PMC Pune Health Schemes |  Pune Municipal Corporation’s ranking improved in health schemes

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे महाराष्ट्र

PMC Pune Health Schemes |  Pune Municipal Corporation’s ranking improved in health schemes

 |  Improvement in ranking due to efforts of PMC health department

 PMC Pune Health Schemes |  Central and State governments health schemes are implemented on behalf of the Pune Municipal Corporation to provide benefits to the people of Pune.  The implementation of this scheme has been started from the year 2006-2007.  Since then till now, the ranking of Pune Municipal Corporation was always below (Low Ranking) in the state.  This ranking used to be in the last 5.  However, in the year 2022-23, due to the initiative taken by the Pune Municipal Corporation health department (PMC health department), this ranking has improved to the 4th position.  The state government has also appreciated the Pune Municipal Corporation in this regard.  This information was given by Assistant Health Officer Dr Vaishali Jadhav of the Health Department.  (PMC Pune health schemes)
 On behalf of Pune Municipal Corporation (PMC), central and state government health schemes are implemented.  It includes various health related programs.  These include RCH (Reproductive And Child Health) and NUHM (National Urban Health Mission) schemes in particular.  In this RCH was started from 2006-07 and NUHM from 2016.  However, the Municipal Health Department (PMC Pune Health Department) appeared apathetic about the implementation of this scheme.  Therefore, the ranking of the municipal corporation in the state always remained in the last five ranks.  But when the responsibility of implementing this program came to the Assistant Health Officer Dr. Vaishali Jadhav, the implementation of the plan gained momentum.  Moreover, the ranking of the municipal corporation also increased.  (PMC Pune Health Department)

 What are the sub-objectives of health schemes?

 In this regard, Assistant Health Officer Dr. Vaishali Jadhav said that we have put in a lot of effort in conveying this scheme to the people and giving them the benefits.  Vacancies were filled in this.  Appointed Asha Worker.  Operation theaters and maternity wards were started.  Male sterilization programs were implemented to create awareness about family planning.  Also, by appointing nurses on vacant posts, they went door to door and conducted a survey in the city.  Out of 740 posts, 618 posts have been filled today.  This includes more than 300 field nurses, 100 staff nurses, 52 lab technicians, 53 data entry operators.  Previously there were fewer posts.  Dr. Jadhav further said that many works being done under the scheme were closed.  We started it afresh.  In this, the work of Patient Welfare Committee, Women Health Committee was appointed.  which was closed for some time.  Funds come from the government for this.  Funds were used to improve these.  (PMC Pune News)

 How much funding is provided by the government for health schemes?

 Dr Jadhav said that the two schemes namely Nuhm and rch get about 29 crores of funds every year.  Its utilization has gone beyond 85%.  Previously, ward Medical Officers and Circle Medical Officers were not involved in these schemes.  We participated in them.  Increased supervision.  Nurses provided for Zonal Ward.  Accelerated work by decentralizing work at all levels.  Also, monthly meetings are held with staff and nurses.  They are trained.  (Pune Municipal Corporation News)

 Patient preference for Pune Municipal Hospital

 Dr Jadhav said that patients were not coming to the municipal hospital due to inadequate facilities.  Those who come leave in the hospital like Sassoon.  In this, the proportion of pregnant women is high.  Then we found the reasons for this.  Such facilities were started in municipal hospitals.  Recently we have started giving sattvic diet to pregnant women.  Due to this, patients’ preference for Pune Municipal Corporation’s hospitals has increased.  Also, pregnant mothers are examined by specialist doctors.  Dr. Jadhav further said, emphasis has been placed on vaccination of children.  Vaccination is done daily in the hospital.  While in big clinics, vaccination is done two days a week.  This has reduced the congestion and also reduced the anguish of the citizens.  Also quality health programs are also implemented well.  All this has been taken note of by the government.  Therefore, the ranking of the municipality has improved.
 —
 News title |  PMC Pune Health Schemes |  Pune Municipal Corporation’s ranking improved in health schemes  Improvement in ranking due to efforts of PMC health department

PMC Pune Health Schemes | आरोग्य योजनांमध्ये पुणे महापालिकेची रँकिंग सुधारली!

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे महाराष्ट्र

PMC Pune Health Schemes | आरोग्य योजनांमध्ये पुणे महापालिकेची रँकिंग सुधारली

| आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे रँकिंग मध्ये सुधारणा

PMC Pune Health Schemes |  (Author: Ganesh Mule) | केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजनांचा (Central and State governments health schemes) पुणेकरांना लाभ देण्यासाठी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने या योजनांची अंमलबजावणी केली जाते. 2006- 2007 सालापासून या योजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तेव्हापासून आतापर्यन्त राज्यात नेहमी पुणे महापालिकेची रँकिंग (Low Ranking) खाली होती. ही रँकिंग शेवटच्या 5 क्रमांकात असायची. मात्र 2022-23 सालात पुणे महापालिकेने (PMC Pune) योजना राबवण्यात घेतलेल्या आघाडीने या रँकिंग मध्ये सुधारणा होऊन 4 थ्या क्रमांकावर रँकिंग आली आहे. याबाबत राज्य सरकारनेही पुणे महापालिकेचे कौतुक केले आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव (Assistant Health officer Dr Vaishali Jadhav) यांनी दिली. (PMC Pune health schemes)
पुणे महापालिकेच्या वतीने (Pune Municipal Corporation) केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजना राबवण्यात येतात. यात विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचा समावेश असतो. यामध्ये खासकरून RCH (Reproductive And Child Health) आणि NUHM (National Urban Health Mission) योजनांचा समावेश आहे. यामध्ये RCH हे 2006-07 पासून तर NUHM हे 2016 पासून राबवण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र या योजना राबवण्याबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग (PMC Pune Health Department) उदासीन दिसून आला. त्यामुळे महापालिकेची राज्यात रँकिंग ही नेहमी शेवटच्या पाच क्रमांकामधे राहिली. मात्र  हा कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी जेव्हा सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांच्याकडे आली तेव्हा योजना अंमलबजावणी बाबत गती आली. शिवाय महापालिकेची रँकिंग देखील वाढली. (PMC Pune Health Department)

आरोग्य योजनांमध्ये काय उपपयोजना केल्या?

याबाबत सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांनी सांगितले कि, या योजना लोकांपर्यंत पोचवण्यात आणि त्यांना याचा लाभ देण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. यामध्ये रिक्त पदे भरण्यात आली. आशा वर्कर ची नियुक्ती केली. ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतिगृहे सुरु केली. कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करत पुरुष नसबंदी चे कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच रिक्त पदावरील नर्सेस ची नियुक्ती करून शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. 740 पदांपैकी आज 618 पदे भरण्यात आली आहेत. यामध्ये फिल्ड वर काम करणाऱ्या 300 हुन अधिक नर्स, 100 स्टाफ नर्स, 52 लॅब टेक्निशियन, 53 डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा समावेश आहे. पूर्वी कमी पदे होती. डॉ जाधव यांनी पुढे सांगितले कि, योजनेअंतर्गत केली जाणारे बरीच कामे बंद होती. ती आम्ही नव्याने सुरु केली. यामध्ये रुग्ण कल्याण समिती, महिला आरोग्य समितीची नियुक्ती करून यांचे काम सुरु केले.  जे काही काळापासून बंद होते. यासाठी सरकार कडून फंड येतात. यामध्ये सुधारणा करण्यासाठी फंड चा वापर केला. (PMC Pune News) 

आरोग्य योजनांसाठी सरकार कडून किती निधी दिला जातो?

डॉ जाधव यांनी सांगितले कि Nuhm आणि rch अशा दोन योजनांसाठी दरवर्षी जवळपास 29 कोटी निधी येतो. त्याचा विनियोग 85% च्या पुढे गेला आहे. या योजनांमध्ये पूर्वी महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आणि परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग नव्हता. त्यांनी आम्ही सहभाग केले. Supervision वाढवले. Zonal  वॉर्ड साठी नर्सेस दिल्या. कामाचे सर्व स्तरावर विकेंद्रीकरण करून कामाला गती दिली. तसेच कर्मचारी आणि नर्स सोबत दर महिन्याला मिटिंग घेतली जाते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. (Pune Municipal Corporation News)

पुणे महापालिकेच्या दवाखान्याला रुग्णाची पसंती

डॉ जाधव यांनी सांगितले कि अपुऱ्या सुविधेमुळे महापालिका रुग्णालयात रुग्ण येत नसत. जे येत ते ही ससून सारख्या रुग्णालयात निघून जात. यामध्ये गरोदर स्त्रियांचे प्रमाण जास्त होते. मग याची आम्ही कारणे शोधली. तशा सुविधा महापालिका दवाखान्यात देण्यास सुरुवात केली. नुकताच आम्ही गरोदर बायकांना सात्विक आहार देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या दवाखान्यांना रुग्णांची पसंती वाढली आहे. तसेच गरोदर मातांची तपासणी तज्ञ् डॉक्टर कडून करून घेतली जाते.  डॉ जाधव पुढे म्हणाल्या, लहान मुलांच्या लसीकरणावर जोर दिला आहे. हॉस्पिटल मध्ये दररोज लसीकरण केले जाते. तर मोठ्या दवाखान्यामध्ये आठवड्यातून दोन दिवस लसीकरण केले जाते. यामुळे गर्दी कमी झाली आहे आणि नागरिकांचा मनस्ताप देखील कमी झाला आहे. तसेच गुणवत्ता विषयक आरोग्य कार्यक्रम देखील चांगल्या पद्धतीने राबवले जातात. या सगळ्याची दखल सरकार कडून घेण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेची रँकिंग सुधारली आहे. (Pune Mahanagarpalika Marathi batmya)
News title | PMC Pune Health Schemes |  Pune Municipal Corporation’s ranking improved in health schemes |  Improvement in ranking due to efforts of health department

Pune Municipal corporation Health Schemes | डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्यविषयक योजना सुरु करण्यासाठी पतित पावन संघटना आक्रमक 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

Pune Municipal corporation Health Schemes | डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्यविषयक योजना सुरु करण्यासाठी पतित पावन संघटना आक्रमक

Pune Municipal corporation Health Schemes | पुणे महानगरपालिकेद्वारा (Pune Municipal Corporation) डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना (Dr. Shamaprasad Mukherjee Health Scheme) पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती . मागील वर्षभरात तब्बल 47 हजार हुन अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. परंतु निधी नसल्याचा कारण देत या अर्थसंकल्पात निधी न देता हि आरोग्यविषयक योजना बंद करून पुणेकर नागरिकांच्या आरोग्य वेठीस धरण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनामार्फत सुरु आहे. याबाबत पतित पावन संघटना (Patit Pawan Sanghatana) आक्रमक झाली आहे. योजना सुरु करण्याची मागणी संघटनेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Pune Commissioner Vikram Kumar) यांना केली आहे.

याबाबत संघटनेकडून आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनानुसार कोरोना रुपी समस्येच घोंघावणारा वादळ आता कुठे कमी झालं असताना . संपूर्ण जगाला आरोग्यविषयक यंत्रणा सक्षम करण्याचा एवढा मोठा धडा दिलेला असताना देखील पुणेकरांच्या आरोग्याशी निगडित योजनेचा प्रशासकीय बळी दिला जातो हि शरमेची बाब आहे .
स्मार्ट सिटी आणि G20 साठी सर्वसामान्य पुणेकरांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी करणाऱ्या पालिकेला एक अत्यंत उपयुक्त आणि आरोग्याशी निगडित योजना निधी अभावी बंद पडताना लाज कशी वाटत नाही . या योजनेचा बळी देताना आयुक्तांना जनाची नाहीतर मनाची लाज आहे का ?
पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना आठवड्याभरात कार्यान्वित नाही झाली तर पालिका आयुक्तांना पतित पावन पुण्यात फिरू देणार नाही अशा प्रकारचा इशारा आज पालिका आयुक्तांना देण्यात आला. यावेळी पतित पावन संघटना जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, कामगार महसंगाचे रवींद्र भांडवलकर,प्रसाद वाईकर,योगेश वाडेकर, यादव पुजारी,विजय क्षीरसागर, सौरभ पवार आदी पढदिकारी उपस्थित होते. (PMC Pune Health Schemes News)