Water Closure | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

येत्या गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येत असून गुरुवार २३ रोजी बाधित होणारे भागास पाणीपुरवठा बंद होणार आहे.  दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
जुना होळकर जलशुद्धीकरण अंतर्गत दुरुस्ती:- HE फॅक्टरी, MES
9 MLD raw water outlet flow meter वारजे WTP:- अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर.
10 MLD raw water outlet flow meter वारजे WTP:- कोंढवे-धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे.
सणस पंपिंग स्टेशन :- नन्हे गाव पूर्ण, नऱ्हे मानाजी नगर, गोकुळ नगर, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदीर परिसर गल्ली क्र. बी १० ते बी १४. झील कॉलेज परिसर,
बकरी हिल आऊट लेट ते ज्योती हॉटेल परिसर:- वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, NIBM, साळुंखे विहार रोड.
रामटेकडी परिसर :- ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, रामटेकडी, गोंधळेनगर, रामटेकडी औद्योगिक परिसर माळवाडी, भोसले गार्डन, १५ नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा.

Water Closure | येत्या सोमवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

येत्या सोमवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येत असून सोमवार रोजी चांदणी चौक टाकीच्या मागे वारजे WTP वरून चांदणी चौक टाकीला येणाऱ्या १००० मि.मी. ची रायझिंग मेन लाईन लिकेज असून त्या लाईनचे दुरुस्तीचे नियोजन सदर दिवशी करणार आहोत. त्यामुळे वारजे WTP वरून चांदणी चौक टाकिस पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे.
यास्तव खालील बाधित होणारे भागास सोमवार  रोजीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.  तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
बाणेर-पाषाण लिंक रोड, गणराज चौक, बाणेर हिल, सदानंद चौक, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सैंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनीत चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी,
सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहन नगर, सुस रोड, बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इत्यादी.
9 MLD raw water outlet वारजे WTP:- अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी,
गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर.
10 MLD raw water outlet वारजे WTP :-कोंढवे-धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे,

Shiv Jayanti | शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य

Categories
Breaking News cultural PMC पुणे

शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य

| अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचे आदेश

पुणे |  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत अंगीकृत करणेबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यगीताचे गायन करणे क्रमप्राप्त आहे. यास्तव सुट्टी असली तरी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिका भवनात हजर राहणे अनिवार्य आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pmc Pune)
आदेशानुसार हा  कार्यक्रम रविवार १९/०२/२०२३ रोजी सकाळी ९:१५ वा. (नऊ वाजून पंधरा मिनिटे) मनपा भवन, हिरवळ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर दिवशी शासकीय सुट्टी असली तरीही ह्या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी व वेळी न चुकता हजर राहावयाचे आहे. तसेच सदर दिवशी पुणे शहरात दुपारी ४.००
वाजेपासून श्री भवानी माता मंदिरापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसएसपीएमएस, शिवाजीनगर, पुणे पर्यंत मिरवणूकीचे आयोजन करणेत आलेले असून सदर मिरवणूकीस सर्व अधिकारी व
कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तरी, सर्व संबंधितांची सदर कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे मनपा भवन, हिरवळ येथे उपस्थित रहावे. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)

Health Camp | PMC pune | पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर | आरोग्य विभागाचा उपक्रम

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर

| आरोग्य विभागाचा उपक्रम 

पुणे | महानगरपालिकेच्या मध्यवर्ती इमारत व एकूण १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला सेविकांसाठी कॅन्सर तपासणी व त्याबाबत जनजागृती करणेकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य कार्यालयकडून याचे नियोजन करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)

महापालिका प्रशासनाच्या परिपत्रकानुसार या  शिबिरामध्ये कॅन्सर आजाराबाबत जनजागृती १४/०२/२०२३ रोजी सकाळी १०:३० ते ११:०० या वेळेत जुना जी. बी, हॉल तिसरा मजला, मुख्य इमारत पुणे मनपा येथे व कॅन्सर तपासणी शिबीर सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वा. या वेळेमध्ये पशुवैद्यकीय विभागासमोर, आरोग्य कार्यालय या ठिकाणी करण्यात येणार आहे. तरी सदर शिबिरामध्ये उपस्थित राहणेबाबत सर्व खातेप्रमुखांनी आपले अधिनस्त असणाऱ्या महिला सेविकांना अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने सर्व खात्यांना केले आहे.

दरम्यान पहिल्या टप्प्यात मनपा मुख्य इमारतीत कार्यरत महिलाना प्राधान्य देण्यात येणार आहे. असे ही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Budget Provision | यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार

Categories
Breaking News PMC पुणे

यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार

| मागील वर्षी आदेश न पाळल्याने आयुक्तांचे पुन्हा आदेश
पुणे | महापालिका प्रशासनाकडून विविध खात्यांना विकासकामासाठी बजेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र सर्वच विभागाकडून आर्थिक वर्षाच्या शेवटी बिले सादर केली जातात. त्यामुळे मागील वर्षी आदेश देण्यात आले होते कि, तिमाही खर्चाचे अहवाल द्यावेत. मात्र त्यावर अमल झाला नाही. त्यामुळे यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा, असे आदेश महापालिका आयुक्तांना जारी करावे लागले आहेत.
आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या विविध विभागांस विविध विकास कामांसाठी अंदाजपत्रकीय तरतुदी उपलब्ध करून दिल्या जातात. सदर तरतुदिमधून निविदा प्रक्रिया राबवून वर्षाचे कालावधीत समप्रमाणात खर्च करणे अपेक्षित असताना खात्यांकडून तसे न करता आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात देयके अदा करण्यासाठी सादर केली जातात. त्यामुळे शेवटच्या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च (Rush of Expenditure) झालेला दिसतो. सदर बाब वित्तीय नियमांशी विसंगत असून प्रशासकीय दृष्ट्याही उचित नाही. यास्तव सर्व खात्यांनी प्रतीमहा होणारा खर्च (Cash Flow Statement ) व प्रति तिमाही झालेल्या कामांची बिले व जमा खर्चाबाबतचा तपशील तिमाही अहवाल सादर करणेबाबत  १९/४/२०२२ चे कार्यालय परीपत्रकान्वये निर्देश देण्यात आले आहेत. तथापि त्यानुसार कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

तरी वरील बाब विचारात घेऊन सर्व खातेप्रमुख यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात तरतूद केलेल्या कामांची देयके दिनांक १५ मार्च २०२३ पर्यंत मुख्य लेखा व वित्त विभागाकडे देयके अदा करण्यासाठी सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच डिसेंबर २०२२ अखेर काम पूर्ण झालेल्या कामांची देयके अदा करण्यासाठी दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत  सादर करण्यात यावी. बिलासोबत सादर करावयाच्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण असे देयक सादर करण्यात यावे. अपूर्ण कागदपत्रांसह देयक सादर केल्यास व त्यामुळे देयक अदा करण्यास विलंब झाल्यास / तरतूद व्यपगत झाल्यास त्याचे संपूर्ण दायित्व व जबाबदारी संबंधित खात्याची / विभागाची राहील. सर्व खातेप्रमुख यांनी आपले विभागातील सर्व संबंधितांना याबाबत सूचना देऊन वर विहित केलेल्या वेळेत देयके मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठविण्याची दक्षता घ्यावी.

Solapur Road Traffic | सोलापूर रस्ता घेणार मोकळा श्वास | वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील

Categories
Breaking News PMC social पुणे

सोलापूर रस्ता घेणार मोकळा श्वास | वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील

| अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पथ विभागाकडून रस्त्याची पाहणी 
पुणे | शहरातील सोलापूर रस्ता (Solapur road) हा वरचेवर वाहतुकीसाठी फारच अडचणीचा ठरू लागला आहे. हडपसर (Hadapsar) पर्यंत तर वाहतूक कोंडीचा (Traffic) नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पुणे महापालिका (Pmc Pune) प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional commmissioner vikas Dhakne) यांच्या नेतृत्वाखाली पथ विभागाकडून या रस्त्याची पाहणी करण्यात आली. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
सोलापूर रस्ता हा रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या रस्त्यावरून छोट्या तसेच मोठया वाहनांची देखील वर्दळ पाहायला मिळते. कारण याच रस्त्यावरून सोलापूर, बारामती, सासवड अशा ठिकाणी नागरीक ये जा करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने असतात. ज्यामुळे कोंडी हा नित्याचा भाग होऊन बसला आहे. या रस्त्याला मोकळा श्वास घेता यावा आणि नागरिकांसाठी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचाच प्राथमिक भाग म्हणून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, झोनल उपायुक्त संदीप कदम, क्षेत्रीय अधिकारी आणि मनपा पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation)
सोलापूर रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महारपट्टा चौक  तसेच सासवड रोड वरील अतिक्रमणे काढली जाणार आहेत. तसेच फुटपाथ दुरुस्ती केली जाणार आहे. ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी आधी सर्वेक्षण केले जाईल. पहिल्या टप्प्यात भैरोबा नाला ते गोळीबार मैदान या दरम्यानचे तिथले नियोजन केले जाईल. इथे रहदारी फार असते. तो सोडवण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांना विश्वासात घेत वाहतूक सुरळीत करण्यासठी विशेष प्रयत्न करावेत. असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. अशी माहिती दांडगे यांनी दिली.
रस्त्याची पाहणी करत असताना सायकल ट्रॅक वर बसेस उभा असणे, त्यावरून टू व्हीलर जाणे, यामुळे सायकल ट्रॅक चा  उपयोग होत नाही. ट्रॅक चा व्यवस्थित उपयोग करण्याच्या दृष्टीने  नियोजन सुरु करण्यात येणार आहे. असे ही दांडगे यांनी सांगितले.

Appointments of Clerks | महापालिकेकडून भरती केलेल्या २०० लिपिकांच्या नेमणुका

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेकडून भरती केलेल्या २०० लिपिकांच्या नेमणुका

पुणे | पुणे महापालिकेकडून (PMC Pune) विविध रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया (Recruitment) राबवण्यात आली होती. सर्व पदासाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी तसेच कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाचा समावेश आहे.  महापालिका प्रशासनाने याआधी कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)आणि सहायक विधी अधिकाऱ्यांच्या हंगामी नेमणुका देखील केल्या आहेत. दरम्यान आज महापालिकेकडून २०० लिपिकांच्या हंगामी नेमणुका केल्या आहेत. नुकतेच महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation)

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. तर कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर झाल्या. (PMC Pune)

निकाल घोषित केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नेमणुका करणे देखील सुरु करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने याआधी कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)आणि सहायक विधी अधिकाऱ्यांच्या हंगामी नेमणुका देखील केल्या आहेत. दरम्यान आज महापालिकेकडून २०० लिपिकांच्या हंगामी नेमणुका केल्या आहेत. नुकतेच महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

 

 

PMC recruitment | पुणे महापालिका भरती | लिपिक पदासाठी आता विद्यापीठाची पदवी आवश्यक! 

Categories
Breaking News Education PMC पुणे

महापालिका भरती | लिपिक पदासाठी आता विद्यापीठाची पदवी आवश्यक

| पूर्वी 10 वी उत्तीर्ण असलेल्यांना देता येत होती परीक्षा

पुणे | महापालिकेत (PMC Pune) लिपिक पदासाठी भरती (Clerk recruitment criteria) करताना उमेदवारांना 10 वी उत्तीर्ण असण्याची अट ठेवण्यात आली होती. आतापर्यंत याच पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र आता शैक्षणिक अर्हतेत सुधारणा करण्यात आली आहे. लिपिक पदासाठी आता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (University Degree) आवश्यक आहे. याबाबतचा सुधारणेचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. सरकारला पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने (Standing Committee) मान्यता दिली आहे. (PMC Pune)

पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियमावली २०१४ मध्ये “लिपिक
टंकलेखक”, वर्ग ३ या पदांची विहित करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता ही एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता असे नमूद आहे. त्यानुसार आजत्यागात पुणे महानगरपालिकेमध्ये लिपिक टंकलेखक या पदाची नियुक्ती करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)

तथापि शासकीय कामांमध्ये सध्या कर्मचाऱ्यांवर कामाची जबाबदारी वाढलेली आहे व महाराष्ट्र शासन व
महानगपालिका यामध्ये संगणकाद्वारे मोठ्या प्रमाणावर कामकाज करण्यात येते. त्यामुळे एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे हे अत्यंत जिकरीचे होत आहे. तसेच लिपिक टंकलेखक या पदासाठी एस. एस. सी. परीक्षा ही शैक्षणिक अर्हता असल्याने पदोन्नती ने उच्च पदावर काम करताना अडचणी येत आहेत. त्यामूळे लिपिक टंकलेखक ह्या पदाची एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता याऐवजी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
त्यामुळे पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मध्ये “लिपिक टंकलेखक”, वर्ग ३ या पदांच्या विहित करण्यात आलेली नेमणुकीची पद्धत, टक्केवारी व शैक्षणिक अर्हतेबाबत  दुरुस्तीचा प्रस्ताव सुचविण्यात आला आहे. या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मुख्य सभेची मान्यता मिळल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला जाईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Recruitment)

Garbage Project | आंबेगाव कचरा प्रकल्प लवकरच होणार सुरु | महापालिकेचा खर्च ही वाचणार

Categories
Breaking News PMC social पुणे

आंबेगाव कचरा प्रकल्प लवकरच होणार सुरु | महापालिकेचा खर्च ही वाचणार

|राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता

महापालिकेने (PMC Pune) आंबेगाव खूर्द येथे उभारलेल्या 200 टन कचरा प्रकल्पास (Garbage Project) आग लावण्यात आल्याच्या घटनेनंतर या प्रकल्पाविरोधात राष्ट्रीय हरित लवादात (national green tribunal) याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अंतिम सुनावणीत एनजीटीने (NGT) या ठिकाणी सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पास मान्यता दिली असून, यासाठी आवश्‍यक असलेली रस्त्याची जागा ताब्यात येताच तो पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत (Dy commissioner Aasha Raut) यांनी दिली.

या प्रकल्पाची ट्रायल रन सुरू असताना या ठिकाणी पर्यावरणाच्या हानीपोटी सुमारे 12 लाख 30 हजार रुपयांचा दंड प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे जमा करण्याची सूचना दिली आहे. तसेच या दंडाच्या रकमेतून प्रकल्पाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प राष्ट्रीय हरित लवादाने रद्द केल्याचे फलक प्रकल्पाच्या ठिकाणी रविवारी लावण्यात आले होते. त्यानंतर, महापालिका प्रशासनाकडून याबाबत खुलासा करण्यात आला. (PMC Pune)

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे वाढणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडून आंबेगाव बु. मध्ये स. नं 51/10 येथे 2018-19 मध्ये 200 टन क्षमतेचा कचरा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाची ट्रायल रन 20 सप्टेंबर 2020 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. त्यावेळी प्रकल्पास आग लावण्यात आली होती. याबाबत पालिकेने पोलिसात तक्रार दिली होती. तेव्हा हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी एनजीटी मध्ये याचिका दाखल करण्यात आली. मात्र, महापालिकेने नव्या गावांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकल्प आवश्‍यक असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे एनजीटीने या ठिकाणी सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करणाच्या प्रकल्पास मान्यता दिलेली आहे. मात्र, या प्रकल्पाकडे जाण्यासाठी आवश्‍यक रस्ता नसल्याने हा रस्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. रस्ता ताब्यात येताच पुन्हा प्रकल्प सुरू होणार असल्याचे उपायुक्त राऊत यांनी सांगितले. या ठिकाणी 150 टन सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. (pune municipal corporation)

हा प्रकल्प बंद असल्याने महापालिका कात्रज येथील रॅम्पवर येणारा सुमारे दीडशे टन सुका कचरा दररोज उरूळी देवाची डेपोवर पाठवत आहे. त्यासाठी प्रतीटन 1 हजार रूपयांचा खर्च येत असून, महिन्याला 40 ते 45 लाखांचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे आंबेगावचा प्रकल्प सुरू झाल्यास महिन्याला महापालिकेचे सुमारे 40 ते 45 लाख रूपये वाचणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.