Pune Water cut Update | गुरुवारची पाणीकपात रद्द | गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water cut Update | गुरुवारची पाणीकपात रद्द | गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत राहणार

Pune Water cut update | महावितरण (MSEDCL) च्या कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबतचे निवेदन पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र महावितरण शी चर्चा केल्यानंतर महापालिकेने ही पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून (PMC water Supply Department) देण्यात आली. (Pune Water Cut Update)
गुरुवार  रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या, यांचे २२०/२२ के. व्ही. पर्वती सब स्टेशन येथे तातडीचे देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन ) व अखत्यारीतील पंपिंग, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी MLR पंपिंग व वडगाव जलकेंद्र येथील बीज पुरवठा बंद राहणार असल्याने जलकेंद्र व पंपिंगच्या अखत्यारीतील पुणे शहरातील भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदन पुणे महानगरपालिके कडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या बाबत महाराष्ट्र
राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. पर्वती सब स्टेशन यांचे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. यांचे काम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सूचित केले आहे. या नुसार पुणे महानगरपालिके कडून प्रसिद्ध करण्यात येत आहे कि वरील नमूद जलकेंद्र व पंपिंग स्टेशन वरील भागाचा गुरुवार १०/०८/२०२३ रोजी नियमितपणे पाणीपुरवठा
सुरळीत चालू राहील. (PMC Pune)
—-
News Title | Pune Water cut Update | Thursday’s water cut cancelled Water supply will be normal on Thursday

Pune Water Cut | दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊ नये

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut | दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊ नये

| खासदार सुप्रिया सुळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pune Water Cut |  बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Constituency) आणि पुणे महापालिका हद्दीत (Pune Municipal Corporation Limits) समाविष्ट झालेल्या काही गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या गावांत पुन्हा गुरुवारी पाणी बंद (Water Cut on Thursday) ठेवले अजून विस्कळीतपणा येतो. त्यामुळे अशा गावांत गुरुवारी पाणी बंद ठेऊ नये. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे. (Pune Water Cut)

खासदार सुळे यांच्या पत्रानुसार बारामती लोकसभा मतदार संघातील पुणे महानगर पालिकेत समाविष्ट गावांना दिवसाआड आणि अनियमित पाणी पुरवठा होतो. तसेच नव्याने समाविष्ट धायरी, न-हे, नांदोशी सणसनगर या गावात विभागानुसार फक्त अर्धातास ते एक तास ऐवढाच पाणी पुरवठा केला जातो. त्यातच काही ठिकाणी महावितरणकडून त्या परिसरातील लाईट गेली तर त्या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. सद्य स्थितीत अनेक सोसायटयांमध्ये व गावांमध्ये असलेल्या पाण्याच्या कुपनलिका उन्हाळ्यामुळे बंदा पडलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच नागरीक पाणी समस्यांमुळे हैराण आहेत. (PMC Pune News)

सुळे यांनी म्हटले आहे कि, जर पुणे महानगर पालिकेने दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवला तर त्या परिसरामध्ये पाण्यासाठी नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या गावात दिवसाआड पाणी पुरवठा आहे त्या ठिकाणचे पाणी आहे त्या प्रमाणे चालू ठेवावे. त्या मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये. अशी मागणी सुळे यांनी केली आहे. (Pune Water Cut Update)
——
News Title |Pune Water Cut | Water supply should not be shut off on Thursday in a village that provides water during the day | MP Supriya Sule’s request to Municipal Commissioner

Pune Water Cut Update | वडगाव जलकेंद्रवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना उद्या देखील पाणीपुरवठा | आठवडाभर कुठलीही कपात नाही

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Update | वडगाव जलकेंद्रवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना उद्या देखील पाणीपुरवठा

| आठवडाभर कुठलीही कपात नाही

Pune Water Cut Update  | पाणीपुरवठा साठी वडगाव जलकेंद्रवार अवलंबून असणाऱ्या परिसरात दर सोमवारी पाणी बंद ठेवले जाते. मात्र Wadgaon WTP वरील सर्व भागांना पुढच्या आठवड्यात म्हणजे 17 ते 23 july या दरम्यान कोणत्याही दिवशी कपात केली जाणार नाही. म्हणजेच त्या दरम्यान सर्व भागांना पाणी दिले जाणार आहे. शहरांतील इतर सर्व भागांना नेहमी प्रमाणे कपात असणार आहे. असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

वडगाव जलकेंद्र परीसरावर अवलंबून असणारा भाग

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.
—-

News Title |Pune Water Cut Update | Water supply to the people who depend on Vadgaon Jalkendra area tomorrow also. There is no reduction during the week

Pune Water Cut Update | वडगाव जलकेंद्र परिसरावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे पाण्याचे हाल | जलकेंद्रावर पम्पिंग चे काम अजूनही सुरु असल्याने सकाळपासून पाणी नाही

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Update | वडगाव जलकेंद्र परिसरावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे पाण्याचे हाल

| जलकेंद्रावर पम्पिंग चे काम अजूनही सुरु असल्याने सकाळपासून पाणी नाही

Pune Water Cut Update  | गुरूवार १३ जुलै रोजी वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी  पंपींगचे अखत्यारीतील  सर्व भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र वडगाव जलकेंद्रवरील पम्पिंग चे काम अजूनही सुरु असल्याने शुक्रवार सकाळपासून परिसरात अजूनही पाणी आलेले नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या (PMC water Supply Department) वतीने सांगण्यात आले कि पुढील 2 तासांत हे काम पूर्ण होईल त्यानंतर पाणी सोडले जाईल. (Pune Water Cut Update)

दरम्यान या परिसरात दर सोमवारी पाणी बंद ठेवले जाते. मात्र काही कारणास्तव गुरुवारी पाणी बंद ठेवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी देखील पाणी न आल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
वडगाव जलकेंद्र परीसरावर अवलंबून असणारा भाग
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी परिसरात सकाळपासून पाणी आलेले नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
—-
News Title | Pune Water Cut Update | Water condition of citizens who depend on Vadgaon Jalkendra area

Pune Water Cut Update | येत्या गुरुवारी काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार | पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Update | येत्या गुरुवारी काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार | पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल

Pune Water Cut Update  | गुरूवार १३ जुलै रोजी वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील खाली नमूद करण्यात आलेल्या सर्व भागांमधील पाणीपुरवठा सदर दिवशी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार 14 जुलै रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या (PMC water Supply Department) वतीने सांगण्यात आले आहे. (Pune Water Cut Update)

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

वडगाव जलकेंद्र परीसर :-

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

राजीव गांधी पंपिंग :-

सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग 38 मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसर इ.

त्यामुळे सोमवार द१०/७/२०२३ ते बुधवार दि.१२/७/२०२३ व शुक्रवार दि.१४/७/२०२३
ते रविवार दि.१६/७/२०२३ पर्यंत संपूर्ण भागाला पाणीपुरवठा करण्यात येणार असून सदर भागासाठी पाणीकपात असणार नाही. सोमवार दि.१७/७/२०२३ पासून पूर्वीच्या नियोजनासह सर्व भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
News Title | Pune Water Cut Update |  The water supply of some parts will be closed on Thursday  Change in water supply schedule

Khadakwasla Dam | Pune Rain | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 5 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी

Categories
Breaking News social पुणे

Khadakwasla Dam | Pune Rain | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 5 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी

| धरणांत सद्यस्थितीत 5.10 TMC पाणी

Khadakwasla Dam | Pune Rain | पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या आठवड्या भरापासून पाऊस (Pune Rain) सुरु आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 5 दिवसांत धरणामध्ये 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. सोमवारी हा साठा 4.16 टीएसमी होता. आज 6 वाजता हा साठा 5.10 टीएमसी झाला आहे. पुणेकरांना हा दिलासा मानला जात आहे. (Khadakwasla Dam | Pune Rain)

एक दिवसाआड पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता कमी

मागील वर्षी याच दिवसांत चार धरणामध्ये 2.55 टीएमसी पाणी होते. यंदा मात्र दुपटीने पाणी जास्त आहे. तसेच पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात (Pune Water Cut) करण्यात आली आहे. काही भागांत दर गुरुवारी तर काही भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पाण्याची बचत केली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी कमी होत चालले होते. त्यामुळे जुलै पासून पाणीकपातीत अजून वाढ (Alternate Day Water cut) करण्याची चर्चा सुरु होते. मात्र आता हे संकट येणार नाही अशी चिन्हे आहेत. (Pune water cut update)

4 धरणांत 17.50% इतके पाणी

खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत 5.10 टीएमसी म्हणजे 17.50% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) 1 टीएमसी म्हणजे 50.63%, पानशेत धरणांत (Panshet Dam) 1.80 टीएमसी म्हणजे 16.87%, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) 2.10 टीएमसी म्हणजे 16.37% तर टेमघर धरणांत (Temghar Dam) 0.21 टीएमसी म्हणजे 5.56% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत 2.55 टीएमसी म्हणजे 8.75% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-
News Title | Khadakwasla Dam |  Pune Rain |  1 TMC water has increased in last 5 days in 4 dams of Khadakwasla project
 |  Presently 5.10 TMC of water in dams

Pune Water Cut Update | उद्या पूर्ण शहरात पाणीपुरवठा सुरळीत राहणार | विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची माहिती

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Update | उद्या पूर्ण शहरात पाणीपुरवठा सुरळीत राहणार | विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची माहिती

Pune Water cut Update | महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) शहरात प्रत्येक गुरुवारी (Water cut on Thursday) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. मात्र, उद्या आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) आणि ईद (Eid-ul-Zuha) असल्याने या दिवशी शहरात पूर्ण वेळ पाणी देण्यात येणार आहे. शहरात कुठेही पाणी बंद ठेवले जाणार नाही. अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pawaskar) यांनी दिली. (Pune Water Cut Update)

उद्या दोन्ही सण एकाच वेळी येत असल्याने पाणीपुरवठा सुरू ठेवण्याबाबत विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना हा दिलासा मानला जात आहे. (Pune Municipal Corporation News)

——

News Title | Pune Water Cut Update |  Water supply will be smooth in the entire city tomorrow  Department Head Anirudh Pavaskar’s information

Pune Water Cut Update | There will soon be alternate day water in Pune city!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Update |   There will soon be alternate day water in Pune city!

 Pune Water Cut Update |  This year, in the month of June, the rain (Monsoon) has given a shortfall.  Although the month of June has come to an end, there has been no rain in Khadakwasla Dam Chain area.  As the water level in the dams has declined, there are signs of a water crisis for the people of Pune.  If there is not enough rain in the coming period, the people of Pune will have to take alternate day water.  Pune Municipal Corporation has also started such preparations.  (Pune water cut update)
 Currently, water is shut off in the city for one day a week.  However, there are signs that this reduction will increase further.  PMC Commissioner Vikram Kumar informed that the next decision will be taken after reviewing the water supply of the city by the end of June.  Meanwhile, last year in June, there was about 127 mm rainfall.  However, this year, the Commissioner said that there has not been even 10 mm of rain yet.  PMC Pune is planning to provide water to the city during the day in July if the water storage in the dams is further depleted.  The schedule has also been prepared accordingly.  Soon a decision will be taken regarding water reduction.  (PMC Pune News)
 ——

Pune Water Cut Update | पावसाच्या ओढीने पुणे शहरात लवकरच एक दिवसाआड पाणी!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Update | पावसाच्या ओढीने पुणे शहरात लवकरच एक दिवसाआड पाणी!

Pune Water Cut Update | यावर्षी जून महिन्यात पावसाने (Monsoon) चांगलीच ओढ दिली आहे. जून महिना संपत आला तरी खडकवासला धरणसाखळी (Khadakwasla Dam Chain) परिसरात पाऊस झालेला नाही. धरणांतील पाणीपातळी खालावल्याने पुणेकरांवर पाणीसंकट ओढवण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात पर्याप्त पाऊस नाही झाला तर पुणेकरांना एक दिवसाआड पाणी (Alternate Day Water) घ्यावे लागणार आहे. पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) तशी तयारी देखील सुरु केली आहे. (Pune water cut update)

सद्यस्थितीत शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाते. मात्र ही कपात अजून वाढण्याची चिन्हे आहेत.  शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत जूनअखेरीस आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी दिली. दरम्यान, मागील वर्षी जूनमध्ये सुमारे 127 मिमी पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी अद्याप 10 मिमी पाऊसही झालेला नसल्याचे आयुक्‍तांनी यावेळी सांगितले. धरणांतील पाणीसाठा आणखी खालावल्यास जुलैमध्ये शहरात दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन महापालिकेकडून (PMC Pune) सुरू आहे. त्यानुसार वेळापत्रकही तयार केले आहे. लवकरच पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. (PMC Pune News)

——

News Title | Pune Water Cut Update | Due to the torrent of rain, there will soon be water in Pune city for a day!

MNS Agitation | PMC Pune | पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी | मनसेने केला आरोप आणि पुणे महापालिकेवर काढला मोर्चा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MNS Agitation | PMC Pune | पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी | मनसेने केला आरोप आणि पुणे महापालिकेवर काढला मोर्चा

MNS Agitation | PMC Pune | पुणे शहरातील पाणी प्रश्नावर (Pune Water issue) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीने पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation) समोर जोरदार निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात मोठया संख्येने महिला पाण्याचे हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या.  पुणे महानगर पालिका प्रशासनाच्या (Pune Civic Body) विरोधात घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांना निवेदन देण्यात आले. (MNS Agitation | PMC Pune)
याप्रसंगीं  पक्षाचे नेते राजेंद्र वागसकर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस किशोर शिंदे,  बाळ शेडगे,  रणजीत शिरोळे, हेमंत संभूस, महिला शहर अध्यक्षा वनिता वागसकर, आरती बाबर,  पुष्पां कनोजिया,  अस्मिता शिंदे,  विभाग अध्यक्ष अमोल शिरस,  विनायक कोतकर,  गणेश भोकरे,  सुनील कदम, सुधीर धावडे,  विक्रांत अमराळे, अजय कदम, विजय मते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेच्या निवेदनात म्हटले आहे कि पुणे महापालिकेने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यानंतर दोन-दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याने पुणे शहरातील सर्व भागातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. हडपसर, कोंढवा, मुंढवा, वारजे, कोथरूड, शिवाजीनगर, वडगावशेरी, वाघोली, ओंध, बाणेर, पाषाण, कर्वेरोड, डेक्कन सर्व पेठा, पुणे कॅम्प या भागात पाणी पुरवठा होत नसल्याने पुणेकरांचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत असल्याचे चित्र दैनंदिन झाले आहे. पुणे शहरातील सर्व भागातील पेठा उपनगरातील सर्व भागात अशीच परिस्थिती आहे. पुण्याचे  पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित झाले असल्याने दोन तीन दिवसाने पाणी येणे तेही कमी दाबाने पाणी येणे. रात्री अपरात्री पाणी आल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या पेठेतून दुसऱ्या पेठेत डोक्यावर हांडे घेऊन महिला पाण्यासाठी वणवण फिरत आहेत, पाणी प्रश्नावर पुणे मनपा पाणीपुरवठा अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
मनसेने पुढे म्हटले आहे कि, पुणे शहरातील टँकर ने सुरु असलेल्या पाणी पुरवठ्यामध्ये  कोणतीही पाणी टंचाईची तक्रार नसल्याने पुणे मनपा अधिकारी व टँकर माफिया यांच्या संगनमताने पुणेकरांवर पाणीकपात लादली असल्याचा संशय पुणेकरांना येत आहे. पुणे शहरात ४३ पाण्याच्या टाक्या बांधून तयार आहेत त्यासाठी पुणे शहरातील रस्ते खोदाई करून पाइप लाइन टाकण्यात आलेल्या आहेत. पुणे शहरात २४/ ७ पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचे बजेट वापरण्यात आले आहे. मेट्रो, स्मार्ट सिटी कामामुळे  रस्ते खडल्याने पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी अनेक भागात येत आहे.
आगामी काळात पुणे शहराचा पाणी पुरवठा नियमित व योग्य दाबाने करण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
News Title | MNS Agitation | PMC Pune | Mixed water from drinking water line | MNS accused and marched against Pune Municipal Corporation