Tag: pune municipal corporatin
MLA Sunil Tingre | PMC Pune | विश्रांतवाडी चौकातील बुध्द विहार स्थलांतरित करण्यास परवानगी
|आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश
| धानोरी- लोहगावकडे जाणारी वाहतूक कोंडी सुटणार
MLA Sunil Tingre | PMC Pune | विश्रांतवाडी चौकातील रस्त्यावर असलेले बुद्ध विहार (Buddha Vihar) स्थलांतरीत करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी मंजुरी दिली आहे. येथील वॉटर वर्क्स आणि प्ले ग्राउंडच्या आरक्षित जागेवर हे बुद्ध स्थलांतरीत होणार आहे. त्यामुळे धानोरी-लोहगावकडे (Dhanori-Lohgaon Road) जाणार्या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे (Vadgaonsheri MLA Sunil Tingre)यांनी ही माहिती दिली. (MLA Sunil Tingre | PMC Pune)
गेल्या अनेक वर्षांपासून विश्रांतवाडी चौकात (Vishrantwadi Chowk) सुमेध बुद्ध विहार (Sumedh Buddha Vihar) आहे. थेट चौकात आणि जवळपास अर्ध्या रस्त्यावर असलेल्या या बुध्द विहारामुळे धानोरी तसेच लोहगाव परिसरात जाणार्या वाहनाना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हे बुध्द विहार स्थलांतरित करुन येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre)यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडविण्यासाठी महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. त्यावेळी त्यांनी हे बुध्द विहार स्थलांतरीत करून वाहतुक कोंडी सोडविण्याची आग्रही मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने त्यावर कार्यवाही सुरू केली. यासदर्भात अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी आमदार टिंगरे यांच्यासह संबंधित सर्व विभागांच्या अधिकार्यांची बैठक घेतली होती. त्यात येथील वॉटर वर्क आणि प्ले ग्राऊंडच्या आरक्षित जागेवरील 200 चौरस मीटर जागेवर हे बुद्ध विहार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार करुन तो आयुक्तांच्या मंजुरीसाठी ठेवला होता. मंगळवारी आयुक्तांनी या प्रस्तावास मंजुरी दिल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले. त्यानुसार आता लवकरच हे बुद्ध विहार स्थलांतरित होऊन या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. (Pune municipal Corporation)
नागरिकांची अडचण लक्षात घेऊन हे बुद्ध विहार स्थलांतरीत करण्यासाठी बुध्द विहाराचे अध्यक्ष राजीव बेंगळे यांच्यासह पालिकेचे नगराभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे व्ही. जी. कुलकर्णी, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, बिपीन शिंदे, पथ विभागाचे अधिकारी मिरा सबनीस, संजय धारव तसेच एसआरए भूमी जिंदगी विभाग यासंर्वाची मोलाची मदत झाल्याचे आमदार टिंंगरे यांनी सांगितले.
—————————–
विश्रांतवाडी चौकातील वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. हे बुध्द विहार स्थलांतरीत झाल्यामुळे लोहगाव-धानोरीकडे जाणारी वाहने आता विना अडथळा जाऊ शकतील. तसेच लवकरच या चौकातील उड्डाणपुलाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून पुलाचे काम होऊन येथील कोंडीचा प्रश्न कायम स्वरुपी सुटेल.
– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.
—————————–
Pune Water Cut New Timetable | पुणे महापालिकेकडून आता पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक | जाणून घ्या तुमच्या परिसरात कधी पाणी बंद असणार?
पुणे शहरामध्ये (Pune city) संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्व भुमीवर दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद करणेबाबत जाहीर प्रकटन देण्यात आलेले होते व त्यानुसार दिनांक 18/05/2023 पासुन कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. तथापी भौगोलीक रचना, पंपिंग व वितरण व्यवस्थेमधील तांत्रीक अडचणीमुळे वडगाव बु। झोनमधील वडगाव बु धनकवडी, आंबेगाव पठार, आगम मंदिर, बालाजीनगर, कात्रज, सुखसागरनगर, कोंढवा बु।।, येवलेवाडी, अप्पर इंदिरानगर परिसरामधील एकाच दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवून दुसऱ्या दिवशी होणारा पाणीपुरवठा पुर्ववत करणे शक्य होत नसल्याने वडगाव बु. झोनमधील या भागामध्ये विभागवार पद्धतीने (रोटेशन) पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यानुसार गुरूवार दिनांक 25/05/2023 पासून विभाग निहाय पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालीलप्रमाणे नमुद करीत आहोत. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे पावसकर यांनी म्हटले आहे. (Pune water cut news)
दिवसनिहाय पाणीपुरवठा बंद असणारा भाग
कांडगेपार्क, मोहिते टाऊनशिप परिसर खोराडवस्ती परिसर, संपुर्ण वडगाव बु।। परिसर, वडगाव बु।।, चव्हाणबाग, डि. एस. के. रोड, वेंकटेश सेरेनिटी परिसर, हायब्लीस सोसायटी परिसर, नांदेड फाटापर्यंत, राजयोग सोसायटी परिसर, लोकमत कार्यालय परिसर, आनंद मंगल कार्यालया परिसर, अभिरुची परिसर, समर्थनगर, दांगटनगर, नारायणबाग परिसर, धायरी परिसर, गोयल गंगा, सनिसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसर, ओंकार गार्डन परिसर, अमृतानगर, सावरकरनगर, नॅशनलपार्क, माणिकबाग परिसर इ. हायवे बायपास परिसर, चरवड वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर, आंबेगाव बु।। शिवसृष्टी परिसर विकासनगर, घुलेनगर, धबाडी, सर्वे नं. 45, 48,47, निवृत्तीनगर, विष्णुपुरम, तुकाईनगर,
तालाब कंपनी परिसर, सर्वे नं. 15 सागर कामठेनगर, पुण्यधाम आश्रमनगर, टायनी इंडस्ट्रीयल परिसर, वाघ वस्ती, श्रद्धानगर, विष्णु ठोसरनगर, सोमजी बसस्टॉप परिसर, संपुर्ण येवलेवाडी गाव, राजमाता कॉलनी परिसर इ.
PMC Pune Deputy commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप को कारण बताओ नोटिस जारी
| महापालिका आयुक्त द्वारा कार्रवाई किए जाने की संभावना
: पुराना वीडियो वायरल किया गया
PMC Pune Employees Award | Soon distribution of meritorious workers award of the Pune municipal corporation!
| Information of Chief Labor Officer Shivaji Daundkar
Awards are given annually
| What are the awards based on?
: Who conducts the interview?
The awards were stopped due to Corona
PMC Pune Employees Award | पुणे महापालिकेच्या गुणवंत कामगार पुरस्काराचे लवकरच वितरण!
| मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांची माहिती
दरवर्षी दिले जातात पुरस्कार
| कशाच्या आधारे दिले जातात पुरस्कार?
: मुलाखत कोण घेतात?
कोरोनामुळे रखडले होते पुरस्कार
PMC Deputy Commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप यांना कारणे दाखवा नोटीस
| महापालिका आयुक्त यांच्याकडून कारवाई होण्याची शक्यता
PMC Deputy Commissioner Madhav Jagtap | महापालिकेच्या (PMC Pune) अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy commissioner Madhav Jagtap) यांना पथारी व्यावसायिकाच्या (Hawkers) अन्न पदार्थासह, स्टॉलला लाथ मारणे चांगलेच महागात पडणार आहे. जगताप यांचा हा लाथ मारण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील राजकीय पक्ष, पथारी व्यावसायिक संघटना, सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत जगताप यांचा पदभार काढून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनीही घेतली असून या प्रकरणी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस (Show cause Notice) बजाविण्यात आली आहे. त्यानंतर या घटनेबाबत त्यांच्याकडून खुलासा घेऊन त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. (Deputy commissioner Madhav Jagtap News)
जुना video वायरल करण्यात आला
माधव जगताप यांचा व्हायरल झालेला व्हीडीओ हा फर्ग्युसन रस्त्यावरील असून तो 5 एप्रिलचा आहे. या व्हिडीओमध्ये जगताप हे आपल्या सुरक्षा रक्षकासह हॉटेल चालकांशी वाद घालत असल्याचे दिसून असून काही वेळानंतर त्यांनी खाद्यपदार्थ ठेवलेल्या स्टॉलवर लाथ मारत हे पदार्थ उडवून लावले आहेत. तसेच दोन ते तीन वेळा लाथा मारून स्टॉल मागे ढकलला आहे. हा व्हीडीओ 16 मे रोजी व्हायरल झाला असून जगताप यांच्याकडून तो व्हायरल करू नये, म्हणून दबाव टाकण्यात आल्याने तो उशिरा बाहेर आल्याची चर्चा आहे. हा व्हीडीओ समोर आल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सोशल मिडीयावर तो व्हायरल करत जगताप यांच्या कृतीचा निषेध केला आहे. त्यांना कायद्याने कारवाईचा अधिकार आहे. मात्र, अशा प्रकारे हिंसक होऊन लाथा मारण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल करत कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation News)
—/——
News Title | PMC Deputy Commissioner Madhav Jagtap Show cause notice to Deputy Commissioner Madhav Jagtap