PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेच्या अधिक्षक, प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा | ‘द कारभारी’ च्या बातमीचा परिणाम

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेच्या अधिक्षक, प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा | ‘द कारभारी’ च्या बातमीचा परिणाम

| अनुभव आणि सेवा या शब्दाच्या गल्लतीमुळे गोंधळ

| महापालिका दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवणार

PMC Pune Employees Promotion | (Author: Ganesh Mule) | पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नतीदेण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या कित्येक महिन्यापासून प्रलंबित आहे. याबाबत महापालिकेने सरकारकडून मार्गदर्शन देखील मागवले होते. सरकारने यात दुरुस्ती सुचवली आहे. हा सगळा गोंधळ अनुभव आणि सेवा या शब्दांमुळे झाला आहे. त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी महापालिकेने सरकारकडे दुरुस्ती प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते. ‘द कारभारी’ (thekarbhari.com) वृत्तसंस्थेने हा विषय लावून धरला होता. त्यानुसार दुरुस्तीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव विधी समिती (PMC Law Committee) समोर ठेवण्यात आला आहे. विधी आणि मुख्य सभेची (PMC General Body) मान्यता घेऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. यामुळे मात्र अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीचा (promotion)  मार्ग मोकळा होणार आहे. (PMC Pune Employees Promotion)

 

PMC Pune Employees Promotion | ‘अनुभव’ आणि ‘सेवा’ या शब्दाच्या गल्लतीमुळे पुणे महापालिकेचे बहुसंख्य कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित!

 

| मानीव दिनांक काय आहे

महापालिकेचा कर्मचारी त्याच्या पदोन्नतीस पात्र असताना देखील काही तांत्रिक कारणामुळे किंवा प्रशासनाच्या चुकीमुळे पदोन्नतीपासून वंचित राहत असतील तर पदोन्नती देण्याबाबत मानीव दिनांक ही संकल्पना सरकारने तयार केली आहे. त्यानुसार महापालिकेने काही लोकांना पदोन्नती देखील दिली आहे. त्यानुसार महापालिकेचे अधिक्षक आणि प्रशासन अधिकारी यांची पदोन्नती देण्याबाबत पदोन्नतीसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. मात्र यात मानीव दिनांकाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने ही पदोन्नती लटकली आहे. कारण सरकारकडून देखील यात एक गोंधळ झाला आहे.   पुणे महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमात पदोन्नतीदेताना “निम्न पदावरील ३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक” अशी तरतुद आहे. मात्र इतर महापालिकांमध्ये ‘3 वर्षाची नियमित सेवा’ अशी तरतूद आहे. (Pune Municipal Corporation)

| महापालिकेने मागवले होते मार्गदर्शन

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील प्रशासकीय सेवा या संवर्गातील ज्या अधिकारी / कर्मचारी यांना निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने ते सध्या त्यांच्या उच्च पदाच्या पदोन्नतीच्या विचाराधीन कक्षेत आले आहेत. त्यांना निम्न संवर्गातील ३ वर्षाचा कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती द्यावी अगर कसे याबाबत महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. (PMC Pune Marathi News)
या अनुषंगाने सरकारने कळवले होते की, पुणे महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमात पदोन्नतीदेताना “निम्न पदावरील ३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक” अशी तरतुद आहे. निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने उच्च पदाच्या पदोन्नतीकक्षेत आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती देण्यासाठी सेवाप्रवेश नियमात सदर अर्हतेमध्ये “निम्न पदावरील ३ वर्षांची नियमित सेवा” असा बदल करणे आवश्यक आहे. (Pune Municipal Corporation Employees promotion)

सरकारच्या या मार्गदर्शनानंतर महापालिकेने दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवणे आवश्यक होते. मात्र गेल्या दोन तीन महिन्यापासून याबाबत कुठलीही हालचाल करण्यात आलेली नव्हती. याबाबत ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हा दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला असून तो विधी समिती समोर ठेवला आहे. या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता घेऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. यामुळे आता प्रशासन अधिकारी, अधीक्षक, उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक  यांची पदोन्नती लवकरच होणार हे सिद्ध झाले आहे. (Pune Municipal Corporation News)
—-
News title | PMC Pune Employees Promotion | Paving the way for the promotion of superintendent, administration officers of Pune Municipal Corporation News result of ‘The Karbhari’

PMC Pune Employees Award | पुणे महापालिकेच्या २७ कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार  | जाणून घ्या कुणाला मिळाले पुरस्कार!

Categories
Breaking News cultural Education PMC social पुणे

PMC Pune Employees Award | पुणे महापालिकेच्या २७ कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार  | जाणून घ्या कुणाला मिळाले पुरस्कार!

PMC Pune Employees Award | (Author: Ganesh Mule) | कोरोना (corona) मुळे रखडलेल्या महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) गुणवंत कामगार पुरस्काराचे (Meritorious Employees award) अखेर वितरण करण्यात आले आहे. दोन वर्षांचे पुरस्कार एकदाच  देण्यात आले. विविध विभागातील २७ कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात आले.  अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. (PMC Pune Employees award)

दरवर्षी दिले जातात पुरस्कार

महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (PMC Pune employees and officers) प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने गुणवंत कामगार पुरस्कार दिला जातो. दरवर्षी  वर्ग 1 ते वर्ग 4 मधील 20 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. 25 हजार रुपये, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (PMC Pune News)

| कशाच्या आधारे दिले जातात पुरस्कार?

 गुणवंत कामगार पुरस्कार देताना विविध निकषांचा विचार केला जातो. यामध्ये खासकरून कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती देखील विचारात घेतली जाते. तसेच सेवाविषयक माहितीचा देखील विचार केला जातो. यामध्ये कर्मचाऱ्याने महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यात तसेच बचत करण्यात काय योगदान दिले, याबद्दलची माहिती विचारात घेतली जाते.  कर्मचाऱ्यांची मागील 5 वर्षातील गोपनीय मूल्यमापन अहवालाची माहिती देखील घेतली जाते. तसेच कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमामधील सहभागाविषयी मते विचारात घेतली जातात. शैक्षणिक कार्याबद्दल कुठले पुरस्कार मिळाले आहेत का, याचा आढावा घेतला जातो. क्रीडा स्पर्धा मधील सहभाग आणि एखाद्या खेळामधील प्राविण्य देखील विचारात घेतले जाते. कर्मचाऱ्याने कुठले पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे का, वर्तमानपत्र किंवा मासिकात काही लेख लिहिले आहेत का, हा देखील विचार केला जातो. अशा सर्व गोष्टीचा आढावा घेऊन मार्क दिले जातात. (Pune Mahanagarpalika News)

कुणाला मिळाले पुरस्कार ?

गुणवंत कामगार पुरस्कार 2018-2019

1. श्रीमती उल्का गणेश कळसकर, सह महापालिका आयुक्त (मुख्य लेखा व वित्त अधिकारी)
2. डॉ. केतकी रणजीत घाटगे, वैद्यकिय अधिकारी
3. श्री. संदेश सुरेश शिर्के, शाखा अभियंता
4. श्रीमती प्रिती अजय शिंदे, वरिष्ठ लिपिक
5. श्री. मुकुंद गजानन कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक
6.  श्रीमती स्वाती आशिष गायकवाड, शारीरिक शिक्षण संघटक
7.  श्रीमती शुभांगी गोवर्धन वामने, सहाय्यक शिक्षिका
8. श्री. श्रीकांत रामचंद्र मते, मोकादम
9. |श्री. विजय रामलखन मिश्रा, बिगारी
10. श्री. बाळासाहेब वामनराव खर्डे, बिगारी
11. श्री. विनायक हिरामण भिसे, बिगारी
12. श्री. तेजस नथुराम खरिवले, फायरमन
13. श्री. संजीव शामप्पा जोगी, शिपाई

—-

गुणवंत कामगार पुरस्कार 2019-2020

1. श्रीमती शिल्पकला कृष्णराव रंधवे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
2. डॉ. सुधीर दादाराम पाटसुते, वैद्यकिय अधिकारी
3. श्री. समिर वसंत गोसावी, उप अभियंता
4. डॉ. लता संतोष त्रिंबके, नि.वैद्यकिय अधिकारी
5. श्री. जिजाभाऊ तुकाराम तीर, लिपीक टंकलेखक
6. श्री. राहुल सुभाष माळी, आरेखक
7. श्री. गणेश तुकाराम खिरीड, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक
8. श्री. संजय शामराव पाटील, फायरमन
9. श्री. अनिल दादू/दादासाहेब रोकडे, झाडूवाला
10. श्री. रविंद्र केशव बिनवडे, सुरक्षा रक्षक

11. श्री. विठ्ठल मारुती टाकळकर, बिगारी
12. श्री. राहुल नारायण बांदल, फायरमन
13. श्री. मारुती महादेव देवकुळे, फायरमन
14. श्री. अशोक लक्ष्मण कांबळे, मोकादम
—-
News Title | PMC Pune Employees Award | Meritorious Workers Award to 27 employees of Pune Municipal Corporation | Find out who got the award!

PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेच्या दोन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेच्या दोन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती

| महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून आदेश जारी

PMC Pune Employees promotion | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) दोन विभागातील कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेने नुकतीच पदोन्नती (Promotion) देण्यात आली आहे. यामध्ये अग्निशमन विभाग (PMC Fire Brigade Department) आणि समाज विकास विभागाचा (PMC Social Devlopment Department) समावेश आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (PMC Pune Employees promotion)
पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागातील (Pune Municipal Corporation Fire Brigade Department) स्टेशन ड्युटी ऑफिसर (गट ब) (Station Duty Officer) या पदावरून सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी (गट ब) (Assistant Divisional Fire Officer) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार विजय भिलारे यांची पदोन्नतीने या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation News)
तसेच समाज विकास विभागातील तीन कर्मचाऱ्यांना सहायक समाज विकास अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. समाजसेवक (Social Worker) या पदावरून सहायक समाज विकास अधिकारी (Assistant Social Devlopment Officer) या पदावर सेवा ज्येष्ठतेने ही पदोन्नती देण्यात आली आहे. समाजसेवक श्रेणी 3 या पदावर असणाऱ्या राजेंद्र मोरे, पूजा पवार आणि रामदास धावडे यांची सहायक समाज विकास अधिकारी श्रेणी 3 या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. (PMC Pune Marathi News)
तीन महिन्यापूर्वीच पदोन्नती समिती बैठकीत या पदोन्नतीला मान्यता देण्यात आली होती. मात्र आयुक्त कार्यालयात बरेच दिवस याबाबतचा प्रस्ताव पडून अखेर महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकीकडे पदोन्नतीची बरीच प्रकरणे प्रलंबित असताना कर्मचाऱ्यांना मिळालेली ही पदोन्नती म्हणजे महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा मानला जात आहे. (Pune Municipal Corporation Employees)
——
News Title |PMC Pune Employees Promotion | Promotion of employees of two departments of Pune Municipal Corporation | Order issued by Municipal Additional Commissioner