Tag: PWD
G20 Summit in Pune | Sinhagad Fort | Foreign guests of the G 20 conference will visit Sinhagad Fort!
| Divisional Commissioner’s order to beautify Sinhagad road
G 20 summit in pune | Sinhagad Fort | G 20 परिषदेतील परदेशी पाहुणे करणार सिंहगडाची सफर!
| सिंहगड रस्त्याचे सुशोभीकरण करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
G 20 summit in pune | Sinhagad Fort | (Author: Ganesh Mule) | पुण्यात जून महिन्यात G- २० परिषद (G 20 Summit in Pune) होणार आहे. या परिषदेसाठी निमंत्रित परदेशी पाहुण्याना महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी (Maharashtrian Culture) अवगत करायचे आहे. त्यानुसार पुण्यापासून जवळच असलेल्या सिंहगड किल्ल्याची (Sinhagad Fort) सफर या पाहुण्यांना घडवून आणली जाणार आहे. त्यानुसार या पर्यटन भेटीकरिता पुणे ते सिंहगड रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती, व सुशोभिकरण (Sinhagad Road Maintenance and beautification) करुन घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी (Divisional Commissioner) पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) , जिल्हा परिषद (Pune Zilla parishad) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला(PWD) दिले आहेत. (G 20 summit in pune | Sinhgadh Fort)
Pune Municipal Corporation | PMRDA | नगर रोड वरील १०७ अनधिकृत बांधकामावर कारवाई
| ७५ हजार चौरस फुट बांधकाम पाडले
Pune Municipal Corporation | PMRDA | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), पुणे महानगर पालिका (PMC pune), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या संयुक्त अतिक्रमण कारवाई (Encroachment) अंतर्गत पुणे- नगर रोड वरील वाघोली मध्ये जकात नाका ते बकोरी फाटा या भागात एकूण १०७ अतिक्रमण बांधकामावर (Illegal constuction) कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७५ हजार चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले. अशी माहिती महापालिका प्रशासन आणि पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC pune and PMRDA encroachment action)
कारवाई ही रोड मध्यापासून १५ मी च्या आत असलेल्या अतिक्रमणावर करण्यात आली असून नागरिकांना १५ मी. अंतरमधील अतिक्रमणे स्वतः हुन काढून घेण्याचे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कडून करण्यात आले आहे.
दोन्ही बाजूस मिळून चार मीटर रस्त्याची रुंदी वाढली असून पीडब्ल्यूडी व पुणे महानगरपालिका रस्ता बांधण्याचे काम तातडीने सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली अनाधिकृत बांधकामे काढणे बाबत कारवाई सातत्याने घेतली जाणार असून पीएमआरडीएमार्फत सर्व संबंधित नागरिकांना नोटीस देण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. असे पुणे महापालिकेकडून सांगण्यात आले.
अतिक्रमण कारवाईला पुणे महानगर विकास प्राधिकरण च्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार बजरंग चौगुले, पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे व क.अभियंते, पुणे महानगपालिकेच्या वतीने उप आयुक्त पुणे शहर माधव जगताप, उप आयुक्त परिमंडळ किशोरी शिंदे व कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उप विभागीय अभियंता राहुल कदम, कनिष्ठ अभियंता सलीम तडवी हे उपस्थित होते.
Pune Municipal Corporation | PMRDA | Action on 107 unauthorized construction on Nagar Road
हडपसर-मांजरी-वाघोली रस्त्यासाठी सिरम कडून 26 कोटींचा निधी
| रस्त्याला विलू पुनावाला यांचे नाव देण्याबाबत सरकारची शिफारस
जसे की Street Light, रस्ते साफसफाई इ. मागणी होते. सा बां विभागाकडे ग्रामीण भागातील रस्ते असल्या कारणामुळे या प्रकारच्या सुविधा सहसा पुरविल्या जात नाहीत.
शासनास सादर करण्यात आला आहे. अदयापपर्यंत शासनाकडून सदर बाबत निर्णय अप्राप्त आहे. सदर रस्त्याच्या विकसनासाठी सिरम इन्स्टीटयुट चे योगदान पाहता सदर रस्त्यास विलू पुनावाला यांचे नाव देण्याची शिफारस करण्यात येत आहे. असे ही पत्रात म्हटले आहे.
दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा
पुणे | दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’(सक्षम-ईसीआय) तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहता कामा नये, यासाठी दोन्ही मतदारसंघात मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी साह्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे काम या माध्यमातून होत आहे.
‘मतदान प्रक्रियेपासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहू नयेत, तसेच त्यांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन विशेष सोयी-सवलती उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना पोस्टल मतदनाची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांच्याकडून नमुना अर्ज १२-ड भरून घेण्यात येत आहेत.
मतदान केंद्रांवरील दिव्यांग मतदारांची एकूण संख्या विचारात घेऊन अशा मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. अंध व दृष्टी अधू असलेल्या मतदारांसाठी काचेचे भिंग, ब्रेल लिपीतील मतपत्रिका देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्तींना सुलभतेने मतदान करता यावे आणि त्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’ तयार केले आहे. दिव्यांग मतदारांना मदतीची आवश्यकता असल्यास त्यांना ‘पीडब्ल्यूडी ॲप’ मोबाइलवर डाउनलोड करावे. या ॲपद्वारे आवश्यक मदतीचे स्वरूप नोंदवता येते. इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या अँन्ड्रॉइड स्मार्ट फोनमध्ये हे ॲप डाउनलोड करता येते. या ॲपची नोंद करणाऱ्या नागरिकाला त्यांच्या मोबाइलवर मदतीची नोंद केल्यानंतर युनिक आयडी मिळेल, त्यामुळे त्याला नोंद झाल्याचे लक्षात येईल.
लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी सहभागी व्हावे. मतदान करणे हे आपले कर्तव्य असल्याने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी केले आहे. जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील दिव्यांग मतदारांच्या बाबतीत अधिक जागरूक राहून त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
000
चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार
| 8 दिवसांत रस्ता नियमानुसार न केल्यास आंदोलनाचा इशारा
चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. याची तक्रार मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. आतापर्यंत झालेला रस्ता उकरून व्यवस्थित करून देण्याची आणि या पुढील रस्ता देखील नियमानुसार करण्याची मागणी केली आहे. अन्यथा 8 दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.