Assembly speaker | विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर..! नार्वेकरांविषयी जाणून घ्या 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर..! नार्वेकरांविषयी जाणून घ्या

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी (assembly speaker election) निवडून आलेले राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) भाजपचे आमदार आहेत. नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

नार्वेकरांना १६४ तर आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप पाळला नाही. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे.

नार्वेकर आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष बदलला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करताच जितेंद्र आव्हाड यांनी नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला.

Assembly Speaker | विधानसभा अध्यक्ष पद | महाविकास आघाडीकडून राजन साळवी तर भाजप कडून राहूल नार्वेकर 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्ष पद | महाविकास आघाडीकडून राजन साळवी तर भाजप कडून राहूल नार्वेकर

महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतर राजकीय घडामोडींनी आणखी वेग धरला आहे. शिंदेंनी सत्तेत येताच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावली. मविआ सरकार असताना नाना पटोले यांच्याकडे हे पद होतं. मात्र, त्यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळताच अध्यपदाची जागा रिक्त आहे. मागील सरकारची तीन अधिवेशनं उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात पार पडली. मात्र आता नव्याने सरकार आल्यानंतर बहुमत चाचणी घेण्याआधीच ही निवडणूक लावण्यात आली आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार राहुल नार्वेकर, तर मविआकडून राजापूरचे आमदार राजन साळवींना उमेदवारी देण्यात आली आहे.