Pune Water cut News | पुणे शहरातील पाणीकपात रद्द! | पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water cut News | पुणे शहरातील पाणीकपात रद्द! | पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

Pune Water Cut News | पुणे शहरात मे महिन्यापासून पाणीकपात (Pune Water cut) लागू करण्यात आली होती. मात्र धरण क्षेत्रात पडत असणारा पाऊस आणि त्यामुळे जमा झालेल्या पुरेशा पाण्यामुळे पुण्यातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांच्यासोबत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. दरम्यान 6 आठवड्यानंतर पुन्हा एकदा आढावा घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. (Pune Water cut News)
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये अपुरा पाणीसाठा असल्याने पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) शहरात पाणीकपात लागू करण्यात आली होती. काही परिसरात गुरुवारी तर काही परिसरात इतर दिवशी पाणी बंद ठेवण्यात येत होते. दरम्यान पावसाळा सुरु झाली तरी पावसाने ओढ दिली होती. परिणामी धरणात पाणीसंचय होऊ शकला नव्हता. मात्र मागील 15 दिवसापासून शहर आणि धरण परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून तो 21.62 टीएमसी म्हणजे 74% इतका झाला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांकडून पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली जात होती. त्या धर्तीवर पालकमंत्र्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. (PMC Pune)
पाणीकपात रद्द करण्याबाबत आता उद्यापासून अंमल करण्यात आहे. तसेच  6 आठवड्यानंतर पाणीसंचय बाबत आढावा घेण्याचे आदेश देखील पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. तसेच शेतीला आणि सिंचनासाठी पूरेसे पाणी देण्याबाबत देखील पालकमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
—–
News Title | Pune Water cut News | Pune city water cut canceled! | Decision in the meeting of the Guardian Minister

Pune Municipal Corporation Schools | पुणे महापालिका शाळांमध्ये 1 ऑगस्ट पासून आरोग्य अभियान

Categories
Breaking News Education PMC social आरोग्य पुणे

Pune Municipal Corporation Schools | पुणे महापालिका शाळांमध्ये 1 ऑगस्ट पासून  आरोग्य अभियान

| विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी अभियान 

Pune Municipal Corporation Schools| प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुणे महानगरपलिका प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये (PMC Pune school) शालेय विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी अभियान आयोजित करणेत येत आहे. शालेय बालकांचे डोळे तपासणी (Student Eye Checking) अभियान पुणे महानगरपलिकेच्या (Pune Municipal Corporation) सर्व शाळांमध्ये १ ऑगस्ट २०२३ पासून राबविणेत येणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation Schools)

महाराष्ट्र शासनाच्या पत्रकानुसार बुलढाणा जिल्ह्यात तसेच पुणे जिल्ह्यात आळंदी  परिसरात विषाणूजन्य आजारामुळे डोळे येणे/ conjunctivitis चे रुग्ण आढळून येत आहेत. conjunctivitis/ डोळे येणे हा आजार संसर्गजन्य आहे, यामध्ये डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे ,सूज येणे डोळ्यातून पिवळा चिकट द्राव येणे अशी लक्षणे प्रामुख्याने आढळून येत आहेत. (PMC School Health Camp) 

डोळे येणे/ conjunctivitis हा आजार संसर्गजन्य असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये पसरू नये म्हणून तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुणे महानगरपलिका प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी अभियान आयोजित करणेत येत आहे. शालेय बालकांचे डोळे तपासणी अभियान पुणे महानगरपलिकेच्या सर्व शाळांमध्ये दि.१ ऑगस्ट २०२३ पासून राबविणेत येणार आहे. शाळेमधील मुलांमध्ये डोळे येणे/ conjunctivitis हा आजार पसरू नये व सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळून आलेल्या मुलांना पुणे मनपा दवाखान्यात संदर्भित करणेत येणार आहे. या आजाराचा इतर मुलांना संसर्ग होऊ नये या उद्देशाने हे अभियान पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित करणेत येत आहे.

तरी पालकांनी या अभियाना करिता सहकार्य करावे असे आवाहन  पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS) यांनी केले आहे. 

——

News Title | Pune Municipal Corporation Schools | Health campaign in Pune municipal schools from August 1

PM Awas Yojana | PMC Pune | पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून वडगाव, हडपसर आणि खराडी येथे उभारल्या 2650 सदनिका  | पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात येणार घराच्या चाव्या 

Categories
Breaking News PMC social पुणे

PM Awas Yojana | PMC Pune | पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून वडगाव, हडपसर आणि खराडी येथे उभारल्या 2650 सदनिका

| पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात येणार घराच्या चाव्या

PM Awas Yojana | PMC Pune |केंद्रसरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे, प्रधानमंत्री आवास योजना (Pradhanmantri Awas Yojana). ही योजना केंद्र सरकार, राज्य शासन व पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corportion) यांनी समन्वयाने राबवली असून या योजनेच्या अंतर्गत वडगाव (खुर्द) व खराडी या ठिकाणी प्रत्येकी एक तर हडपसर येथे ३ गृहप्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आपल्या हक्काचे घर केंद्र शासन, राज्य शासन व पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) वतीने उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून वडगाव, हडपसर आणि खराडी येथे 2650 सदनिका उभारल्या आहेत. यातील काही लोकांना पंतप्रधान यांच्या हस्ते  घराच्या चाव्या देण्यात येणार आहेत.. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PM Awas Yojana | PMC Pune)

प्रत्येक नागरिकाकडे स्वत:चे हक्काचे घर असावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ दोन महत्वाच्या पात्रता केंद्र सरकारने ठरवून दिल्या आहेत. यामध्ये लाभार्थ्याच्या कुटुंबाच्या नावे भारतात कोठेही घर नसावे व त्याचे उत्पन्न हे तीन लाख रुपयांच्या आत असावे. यामुळे हातावर पोट असणारे, कमी उत्पन्न असणारे व्यक्तींकरिता आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाउल ठरले आहे. (Pune Municipal Corporation News)

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पुणे महापालिका हद्दीत तीन ठिकाणी गृहप्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी नियोजित जागा उपलब्ध होण्यासाठी पालिकेच्या वतीने ईडब्ल्यूएस (EWS), एचडीएच (HDH) आरक्षण असलेल्या जागामालकांशी संवाद साधला. यानुसार जागा मालकांना टीडीआर व एफएसआय देवून जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. हे सर्व प्रकल्प मुख्य रस्त्याच्या आसपास, नांदेड सिटी, खराडी आयटी पार्क सारख्या परिसराच्या जवळपास असल्याने लाभार्थ्यांना उपजीविकेच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत.

या पाच गृहप्रकल्पांपैकी सर्व्हे नंबर १०६ अ व १७ अ, सर्व्हे नंबर ८९ (पै)+ ९२ (पै) व सर्व्हे नंबर १०६ अ १२ या हडपसर मधील तीन ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तसेच सर्व्हे नंबर ५७-५ पार्ट प्लॉट नंबर १, खराडी व सर्व्हे नंबर ३९ (पै) + ४० (पै) वडगाव खुर्द या ठिकाणी प्रत्येकी एका गृह प्रकल्पाची बांधणी करण्यात आली आहे. हडपसर येथील तीन प्रकल्पात मिळून ७६४, वडगाव खुर्द येथे ११०८ तर खराडी येथे ७८६ सदनिकांची निर्मिती करून सज्ज करण्यात आली आहेत. (PMC Pune News)

या गृहप्रकल्पातील सदनिकांचे क्षेत्रफळ सुमारे ३०० चौरस फुट ते ३३० चौरस फुट असून सदनिकेमध्ये हॉल, किचन, बेडरूम, स्वतंत्र स्वच्छतागृह व बाथरूम व बाल्कनीची सोय करण्यात आली आहे. सुमारे १० ते सव्वा १२ लाख रुपयामध्ये या सदनिका लाभार्थ्याना उपलब्ध झाल्या आहेत. यातील सुमारे साडे आठ ते साडे नऊ लाखांची रक्कम लाभार्थी भरणार आहेत. या लाभार्थ्याला साहाय्य म्हणून राज्य शासन १ लाख तर केंद्र शासन दीड लाखांचा निधी दिला आहे. या गृहप्रकल्पासाठी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिली तर राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी ३० मार्च २०२२ रोजी दुसरी लॉटरी काढण्यात आली होती.

कोरोना काळानंतरच्या कालावधीनंतर पुणे महानगरपालिकेने या प्रकल्पांचा गतीने विकास व्हावा, यासाठी भरीव निधीची तरतूद केली होती होती.  यामध्ये २०२१-२२ साली ६२ कोटी, २०२२-२३ साली १२० कोटी तर २०२३-२४ साली ९५ कोटी रुपयांची तरतूद पुणे महानगरपालिकेने केली होती.

या प्रकल्पासाठी पात्र ठरणारे लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने यातील अनेकांना कर्ज मिळण्यास देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोरोनामुळे गेलेली नोकरी, बंद असणारे व्यवसाय, खराब झालेले सिबिल यामुळे अनेक लाभार्थी हतबल झाले होते. यावेळी पुणे महानगरपालिकेकडून मा. शहर अभियंता यांनी पुढाकार घेताना राष्ट्रीयकृत बँक व एनबीएफसी यांना व लाभार्थ्यांना ‘कर्ज मेळाव्यांचे’ व्यासपीठ दोन वेळा उपलब्ध करून दिले. सदर प्रकरणी मा.महापालिका आयुक्त व मा. अति. महापालिका आयुक्त यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले यामुळे राष्ट्रीयकृत बँक व एनबीएफसी यांनी या लाभार्थ्यांना कमी कागदपत्रे, कमी व्याजदर असलेले कर्ज लवकरात लवकर उपलब्ध करून देताना त्याचे वितरण देखील करण्यात आले. रेरा मुदतीच्या सुमारे प्रकल्पाचे सहा महिने आधीच प्रकल्प पूर्ण झाल्याने या लाभार्थ्यांची हफ्ते व घरभाडे यांच्या दुहेरी कात्रीतून सुटकाझालेली आहे.

या गृहप्रकल्पामध्ये भूकंप अवरोधक सांगाडा, विटा व प्लास्टर यांचा वापर करून केलेले मजबूत बांधकाम, प्रत्येक घराच्या किचनमध्ये कडप्पा व स्टेनलेस स्टीलचे सिंक व इलेक्ट्रिक साहित्य वापरण्यासाठी मुबलक पॉईंट, सर्व इमारतीमध्ये कॉपर वायरचे विस्तृत जाळे, तसेच मोड्युलर स्विचेस, इमारतीला संपूर्ण सिमेंट पेंट तर अंतर्गत भागासाठी  ऑईल पेंट ज्यामुळे घर आणखीनच आकर्षक झाली आहेत. तसेच स्वतंत्र स्वच्छतागृह व बाथरूमसाठी कन्सील्ड प्लंबिंग, तसेच गिझर पॉईंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक घरामध्ये ६०० बाय ६००चे व्हेंट्रीफाईड फ्लोरिंग, ऍल्युमिनियम पावडर कोटेड खिडक्या व दरवाजे अशा सर्व सुविधांनी ही घरे लाभार्थ्याना मिळणार आहेत. गृहप्रकल्पाचे भव्य गेट, सोलार, दुचाकीसाठी मुबलक पार्किंग, मोठे अंतर्गत रस्ते, बॅक अप सह लिफ्ट, एसटीपी प्लांट, वरिष्ठ नागरिकांसाठी वेगळी जागा, फायर फायटिंग सिस्टीम, गार्डन, रेनवॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, जनरेटर या सुविधांमुळे हा प्रकल्प देखील व्यावसायिक प्रकाल्पांसारखे दिसत आहेत.

प्रकल्पाचे डिझाईन हे आयआयटी मुंबई / व्हीजेआयटी या नामांकित संस्थेकडून प्रमाणित करण्यात आले आहे. त्यांनी प्रमाणित केलेल्या व सुचविलेल्या सुचनानुसारच या प्रकाल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेसाठी महत्वपूर्ण असल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नानाविध यंत्रणा अमलात आणल्या होत्या. यामध्ये असणारी ‘थ्री टियर सिस्टीम’. ठेकेदाराच्या क्वालिटी लॅबच्या (lab) माध्यमातून कामाचे टेस्टिंग केले जात होते. कामासाठी आलेल्या साहित्यापैकी सुमारे १० टक्के साहित्याची ‘अनपेक्षित तपासणी’ (randam test) एनएबीएल अक्रीडेटेड लॅब (lab)च्या माध्यमातून तपासणी करण्यात येत होती. तज्ज्ञ प्रकल्प सल्लागार देखील झालेल्या कामाची गुणवत्ता तपासणी सातत्याने करत होते. त्यानंतर महानगरपालिकेचे अभियंते, अधिकारी देखील कामाची पडताळणी करत असल्याने गृहप्रकल्पाचे पूर्ण काम दर्जेदार झाले आहे.

या पूर्ण ग्रहप्रकल्पाची निर्मिती करणाऱ्या घटकांमध्ये कामगार हा महत्वपूर्ण घटक आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वतीने कामगारांना सर्व प्रकारच्या सुरक्षा सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. ही सर्व उपकरणे वापरणे कामगारांना बंधनकारक असल्याने या प्रकल्पाच्या ठिकाणी कोणताही अपघात घडला नाही. याबरोबरीने कामगारांच्या आरोग्य देखील चांगले राहावे यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने दर महिन्यामध्ये तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात येत होते. कोरोना कालावधीमध्ये या सर्व कामगारांना धान्य, औषधे, जीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व या कामगारांना पुरविण्यात आल्या होत्या. पालिकेच्या वतीने अशा प्रकारे कामगारांच्या आरोग्याची व जीविताची सुरक्षा केल्याने क्रेडाईच्या वतीने वडगाव येथील प्रकल्पाला पुरस्कार देखील मिळाला.

केंद्र सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला असून याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. सन २०१७-१८ साली या कामाची निविदा पीडब्ल्यूडीच्या दर पत्रकानुसार प्रसिद्ध करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात विशेषत: कोरोना नंतरच्या काळात बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ झाली होती. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून त्याच किमतीमध्ये, उत्तम दर्जाचे काम करून घेतले आहे. लाभार्थ्यांनी आपल्या सदनिका पाहिल्यानंतर पालिकेच्या वतीने करण्यात आलेया दर्जेदार कामावर समाधान व्यक्त केले.

सर्व प्रकल्पांस आवश्यक त्या परवानग्या पुणे महानगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या आहेत.

या प्रकल्पातील लाभार्थ्यांची मानवी हस्तक्षेपाशिवाय निवड करणेसाठी ऑनलाईन सोडत यंत्रणेची (सॉफ्टवेअर) निर्मिती पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती. इच्छुक लाभार्थ्यांचे लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच सर्व कागदपत्रे मागविण्यात आली, ती तपासण्यात आली व एकदा माहिती पूर्ण झाली, कि याची पोच लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे मिळत असे. यानंतर पुढील सर्व सुचना / अपडेट्स देखील याच ‘सिस्टीम’द्वारे येत असल्याने या यंत्रणेचा लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला.


पंतप्रधान आवास योजने अंतर्गत वडगाव, हडपसर आणि खराडी येथे 2650 सदनिका उभारण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे अल्पदरातील हक्काचे घर उपलब्ध करून घ्यायचे माननीय पंतप्रधानांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारताना आनंद होत आहे. यापुढील काळात बाणेर , हडपसर परिसरातही या योजने अंतर्गत प्रकल्प उभारण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना सारख्या संसर्ग रोगाच्या साथीतही महारेरा च्या मुदती अगोदर सहा महिने प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. लवकरच सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थी नागरिक त्यांच्या स्वप्नातील घरात राहायला जातील यासाठी प्रयत्न केले जातील.

विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

————-\

News Title |PM Awas Yojana | PMC Pune | 2650 flats constructed at Vadgaon, Hadapsar and Kharadi by Pune Municipal Corporation under Pradhan Mantri Awas Yojana

Pune Municipal Corporation | आता विकास कामाचे डॉकेट IWMS प्रणाली द्वारेच करावे लागणार | महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | आता विकास कामाचे डॉकेट IWMS प्रणाली द्वारेच करावे लागणार

| महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश

Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेतील (PMC Pune) विविध विभागांमार्फत  विकसित होणाऱ्या विकास कामांचे निविदा मान्यतेचे डॉकेट Intelligent Works Management System (IWMS) सॉफ्टवेअर प्रणालीद्वारेच करावे लागणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी याबाबतचे आदेश सर्व विभागांना जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune) अंदाजपत्रकिय तरतुदी नुसार विविध विभागांमार्फत प्रकल्पीय, भांडवलीय आणि महसुली कामे निविदा प्रक्रियेतून (Tender Process) केली जातात. या  विकास कामांकरिता सुधारित संगणक प्रणाली (Intelligent Works Management System ) वापरण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. यानुसार महापालिका आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation News)

आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेतील विविध विभागामार्फत विकसित होणाऱ्या विकास कामांचे निविदा मान्यतेचे डॉकेट IWMS सॉफ्टवेअर मार्फतच करण्यात यावे. तसेच ऑडीट व दक्षता विभागाकरिता तयार करण्यात आलेल्या चेकलिस्ट पूर्णपणे भरणेची जबाबदारी ज्या विभागामार्फत डॉकेट मान्येतेसाठी सादर करण्यात येते त्या विभागातील संबधित कनिष्ठ अभियंता यांची राहील. (PMC Pune News)

तसेच सर्व विकास कामांचे पूर्वगणक पत्रक ( पु.ग.प.), जी. आय. एस. मॅपिंग, प्रशासकीय मान्यता, लाँकिंग, तांत्रिक मान्यता, डीटीपी, निविदा जाहिरात, ऑडीट व दक्षता विभागाकरिता तयार करण्यात आलेल्या चेकलिस्ट, निविदा मान्यतेचे डॉकेट, कार्यादेश (वर्क ऑर्डर) आणि मोजमापक पुस्तके ( एम. बी.) इत्यादी कामे IWMS सॉफ्टवेअर मार्फतच करण्यात यावे. असेही आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
——
News Title |Pune Municipal Corporation | Now the development work docket has to be done through IWMS system| Municipal Commissioner Vikram Kumar’s order

PMC Property Tax | मिळकत कराच्या वसुलीने ओलांडला 1 हजार कोटींचा टप्पा | शनिवार आणि रविवार देखील सुविधा केंद्र सुरु राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax | मिळकत कराच्या वसुलीने ओलांडला 1 हजार कोटींचा टप्पा

| शनिवार आणि रविवार देखील सुविधा केंद्र सुरु राहणार

PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) तिजोरीत मिळकत कराच्या (Pune Property tax) वसुलीतून 1 हजार 77 कोटी रुपये जमा झाले आहेत. 31 जुलै पर्यंत 1200 कोटी जमा होतील, असा अंदाज मिळकत कर विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान करात सवलत मिळवण्याचा कालावधी हा 31 जुलै पर्यंतच असणार आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन मिळकतकर विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच येत्या शनिवार आणि रविवारी सुट्टी असून देखील कर भरणा करण्यासाठी नागरी सुविधा केंद्र सुरु राहणार आहेत. अशी माहिती मिळकतकर विभाग प्रमुख   तथा उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC Property Tax)

देशमुख यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे कि, पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतधारकांना  ३१ जुलै २०२३ पर्यंत आपला संपूर्ण मिळकतकर भरा व सर्वसाधारण करावर ५ किंवा १०% सवलत मिळवा. ३१ जुलै २०२३ पर्यंत आपल्या निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागा यांचा संपूर्ण मिळकतकर

भरल्यास पुणे महानगरपालिकेकडून र.रु. १ कोटीपर्यत बक्षिस असलेली लॉटरी योजना घोषित करण्यात आली आहे. ज्यामध्ये ५ पेट्रोल कार, १५ ई-बाईक, १५ मोबाईल फोन, १० लॅपटॉप अशी एकूण ४५ बक्षिसे मिळकतधारकांना प्राप्त होतील. लॉटरी योजनेचा लाभ घेणेसाठी कुठल्याही प्रकारे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. केवळ आपला संपूर्ण मिळकतकर दि. ३१ जुलै २०२३ पूर्वी भरणे आवश्यक आहे. (Pune Municipal Corporation News)

देशमुख यांनी पुढे म्हटले आहे कि, नागरिकांच्या सोयीकरिता २९ जुलै व दि. ३० जुलै २०२३ रोजी शनिवार व रविवारी शासकीय सुट्टी सुरु असली तरी देखील महापालिकेची सर्व सी.एफ.सी. केंद्र सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहतील. तसेच दि. ३१ जुलै २०२३ रोजी सर्व सी.एफ.सी. केंद्र सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहतील. आपला संपूर्ण मिळकतकर भरून महापालिकेस सहकार्य करावे. असे ही देशमुख यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे. (PMC Pune News)
—-
News Title |PMC Property Tax | Income tax collection has crossed the 1 thousand crore mark |The facility will be open on Saturdays and Sundays as well

PMC Environment Report 2022-23 | पीएमपीच्या सीएनजी व इलेक्ट्रिक बस मुळे पुणे शहराच्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात घट

Categories
Breaking News Education PMC social आरोग्य पुणे

PMC Environment Report 2022-23 | पीएमपीच्या सीएनजी व इलेक्ट्रिक बस मुळे पुणे शहराच्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात घट 

 

| महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून करण्यात आला दावा 

PMC Environment Report 2022-23 | पुणे शहरात PMPML च्या एकूण २०७९ बसेस कार्यरत असून त्यांपैकी १४२१ सी. एन. जी. (PMPML CNG Bus) + ४५८ इलेिक्ट्रक बस (PMPML Electric Bus) मिळून स्वच्छ इंधन वर चालणाऱ्या एकूण १८७९ बसेस आहेत. सदर चे प्रमाण एकूण २०७९ बस ताफ्याच्या ९०% आहे. इलिक्ट्रक व सी. एन. जी. बसेसमुळे पुणे शहरातील वायू प्रदूषणाबरोबरच (Pune Air Pollution) ध्वनी प्रदूषणाची पातळी (Pune Sound Pollution) देखील कमी होत आहे. PMPML च्या ४५८ इलेक्ट्रिक बस डिसेम्बर २०२२ पर्यंत एकूण इलिक्ट्रक बसेस चा प्रवास ३.५० कोटी कि.मी. पेक्षा जास्त झाला आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या  पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल 2022-23 यामध्ये मांडण्यात आली आहे. (PMC Environment Report 2022-23)
पर्यावरण अहवालात पुढे म्हटले आहे कि, पुणे शहरात जून २०२३ पर्यंत एकूण ३५,९४,१३२ नोंदणीकृत वाहने. सन २०२१ ( १,६९,५५२) च्या तुलनेत सन २०२२ मध्ये नवीन २,५५,७५७ वाहनांची भर पडली आहे. महापालिका प्रशासनाकडून हा अहवाल स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त, डॉ कुणाल खेमणार, उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे आदी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation)

पर्यावरण अहवालातील काही ठळक गोष्टी 

पुणे शहर व परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्साठी हॉटस्पॉट ठरलेल्या नैसर्गिक अधिवासांचे ई- बर्ड या वेबसाईटवरील मॅपींग वरून पुणे शहराच्या पूर्व भागातील कवडीपाठ या ठिकाणी सर्वाधिक २६३ प्रजाती, तर ARAI टेकडीवर २५३, पाषाण तलाव परिसरात २३६ प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत. (PMC Pune)

शहरात प्रतिदिन तयार होणारा घनकचरा: २१०० ते २२०० मे.टन. ओला कचरा ९५० मे. टन यावर कंपिस्टिंग, बायोगॅस, बल्क वेस्ट जनरेटर, होम कम्पिोस्टंग, शेतकऱ्यामार्फत जिरवला जाणारा कचरा, ओल्या कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅसमधून (सीबीजी) वापर PMPML बसेस साठी इंधन स्वरुपात वापरण्यास सुरुवात. सुका कचरा १२०० मे. टन : सुका कचऱ्यावर RDF रीफ्युस डीराईव्हड फ़ुएल, MRF- मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, कचरा वेचकां माफर्त रिसायकल, सिमेंट कंपनीस थेट वापर. २०० सोसायटीमध्ये राबाविलेलेया ४० अभियानाच्या माध्यमातून ६८ टन ई-वेस्ट संकलित. स्वच्छ संस्थेच्या ‘वी कलेक्ट च्या माध्यमातून २४२ अभियानांतगर्त ६२ टन ई-वेस्ट संकलित. पुणे शहरातील विविध ठिकाणी कायर्रत कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये १००% कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. उरुळी फुरसुंगी कचरा डेपो येथे बफर झोन अमृत वन अंतर्गत २१,००० वृक्षांची लागवड केली आहे.

हवा प्रदूषण मधील PM १० व PM २.५ या घटकांचे सन २०२२ मध्ये पी.एम. १० चे सरासरी प्रमाण शिवाजीनगर व हडपसर या ठिकाणी सर्वात जास्त नोंदविले गेले

२४ x ७ पाणीपुरवठा योजनेच्या कामामध्ये नियोजित १५५० कि.मी. जलवाहिन्यांची लांबी पैकी ८३० कि.मी. चे काम पूर्ण झाले आहे. ट्रान्समिशनच्या कामामधील ११५ कि.मी. पैकी ७३ कि. मी. लांबीचे काम पूर्ण झाले आहे. ३,१८,८४७ AMR मीटर पैकी १,१९,७४६ मीटर्स बसविण्यात आले आहेत.
मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी वापरणे बंधनकारक करण्याकरिता कायार्लयीन परिपत्रक लागू केले आहे. यासाठी PMC STP WATER TANKER SYSTEM नावाचा मोबाईल अॅप तयार केला आहे. विविध बांधकाम व्यावसायिकांनी याचा वापर सुरु केला आहे. (PMC Pune news)
सन २०२०-२१ मध्ये पुणे शहराचा एकूण ऊर्जा वापर ४४६३.५९ MU ( Million Units) इतका होता तर सन २०२१-२२ मध्ये वाढून ४९८२.८९ MU इतका झाला. रहिवासी भागात सन २०२०-२१ मध्ये ऊर्जा वापर २०४५ MU इतका होता तर सन २०२१-२२ मध्ये वाढून २१४४ MU इतका झाला. उर्जेची मागणी रहिवासी भागांत सवार्त जास्त, तर त्या खालोखाल औद्यगिक आणि व्यावसायिक भागात होती.

 पुणे शहराची वाटचाल कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने कशी व्हावी यासाठी महानगरपालिका, शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था या क्षेत्रात काम करणारे तज्ञ व स्वयंसेवी संस्था मिळून क्लायमेट अॅक्शन सेल तयार करण्यात आला आहे.
सन २०२२ मध्ये ११२२ मि. मि. पावसाची नोंद. सर्वाधिक तापमान ४१.८ डिग्री सेल्सियस तर सर्वात कमी तापमान ८.५ डिग्री सेल्सियस

आय. जी. बी. सी. ग्रीन सिटी रेटिंग सिस्टीम अंतर्गत पुणे शहराला प्लॅटीनम रेटिंग प्राप्त झाले. शहराचा हरित विकास, ग्रीन बिल्डिंग, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याची
उपलब्धता पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये इलेक्ट्रिक बस चा वापर इ. पर्यावरण संवर्धन संबंधी केलेल्या कामासाठी प्लॅटीनम रेटिंग असलेले महाराष्ट्रातील प्रथम व भारतातील दुसरे शहर झाले आहे.
पुणे शहरामध्ये शहरांमध्ये शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय G20 शिखर परिषदे अंतगर्त पायाभूत सुविधांवर कार्यागटाची पहिली मोठी बैठक झाली. शहरांचा विकास, शहरिकरणामुळे निमार्ण झालेल्या समस्यांवर उपाय, शहरे विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावरून उपलब्ध होऊ शकणारा निधी शाश्वत जीवनशैली इत्यादी सारख्या
विषयांवर बैठकित चर्चा झाली.

माझी वसुंधरा मध्ये पुणे शहराला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
—-/
News Title | PMC Environment Report 2022-23 | Reduction in air and noise pollution of Pune city due to CNG and electric buses of PMP

PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पाल्यांचा केला जाणार सन्मान | 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत

Categories
Breaking News Education PMC पुणे

PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पाल्यांचा केला जाणार सन्मान | 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत

PMC Employees and Officers | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अधिकारी / सेवकांच्या पाल्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता दहावी व बारावी) परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. अशा उत्तीर्ण सर्व पाल्यांचे महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतर्फे सन्मान केला जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट देण्यात आला आहे. (PMC Employees and Officers)

माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता १० वी, १२ वी) परीक्षांमध्ये ६५% गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सर्व पाल्यांचा कामगार कल्याण निधीमार्फत गुणगौरव व सत्कार समारंभ प्रस्तावित आहे. कामगार कल्याण निधीच्या ज्या सभासद सेवकांच्या पाल्यांनी ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, त्यांनी  अर्जासोबत गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत व माहे एप्रिल पेड इन मे, २०२३ ची वेतनचिठ्ठी जोडून खातेप्रमुख यांचेमार्फत कामगार कल्याण विभागाकडे दिनांक २४/०८/२०२३ अखेर सादर करावेत. विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी जारी केले आहेत. (PMC Pune News)
महापालिका प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शालेय उपयोगी सामग्री दिली जाते. तसेच त्यांच्यासाठी तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान ठेवले जाते.
अरुण खिलारी, मुख्य कामगार अधिकारी.
—-
News Title | PMC Employees and Officers | Children of Pune Municipal Corporation employees and officers will be honoured Application deadline is August 24

PMC Polyclinic | नागपूर चाळ, समतानगर येथे पॉलिक्लिनिक सुरू करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आरोग्य प्रमुखांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

PMC Polyclinic | नागपूर चाळ, समतानगर येथे पॉलिक्लिनिक सुरू करा

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आरोग्य प्रमुखांना निवेदन

PMC Polyclinic | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्रभाग 2 मध्ये नागपूर चाळ, समतानगर येथील छत्रपती शिवराय दवाखाना इमारतीमध्ये पॉलिक्लिनिक (Polyclinique) सुरू करा, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी केली आहे. या बाबत महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. भगवान पवार (PMC Health Department Head Dr Bhagwan Pawar) यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. (PMC Polyclinic)
डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे महापालिकेमधील प्रभाग क्र २ नागपूर चाळ, फुलेनगर या प्रभागामध्ये पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत छत्रपती शिवराय दवाखाना येथे बाहय रूग्ण विभाग व मॅटर्निटी होम सध्या चालू आहे. या दवाखाण्याच्या परिसरामध्ये राहणारे सुमारे ४० हजार नागरिक या दवाखान्यातून आरोग्य सुविधेचा लाभ घेत आहेत. या भागामध्येच प्रामुख्याने झोपडपट्टी व अल्प उत्पन्न गटाचे नागरीक राहत आहेत. त्यांना अद्ययावत चांगली आरोग्य सुविधा देणे ही मनपाची प्राथमिक जबाबदारी आहे. (PMC Pune)
केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय शहरी आरोग्य योजना या योजनेअंतर्गत पुणे शहरामधील विविध प्रभांगांमध्ये पॉलिक्लिनीक उभारावयाचे काम चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर समतानगर येथील छत्रपती शिवराय दवाखाण्याची इमारत देखील अद्ययावत उभारलेली असून त्या इमारतीमध्ये पॉलिक्लिनिक चालू केल्यास नागरिकांची आरोग्य बाबत होणारी गैरसोय टळेल. या भागातील नागरीकांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळतील. या पूर्वी या इमारतीची पाहणी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन येथे पोलिक्लिनिक चालू करावे, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली. (Pune Municipal Corporation News)
—-
News Title | PMC Polyclinic | Start Polyclinic at Nagpur Chal, Samtanagar | Former Deputy Mayor Dr. Siddharth Dhende’s statement to the PMC Health Chief

Savitri Award | पुणे मनपाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना यंदाचा ‘सावित्री’ पुरस्कार जाहीर

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

Savitri Award | पुणे मनपाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना यंदाचा ‘सावित्री’ पुरस्कार जाहीर

 

Savitri Award ‘सावित्री फोरम’तर्फे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) सहाय्यक आरोग्यअधिकारी डॉ. वैशाली जाधव (Assistant Health Officer Dr Vaishali Jadhav) यांना स्त्री भ्रूण हत्या विरोधी कार्य केल्याबद्दल ‘सावित्री’पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याबरोबरच ७५ विद्यार्थिनींना एकूण सुमारे 1 लाख रुपयांची शैक्षणिक मदतही देण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखिका सौ. वर्षा गजेंद्रगडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दि. २८ जुलै रोजी सायं 5 वाजता जवाहरलाल नेहरु ऑडिटोरियम, घोले रोड, पुणे येथे संपन्न होईल अशी माहिती सावित्री फोरमच्या सचिव संयोगिता कुदळे यांनी दिली. (Savitri Award)

 

त्या म्हणाल्या की, सन २०१५मध्ये ही संस्था नोंदणीकृत ट्रस्ट म्हणून स्थापन केली. तेव्हापासून दरवर्षी ७५ मुलींना सुमारे 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सावित्री हा पुरस्कार यावर्षी पासून सुरु करण्यात आला आहे. सावित्री फोरमतर्फे महिलांच्या उन्नतीसाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी सातत्याने केले जाते. आरोग्य शिबिरे, महिला उद्योजकांसाठी प्रदर्शन, सॅनिटरी पॅडचे वाटप, रक्तदान शिबिर, कपडे गोळा करून गडचिरोलीला पाठवणे, अनाथाश्रम व वृद्धाश्रमात खाऊ वाटप व करमणूकीचे कार्यक्रम, महिलाश्रम येथे कपडे, चादरी वाटप, दंत चिकित्सा शिबिर, मेकअप वर्कशॉप, सायबर क्राईम अवेयरनेस, आहार व आरोग्य, मॉकटेल सरबते बनवणे, राखीआकाशकंदीलपॉट गार्डन बनवणे, व्याख्याने, फॅशन शो, रंगारंग कार्यक्रम, वार्षिक सहल असे अनेक उपक्रम सावित्री फोरमतर्फे दरवर्षी आयोजित केले जातात असे सचिव संयोगिता कुदळे यांनी सांगितले.

——

News Title | Savitri Award | Assistant Health Officer of Pune Municipality Dr. To Vaishali Jadhav This year’s ‘Savitri’ award has been announced

Pune Water Cut | MNS Pune | पाणी कपात रद्द न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut | MNS Pune | पाणी कपात रद्द न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा

Pune Water Cut | MNS Pune |  पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात लागू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसाने धरणात पाणी साठत आहे. त्यामुळे आता पाणीकपात रद्द करावी. अशी मागणी मनसेच्या वतीने महापालिका आयुक्तांना केली आहे. पाणीकपात रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. (Pune Water Cut | MNS Pune)
याबाबत मनसेकडून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनानुसार पुणे शहरातील पाणी कपात मागे घेण्याचा निर्णयाचा  आढावा ऑगस्ट महिन्यात घेणार असा निर्णय पुणे महानगर पालिकेचे आयुक्त  विक्रम  कुमार यांनी जाहीर केला. पुणे शहरात पुणे महानगरपालिकेने लादलेली पाणी कपात पाणी कमी दाबाने येणे अशा समस्येमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेवर हांडा मोर्चा काढण्यात आलेला होता. (Pune Rain)
आजही पाणी कपाती मुळे पुणेकरांना हाल सोसावे लागत आहे. खडकवासला धरण साखळीत काल रात्री पर्यंत ६०% पाणी साठा जमा झाला आहे. तर एकटे खडकवासला धरण ८२% भरले आहे.  पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने खडकवासला धरण साखळी  पूर्ण क्षमतेने भरणार आहे पाटबंधारे खाते नदीपात्रातून विसर्ग करण्याच्या दृष्टीने काम करीत असून येत्या २४ ते ४८ तासात नदीपात्रातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. तश्या पद्धतीचे इशारे पाटबंधारे खात्याने दिले आहेत. असे असताना पुणे शहरात पाणी कपात का आणि त्या संधर्भात तातडीने निर्णय घेण्याची गरज असताना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठकीचा घाट का घातला जात आहे ?पुणे शहरातील पाणी कपात तातडीने रद्द करून यावर त्वरित निर्णय घेऊन पुणेकरांना दररोज सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
——
News Title | Pune Water Cut | MNS Pune | MNS warns of agitation if water cut is not cancelled