PMC Fireman Bharti Results | फायरमन पद निकाल बाबत निवड समितीची बैठक 9 फेब्रुवारीला!

Categories
Breaking News Education PMC social पुणे

PMC Fireman Bharti  Results | फायरमन पद निकाल बाबत निवड समितीची बैठक 9 फेब्रुवारीला!

| लवकरच अंतिम निकाल लागण्याची शक्यता

Pune Mahanagarpalika Fireman Bharti Results | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) वतीने फायरमन (Fireman) पदासाठी पात्र झालेल्या 575 उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत  घेण्यात आली. दरम्यान अग्निशमन साहित्य ओळख बाबत घेतलेल्या लेखी परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांच्या काही हरकती असल्या तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही हरकती आल्या होत्या. याचे निरसन करून प्रशासनाकडून सुधारित गुणांची यादी मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध  केली आहे. दरम्यान आता निवड समितीच्या बैठकीत या सगळ्या प्रक्रिये बाबत चर्चा करून अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.  9 फेब्रुवारी रोजी समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर लवकरच अंतिम निकाल घोषित केला जाईल.  अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली.  (Pune Mahanagarpalika Fireman Bharti Results)
पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरले होते. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा  ही 26 ते 29 ऑक्टोबरला आणि 22 नोव्हेंबर ला घेण्यात आली होती.  त्यानुसार या चाचणीचे गुण महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर अग्निशमन साहित्य ओळख बाबत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी 5 गुण होते. परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत काही हरकती असतील तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर ‘अग्निशमन साहित्याची ओळख’ यामधील उत्तरांबाबत आणि गुणांबाबत उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्यात आलेली आहे. पुनर्तपासणीमध्ये बदल झालेल्या उमेदवारांच्या सुधारित गुणांचा तक्ता व संबंधित उत्तरपत्रिका मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आली.   Pune Municipal Corporation recruitment)

: निवड समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्ध होणार अंतिम यादी

दरम्यान अंतिम निकालासाठी उमेदवारांना काही दिवसांचीच वाट पाहावी लागणार आहे. कारण आता या सगळ्या भरती प्रक्रिये बाबत निवड समितीची बैठक लावली जाणार आहे. 9 फेब्रुवारीला ही समितीची बैठक होणार आहे. या समितीत 8 ते 10 सदस्य असतात. आरक्षण आणि गुण प्रक्रियेवर समितीत चर्चा केली जाईल. त्यानंतर समितीच्या मान्यतेने अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. 

PMC Fireman Bharti | उमेदवारांच्या हरकतीवर महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद | लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Fireman Bharti  | उमेदवारांच्या हरकतीवर महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद | लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार

Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदासाठी पात्र झालेल्या 575 उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत  घेण्यात आली. दरम्यान अग्निशमन साहित्य ओळख बाबत घेतलेल्या लेखी परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांच्या काही हरकती असल्या तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही हरकती आल्या आहेत. याचे निरसन प्रशासनाकडून सुरु आहे. हे झाल्यानंतर येत्या 8-10 दिवसात उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023)
पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरले होते. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा  ही 26 ते 29 ऑक्टोबरला आणि 22 नोव्हेंबर ला घेण्यात आली होती.  त्यानुसार या चाचणीचे गुण महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर आता अग्निशमन साहित्य ओळख बाबत घेतलेल्या लेखी परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत काही हरकती असतील तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. (Pune Mahanagarpalika Bharti)
त्यानुसार काही उमेदवारांनी हरकती घेतल्या आहेत. यामध्ये गुण कमी मिळणे, उत्तर बरोबर असून कमी गुण मिळणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराला जास्त गुण देणे, अशा हरकतींचा समावेश आहे. यामुळे प्रशासनाने सर्वच उत्तरपत्रिका पुन्हा एकदा तपासण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी आठवडा भराचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर तात्काळ अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

PMC Fireman Bharti Physical Exam Results | फायरमन पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर | पुणे मनपा वेबसाईट वर निकाल प्रसिद्ध

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Fireman Bharti Physical Exam Results | फायरमन पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर | पुणे मनपा वेबसाईट वर निकाल प्रसिद्ध

Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदासाठी पात्र झालेल्या 575 उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत  घेण्यात आली. त्यानुसार उमेदवारांची शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग, पाषाण, यांचे कार्यालयांतर्गत असलेल्या मैदानावर झाली. दरम्यान या तांत्रिक आणि शारीरिक चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महापालिका वेबसाईट वर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023)
पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरले होते. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा  ही 26 ते 29 ऑक्टोबरला आणि 22 नोव्हेंबर ला घेण्यात आली होती.  त्यानुसार या चाचणीचे गुण महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अंतिम निकालासाठी वाट पाहावी लागणार

दरम्यान हा फक्त शारीरिक चाचणीचा निकाल आहे. अंतिम निकाल अजून बाकी आहे. कारण महिला उमेदवारांच्या उंचीबाबतचा मुद्दा कोर्टात प्रलंबित आहे. त्याची सुनावणी अजून बाकी आहे. शिवाय काही तांत्रिक मुद्द्यांबाबत महापालिकेने काही संस्थांकडून मार्गदर्शन मागवले आहे. याबाबत पूर्तता झाल्यानंतरच महापालिका अंतिम निकाल घोषित करणार आहे.

PMC Pune Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या ई लर्निंग स्कुल मध्ये शिपायापासून ते शिक्षक पदांसाठी भरती! 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

PMC Pune Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या ई लर्निंग स्कुल मध्ये शिपायापासून ते शिक्षक पदांसाठी भरती!

| 8 ते 14 जून पर्यंत करू शकता अर्ज

PMC Pune Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) राजीव गांधी ई लर्निंग स्कुल (Rajiv Gandhi E learning school) मध्ये विविध पदांसाठी सहा महिने मुदतीसाठी मानधन तत्वावर भरती (PMC Recruitment) करण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून (PMC Éducation department) याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 42 शिक्षक पदे 15 शिक्षकेतर पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये शिपायापासून ते शिक्षक पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार यासाठी 8 ते 14 जून या कालावधीत अर्ज करू शकतात. अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune Bharti 2023)

पुणे महानगरपालिका संचलित राजीव गांधी ॲकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन, या सी.बी.एस.ई. बोर्ड मान्यता प्राप्त कायम विनाअनुदानीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी सहा महिने मुदतीसाठी एकवट मानधनावर करार पध्दतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. ह्या नियुक्त्या दरमहा एकवट मानधनवर नेणूका करणेत येणार आहेत. उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज ८ ते १४ जून, २०२३ या कालावधीत शासकीय सुट्टी वगळून राजीव गांधी ॲकॅडमी ऑफ ई- लर्निंग स्कूल, शिवदर्शन, पुणे ४११००९ येथे शाळेच्या कामकाजाच्या काळात सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत या वेळेत समक्ष जमा करावेत. या कालावधीनंतर उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (PMC Pune recruitment 2023)

या वेबसाईट वर अर्ज मिळेल
https://www.pmc.gov.in/sites/default/files/recruitment/RJ.pdf
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी सहा महिने मुदतीसाठी दरमहा एकवट मानधन करार पध्दतीने भरावयाची पदे
शिक्षक पदे 
पदनाम                  पदे
शाला प्रमुख           1
पर्यवेक्षक               1
दुय्यम शिक्षक
  (माध्यमिक).       35
दुय्यम शिक्षक
(प्रायमरी).               5
शिक्षकेतर पदे 
 कनिष्ठ लिपिक         2
पूर्णवेळ ग्रंथपाल         1
प्रयोगशाळा सहायक
कॅम्पुटर लॅब                1
प्रयोगशाळा सहायक
विज्ञान प्रयोगशाळा      1
शिपाई                       10
सर्वसाधारण अटी या असतील 
१) शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक या पदाचे इच्छुक उमेदवारांचे पूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमामध्ये झालेले असणे आवश्यक आहे.
२) सर्वसाधारण खुल्या गटासाठी वयो र्गादा ही ४० वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांस शासकीय नियमानुसार वयो र्गादा ही ४५ वर्षे राहील.
३) मागासवर्गीय उमेदवारांच्या नावाचा जातीचा दाखला व वैधताप्रमाणपत्र असणे आवश्यक.
४) या जाहिर प्रकटनातील शिक्षक पदासमोर दर्शविण्यात आलेल्या दरमहा एकवट मानधन करार पध्दतीने सहा महिने मुदतीसाठी शैक्षणिक मेरीट / गुणात्मक्तेने नेणूकीसाठी उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज दिनांक ८ ते १४ जून, २०२३ या कालावधीत राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन, पुणे ४११००९ येथे शाळेच्या कामकाजाच्या काळात सकाळी ८ ते ११ ते दुपारी ३ पर्यंत या वेळेत समक्ष जमा करावेत. या कालावधीनंतर उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
५) अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रमाणीत केलेल्या छायामुद्रांकीत/ झेरॉक्स प्रती जोडण आवश्यक आहे. तसेच अर्ज पडताळणीसाठी सर्व छायामुद्रांकीत प्रतींच्या मूळ प्रती दाखविणेआवश्यक असल्याने येताना त्या घेऊन याव्यात. अपूर्ण अर्ज असल्यास बाद करणेत येऊन तो कार्यालयीन कागदपत्र म्हणून जमा करणेत येईल.
६) उमेदवार निवडीचे आणि काही कारणाने कोणताही बदल करण्याचे सर्व अधिकार मा. महापालिका आयुक्तांना आहेत.
७) उमेदवार निवडीसाठी कोणताही राजकीय, पदाधिकारी, अधिकारी यांचा दबाव आणल्यास सदर उमेदवारास अपात्र ठरविले जाईल याची नोंद घ्यावी.
८) निवड झालेल्या उमेदवाराची नेमणूक ही करारपध्दतीने एकवट मानधनावर आणि ठराविक मुदतीसाठी आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येणार असून उमेदवारास कोणत्याही स्वरुपाचे कायम नेणुकीविषयी हक्क सांगता व मागता येणार नाही. तसेच नियमित सेवकाचे कोणतेही फायदे लागू राहणार नाही. (Pune Mahanagarpalika Bharti 2023)
——
News Title | PMC Pune Bharti 2023 | Pune Municipal Corporation’s e-learning school recruitment for the posts from soldier to teacher!

Pune Mahanagarpalika Bharti | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात 89 पदांसाठी भरती!

Categories
Breaking News Education PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Bharti | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात 89 पदांसाठी भरती!

Pune Mahanagarpalika Bharti | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात (PMC Pune Health Department) 89 पदांसाठी भरती (PMC Pune Recruitment) करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून अनुभवी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून महापालिकेच्या संकेतस्थळावर (PMC Website) सर्व माहिती देण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune Mahanagarpalika Bharti)

पुणे महापालिकेच्या आरोग्य कार्यालयाअंतर्गत ६ महिने कालावधीकरिता एकवट वेतनावर करार पद्धतीने सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation recruitment)

या पदांसाठी होणार आहे भरती

1. वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) (वर्ग-२)
2. आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२)
3. फार्मासिस्ट (वर्ग-३)
4. व्यवस्थापक (स्टुअर्ड) (वर्ग-३)
5. सहाय्यक ( दवाखाना) (विविध काम करणारे सेवक) (वर्ग-३)

वरील नमूद केलेल्या पदांची शैक्षणिक अर्हता, अनुभव व सदर पदभरतीसाठी आवश्यक त्या अटी व
शर्ती पुणे महानगरपालिकेच्या pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती (recruitment ) मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (Pune Mahanagarpalika health department Bharti)

किती असणार वेतन?

1. वैद्यकीय अधिकारी  (वर्ग-२) – 60,000
2.  आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२) – 40,000
3. फार्मासिस्ट (वर्ग-३) – 23,000
4. व्यवस्थापक (स्टुअर्ड) (वर्ग-३) – 25,000
5. सहाय्यक  (वर्ग-३) – 21,100
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व अनुभवधारक उमेदवारांना अर्ज महापालिकेत उपस्थित राहून जमा करायचे आहेत.   वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) (वर्ग-२) आणि आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२) यांनी १५/०६/२०२३ रोजी सकाळी १० ते २ दुपारी ३ ते ६ या वेळेत तर   फार्मासिस्ट (वर्ग-३) व व्यवस्थापक (स्टुअर्ड) (वर्ग-३) यांनी १६/०६/२०२३ रोजी सकाळी १० ते २ दुपारी ३ ते ६ व सहाय्यक ( दवाखाना) (विविध काम करणारे सेवक) (वर्ग-३) यांनी १९/०६/२०२३ रोजी सकाळी १० ते २ दुपारी ३ ते ६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे- ४११००५ येथे विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सह उपस्थित राहायचे आहे. (PMC Recruitment News)
उमेदवाराने सादर करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी सदरचा अर्ज www.pmc.gov.in या वेबसाईट वरून डाउनलोड करून भरून आणावे व कार्यालयात फॉर्म जमा करावे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation News)
—-
News Title | Pune Mahanagarpalika Bharti |  Recruitment for 89 posts in Health Department of Pune Municipal Corporation!