आहे.

——
News Title | Pune Mahanagarpalika Shikshak Bharti 2023 |  260 Teacher Recruitment Posts in Pune Municipal Schools

Pune Mahanagarpalika Bharti | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात 89 पदांसाठी भरती!

Categories
Breaking News Education PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Bharti | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात 89 पदांसाठी भरती!

Pune Mahanagarpalika Bharti | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात (PMC Pune Health Department) 89 पदांसाठी भरती (PMC Pune Recruitment) करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून अनुभवी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून महापालिकेच्या संकेतस्थळावर (PMC Website) सर्व माहिती देण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune Mahanagarpalika Bharti)

पुणे महापालिकेच्या आरोग्य कार्यालयाअंतर्गत ६ महिने कालावधीकरिता एकवट वेतनावर करार पद्धतीने सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation recruitment)

या पदांसाठी होणार आहे भरती

1. वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) (वर्ग-२)
2. आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२)
3. फार्मासिस्ट (वर्ग-३)
4. व्यवस्थापक (स्टुअर्ड) (वर्ग-३)
5. सहाय्यक ( दवाखाना) (विविध काम करणारे सेवक) (वर्ग-३)

वरील नमूद केलेल्या पदांची शैक्षणिक अर्हता, अनुभव व सदर पदभरतीसाठी आवश्यक त्या अटी व
शर्ती पुणे महानगरपालिकेच्या pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती (recruitment ) मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (Pune Mahanagarpalika health department Bharti)

किती असणार वेतन?

1. वैद्यकीय अधिकारी  (वर्ग-२) – 60,000
2.  आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२) – 40,000
3. फार्मासिस्ट (वर्ग-३) – 23,000
4. व्यवस्थापक (स्टुअर्ड) (वर्ग-३) – 25,000
5. सहाय्यक  (वर्ग-३) – 21,100
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व अनुभवधारक उमेदवारांना अर्ज महापालिकेत उपस्थित राहून जमा करायचे आहेत.   वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) (वर्ग-२) आणि आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२) यांनी १५/०६/२०२३ रोजी सकाळी १० ते २ दुपारी ३ ते ६ या वेळेत तर   फार्मासिस्ट (वर्ग-३) व व्यवस्थापक (स्टुअर्ड) (वर्ग-३) यांनी १६/०६/२०२३ रोजी सकाळी १० ते २ दुपारी ३ ते ६ व सहाय्यक ( दवाखाना) (विविध काम करणारे सेवक) (वर्ग-३) यांनी १९/०६/२०२३ रोजी सकाळी १० ते २ दुपारी ३ ते ६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे- ४११००५ येथे विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सह उपस्थित राहायचे आहे. (PMC Recruitment News)
उमेदवाराने सादर करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी सदरचा अर्ज www.pmc.gov.in या वेबसाईट वरून डाउनलोड करून भरून आणावे व कार्यालयात फॉर्म जमा करावे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation News)
—-
News Title | Pune Mahanagarpalika Bharti |  Recruitment for 89 posts in Health Department of Pune Municipal Corporation!