PMC Sinhgadh Road Kshetriya Karyalay | अखेर ओढे नाल्यांवर बसल्या संरक्षक जाळ्या

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Sinhgadh Road Kshetriya Karyalay | अखेर ओढे नाल्यांवर बसल्या संरक्षक जाळ्या

| पावसाळ्यात ओढ्यांना आलेल्या पुरात अनेकांनी गमावले होते आपले जीव

 

PMC Sinhgadh Road Kshetriya Karyalay | सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय (PMC Sinhgadh Road Ward Office) अंतर्गत  प्रभागां मधे अनेक ओढे नाले कॅनॉल धोकादायक पध्दतीत ओपन होते.  त्यामधे नागरिकांकडुन मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने ओढे नाले तुंबण्याचे प्रकार वाढले होते. मागील पावसाळ्यात आलेल्या पुरात नाले ब्लाॅक होऊन अपघात झाले यात अनेकानां आपले प्राण गमवावे लागले होते. (Sinhagad Road Kshetriya Karyalay Office Address)

The karbhari - PMC Safety net
यांच कारणाने सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप  खलाटे (Sandip Khalate PMC) यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत सर्व प्रभागां अंतर्गत खडकवासला, धायरी, नऱ्हे, वडगांव येथील अशा सर्व छोटे मोठे ओढे नाल्यांच्या पुलावर संरक्षक जाळ्या (Safety Net) बसवण्याचे काम हाती घेतले. ते  जवळ जवळ पूर्णत्वास आले आहे. एवढ्या वर्षांत प्रथमच असे काम झाल्याने नागरिकांमधून सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे व उप अभियंता विजय वाघमोडे आणि अभियंता वर्गाचे कौतुक होत आहे.

या पुढे ही अत्यावश्यक कामांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांनी या वेळी सांगितले.

500 crore provision for democratic empowerment | Union budget announced

Categories
Breaking News Commerce social पुणे

500 crore provision for democratic empowerment| Union budget announced

In India, people have limited access to democratic decision-making processes, their participation is minimal and people distrust the governance system. Hence, the democratic decision-making process is deteriorating day by day. It has been announced in the Union Budget that a provision of 500 crores is required in the Union Budget for the promotion of democratic values.

Center for Holistic Human Development and Research announced the Union Budget for 2024-25 at SM Joshi Auditorium. This public budget was published by Marxist leader Ajit Abhyankar, head of the center Vishweshwar Raste, and social activist Vishal Vimal. On this occasion, Swapna Alluri, Shiwangi Bageshwari, Utkarsh Pande, Pramod Dahule, Jayashri Patil, Neha Madhavi, and Vijaya Lakshmi presented the provisions of the Public Budget.

India’s global rank in democratic decision-making is declining. For overall development of the country, it is necessary to implement a democratic decision-making process with suggestions, opinions, and participation of the people. 1 crore of MP fund should be spent for the promotion of democratic values. It is necessary to create public awareness among the people about the democratic decision-making process, to know the suggestions of the people, and to encourage the people, provision has been made in the public budget.

There is a need for well-planned management of cities to curb the uncontrolled growth of cities. 73rd and 74th constitutional amendments should be effectively implemented. India invests only one percent if compared to the global tourism industry. The development of the tourism business will generate employment and economic prosperity by increasing investment. We need to create awareness of food literacy. overconsumption and malnutrition are major problems in India. Quality and regular electricity should be provided to every household and free electricity should be provided to the poor. Cold storage and processing industries are essential to increase the shelf life of perishable agricultural products. The farmers will get a stable price from it and other provisions have been made in the public budget.

The government system should increase its capacity to solve the people’s problems. Ajit Abhyankar expressed the opinion that a plan of action should be proposed and implemented strictly for the people. About 23 crore people in the country are living in poverty and providing employment and education to them will eradicate poverty in five years. Vishweshwar Raste expressed that 2 percent of the Union Budget is needed to eradicate the poverty of 20 percent of the people. Special provisions have been made in this public budget for democratic empowerment, poverty eradication, employment growth, well-planned urbanization, tourism development, skill development, food literacy, quality and sufficient electricity, girl child education, and sustainability of perishable agricultural products. Vishal Vimal stated that a copy of the public budget will be sent to the Prime Minister and Finance Minister.

Union Budge 2024 | लोकशाही सक्षमीकरणासाठी 500 कोटींची तरतूद आवश्यक | केंद्रीय जनअर्थसंकल्प जाहीर

Categories
Breaking News Commerce social पुणे

Union Budge 2024 | लोकशाही सक्षमीकरणासाठी 500 कोटींची तरतूद आवश्यक

| केंद्रीय जनअर्थसंकल्प जाहीर

Union Budge 2024 | भारतात लोकशाही निर्णय (Indian Democracy) प्रक्रियेत लोकांना मर्यादित संधी, त्यांचा अत्यल्प सहभाग आणि लोकांना शासन व्यवस्थेबद्दल अविश्वास आहे. त्यामुळे लोकशाही निर्णयप्रक्रिया दिवसेंदिवस खालावत आहे. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budge 2024) ५०० कोटींची तरतूद आवश्यक आहे, असे केंद्रीय जनअर्थसंकल्पात जाहीर केले आहे.

सेंटर फॉर हॉलिस्टिक ह्युमन डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्यावतीने एस एम जोशी सभागृह येथे २०२४-२५ या वर्षीचा केंद्रीय जनअर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. हा जनअर्थसंकल्प मार्क्सवादी नेते अजित अभ्यंकर, सेंटरचे प्रमुख विश्वेश्वर रास्ते, सामाजिक कार्यकर्ते विशाल विमल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी स्वप्ना अलुरी, शिवांगी बागेश्वरी, उत्कर्ष पांडे, प्रमोद डाहूले, जयश्री पाटील, नेहा मधवी, विजया लक्ष्मी यांनी जनअर्थसंकल्पातील तरतुदींसंबंधी मांडणी केली.

जागतिक पातळीवर भारताचा लोकशाही निर्णय प्रक्रियेतील क्रमांक घसरत आहे. देशाच्या सर्वांगिण विकासासाठी लोकांच्या सूचना, मते आणि सहभागाने लोकशाही निर्णय प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. लोकशाही सक्षमीकरणासाठी खासदार निधीतील १ कोटी रुपये खर्च केले पाहिजेत. लोकशाही निर्णय प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे, लोकांच्या सूचना जाणून घेणे, लोकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, अशी तरतूद जन अर्थसंकल्पात केली आहे.

शहरांची अनिर्बंध बकाल वाढ रोखून शहरांचे सुनियोजित व्यवस्थापन करण्याची गरज आहे. 73 व 74 वी घटना दुरुस्तीची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. पर्यटन व्यवसायामध्ये जागतिक पातळीवर विचार करता भारतामध्ये केवळ एक टक्का खर्च होतो. पर्यटन व्यवसायाचा विकास केल्यास ती गुंतवणूक वाढवून रोजगार आणि आर्थिक सुबत्ता निर्माण होईल. आपल्याकडे आहार साक्षरता घडवून आणण्याची आवश्यकता असून अतिसेवन आणि कुपोषण या मोठ्या समस्या आहेत. दर्जेदार, नियमित आणि गरिबांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. नाशवंत शेतीमाल पदार्थांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी शीतगृह आणि प्रक्रिया उद्योग आवश्यक आहे. त्यातून शेतकऱ्यांना स्थिर भाव मिळेल, आदी तरतुदी जनअर्थसंकल्पात केल्या आहेत.

लोकांचे प्रश्न सोडवणुकीसाठी शासन व्यवस्थेने स्वतःची क्षमता वाढविल्या पाहिजेत. लोकांसाठी योजना आखून त्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, असे मत अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. देशातील सुमारे 23 कोटी लोक गरिबीत असून त्यांच्यासाठी रोजगार आणि शिक्षण उपलब्ध करून दिल्यास पाच वर्षात गरिबी निर्मूलन होईल. 20 टक्के लोकांच्या गरिबी निर्मूलनासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातील 2 टक्के रक्कम आवश्यक आहे, असे मत विश्वेश्वर रास्ते यांनी व्यक्त केले. लोकशाही सबलीकरण, गरिबी निर्मूलन, रोजगार वृद्धी, सुनियोजित शहरीकरण, पर्यटन विकास, कौशल्य विकास, आहार साक्षरता, दर्जेदार व पुरेशी वीज, मुलींचे शिक्षण, नाशवंत शेतमालाचा टिकाऊपणा या बाबींसाठी विशेष तरतूद या जनअर्थसंकल्पात केली आहे. जन अर्थसंकल्पाची प्रत पंतप्रधान व अर्थमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे, असे विशाल विमल यांनी सांगितले.

Pune Education News | गाडकवाडी गाव “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” माध्यमातून झाले चकाचक! | गावच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन केला शिबिरार्थींचा यथोचित सन्मान!”

Categories
Education social पुणे

Pune Education News | गाडकवाडी गाव “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” माध्यमातून झाले चकाचक! | गावच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन केला शिबिरार्थींचा यथोचित सन्मान!”

 

Pune Education News | दापोडी पुणे येथील श्रीमती सी.के. गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे (C K Goyal Art and Commerce College Dapodi) “विशेष संस्कार शिबिर” रविवार १४ जानेवारी ते शनिवार 20 जानेवारी २०२४ या कालावधीत मु.पोस्ट गाडकवाडी ता. खेड जि. पुणे येथे मोठ्या उत्साहात संपूर्ण झाले. विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये गाडकवाडी गावांमध्ये वेगवेगळे उपक्रम नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यातून गावामध्ये मोठा बदल झाला असून संपूर्णगाडकवाडी गावचकाकचक होऊन त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

The karbhari - Education news

शिबिरामध्ये खालील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.

१) सकाळ सत्रात: दररोज८;०० ते ११:३० या वेळेत”श्रमदान”अंतर्गत वेगवेगळी श्रमदानाची कामे करण्यात आली त्यामध्ये जि. प .प्राथमिक शाळा गाडकवाडी येथे परिसर स्वच्छता, शालेय परिसरातील झाडांना आळी करणे, व झाडांना पाणी घालणे, शाळेच्या परिसरातील दगड, खडी, उचलून बाजूला करणे, शाळेच्या पाठीमागे बाजूस सपाटीकरण करणे, डोंगरावरून येणारे पाणी बाजूला करणे साठी चार खोदणे,
गावातील सर्व रस्ते साफसफाई करणे मुरूम खडी बाजूला करणे, झाडलोट करून स्वच्छ करणे,
ग्रामपंचायत, चावडी, मंदिर परिसर, व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी परिसर स्वच्छता, गाजर गवत काढणे, झाडलोट करणे व परिसर स्वच्छ करण्याचे काम केले,
वृक्षारोपण-गावामध्ये शाळा परिसर, ग्रामपंचायत परिसरामध्ये, वृक्षारोपण करण्यात आले.
वनराई बंधारा: पर्यावरण जागृतीच्या संदर्भात पाणी आडवा पाणी जिरवा संदेश देऊन स्वयंसेवकांकडून वनराई बंधारा बांधण्यात आला.
२) दुपार सत्रात: व्याख्यानमाला: प्रबोधन उद्बोधन अंतर्गत दररोज दुपारी ३;०० ते ४:३० या वेळेत व्याख्यान मला संपन्न झाली. या व्याख्यान माले अंतर्गत :श्री. संपत गारगोटे-यांचे जीवन सुंदर आहे, सौ. शर्मिला सांडभोर-महिला उद्योजकता विकास, प्रा. परबतराव बैसाणे-कवितेच्या गजलेच्या दुनियेत,प्रा. डॉ . बाळासाहेब माशेरे-शिवार फेरी, श्री. संतोष घुले-अपरिचित शिवराय, श्री. मयूर दौंडकर-उद्योजकता विकास, या विषयावर व्याख्यानमाला संपन्न झाली व्याख्यानमालेस उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
३) सायंकाळचे सत्र: दररोज ८:०० ते १०:०० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम:-गावातील लोकांच्या मनोरंजनासाठी उद्बोधनसाठी दररोज सायंकाळी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये प्रवचन, भारुड, गवळण, विविध सामाजिक विषयावर प्रबोधन पर प्रसंग नाट्य, विनोदी अभिनय मिमिक्री, मॉडेल्स, संमोहन/सर्प समज गैरसमज अंधश्रद्धा निर्मूलन-सादर करते श्री. अतुल सवांडे आणि सहकारी, गावातील लोकांचे व जि. प. शाळा गडकवाडी व जि. प. शाळा निघोजे शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रुप डान्स, वैयक्तिक डान्स, मंगळागौर, यासारखे विविध अंगी कार्यक्रम संपन्न झाले. ग्रामस्थांची उपस्थिती या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात लाभत होती यात्रेसारखे लोक जमा होत होते.
४) विविध सामाजिक उपक्रम; शिबिराच्या माध्यमातून गावातील लोकांना उपयुक्त असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये
अ) महिला मेळावा/उद्योजकता विकास/ शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन /आरोग्य जागृती /हळदी कुंकूशिबिर: १५ जानेवारी “मकर संक्रांत “निमित्त या उपक्रमाचे आयोजन शिबिर कालावधीत करण्यात आले असून “मुंबई माता बालसंगोपन केंद्र राजगुरुनगर” यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरासाठी १६० पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या . या मेळाव्यास महिलांकडून उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
ब) मोफत पशु चिकित्सा शिबिर: बुधवार दिनांक १७ जानेवारी २०२४रोजी सकाळी ९:३० ते ११:30 यावेळेस जि. प. प्राथमिक शाळा गाडकवाडी या ठिकाणी गावातील जनावरांसाठी “मोफत पशु चिकित्सा शिबिर” आयोजित करण्यात आले होते. “तालुका लघु पशु संवर्धन चिकित्सालय राजगुरुनगर” यांच्या सौजन्याने सदर शिबिर राबविण्यात या शिबिरासाठी डॉ.प्रशांत पोखरकर (प्रमुख तालुका लघु पशुसंवर्धन राजगुरुनगर) व इतर सहकारी पशुवैद्यकीय डॉक्टर उपस्थित होते. गावातील १७५ अधिक जनावरांची तपासणी करून औषध उपचार करण्यात आले. या शिबिरास गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रसिद्ध दिला
के) मोफत डोळे तपासणी औषधोपचार व चष्मे वाटप शिबिर;: गुरुवार दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९;३० ते १२:०० या कालावधीत गावामध्ये वृद्ध लोकांची संख्या जास्त असल्याकारणाने त्याचा विचार करून मोफत डोळे तपासणी व औषध उपचारा, चष्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.
“मयूर दौंडकर युवा फाउंडेशन राजगुरुनगर” यांच्या सौजन्याने सदर शिबिर राबविण्यात आले. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून १४० पेक्षा अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतला.

The karbhari Dapodi college

५) शिवार फेरी शैक्षणिक सहल: गावाची विद्यार्थ्यांना सर्वांगीण माहिती मिळावी पाहणी व्हावी यासाठी “शिवार फेरी शैक्षणिक सहलीचे “आयोजन करण्यात आले या सहलीतून गावाची सर्वांगीण पाहणी करण्यात आली.
६) ग्रामसर्वे: शिबिरामध्ये ग्राम सर्वे करण्यात आला असून गावची लोकसंख्या, गावातील मंदिरे ,गावातील ग्रामपंचायत तिची कामे, लोकांचा आर्थिक स्थर ,पीक पाहणी, पाण्याचे स्रोत, उद्योग व्यवसाय, या सर्वा विषयी माहिती घेण्यात आली.
७) स्वच्छता फेरी स्वच्छता दिंडी: शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत संपूर्ण गावात ढोल, ताशा, झांज ,लेझीम पथकासह घोषणा देत प्रभात फेरी संपन्न करण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये गाडगेबाबांची प्रतिकृती बनवून स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाला होता त्यामुळे दिंडीमध्ये गाडगेबाबा हे आकर्षण ठरले. स्वच्छतेचा संदेश देत घोषणा देत अतिशय उत्साहात दिंडी संपन्न झाली गावातील महिला भगिनींनी ठिकाणी गाडगेबाबांचे पूजन करून अभिवादन केले. दिंडीच्या समोर प्रसंगी गाव स्वच्छ ठेवण्याच्या आश्वासन ग्रामस्थांनी दिले.
८) शिबिराचे उद्घाटन: शिबिराचे उद्घाटन शनिवार दिनांक १४ जानेवारी२०२४ रोजी सायंकाळी ४:०० ते५;३० या वेळेत संपन्न झाले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री.कैलास दुधाळे, जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार श्रीमती कविता गोरे, जनता शिक्षण संस्थेचे ग्रामीण सदस्य श्री. बाळासाहेब पोळ, गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील ,ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष , सोसायटी सदस्य,व इतर ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होते.
९) शिबिराचा समारोप समारंभ: शनिवार दिनांक २० जानेवारी २0२४रोजी सकाळी ९:३० ते ११३० या वेळेत “शिबिराचा समारोप” समारंभ अतिशय उत्साह संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. महेश आगम गावचे सरपंच, वैभव गावडे, उपसरपंच चंद्रकांत गाडगे, शाळा समिती अध्यक्ष ज्योतीताई गावडे, विठ्ठल पंत दौंडकर, फुलचंद महाराज सरडे,पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष ,ग्रामपंचायत सदस्य, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने शिबिर अतिशय सुंदर झाल्यामुळे शिबिरार्थींना “स्मृतीचिन्ह” देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे शाळा समितीचे अध्यक्ष सौ कविताताई गाडगे यांच्याकडून प्रत्येक गटप्रमुखांना “स्मृतीचिन्ह” देऊन सन्मानित करण्यात आले.
शिबिराच्या समारोप कार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी शिबिरार्थींना स्वादिष्ट भोजन देऊन स्वतः वाढण्याचे काम केले.
शिबिराचे संयोजन: सी.के गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुभाष सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे प्रा. सिद्धार्थ कांबळे प्रा.वैभव वरडुले,प्रा. उत्तम गोरड प्रा. अक्षदा पानसरे ,प्रा. शीला येलमेळी यांनी केले.
त्यांना विद्यार्थी प्रतिनिधी कपिल कांबळे, जायराज मोरे, धीरज ससाने ,काजल काटे, रत्नप्रभा मोरे, व सर्व गटप्रमुखांनी सहकार्य केले.

Pu La Deshpande Udyan Pune | पु. ल. देशपांडे उद्यानात आजपासून महिला बचत गट खाद्य महोत्सव

Categories
Breaking News PMC social पुणे

Pu La Deshpande Udyan Pune | पु. ल. देशपांडे उद्यानात आजपासून महिला बचत गट खाद्य महोत्सव

 

Pu la Deshpande Udyan Pune | पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत (PMC Social Devlopment Department) महिला बचत गट (Women health Group) खाद्य महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन  १९ जानेवारी ते २१ जानेवारी ४ या कालावधी मध्ये करणेत आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांनी पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, पुणे (Pu la Deshpane Udyan, Sinhgadh Road pune) येथे केले. (PMC Mahila Bachat gat khadya mahotsav)

उद्घाटन प्रसंगी मा. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी पुणे शहरात विविध वस्तू उत्पादीत करणारे ६००० महिला बचत गट असल्याचे  सांगून  पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत राबविणेत येत असलेल्या विविध महिला सक्षमीकरण योजनांबद्दल माहिती दिली. पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील ठराविक रक्कम महिलांच्या सक्षमीकरणासाठी वापरणे बंधनकारक असलेचे त्यांनी नमूद करून या योजनांचा लाभ सर्व महिला वर्गांनी घेणेबाबत तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित करणेत येत असलेल्या विविध प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घेणेबाबत आव्हान केले. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ.  कुणाल खेमनार  यांनी  महिला सक्षमीकरणअंतर्गत महिला बचत गटांकरीता येत्या काळामध्ये डिजिटल मार्केटींगचे नियोजन इ-कॉमर्स चे वेगवेगळे प्लॅटफॉर्म व मोबाईल ॲप्लिकेशन यांचे माध्यमातून करणेत येणार असल्याचे नमूद केले व यामध्ये जास्ती जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले. या कार्यक्रम प्रसंगी   परिमंडळ क्र. ३ चे उप आयुक्त श्रीमती आशा राऊत, उद्यान विभाग प्रमुख  अशोक घोरपडे, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे,  समाज विकास विभागाचे मुख्य समाज विकास अधिकारी  रामदास चव्हाण, तसेच  समाज विकास विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. (PMC Pune News)

The karbhari - PMC Social Devlopment Department

उप आयुक्त नितिन उदास,यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन  संदीप कोळपे सहा. समाज विकास विभाग यांनी केले तर आभार प्रदर्शन  रामदास चव्हाण, मुख्य समाज विकास अधिकारी यांनी केले.

| महोत्सवाचे लाभ घेण्याचे महापालिका समाज विकास विभागाचे आवाहन

१९ जानेवारी २०२४ ते २१ जानेवारी २०२४ पर्यन्त पु.ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, पुणे येथे पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत बचतगटाच्या महिला सदस्यांनी बनविलेल्या खाद्यपदार्थांचा महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकानी अत्यंत चविष्ट् रूचकर ताजे पदार्थचा आस्वाद घेउन बचत गटातील महिलाना प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन महापालिका समाज विकास विभागाने केले आहे.

PMC Solid Waste Management Department | सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे पुणेकरांना अजून पडणार महागात! | पुणे महापालिका अडीच ते तीन पटीने दंड वाढवणार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Department | सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे पुणेकरांना अजून पडणार महागात!

| पुणे महापालिका अडीच ते तीन पटीने दंड वाढवणार

PMC Solid Waste Management Department | सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्ता किंवा मार्गावर अस्वच्छता करणे (Unhygienic in Public places), कचरा टाकणे यासाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून (PMC Pune Solid Waste Management Department) दंड आकारला जातो. मागील चार महिन्यात महापालिकेने 1 कोटींचा दंड वसूल केला आहे. दरम्यान आगामी काळात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, अजून महागात पडणार आहे. कारण यासाठी आकारण्यात येत असलेला 180 रुपयाचा दंड वाढवून तो 500 रुपये करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असते. महापालिका सरकार मान्यता देईल या भरवश्यावर नवीन दंडाची अंमलबजावणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)
प्रशासनाच्या प्रस्तावा नुसार घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे तरतुदींचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना दंड करण्याचे अधिकार नगरपरिषद / नगर पंचायत यांना शासन निर्णय नुसार देण्यात आले आहेत.  त्यानुसार  पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन कार्यालयांतर्गत सार्वजनिक ठिकाणी / रस्ता / मार्गावर अस्वच्छता करणे याकरिता १८०/- दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुणे शहराचा विस्तार वाढत चाललेला असून वाढती लोकसंख्या त्यातून निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या दैनंदिन कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, त्याची अंमलबजावणी करणे तसेच घनकचरा हाताळणी आणि व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार प्रभावी करणेसाठी शहरातील नागरिकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. शहरातील जुन्या हद्दीत व नवीन समाविष्ट गावे येथील नागरिक कचरा उघड्यावर टाकत असतात. त्यामुळे क्रोनिक स्पॉट व अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण होते व सदर ठिकाणी पडलेला कचरा उचलून घेण्यासाठी अतिरिक्त मनुष्य बळ वाहतूक खर्च व मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया याकरिता महानगरपालिकेला आर्थिक तोशिष सहन करावी लागत आहे. (PMC Pune News)
प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि, सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर  अस्वच्छता करणे याकरिता सध्या असणारी दंडाची तरतूद अत्यल्प असल्याने नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यामध्ये अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे सदर दंडात्मक रक्कमेमध्ये वाढ करून १८०/- ऐवजी रक्कम ५००/- इतकी दंड आकारणी केल्यास प्रतिबंध सिद्धांतानुसार (theory of Deterrence) नुसार नागरिकांमध्ये अपेक्षित बदल घडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होणार आहे. यामुळे अपेक्षित घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी होऊन शहर स्वच्छ व सुंदर राखण्यास मदत होणार आहे. यामध्ये नागरिकांकडून निधी वसूल करणे असे उद्दिष्ट नसून घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे व शहर विद्रुपीकरणास प्रतिबंध करणे असे ध्येय आहे. दंड रक्कम FI31A101 स्वच्छता संकल्प निधी या अर्थाशिर्षाकावर जमा होत असून या रक्कमेचा विनियोग सार्वजनिक स्वच्छतेच्या कामाकरिता केला जातो.
त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समिती आणि मुख्य सभेसमोर ठेवला जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. मात्र सरकार मान्यता देईल या भरवश्यावर नवीन दंडाची अंमलबजावणी करण्याचा मानस महापालिका प्रशासनाचा आहे.

Katraj Dairy Pune | Play Ground Reservation | कात्रज येथील मैदानाचे आरक्षण उठवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीचे वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Katraj Dairy Pune | Play Ground Reservation | कात्रज येथील मैदानाचे आरक्षण उठवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीचे वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन

Katraj Dairy Pune |  Play Ground Reservation | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation)  विकास आराखड्यात मैदानासाठी दर्शविण्यात ३.५९१ हेक्टरचा भूखंड पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (Katraj Dairy) देण्याचा निर्णय झाला आहे. ही जागा मुलांना खेळासाठी राहू द्यावी अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Pune) वतीने पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) समोर आंदोलन करण्यात आले. कात्रज येथील क्रीडांगणाचे आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियेसाठी आरक्षण टाकणार असल्याच्या निषेधार्थ पुण्याचे पालकमंत्री व पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिका समोर आंदोलन घेण्यात आले. (Katraj Dairy Pune | Play Ground Reservation)

यावेळी वेगवेगळे खेळ रस्त्यावर खेळण्यात आले. कात्रज येथील डीपीमधील मैदानाचे आरक्षण उठवू नये याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त  विक्रमकुमार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, दूध डेअरी व प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागाशी संबंधित आहे. महापालिकेच्या डीपीमधे याबाबत आरक्षण नाही . शहरांमध्ये खेळासाठी मैदानिची कमतरता भासत असताना ही जागा कात्रज डेअरीच्या व्यावसायिक वापरासाठी काढून घेणे योग्य नाही. पुणे शहरांमध्ये मुलांना खेळांसाठी पुरेसे क्रीडांगण नाही असे असताना जी जागा क्रीडांगणासाठी आरक्षित आहे आणि जर त्या जागेवरच आरक्षण काढून कात्रज डेअरीला ती जागा पुणे महानगरपालिका देणार असेल तर ते पुणेकरांच्या हिताचे नाही.  तसेच कात्रज, धनकवडी या भागात दाट लोकवस्ती आहे येथे मुलांना खेळांसाठी हक्काचे मैदान आवश्यक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पुणेकरांच्या हितासाठी आज रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवित आहे. (Pune Sahkari Dudh Utpadak Sangh Pune)

यावेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना गटाचे (उद्धव ठाकरे गट) गजानन थरकुडे संजयजी मोरे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ऍड.अभय छाजेड, संगिता तिवारी, लता राजगुरू, गोपाळ तिवारी,शिवा मंत्री, अजित दरेकर रजनी त्रिभुवन, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, अक्षय माने,राजू याने संतोष पाटोळे, कृष्णा सोनकांबळे,एंन.एस.यू.आय.अध्क्ष अभिजित गोरे, प्रियांका रणपिसे,द.स.पोळेकर, सचिन आडेकर, सतिश पवार यशराज पारखी, बाळासाहेब मारणे लतेंद्र भिंगारे , मुन्नाभाई शेख , यासिन‌ शेख, अभिजित महामुनी, आशुतोष शिंदे आकाश माने,ओम भंवर उषा राजगुरू,रेखा गेहलोत, नलीनी दोरगे,छाया जाधव, सुंदर ओव्हाळ ,मोती उडते, सीमा महाडिक , शारदा वीर, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, दिलीप लोळगे,सेल्वराज अंथोनी,सागर खडके,नागेश कवडे दत्ता जधव आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.