Pune City Traffic Update | सह्याद्री लेन ते बदामी चौक दरम्यानची जड वाहतूक बंद होणार

Categories
Breaking News Political social पुणे

Pune City Traffic Update | सह्याद्री लेन ते बदामी चौक दरम्यानची जड वाहतूक बंद होणार

 | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

| वाहतूक बंद करण्याबाबत पुणे वाहतूक शाखेचा निर्णय

Pune City Traffic Update | शास्त्रीनगर, सह्याद्री हॉस्पीटल समोरून शांतीरक्षक मार्गे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथून बदामी चौकाकडे जड वाहनांची होणारी वाहतूक बंद (Heavy Vehicles Traffic) करण्यात येणार आहे. त्या बाबत पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी पुणे वाहतूक शाखेला (Pune City Traffic Police) निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. संबंधीत मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात येणार असून त्या बाबत नागरिकांच्या सूचना पाहून त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त विजयकुमार मगर (Deputy Police Commissioner Vijaykumar Magar) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिर केले आहे. (Pune City Traffic Update)
येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातील (Shastrinagar Chowk Yerwada) सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital) लेन येथून बदामी चौक (Badami Chowk), जुना एअरपोर्ट रस्ता (Old Airport Road) येथे जाणारी व एअरपोर्ट रोडवरील (Airport Road m) बदामी चौकीतून सह्याद्री हॉस्पिटल च्या रस्त्याने नगर रोड कडे जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी करण्याचा निर्णय वाहतूक शाखेचे पोलीस उपयुक्त विजय मगर यांनी सोमवारी घेतला आहे. सह्याद्री हॉस्पिटल मार्गे बदाम चौकाकडे जाताना अरुंद रस्त्यामुळे होणारे वाहतूक कोंडी तसेच सातत्याने होणारे अपघात यासाठी स्थानिक नागरिकांच्या वतीने माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी मागील दोन महिन्यांपासून या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. कालच कॉमर्स झोन जवळील मेंटल हॉस्पिटलच्या समोर अज्ञात जड वाहनाने चिरडल्यामुळे एका स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या सर्व गंभीर परिस्थितीची तात्काळ माहिती घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी आज सोमवारी (दि. 10) हा निर्णय घेतला आहे. (Pune Traffic Update)
या भागातील जड वाहतूक बंद केल्यानंतर पर्यायी रस्ता म्हणून शास्त्रीनगर चौक येथून सरळ गोष्ट चौकातून उजवीकडे वळून एअरपोर्ट रोडने बदामी चौकातून वाहनांना पुढे जाता येईल तसेच बदामी चौकाकडून सरळ गोल क्‍लब चौकाच्या डावीकडे वळून शास्त्रीनगर चौकातून नगर रस्त्याने या वाहनांना पुढे जाता येणार आहे. पुणे शहर वाहतूक शाखेने घेतलेले या निर्णयाचे माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी स्वागत केले आहे.

|  वाहतूक शाखेचा आदेश

शास्त्रीनगर चौकातील सह्याद्री हॉस्पीटल लेन येथुन बदामी चौक, जुना एअर पोर्ट रोड येथे जाणारी व एअरपोर्ट रोडवरील बदामी चौक येथून सह्याद्री हॉस्पीटल लेन मार्गे नगर रोडकडे जाणाऱ्या जड वाहनांचे वाहतूकीस बंदी करण्यात येत आहे.त्या ऐवजी शास्त्रीनगर चौक सरळ गोल्फ चौक, उजवीकडे वळुन एअरपोर्ट रोडने बदामी चौक पुढे इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच बदामी चौक सरळ गोल्फ क्‍लब चौक डावीकडे वळण घेवुनशास्त्री नगर चौक पुढे इच्छितस्थळी जाता येणार आहे. 10 ते 25 जुलै पर्यंत लेखी स्वरूपात नागरीकांच्या सूचना व हरकतींचा विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले. (Pune City Traffic Police)
——
या भागातील गंभीर अशी वाहतूक कोंडी व सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी जड वाहनांची वाहतूक बंद करणे आवश्‍यक होते. त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्याची दखल वाहतूक शाखेने घेतली त्याचे मी स्वागत करतो.  नागरिकांनी कायम स्वरुपी जड वाहतुक बंद करावी, या करिता वाहतूक शाखेला सूचना कराव्यात असे या निमित्त मी आवाहन करत आहे.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.
———-
News Title | Pune City Traffic Update |  Heavy traffic between Sahyadri Lane and Badami Chowk will be closed  |   Success in pursuit of Dr. Siddharth Dhende

Pune Traffic Update | पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या पुणे शहरात वाहतूक बदल

Categories
Breaking News social पुणे

Pune Traffic Update | पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या पुणे शहरात वाहतूक बदल

Pune Traffic Update | पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त (Palkhi Sohala) बुधवारी (१४ जून) शहराच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथून बुधवारी पहाटे मार्गस्थ होणार आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. (Pune Traffic Update)

श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठ, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, लष्कर भागातील मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सासवड रस्त्याने पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील अरुणा चौक, समाधान चौक, पिंपरी चौक, एडी कॅम्प चौक, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सरळ सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. (Pune News)

बुधवारी पहाटे दोन वाजल्यापासून पालखी शहराबाहेर पोहोचेपर्यंत पालखी मार्ग टप्याटप्याने बंद करण्यात येईल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे- संत कबीर चौक- बेलबाग चौक (लक्ष्मी रस्ता), संत कबीर चौक ते रामोशी गेट (नेहरु रस्ता), सेव्हन लव्ह चौक (ढोले पाटील चौक) ते रामोशी गेट, गोळीबार मैदान ते सेव्हन लव्ह चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, बिशप स्कूल चौक ते मम्मादेवी चौक, वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक, ट्रायलक चौक, महात्मा गांधी रस्ता, रामोशी गेट चौक, भैरोबानाला ते मम्मादेवी चौक, जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक, बी. टी. कवडे रस्ता, रामटेकडी चौक, वैदुवाडी चौक, मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस, सिरम कंपनी चौक ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड रस्ता. (Pune Traffic)

पुणे-सोलापूर रस्त्याने येणाऱ्या जड वाहनचालाकंनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत जाणाऱ्या दिंड्यामधील वाहनांनी भैरोबानाला चौक, लुल्लानगर चौक, कोंढवा खडीमशीन चौक, बोपदेव घाटमार्गे सासवडकडे जावे किंवा मंतरवाडी फाटा, फुरसुंगी, उंड्री, पिसोळी, खडी मशीन चौकमार्गे बोपदेव घाटातून सासवडकडे जावे. वाहतूक बदलांविषयी माहिती हवी असल्यास वाहतूक शाखा मुख्य नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्रमांक- ०२०-२६६८५००० किंवा ०२०-२६६८४०००) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

—-

सिहंगड व भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

सिहंगड वाहतूक विभागाच्या हद्दीत वडगाव ते पाउंजाई माता मंदीर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून विष्णू पुरम सोसायटीच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या दोन्ही बाजुला ५० मीटर पर्यंत  नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीत भारती विद्यापीठ मुख्यद्वार ते भारती रुग्णालयाचे प्रवेशद्वार दरम्यान उत्तर-दक्षिण अंतर २०० फूट व रुंदी ३० फुट या सेवा मार्गावर नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. सिहंगड वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेबाबतच्या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांना सूचना द्यावयाच्या असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे २१ जून पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

0000

News Title |Pune Traffic Update | Traffic changes in Pune city tomorrow on the occasion of Palkhi departure ceremony

Pune Police | PMC Pune | मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक संपन्न

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Police | PMC Pune | मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक संपन्न

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे यंत्रणांना निर्देश

Pune Police | PMC Pune | पुणे शहरात पावसाळ्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची कामे संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) आणि पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी दिले. (Pune Police, PMC pune)

मान्सूनपूर्व तयारीच्या (pre-monsoon preparations) अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात (गुरुवारी) आयोजित बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते (Smart City CEO Sanjay kolte), पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक (Assistant police commissioner Sandeep karnik), पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महामेट्रो, टाटा मेट्रो, पी.एम.आर.डी.ए., सार्वजनिक बांधकाम विभाग, कटक मंडळ, पी.एम.पी.एम.एल.चे अधिकारी उपस्थित होते. (Pune Monsoon news)

या बैठकीमध्ये पुणे शहरामध्ये पावसाळ्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी (Pune Traffic) होऊ नये याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, मेट्रो मार्ग, मेट्रो स्थानकांची कामे व त्याचा राडारोडा रस्त्यावर असल्याने होणारी वाहतूक कोंडी, शहरात सुरु असलेली उड्डाणपुलांची कामे, स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत सुरु असलेल्या खोदकामामुळे पावसाचे पाणी साचण्याची ठिकाणे आदींच्या अनुषंगाने उपाययोजनांविषयी विचारविनिमय करण्यात आला. (Pune traffic news)

गटारे, नालेसफाईचे काम गतीने पूर्ण करावे तसेच गटारांची तुटलेली झाकणे बदलावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळी (स्टॉर्मवॉटर) पाईप लाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन वगैरे कामामुळे रस्त्यात पडलेला राडारोडा काढून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या.

पावसाळ्यामध्ये वाहतूक नियमानाकरीता पुणे मनपा, महामेट्रो, टाटा मेट्रो यांच्याकडून वाहतूक शाखेस अतिरिक्त वॉर्डन पुरविण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

आंबील ओढा, कोळेवाडी नाला, दळवी नगर चौक, आंबेगांव नाला, जांभुळवाडी नाला आदींच्या नालेसफाईबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पीएमपीएमएल बसेस नादुरुस्त होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. वाहतूकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढावीत असेही सांगण्यात आले.

अचानक पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. सर्व संबंधित यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय रहावा याकरीता सर्व संबंधित स्वायत्त संस्थांच्या कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार असून जलद प्रतिसादासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये तातडीने संदेशाचे आदानप्रदान करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


News Title |