Pune Traffic Update | ट्रॅफिक प्रश्नासाठी ‘वेकअप पुणेकर’ कडून पाठपुरावा चालू | वाहतूक उपायुक्तांशी चर्चा

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Traffic Update | ट्रॅफिक प्रश्नासाठी ‘वेकअप पुणेकर’ कडून
पाठपुरावा चालू | वाहतूक उपायुक्तांशी चर्चा

-संयोजक, माजी आमदार मोहन जोशी

 

Pune Traffic Update | पुणे – विविध चौकांमध्ये होणाऱ्या ट्रॅफिक जॅम च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ‘वेकअप पुणेकर’ मार्फत पाठपुरावा चालू आहे.

याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याशी चर्चा करण्यात आली. अशी माहिती ‘वेकअप पुणेकर’ चे संयोजक, माजी आमदार मोहन जोशी यांनी  दिली.

कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पुलाच्या पाडकामाआधी करण्यात आलेल्या प्रायोगिक वाहतूक बदलामुळे निर्माण झालेल्या समस्या नागरिकांनी ‘वेकअप पुणेकर’ च्या निदर्शनास आणून दिल्या. मंगलदास रोड वाहतुकीसाठी एकेरी न ठेवता पूर्वीसारखीच दुतर्फा वाहतूक चालू ठेवावी, मोबोज हॉटेल चौकातील बॅरिकेड्स ताबडतोब काढण्यात यावेत, त्या चौकातील रसत्यांवर तीन ते चार ट्रॅफिक वॉर्डन दिवसभरासाठी तैनात व्हावेत, अशा उपाययोजना नागरिकांनी ‘वेकअप पुणेकर’ला सुचविल्या होत्या. पोलीस उपायुक्तांकडे त्या सूचनांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

दहावी, बारावी आणि इतर वार्षिक परीक्षेनंतर पुलाचे पाडकाम करावे, अशीही सूचना नागरिकांकडून आली होती, ती ही उपायुक्तांकडे दिल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

ट्रॅफिक समस्येवर नागरिका़ंकडून ‘वेकअप पुणेकर’ मार्फत उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी स्वयंसेवी संघटना, जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ यांना ‘वेकअप पुणेकर’ने एकत्रित आणले आहे. ट्रॅफिक प्रश्नातून पुणेकरांची लवकरात लवकर सुटका व्हावी, असा प्रयत्न असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

वाहतूक उपायुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत धैर्यशील वंदेकर, वीरेंद्र किराड, प्रथमेश आबनावे, प्रशांत सुरसे, संकेत गलांडे, किशोर मारणे, प्रा.यशराज पारखी, सचिन भोसले, पल्लवी सुरसे, विश्वजीत जाधव आणि अधिकारी वर्ग सहभागी झाला होता.

Sadhu Vaswani Flyover | Pune City Traffic Police | साधू वासवानी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद! | वाहतूक पोलिसांकडून दिली ही पर्यायी व्यवस्था

Categories
Breaking News PMC social पुणे

Sadhu Vaswani Flyover | Pune City  Traffic Police | साधू वासवानी उड्डाणपूल वाहतुकीसाठी  बंद! | वाहतूक पोलिसांकडून दिली  ही पर्यायी व्यवस्था

Sadhu Vaswani Flyover | PMC Pune | पुणे महानगरपालिका प्रकल्प विभागामार्फत (PMC Project Department) कोरेगाव पार्क (Koregaon Park Pune) येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल (Sadhu Vaswani Railway Flyover) कमकुवत झाल्याने तो पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याकरिता सदरचा पूल वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे.  त्यामुळे वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात वाहतूक पोलीस यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर Vijaykumar Magar DCP Pune Traffic) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे. (Pune city traffic police)

साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल हा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून सुमारे ५० वर्षापूर्वी बांधण्यात आलेला असून सद्यस्थितीत सदरचा पूल हा कमकुवत झाल्याने पुणे महानगरपालिकेमार्फत पुलाच्या दोन्ही बाजूस हाईट बॅरीअर टाकून सदरील पूल जड वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. (PMC Pune News)

| अशी असणार व्यवस्था

पुणे शहर कोरेगांव पार्क व बंडगार्डन वाहतूक विभागाचे हद्दीतील वाहनांचे वाहतूकीमध्ये दिनांक १०/०१/२०२४ ते पुढिल आदेशापर्यंत खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.
1. बंडगार्डन, कोरेगांव पार्क वाहतूक विभागाअंतर्गत
पर्णकुटी चौक ते ब्ल्यु डायमंड चौक ते मोबोज चौक असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे.
2. मोबाज चौक ते महात्मा गांधी उद्यान चौक (बंडगार्डन रोड) असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे.
3. अलंकार चौक ते आय.बी. चौक ते सर्कीट हाऊस चौक ते मोरओढा चौक असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे.
4. मोर ओढा चौक ते कौन्सिल हॉल चौक असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे. वर नमुद सर्व मार्गावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारच्या जड, अवजड, मल्टीअॅक्सल वाहनांना २४ तास बंदी करण्यात येत आहे.
5. lकाहुन रोड जंक्शन ते तारापुर रोड जंक्शन हा रस्ता पुर्वी प्रमाणेच एकेरी मार्ग राहील.
6. कॉन्सील हॉल चौक ते साधु वासवानी पुतळा मार्ग एकेरी करण्यात येत आहे.

: पर्यायी मार्ग असे असतील

* नगर रोडवरुन मोर ओढा चौकाकडे जाणारी वाहने :- पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, ब्ल्यु डायमंड चौक,
उजवीकडे वळण घेवून मंगलदास रोडने मोबोज चौक, डावीकडे वळण घेवून मंगलदास चौकी समोरुन पुन्हा डावीकडे वळण घेवून आय.बी. (रेसीडेन्सी क्लब) चौक, डावीकडे वळण घेवून सर्किट हाऊस चौक मार्गे मोर ओढा चौक
मोर ओढा चौक कोरेगांव पार्ककडे जाणारी वाहने :- मोर ओढा चौक, सरळ कौन्सिल हॉल चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास चौक, उजवीकडे वळण घेवून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळण घेवून कोरेगांव पार्क
* पुणे स्टेशन येथुन कोरेगांव पार्ककडे जाणारी वाहने:- पुणे स्टेशन, अलंकार चौक, डावीकडे वळण घेवून जहाँगीर चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास चौक, पुणे स्टेशन, अलंकार चौक, सरळ आय.बी. चौक, डावीकडे वळण घेवून मंगलदास चौक, उजवीकडे वळण घेवून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळण घेवून कोरेगांव पार्क

पुणे स्टेशन ते घोरपडीकडे जाणारी वाहने : पुणे स्टेशन ते अलंकार चौक, सरळ आय.बी. चौक, सरळ सर्कीट
हाऊस चौक मार्गे मोरओढा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

* घोरपडी व भैरोबानाला चौकामधुन येणाऱ्या सर्व बसेस (पी.एम.पी.एम.एल. सह) मोरओढा चौकाकडुन सरळ जावून काहुन रोड जंक्शन वरून डावीकडे वळण घेवून तारापूर रोड जंक्शन वर येतील व उजवीकडे वळण घेवून तारापूर रोडने ब्लु नाईल चौकाकडुन उजवीकडे वळण घेवून कॉन्सील हॉल चौकामधुन इच्छितस्थळी जातील.
• आय.बी. जंक्शन ते मोरओढा हा एकेरी मार्ग आवश्यक त्यावेळेस तात्पुरता दुहेरी करण्यात येईल.
• ब्लु डायमंड चौक ते साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क कडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे राहील.

Sadhu Vaswani Flyover | PMC Pune | साधू वासवानी उड्डाणपूल 6 जानेवारी पासून वाहतुकीसाठी राहणार बंद!

Categories
Breaking News PMC social पुणे

Sadhu Vaswani Flyover | PMC Pune | साधू वासवानी उड्डाणपूल 6 जानेवारी पासून वाहतुकीसाठी राहणार बंद!

| वाहतूक पोलिसांकडून दिली जाणार पर्यायी व्यवस्था

Sadhu Vaswani Flyover | PMC Pune | पुणे महानगरपालिका प्रकल्प विभागामार्फत (PMC Project Department) कोरेगाव पार्क (Koregaon Park Pune) येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल (Sadhu Vaswani Railway Flyover) कमकुवत झाल्याने तो पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याकरिता सदरचा पूल वाहतुकीकरिता बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर 6 जानेवारी पासून पुढील १० ते १५ दिवस प्रायोगिक तत्वावर पुढे नमूद केल्यानुसार वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)

साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल हा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून सुमारे ५० वर्षापूर्वी बांधण्यात आलेला असून सद्यस्थितीत सदरचा पूल हा कमकुवत झाल्याने पुणे महानगरपालिकेमार्फत पुलाच्या दोन्ही बाजूस हाईट बॅरीअर टाकून सदरील पूल जड वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. (PMC Pune News)

नगररोड कोरेगाव पार्क बंडगार्डन कौन्सिल हॉल – मोरवाडा या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. काही रोड One Way व काही रोड No Entry करण्यात येणार आहेत. सदरील बाबत Detail Notification पुणे पोलीस वाहतूक विभागामार्फत करण्यात येणार असून सदरचे बदल ०६/०१/२०२४ पासून पुढील १० १५ दिवस प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे. तदनंतर वाहतुकीच्या Diversion चा अभ्यास करून अंतिम आदेश पुणे पोलीस वाहतूक विभागामार्फत निर्गमित करण्यात येणार आहे.

Pune Traffic Update | १ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

Categories
Breaking News social पुणे

Pune Traffic Update | १ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

Pune Traffic Update | पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी कळविले आहे. (Pune Traffic Update)
 १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा. ते दुपारी ३ वा. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील. (PM Modi tour pune)
 वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. (PM Modi Pune Daura)
0000
News Title | Pune Traffic Update | Change in traffic in Pune city on August 1

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

Categories
Breaking News PMC social पुणे

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

CP Pune | PMC Pune | यावर्षी पावसाळा (Monsoon) सुरु होणेपुर्वी शहरातील वॉटर लॉगींगचे ठिकाणांची (Water Logging Places) व ड्रेनेजच्या झाकणांची (Drainage Covers) पाहणी करा. तसेच रस्त्यावरील खड्यांची (Potholes) पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती आणि उपाययोजना करुन घेणे उचित होणार आहे. जेणेकरुन वाहतूक कोंडी (Traffic Jam) होणार नाही.  तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. अशा सूचना पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Pune Ritesh Kumar) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) केल्या आहेत. (CP Pune | PMC Pune)

विकासकाम झाल्यानंतर काळजी घेतली जात नाही

पोलीस आयुक्तांनी महापालिकेला दिलेल्या पत्रानुसार पुणे शहरामध्ये विविध विकासकामे (Devlopment Works) सुरु असुन विविध विकासकामांकरीता रस्ते खोदाई ( ड्रेनेज लाईन / पिण्याचे पाईपलाईन / इलेक्ट्रीसीटी केबल / गॅस लाईन ) करण्यात येते. मात्र काम पूर्ण झालेनंतर त्या कामाकरीता खोदलले रस्ते तात्काळ दुरुस्त केले जात नाहीत. कंपनीने नियुक्त केलेला ठेकेदार खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवत नाहीत. खडी, माती टाकून बुजवलेल्या रस्त्यावरुन गाडी गेल्यास रस्ता लगेच खचून तो वाढतच जातो. त्यात पाणी साचल्याने खड्डे तयार होतात व असे खड्डे अपघातास कारणीभूत होतात.  विकास कामांकरीता रस्ते खोदाई झालेनंतर खोदलेला भाग बऱ्याच ठिकाणी तसाच ठेवला जात असून त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठया गैरसोयीला सामोरे जावे लागते. प्रसंगी अपघात होण्याची शक्यता वाढते. (Pune Police)

मेट्रोच्या कामाने अडचणी वाढल्या

पुणे शहरामधील अनेक रस्त्यावर मेट्रोचे कामकाज (Pune Metro) चालु असुन त्या कामाच्या अनषंगाने रस्त्यावर खोदण्याचे कामे करण्यात आलेली आहे. काम पुर्ण झालेनंतर त्याकारीता खोदलेले रस्ते दुरूस्त केले गेलेले नाहीत. त्यामध्ये तात्पुरती खडी, माती टाकुन ते बुजविण्यात येतात. या ठिकाणावरून वाहने जाऊन रस्ता खचला जातो. त्यामुळे मोठा खड्डा होऊन पावसाचे पाणी साठवुन अपघात होण्याची शक्यता असते. मेट्रोच्या कामाचा राडारोडा रस्त्यावर तसाच पडुन वाहतुकीची कोंडी होवुन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मेट्रोच्या कामकाजाकरीता बरेच ठिकाणी बॅरीकेडस् करण्यात आले असुन मेट्रोचे कामकाज पुर्ण झालेनंतरही सदर ठिकाणाचे बॅरीकेडस् तसेच असल्याने वाहतुकीस कॅरेज वे कमी मिळुन अडथळा होवुन पावसाळयामध्ये सदर बॅरीकेडस् चुकविण्यात पावसाच्या पाण्यामुळे वाहने घसरून अपघात होतात. मेट्रोच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली मशिनरी रोडवर तशीच ठेवण्यात आलेली आहे.  त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असुन वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. (Pune Municipal Corporation News)

वाहनचालकांना करावी लागते कसरत

विविध कामांमुळे रस्त्यांची दूरावस्था होवून त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, पादचाऱ्यांना नेहमी जीव मुठीत घेवून रस्त्यावर चालावे लागत आहे. अनेक भागात सांडपाण्याची वाहिनी तुंबल्यामुळे अगर फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचल्यामुळे रस्ता वाहतूकीस उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी ड्रेनेजची तुटलेली झाकणे, रस्त्यावर अर्धवट बाहेर आलेली झाकणे यामुळे अपघातास निमंत्रण ठरते व रस्त्यावरचे खड्डे व अशी तुटलेली झाकणे चुकविण्याचे नादात वाहनचालकांचे वाहनावरचे लक्ष विचलीत होवून पायी चालणाऱ्या नागरिकांचा तसेच इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. (Pune police commissioner)

अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई आवश्यक

पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी फुटपाथ, रस्ते या ठिकाणी विशेषतः शहराचे मध्यवर्ती भागात मोठया प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत परिणामी वाहतूकीस रस्ता कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने वाहतूक
कोंडीच्या घटना घडत आहेत, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अशा ठिकाणी वाहनचालक रस्त्यातच वाहन उभे करीत असतात, फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागते त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता वाढते. याकरीता अशी अतिक्रमणे काढण्यात येवून फेरीवाले, पथारीवाले यांचेवर दैनंदिन कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरुन चालणे शक्य होवून पादचाऱ्यांचे अपघात कमी होतील. तसेच त्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होईल. (Hawker’s in Pune)

पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक

पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहनांकरीता पार्किंग उपलब्ध नसल्याने रोडवर वाहने पार्क होत असतात, याकरीता पुणे महानगरपालिके तर्फे जास्तीत जास्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठ / भाजीमंडई आहे अशा ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पार्किंगची व्यवस्था / पार्किंग प्लाझा करणे गरजेचे आहे. (Parking Management)

सिग्नल यंत्रणा असणे गरजेचे

पुणे शहरामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उपलब्ध नसल्याने वाहतूक नियमन करणे जिकिरीचे होत आहे. त्यातच पुणे शहरातील प्रवेशाचे ठिकाणी जेथे अवजड वाहतूकीची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी रस्त्यांची रुंदी जास्त असणे तसेच चौकामध्ये सिग्नल व्यवस्था असणे गरजेचे आहे. (Signal Management)

वाहतूक कोंडीवर उपाययोजनासठी बैठक आवश्यक

पुणे शहरामध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वरील सर्व स्टेक होल्डर्स यांची संयुक्त बैठक झाल्यास एकत्रित चर्चा होऊन पावसाळयापुर्वी उपाययोजना करणेबाबत तात्काळ अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. जेणेकरुन पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांमुळे व वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही. तसेच पोलीसांना वाहतूक नियमन करणे सोईस्कर होईल. ( Pune Traffic update)

पावसाळ्यात खड्डे होणार नाहीत याची दक्षता घ्या

पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने तसेच विविध कारणांमुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साठून वाहतूक कोंडी झाल्याने वॉटर लॉगींगचे ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येवून वॉटर लॉगींग होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना होणे आवश्यक आहे. मागील वर्षी पावसाचे पाणी साठून वॉटर लॉगींग
झाल्याने त्याचा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला होता, शहरामध्ये जागोजागी प्रचंड प्रमाणात वाहतूक
कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती. त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचणेसाठी त्रास सहन करावा लागला होता. वॉटर लॉगींगचे ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था होऊन लहान मोठे अपघात झाले. तसेच जागोजागी ड्रेनेजचे झाकणातुन तुंबलेले पाणी रस्त्यावर येऊन बरीचशी वाहने रस्त्यात अडकुन पडल्याने
नागरिकांना त्रास झाल्याने प्रशासनास नागरिकांचा रोष सहन करावा लागला. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी
पावसाळयापुर्वीच ड्रेनेज झाकणांची दुरुस्ती तसेच रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन नागरिकांना तसेच प्रशासनास नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व नागरिकांची गैरसोय
होणार नाही. माहितीचे अनुषंगाने यावर्षी पावसाळा सुरु होणेपुर्वी अशा वॉटर लॉगींगचे ठिकाणांची व ड्रेनेजच्या झाकणांची पाहणी तसेच रस्त्यावरील खड्यांची पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती / उपाययोजना करुन घेणे उचित राहील जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. असे पोलिस आयुक्तांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
—-
News Title | CP Pune |  PMC Pune |  Take care that Pune residents do not face any hardship during monsoon season  Notice of Pune Police Commissioner to Pune Municipal Corporation

Pune Traffic Update | पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या पुणे शहरात वाहतूक बदल

Categories
Breaking News social पुणे

Pune Traffic Update | पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या पुणे शहरात वाहतूक बदल

Pune Traffic Update | पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त (Palkhi Sohala) बुधवारी (१४ जून) शहराच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथून बुधवारी पहाटे मार्गस्थ होणार आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. (Pune Traffic Update)

श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठ, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, लष्कर भागातील मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सासवड रस्त्याने पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील अरुणा चौक, समाधान चौक, पिंपरी चौक, एडी कॅम्प चौक, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सरळ सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. (Pune News)

बुधवारी पहाटे दोन वाजल्यापासून पालखी शहराबाहेर पोहोचेपर्यंत पालखी मार्ग टप्याटप्याने बंद करण्यात येईल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे- संत कबीर चौक- बेलबाग चौक (लक्ष्मी रस्ता), संत कबीर चौक ते रामोशी गेट (नेहरु रस्ता), सेव्हन लव्ह चौक (ढोले पाटील चौक) ते रामोशी गेट, गोळीबार मैदान ते सेव्हन लव्ह चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, बिशप स्कूल चौक ते मम्मादेवी चौक, वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक, ट्रायलक चौक, महात्मा गांधी रस्ता, रामोशी गेट चौक, भैरोबानाला ते मम्मादेवी चौक, जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक, बी. टी. कवडे रस्ता, रामटेकडी चौक, वैदुवाडी चौक, मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस, सिरम कंपनी चौक ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड रस्ता. (Pune Traffic)

पुणे-सोलापूर रस्त्याने येणाऱ्या जड वाहनचालाकंनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत जाणाऱ्या दिंड्यामधील वाहनांनी भैरोबानाला चौक, लुल्लानगर चौक, कोंढवा खडीमशीन चौक, बोपदेव घाटमार्गे सासवडकडे जावे किंवा मंतरवाडी फाटा, फुरसुंगी, उंड्री, पिसोळी, खडी मशीन चौकमार्गे बोपदेव घाटातून सासवडकडे जावे. वाहतूक बदलांविषयी माहिती हवी असल्यास वाहतूक शाखा मुख्य नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्रमांक- ०२०-२६६८५००० किंवा ०२०-२६६८४०००) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

—-

सिहंगड व भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

सिहंगड वाहतूक विभागाच्या हद्दीत वडगाव ते पाउंजाई माता मंदीर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून विष्णू पुरम सोसायटीच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या दोन्ही बाजुला ५० मीटर पर्यंत  नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीत भारती विद्यापीठ मुख्यद्वार ते भारती रुग्णालयाचे प्रवेशद्वार दरम्यान उत्तर-दक्षिण अंतर २०० फूट व रुंदी ३० फुट या सेवा मार्गावर नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. सिहंगड वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेबाबतच्या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांना सूचना द्यावयाच्या असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे २१ जून पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

0000

News Title |Pune Traffic Update | Traffic changes in Pune city tomorrow on the occasion of Palkhi departure ceremony

Palkhi Sohala 2023 | PMPML Pune | पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’कडून जादा बसेसचे नियोजन

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Palkhi Sohala 2023 | PMPML Pune | पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’कडून जादा बसेसचे नियोजन

Palkhi Sohala | 2023 | PMPML Pune | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांचे वाहतुकीची व्यवस्था नेहमीच्या बसेसशिवाय जादा बसेस देवून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात येत आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Palkhi Sohala 2023 | PMPML Pune)

भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक ०८/०६/२०२३पासून दिनांक १२/०६/२०२३ पर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकुण १४२ बसेस संचलनात राहणार आहेत. दिनांक ११/०६/२०२३ रोजी रात्रौ १२:०० वा. पर्यंत आळंदी करिता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सद्याच्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकुण ३०बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा १२बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Palkhi Sohala 2023 | PMPML Pune)

​दिनांक १२/०६/२०२३ रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे ०२:३० वा. पासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरूनआळंदीला जाणेकरिता जादा १८ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. (Pune Traffic Update)

​या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी ०५:३० वाजले पासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील ११३बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान ४० आवश्यक) देण्यात येईल. (PMPML PUNE NEWS)

तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक १४/०६/२०२३ रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२:०० ते ०१:०० दरम्यान थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (Palkhi Sohala 2023 News)

 

तद्दनंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरूळीकांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतुक चालू ठेवण्यात येईल.

​हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गांची बसवाहतुक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

​तरी सदर बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भाविक व इतर प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

—-

News Title | Palkhi Sohala 2023 | PMPML Pune | Planning of extra buses by ‘PMPML’ on the occasion of Palkhi festival