Tag: Ramdas Jagtap
Ring Road Pune | रिंगरोड साठी 47 हेक्टर वनजमीनीची आवश्यकता | ऑनलाईन प्रस्ताव वन विभागाकडे सादर
संपादित करावयाच्या सुमारे ४७ हेक्टर वनजमिनीसाठी पर्यायी वनेतर क्षेत्र देणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास विनंती करण्यात आली असुन पर्यायी जागेचा तपशील उपलब्ध झालेवर वनविभागासाठी चर्चा करुन पर्यायी जागा देण्यात येईल.
Digital Satbara | डिजिटल सातबारा साठी आता उमंग मोबाईल अॅप
आता डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उमंग मोबाईल अॅपवरून देखील उपलब्ध होणार असल्याने त्याची उपलब्धता अत्यंत सोपी व सहज होईल. परिणामी डिजिटल ७/१२ व महाभूमी प्रकल्प महसूल विभागाची डिजिटल क्रांती आहे हेच दिसून येते.
Pune Metro Line 3 Project | पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाला रौप्य पुरस्कार
Pune Metro Line 3 Project |पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत करण्यात येत असलेल्या पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाला (Pune Metro Line 3 Project) SKOCH संस्थेकडून राष्ट्रीय स्तरावरील ‘शहरी विकास’ श्रेणीतील रौप्य पुरस्कार मिळाला आहे. अशी माहिती पीएमआरडीए चे जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप (PMRDA PRO Ramdas Jagtap) यांनी दिली. (Pune Metro Line 3 Project)
SKOCH पुरस्कारासाठी 2023 या वर्षामध्ये विविध श्रेणीं अंतर्गत ३२० अर्ज प्राप्त झाले होते. हा पुरस्कार विषय तज्ञ आणि पीअर रँकिंग यांच्या संयुक्त रेटिंगवर आधारित होता. पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्प हा ज्युरी आणि पुरस्कारासाठीचे सहभागी या दोघांचेही लक्ष आणि रेटिंग मिळवण्यात यशस्वी झाला. (PMRDA Pune)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर (PPP) मॉडेलद्वारे हाती घेणेत आलेला आहे. (Pune metro line 3 News)
——
“पीएमआरडीएच्या स्थापनेपासून अत्यल्प कालावधीत हा प्रकल्प हाती घेणेत आला असून सदर प्रकल्प अत्यंत वेगाने व यशस्वीरित्या राबविणेत येत आहे. या प्रकल्पामुळे पुणे महानगर प्रदेश अंतर्गत सर्व कामांमध्ये गति मानता येणार असून आयटी आणि इतर संलग्न अर्थव्यवस्थांना चालना मिळणार आहे. SKOCH पुरस्कार त्याचीच साक्ष आहे.”
– राहुल महिवाल, महानगर आयुक्त, पीएमआरडीए
“पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची पीएमआरडीएच्या वचनबद्धतेची कबुली आणि प्राप्त पुरस्कार भविष्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांसमोर एक आदर्श ठेवतो.”
– विवेक खरवडकर, महानगर नियोजनकार, पीएमआरडीए
“प्रकल्पाच्या संरचनेतील नावीन्य, प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा वेग हे या पुरस्कारासाठीचे कारणीभूत मुख्य घटक होते.”
रिनाज पठाण, मुख्य अभियंता पीएमआरडीए
News Title |Pune Metro Line 3 Project | Silver award for Pune Metro Line-3 project
PMRDA Pune | Income Tax | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास मिळाली आयकरातून सूट | बचत होणाऱ्या निधीतून केली जाणार विकास कामे
PMRDA Pune | Incoe Tax | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (PMRDA) आयकरातून (Income Tax) सूट मिळाली आहे. २०१७ ते २०२२ या पाच वर्षांसाठी प्रथमतः प्राधिकरणास सूट प्रदान करण्यात आली आहे. त्यातून बचत होणाऱ्या सुमारे एक हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी स्थानिक विकास कामांना उपलब्ध होऊ शकेल. अशी माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी तथा जन संपर्क अधिकारी रामदास जगताप (PMRDA public relations officer Ramdas Jagtap) यांनी दिली. (PMRDA Pune | Income Tax)
रामदास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाची स्थापना ३१ मार्च २०१५ रोजी झाली असून सदर प्राधिकरण हे शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता महानगर क्षेत्रातील बांधकाम परवानगी व जमीन संबंधी मिळणारा महसूल या दोन प्रमुख उत्पन्नाच्या स्वोतावर प्राधिकरण क्षेत्राचा पायाभूत विकास करण्याचे काम करीत आहे. (PMRDA pune news)
त्या अनुषंगाने नागरिकांसाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणे हेच प्रमुख कार्य असल्याने आयकर भरणेपासून सवलत मिळावी असा विनंती अर्ज सन २०१७ मध्ये प्राधिकरणाने Central Board of Direct Taxes या Authority कडे दाखल केला होता. (PMRDA Marathi news)
दरवर्षी सुमारे २५० ते २७५ कोटी रकमेची मागणी आयकर विभागाकडून करण्यात येत होती. दरम्यानच्या काळात प्राप्तीकर वसूलीच्या तगाद्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने CBDT कडे मा. महानगर आयुक्त राहुल महिवाल यांचे मार्गदर्शनाखाली बोरकर अँड बोरकर या फर्म तर्फे श्री. प्रथमेश बोरकर आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी, लेखा व वित्त विभाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी आवश्यक त्या कागदपत्र पुर्ततेसाठी परिश्रम घेतले व त्या अनुषंगाने दि.१०.०५.२०२३ चे नोटीफिकेशन द्वारे सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षांसाठी प्रथमतः प्राधिकरणास सूट प्रदान करण्यात आली आहे. त्यातून बचत होणाऱ्या सुमारे एक हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी स्थानिक विकास कामांना उपलब्ध होऊ शकेल. असे रामदास जगताप यांनी सांगितले. (Deputy collector Ramdas Jagtap)
News Title | PMRDA Pune | Income Tax | Pune Metropolitan Region Development Authority got exemption from income tax Development works to be done from the saved funds