Kasba Constituency | BJP | कसबा मतदारसंघातील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात पहिल्याच दिवशी शंभर पेक्षा जास्त महिलांचा सहभाग

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे

Kasba Constituency | BJP | कसबा मतदारसंघातील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात पहिल्याच दिवशी शंभर पेक्षा जास्त महिलांचा सहभाग

| कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या यांच्या पुढाकाराने महिलांना दिलासा

 

Kasba Constituency | BJP |पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (PM Narendra Modi Birthday) उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री  चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या संकल्पनेतून कसबा मतदारसंघात (Kasba Constituency) महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे (Helath Check Up Camp for women) आयोजन करण्यात आले आहे. १० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून आज प्रभाग क्रमांक १८ मध्ये पहिल्याच दिवशी शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ज्या नागरिकांना पुढील उपचाराची गरज आहे, त्यांनाही मदत केली जाणार आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), राज्य उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande) आणि शहराध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वय वर्ष ४० वर्षांवरील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणात आले आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात महिला घरगुती कामांसोबतच त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी माझ्या माता – भगिनींसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या तपासणीमध्ये महिलांना काही आजार आढळल्यास त्यावर योग्य ते औषधोपचार करण्यात येतील.

समर्थ युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून शिबीर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या माध्यमातून आज प्रभाग १७ मधील शुक्रवार पेठेतील जैनमंदिर येथे फिरत्या आरोग्य तपासणी वाहिकेच्या माध्यमातून अनेक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली व आरोग्या संबंधीच्या तक्रारींवर योग्य ते उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात रक्तातील साखर तपासणी (ब्लड शुगर),रक्तदाब तपासणी (बी.पी.),छातीचा एक्स-रे,रक्त तपासणी (सीबीसी टेस्ट),कोलेस्ट्रॉल तपासणी,स्तनाचा कर्करोग तपासणी (मॅमोग्राफी) आदी ९५०० रुपये पर्यंतच्या तपासण्या करण्यात आल्या. कसबा मतदारसंघातील सर्व ६ प्रभागांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी कसबा विधानसभा अध्यक्ष श्री. राजेंद्र काकडे, सहसंयोजक श्री.अनिल बेलकर, फार्मासिस्ट, केमिस्ट तसेच कसबा मतदारसंघातील सर्व महिला पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Meri Mati Mera Desh Abhiyan | “मेरी माटी, मेरा देश” : देशव्यापी अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भाजपचे राजेश पांडे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Meri Mati Mera Desh Abhiyan | “मेरी माटी, मेरा देश” : देशव्यापी अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भाजपचे राजेश पांडे

महाविजय २०२४: पुणे महानगरपालिकेसोबतच पांडे यांच्याकडे शिरूर लोकसभेच्या समन्वयाची जबाबदारी

 

Meri Mati Mera Desh Abhiyan |’मन की बात’ (Man ki Bat) या लोकप्रिय कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मांडलेल्या “मेरी माटी, मेरा देश” (Meri Mati Mera Desh Abhiyan) या देशव्यापी आणि लोकाभिमुख अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजकपदी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande BJP) यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भारतीय जनता पार्टीच्या ‘महाविजय २०२४’ साठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयकपद म्हणून पांडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या हस्ते दोन्ही निवडीचे पत्र पांडे यांना बुधवारी (२ जुलै २०२३) मुंबईत प्रदेश कार्यालयात प्रदान करण्यात आले. (Meri Mati Mera Desh Abhiyan)

देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम साकार होत आहे. या देशव्यापी अभियानात ‘मिट्टी यात्रा’, ‘वसुधा वंदन’, ‘वीरो को वंदन’, ‘ध्वज वंदन’, शिलाफलकांची उभारणी अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची महाराष्ट्रात राज्यभर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पांडे यांच्यावर असेल.

उपक्रमाचा समारोप दिल्लीत कर्तव्य पथावर ७५०० युवकांच्या उपस्थितीत होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युवकांना पंचप्राण शपथ देऊन देशभरातून गोळा केलेल्या मातीतून अमृत वाटिकेचे निर्माण करण्यात येईल. या अभियानाने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ स्मारकाचे समर्पण करण्यात येईल.

———

देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आम्ही यापूर्वी ‘हर घर तिरंगा’ विश्वविक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मदतीने राबविला. देशाचा अभिमान जागविणारे “मेरी माटी, मेरा देश” अभियान महाराष्ट्रात प्रत्येक नागरिकांपर्यंत आणि ४० लाख युवकांपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे. ‘संघटन हेच सामर्थ्य’ या विश्वासातून मी गेली ४० वर्षे संघटनेत कार्यरत आहे. नवीन जबाबदारीतही त्याच निष्ठेने पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वांसोबत काम करेन. माझ्यावर विश्वास ठेवून दिलेल्या जबाबदारीबद्दल मी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार मानतो.

| राजेश पांडे उपाध्यक्ष, भाजप , महाराष्ट्र प्रदेश-


News Title |Meri Mati Mera Desh Abhiyan | “Meri Mati, Mera Desh”: BJP’s Rajesh Pandey as Maharashtra Pradesh Coordinator of Nationwide Campaign

G 20 Summit in Pune | पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रदर्शनाला पाच लाख पुणेकर भेट देणार

Categories
Breaking News Political social पुणे

G 20 Summit in Pune | पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रदर्शनाला पाच लाख पुणेकर भेट देणार | राजेश पांडे

G 20 Summit in Pune | जी 20 परिषदेच्या (G 20 Summit 2023)  निमित्ताने पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव स्टेडियम (Khashaba Jadhav stedium) मध्ये दिनांक 17 ते 22 जून या कालावधीत ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला पाच लाख पुणेकर भेट देतील असे नियोजन केले असल्याची माहिती जी २० परिषद संयोजन समितीचे समन्वयक राजेश पांडे (Rajesh Pande)  यांनी दिली. (G 20 Summit in Pune)

पांडे म्हणाले, ‘तीन ते नऊ वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिक्षण पद्धती व त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन शैक्षणिक साधनांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांचे कुतूहल जागृत करणारी साधने प्रदर्शनात पाहायला मिळतील. या साधनांमुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी कृतियुक्त शिक्षण देता येईल. ज्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोठा हातभार लागेल. त्यामुळे पुणेकरांनी ही संधी दवडू नये. (G 20 Summit News)

पुणेकरांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी याचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सर्व शैक्षणिक संस्थांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, व्यवस्थापन समिती सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. आदित्य अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनाला अधिकाधिक पुणेकरांनी भेट द्यावी असे आवाहन पाटील यांनी या बैठकीत केले होते. त्याला सर्व शिक्षण संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांतील सुमारे दीड लाख विद्यार्थी आणि शिक्षक प्रदर्शनाला भेट देणार आहेत. पीएमपीएमएलने त्यासाठी विनामूल्य वाहन व्यवस्था केली आहे.’ (G 20 Summit in Pune news)

प्रदर्शनात शंभरहून अधिक शिक्षण संस्था आणि उत्पादकांची दालने असणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ६ ही प्रदर्शनाची वेळ आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. पुणेकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


News Title | G20 Summit in Pune | Five lakh Punekar to visit Basic Literacy and Numeracy Exhibition | Rajesh Pandey

PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु

| महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती

PMC Election | BJP | पुणे महापालिका निवडणूक (Pune Municipal Corporation Election) कधी होणार याची उत्सुकता सर्वानाच आहे. मात्र निवडणूक कधी होणार, हे खात्रीशीरपणे कुणीच सांगू शकत नाही. पण दुसरीकडे भाजपने (BJP) मात्र निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुणे महापालिका निवडणूक प्रमुख (PMC Pune election) म्हणून राजेश पांडे (Rajesh Pande) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (PMC Election | BJP)
पांडे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State president Chandrashekhar Bawankule) यांनी नुकतेच तसे पत्र दिले आहे. पत्रात बावनकुळे यांनी म्हटले आहे कि पुणे महापालिकेत पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्न कराल.
प्रदेश भाजपने पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाली आहे. पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन. अशा भावना पांडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. (PMC election news)
महापालिकेच्या माध्यमातून भाजपने शहरात मोठी विकासकामे केली आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही मागील यशाची पुनरावृत्ती करू. त्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन. बूथ रचनेचे सक्षमीकरण, नियोजनबद्ध निवडणूक व्यवस्थापन आणि विकासकामे व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.
राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र
पुणे महापालिका निवडणूक प्रमुख, भाजपा
—–
News Title |PMC Election | BJP | Preparations for Pune Municipal Elections have started from BJP | Appointment of Rajesh Pandey as Chief Municipal Election Officer

BJP Pune : Rajesh Pande : PMC election : राजेश पांडे हे ‘निवडणूक संचालन समिती’ चे प्रमुख : भाजपकडून खुलासा 

Categories
Breaking News Political पुणे

राजेश पांडे हे ‘निवडणूक संचालन समिती’ चे प्रमुख

: भाजपकडून खुलासा

पुणे : गेले दोन दिवस पुणे शहरातील विविध प्रसिद्धी माध्यमांमध्ये पुणे शहर भाजपच्या निवडणूक संचालन समिती प्रमुख पदाच्या नियुक्ती बाबत वृत्त प्रसारित झाले आहे. यापैकी काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बाबत  भाजपने खुलासा केला आहे.

त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे शहर भाजपचे संघटन सरचिटणीसराजेश पांडे यांना पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ‘निवडणूक संचालन समिती’चे प्रमुख म्हणून अधिकृत नियुक्ती पत्र दिले आहे.  राजेश पांडे हे आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘निवडणूक संचालन समिती’चे प्रमुख म्हणून काम पाहातील.

भाजपने नुकतीच घोषणा केली होती कि शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका निवडणुका लढल्या जातील. त्या अगोदर भाजपने घोषणा केली होती कि महापालिका निवडणुकीची सूत्रे राजेश पांडे यांच्याकडे राहतील. यामुळे भाजप मधेच संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आता भाजपला हा खुलासा करावा लागला आहे.

Atalshakti Abhiyan : 21 हजार 115 कार्यकर्त्यांकडून 1 लाख 23 हजार 343 घरात संपर्क – शहराध्यक्ष जगदीश मुळीक

Categories
Political पुणे

 21 हजार 115 कार्यकर्त्यांकडून 1 लाख 23 हजार 343 घरात संपर्क – शहराध्यक्ष जगदीश मुळीक

अटलशक्ती महासंपर्क अभियानास अपेक्षेपेक्षा जास्त यश – राजेश पांडे

प्राथमिक अंदाजानुसार एकूण 493372 नागरिकांपर्यंत संपर्क आणि संवाद

पुणे : आज पुणे शहरातील अटलशक्ती महासंपर्क अभियानात शहरातील एकूण 2854 बूथ पैकी प्रत्यक्ष 2649 बूथ वर संपर्क झाला,या सम्पर्क अभियानात 21115 कार्यकर्ते सहभागी झाले व त्यांनी तब्ब्ल 123343 ( एक लाख तेवीस हजार तीनशे त्रेचाळीस ) घरांपर्यंत संपर्क केला असल्याची प्राथमिक आकडेवारी उपलब्ध झाली असून अजूनही काही भागातील आकडेवारी चे संकलन सुरु असल्याचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक व संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले.हर घर मोदी हा संकल्प घेऊन पक्षाच्या बूथ समितीतील कार्यकर्ते सकाळी 8 वाजताच बाहेर पडले व त्यांच्या यादीतील सर्व घरात संपर्क करून कुटुंबाशी संवाद साधला असेही शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

कोणतीही निवडणूक नसताना कार्यकर्ता घरी येतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार च्या लोकोपयोगी योजनांची माहिती पुस्तिका देतो याचे नागरिकांना नवल वाटले व त्यांनी घरी येणाऱ्या कार्यकर्त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले असे ह्या अभियानाचे प्रमुख पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले.माजी पंतप्रधान भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अपेक्षित असलेले कार्य यशस्वी करून आज त्यांच्या जयंती दिनी त्यांना समर्पक अभिवादन केले गेले अशी भावना व्यक्त करताना, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील,केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार,खासदार गिरीश बापट,आमदार माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. मुक्ता टिळक, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. सुनील कांबळे, महापौर मुरलीधर मोहोळ, सर्व नगरसेवक, शहर पदाधिकारी ते शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि बूथ समिती सदस्यांनी आजचे अभियान यशस्वी केल्याचे ही राजेश पांडे म्हणाले. भाजप चा कार्यकर्ता हा पक्षाप्रति समर्पित कार्यकर्ता असून हीच पक्षाची ताकत असल्याचे ही राजेश पांडे यांनी स्पष्ट केले.आज एका दिवसात झालेला हा बहुधा सर्वात मोठा जनसंपर्क अभियान असावा, ज्या माध्यमातून शहरातील कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यवसायिक अश्या सर्व क्षेत्रातील नागरिकांपासून सामान्य माणसापर्यंत भाजपचा कार्यकर्ता पोहोचला आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या पक्ष संघटनेप्रतीचे आपले कर्तव्य पूर्ण करता झाला असे ही ते म्हणाले.