PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! 

 

| राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव 

 
PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा प्रस्ताव (Time Bound Promotion Proposal) पुन्हा एकदा लटकला आहे. याबाबतची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांनी दिले आहेत. याच्या अंमलबजावणी बाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण घेतले जाणार आहे. यामुळे कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला आहे. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation Employees)

– सामान्य प्रशासन विभागाचे सर्क्युलर जारी

सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना लागू केलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी व सुधारित वेतन संरचना यानुसार तीन लाभांची सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना (१०/२०/३० वर्षे) लागू करण्याबाबत स कार्यालयीन आदेश प्रसृत करण्यात आलेला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु झालेली आहे. या  प्रकरणी सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागवावे, तोपर्यंत दाखल प्रस्ताव व यापूर्वी मान्य केलेले प्रस्ताव देखील पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करावेत, असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी दिलेले आहेत. (PMC General Administration Department)
त्यानुषंगाने सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे अंमलबजावणीबाबत राज्य
शासनाकडून स्पष्टीकरण मागविणेची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येईल. तरी, सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे सर्व प्रस्ताव पुढील आदेश होईपर्यंत स्थगित ठेवण्यात यावेत. असे आदेशात म्हटले आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना वाटच पाहावी लागणार आहे. (7th Pay Commission Update)

– काय आहे कालबद्ध पदोन्नती

काही महापालिका कर्मचाऱ्यांची महापालिकेत बरेच वर्षे सेवा होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पदोन्नतीचे पद मिळत नाही. त्यामुळे पद आणि वेतन अशा दोन्ही पासून कर्मचाऱ्याला वंचित राहावे लागत होते. यावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार दोन टप्पे करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 12 वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण झाली असेल, त्यांना त्यांच्या सेवेनुसार वेतनवाढदेण्यात आली. पद तेच असले तरी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळू लागले. 1994 साली हा नियम लागू करण्यात आला. यामध्ये 2003 साली सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 2013 यात आणखी स्पष्टता आणण्यात आली. मग सातव्या वेतन आयोगानुसार सरकार ने 2016 सालापासून दोन ऐवजी तीन टप्पे केले. त्यामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष असे टप्पे करण्यात आले आहेत. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Employees Time Bound Promotion | The time-bound promotion of Pune municipal employees is suspended again!

PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेतील रखडलेल्या पदोन्नती वरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आयुक्तांना फटकारले 

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेतील रखडलेल्या पदोन्नती वरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आयुक्तांना फटकारले

| आगामी 30 दिवसांत योग्य निर्णय घेण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश

PMC Pune Employees Promotion | (Author : Ganesh Mule) |पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) लेखनिकी संवर्गातील (Clerical Cadre) अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी आणि तसेच इतर संवर्गातील १० ते १२ पदांच्या पदोन्नती (Promotion) रखडली आहे. तर दुसरीकडे अभियंता संवर्गातील पदोन्नती (Engineering cadre promotion) तात्काळ केली जाते. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. महापालिका प्रशासनाच्या या कामकाजाला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी महापालिकेची तक्रार भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे (National Commission for scheduled castes) केली होती. याबाबत आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच महापालिका आयुक्तांना (PMC commissioner) चांगलेच सुनावले आहे. आगामी 30 दिवसांत यावर योग्य कार्यवाही करण्याचे आदेश आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तसे नाही झाले तर आम्हांला याचा तपास करावा लागेल, असा इशारा देखील आयोगाने महापालिका आयुक्तांना दिला आहे. (PMC Pune Employees promotion)
पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) लेखनिकी संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काही हक्काच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) परस्पर सेवा नियमावलीत (service rules) बदल  केले जात आहेत. यामुळे या संवर्गातील कर्मचारी हवालदिल झाले असून आमच्यावर अन्याय होत असल्याची खंत कर्मचारी व्यक्त करत आहेत. (PMC Pune Employees)
महानगरपालिकेतील प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक”, उपअधीक्षक, (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (वर्ग-२) या पदावर तात्पुरती पदोन्नतीदेण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या कित्येक महिन्यापासून प्रलंबित आहे. याबाबत महापालिकेने सरकारकडून मार्गदर्शन देखील मागवले होते. सरकारने यात दुरुस्ती सुचवली आहे. हा सगळा गोंधळ अनुभव आणि सेवा या शब्दांमुळे झाला आहे. त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी महापालिकेने सरकारकडे दुरुस्ती प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे. मात्र तेच होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून वंचित राहावे लागत आहे. लेखनिकी संवर्गातील कर्मचाऱ्यावर अशा पद्धतीने अन्याय होत असताना दुसरीकडे अभियंता संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या मात्र तात्काळ केल्या जातात. प्रशासनाच्या या भेदभाव करण्याच्या कामकाजाला महापालिका कर्मचारी कंटाळले आहेत. यामुळेच काही कर्मचाऱ्यांनी याबाबत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने याची खूप गंभीरपणे दखल घेतली आहे. (Pune Municipal Corporation Employees promotion)

| राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने नेमके काय म्हटले आहे?

महापालिका कर्मचाऱ्याकडून 25 मे ला याबाबत तक्रार करण्यात आली होती. भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (National Commission for scheduled castes) याची तात्काळ दखल घेत 1 जून ला महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. आयोगाने म्हटले आहे कि, कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे भारतीय आयोग घटनेच्या कलम ३३८ अन्वये आयोगाला बहाल केलेल्या अधिकारांच्या अनुषंगाने, आम्ही तपास करण्याचे ठरवले आहे. यात सुधारणा होईल, अशी आशा आहे.  आणि आयोगाला याबाबत केलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली जाईल. अशी आशा आहे, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने आयुक्तांना दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे कि तुम्हाला हे पत्र मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत आयोगाकडे याबाबत योग्य कार्यवाही करून निवेदन सादर करावे.    यामध्ये कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर पॅरानिहाय टिप्पण्यांसह पुढील तपासासाठी प्रकरणातील संपूर्ण तथ्ये मांडण्याची व्यवस्था करा. जेणेकरून या प्रकरणात योग्य तो निर्णय घेता येईल. लक्षात ठेवा की जर आयोगाला निर्धारित कालावधीत तुमचे उत्तर प्राप्त झाले नाही तर भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३८ अन्वये आयोगाला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर केला जाईल. असा इशारा देखील दिला आहे. (PMC Pune Marathi News)
यावरून तरी महापालिका प्रशासन काही धडा घेऊन पदोन्नतीच्या विषय मार्गी लावेल आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करणार नाही, अशी अपेक्षा महापालिका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (Pune Municipal Corporation)
—-
News title | PMC Pune Employees Promotion | The National Commission for Scheduled Castes reprimanded the Commissioner over the stalled promotions in the Pune Municipal Corporation

PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेच्या दोन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेच्या दोन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती

| महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून आदेश जारी

PMC Pune Employees promotion | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) दोन विभागातील कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेने नुकतीच पदोन्नती (Promotion) देण्यात आली आहे. यामध्ये अग्निशमन विभाग (PMC Fire Brigade Department) आणि समाज विकास विभागाचा (PMC Social Devlopment Department) समावेश आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (PMC Pune Employees promotion)
पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागातील (Pune Municipal Corporation Fire Brigade Department) स्टेशन ड्युटी ऑफिसर (गट ब) (Station Duty Officer) या पदावरून सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी (गट ब) (Assistant Divisional Fire Officer) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार विजय भिलारे यांची पदोन्नतीने या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation News)
तसेच समाज विकास विभागातील तीन कर्मचाऱ्यांना सहायक समाज विकास अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. समाजसेवक (Social Worker) या पदावरून सहायक समाज विकास अधिकारी (Assistant Social Devlopment Officer) या पदावर सेवा ज्येष्ठतेने ही पदोन्नती देण्यात आली आहे. समाजसेवक श्रेणी 3 या पदावर असणाऱ्या राजेंद्र मोरे, पूजा पवार आणि रामदास धावडे यांची सहायक समाज विकास अधिकारी श्रेणी 3 या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. (PMC Pune Marathi News)
तीन महिन्यापूर्वीच पदोन्नती समिती बैठकीत या पदोन्नतीला मान्यता देण्यात आली होती. मात्र आयुक्त कार्यालयात बरेच दिवस याबाबतचा प्रस्ताव पडून अखेर महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकीकडे पदोन्नतीची बरीच प्रकरणे प्रलंबित असताना कर्मचाऱ्यांना मिळालेली ही पदोन्नती म्हणजे महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा मानला जात आहे. (Pune Municipal Corporation Employees)
——
News Title |PMC Pune Employees Promotion | Promotion of employees of two departments of Pune Municipal Corporation | Order issued by Municipal Additional Commissioner