Rajgad | Toranagad Fort | राजगड आणि तोरणागड येथे अत्याधुनिक रस्ते करण्याची मागणी | माजी नगरसेविका राणी भोसले यांनी नितीन गडकरींकडे केली मागणी

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Rajgad | Toranagad Fort |  राजगड आणि तोरणागड येथे अत्याधुनिक रस्ते करण्याची मागणी

| माजी नगरसेविका राणी भोसले यांनी नितीन गडकरींकडे केली मागणी

Raigadh | Toranagadh | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) २५ वर्षे वास्तव्य असलेल्या किल्ले राजगड (Rajgad))व किल्ले तोरणागड (Toranagad) येथे अत्याधुनिक रस्ते मार्ग करण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका तथा शहर उपाध्यक्ष राणी भोसले (Rani Bhosale) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. (Rajgad | Toranagad)

भोसले यांनी याबाबत गडकरी यांना पत्र दिले आहे. पत्रानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे सन १६४७ ते १६७२ असे तब्बल २५ वर्षे किल्ले राजगड येथे वास्तव्य
होते. तसेच हिंदवी स्वराज्याचे प्रथम तोरण बांधलेला किल्ला तोरणा हा देखील शेजारीच आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा स्फूर्तीदायक इतिहास किल्ले राजगड येथे घडला आहे. सदर किल्ल्यावर अखंड हिंदुस्तानमधून तसेच महाराष्ट्रामधून शिवप्रेमी नागरिकांचा ओघ सुरु असतो. सदर किल्ल्यांवर पोहोचण्यासाठी सद्यस्थितीत खूप खराब व निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत. कोणत्याही स्वरूपाच्या पायाभूत सुविधा सदर ठिकाणी उपलब्ध नाहीत. (Fort Roads)

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ (मुंबई – बेंगलोर) येथून किल्ले राजगड व तोरणागड हे अंतर फक्त ३० कि.मी. आहे. सदर ३० कि.मी. अंतराचा रस्ता अत्याधुनिक पद्धतीने तयार झाला, रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण झाले तर निश्चितच संपूर्ण वेल्हे तालुका व राजगड व तोरणा किल्ला या परिसराचा कायापालट होणार आहे.
डोंगरी, दुर्गम व अतिमागास तालुका असा, जो आमच्या या ऐतिहासिक वेल्हे तालुक्याला शिक्का लागला आहे
तो निश्चित सदरच्या कार्याने पुसला जाईल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र व पावन झालेल्या या शिवभूमित आपल्या माध्यमातून रस्त्याची कामे व्हावीत व सदर परिसर जगाच्या नकाशावर पुढे यावा यासाठी आपण भरघोस निधी मंजूर करून सदर रस्त्यांचा विषय मार्गी लावावा अशी आपणास नम्र विनंती आहे.

वेल्हे तालुक्यात अरुंद व निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्यामुळे दोन बस समोरासमोर आल्यास एक बस रस्त्याच्या कडेला उतरल्याशिवाय दुसरी बस मार्गस्थ होऊ शकत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चिखल
असल्यामुळे खूप मोठी कसरत करावी लागते. संपूर्ण भारत देशात आपली रस्ते विकासपुरुष म्हणून गणना केली जाते. नुकतेच आपण कापूरहोळ ते भोर तसेच शिंदेवाडी ते महाड घाट या रस्त्यांसाठी खूप मोठं निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. राष्ट्रीय महामार्ग क्र.४ (मुंबई – बेंगलोर) येथून रस्ते दुरुस्तीसाठी अंदाजे १०० कोटी
रुपये निधी पुरेसा होईल. आपले माध्यमातून सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला तर किल्ले राजगड, किल्ले तोरणागड व संपूर्ण डोंगरी व दुर्गम, अतिमागास वेल्हे तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात या रस्त्यांची कामे कामे झाल्यास संपूर्ण ग्रामीण जनतेचे जीवनमान, विद्यार्थ्यांचे शिक्षक व बेरोजगारांना रोजगार व शिवप्रेमी व दुर्गप्रेमी पर्यटकांमुळे सदर परिसराचा निश्चितच कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. असे भोसले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
—-
News Title | Rajgad | Toranagad | Demand for modern roads in Rajgad and Tornagad | Former corporator Rani Bhosale made a demand to Nitin Gadkari

PMC Health Service | माजी नगरसेविकेची आक्रमकता आणि सहायक आरोग्य अधिकाऱ्याच्या प्रयत्नाने अखेर वरिष्ठ नागरिकाला मिळाला न्याय!

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

PMC Health Service | माजी नगरसेविकेची आक्रमकता आणि सहायक आरोग्य अधिकाऱ्याच्या प्रयत्नाने अखेर वरिष्ठ नागरिकाला मिळाला न्याय!

| शहरी गरीब योजनेत अजून सुधारणा आवश्यक | नागरिकांची अपेक्षा

PMC Health Service | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने शहरी गरीब वैद्यकीय योजना (Urban poor Medical Assistance Scheme) राबवली जाते. ही योजना आता ऑनलाईन (Online) करण्यात आली आहे मात्र या योजनेतील काही तांत्रिक गोष्टीमुळे  बालाजीनगरच्या वरिष्ठ नागरिकाला योजनेचे कार्ड घेण्यात अडचणी येत होत्या. यामध्ये भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका राणी भोसले (Ex corporator Rani Bhosale) यांनी पुढाकार घेतला. भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित नागरिकाला कार्ड देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. त्यानुसार सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक (Assistant Health Officer Dr Manisha Naik) यांनी सगळी माहिती घेत आणि योजनेतील तरतुदीनुसार संबंधित नागरिकाला योजनेचे कार्ड दिले. असे असले तरी संबंधित नागरिकाला यात बराच काळ वाट पाहावी लागली. त्यामुळे योजनेत अजून सुधारणा कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. (PMC Health Service)
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना (Urban Poor Medical Assistant Scheme) ही पुणे मनपा (PMC Pune) कार्यक्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये राहात असलेल्या दारिद्रय रेषेखालील पिवळे रेशनिंगकार्ड व ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (Yearly income) १ लाख पर्यंत असणाऱ्या कुटूंबीयांना लागू करण्यात आलेली आहे. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत नागरिकांना सभासदत्व देण्यासाठी नव्याने संगणक प्रणाली विकसित करुन पूर्णपणे कार्यान्वीत करणेत येत आहे. त्यानुसार नागरिकांचे सभासदत्व रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन प्रोसेस, प्री-अॅथोरायझेशन, बिलींग प्रोसेस याबाबत कार्यवाही करणेत येत आहे. (PMC Health Department) 
 
 शुक्रवारी दुपारच्या सुमारास बालाजीनगर मधील एक रहिवासी या योजनेचे कार्ड काढण्यासाठी आले होते. मात्र शहरी गरीब योजनेच्या तरतुदी आणि नागरिकाचे रेशन कार्ड यात मेळ बसत नसल्याने संबंधित नागरिकाला अडचणी येत होत्या. याआधी देखील एकाच घरातील काही व्यक्ती दोन-तीन कार्ड घेत असल्याचा अनुभव महापालिकेच्या आरोग्य विभागाला होता. त्यामुळे या प्रकरणात आरोग्य विभागाने सावध भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे संबंधित नागरिकाची देखील काही चूक नव्हती. कारण रेशन कार्डवरील आपल्या मुलाचे नाव कमी करण्याबाबत त्यांनी संबंधित कार्यालयाकडे अर्ज केला आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून हे पोर्टल बंद असल्याने ती प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे नागरिकाला नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे संबंधित नागरिकाने याबाबतची तक्रार माजी नगरसेविका राणी भोसले यांच्याकडे केली. तक्रार येताच भोसले तात्काळ मदतीला धावून आल्या. कार्ड जिथे दिले जातात तिथेच जाऊन भोसले यांनी याबाबतची चौकशी केली. तिथे त्यांचा आणि काही कर्मचाऱ्यांचा शाब्दिक वाद देखील झाला. मात्र नागरिकाला न्याय द्यायचाच या हेतूने भोसले यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. हे प्रकरण सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक यांच्या कानावर घातले. डॉ नाईक यांना देखील या प्रकरणाचे गांभीर्य कळले. त्यानुसार त्यांनी यात लक्ष घेतले. संबंधित नागरिकाच्या अर्जाची पूर्ण माहिती घेतली. योजनेचे कार्ड या नागरिकाला मिळू शकते हे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार नागरिकांकडून एक अर्ज घेतला गेला.  आपल्या मुलाचे नाव रेशन कार्डवरून कमी करण्यास हरकत नाही, असे त्या अर्जात म्हटले. त्यानंतर नागरिकाला योजनेचे कार्ड देण्यात आले. (Pune Municipal Corporation News) 
—-

| नागरिकांच्या अपेक्षा 

 
दरम्यान संबंधित नागरिकाला हे कार्ड मिळण्यात बराच अवधी लागला. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठ नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यात देखील बऱ्याच अडचणी येतात. यात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच सूचना व्यवस्थित दिल्या जाव्यात, वरिष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष असावा. एकूणच योजनेत अजून सुधारणा कराव्यात अशी मागणी नागरिकांनी या निमित्ताने केली आहे. (PMC Pune News) 

| महापालिका कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा 

 
शहरी गरीब योजनेचे कार्ड घेण्यावरून आरोग्य विभागातील कर्मचारी आणि नागरिक यांच्यात नेहमी हुज्जत झालेली पाहायला मिळते. यात शाब्दिक चकमक होते. नागरिकांसोबतच कर्मचारी देखील याला वैतागले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अपेक्षा केली आहे कि नागरिकांनी आमच्याशी सौजन्याने वागावे. आम्ही आमच्या वरिष्ठांचे आदेश पाळत असतो. आम्हांला देखील नागरिकांचे काम पूर्ण करावे वाटते. मात्र अधुरी माहिती आणि तांत्रिक गोष्टीमुळे उशीर होतो. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. (PMC Pune Health Service) 
——
 
शहरी गरीब योजना नागरिकांसाठी निर्माण केली आहे. त्यामुळे योजना अजून नागरिकाभिमुख करणे आवश्यक आहे. नागरिकांना कळेल अशा सूचना द्यायला हव्यात. तसेच वरिष्ठ नागरिकांशी स्वतंत्र कक्ष करावा. जेणेकरून त्यांचे हाल न होता त्यांना लाभ मिळेल. तसेच कर्मचाऱ्यांनी देखील नागरिकांशी सौजन्याने वागणे अभिप्रेत आहे. 
 
राणी भोसले, माजी नगरसेविका.
—-
एकाच कुटुंबात शहरी गरीब योजनेचे जास्त कार्ड जाऊ नयेत म्हणून रेशन कार्डवर कुटुंबातील सर्वांची नावे असावीत असे बंधन केले आहे. कुटुंब विभक्त असेल तर नावे काढून टाकली गेलेली असायला हवीत. नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी. 
– डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी
—–
News Title | PMC Health Service | The aggression of the former councilor and the efforts of the assistant health officer finally got justice for the senior citizen!
 

Rani Bhosale | पीएमपीच्या बसमध्ये देखील महिलांना 50% सवलत द्या | माजी महिला बाल कल्याण अध्यक्ष राणी भोसले यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पीएमपीच्या बसमध्ये देखील महिलांना 50% सवलत द्या

| माजी महिला बाल कल्याण अध्यक्ष राणी भोसले यांची मागणी

पुणे | राज्य सरकारने महिला सम्मान योजना अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या तिकिटमध्ये 50% सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर PMPML मधून प्रवास करणाऱ्या महिलांना देखील 50% सवलत द्यावी. अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका तथा माजी महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राणी भोसले यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

राज्य सरकारच्या वतीने महिला सम्मान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अंतर्गत महिलांना वेगवेगळ्या सुविधा देण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून एसटीच्या प्रवासात तिकिटात 50% सवलत देण्यात आली आहे. पुणे शहरात पीएमपी ला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची जीवनदायिनी म्हटले जाते. यामधून खूप महिला प्रवास करत असतात. महिलांसाठी विशेष बस देखील ठेवण्यात आल्या आहेत. तसेच महिन्यातून एकदा मोफत प्रवासाची सुविधा महिलांना दिली जाते. शहरातील महिला प्रवाशाची संख्या पाहता आणि त्यांना सुविधा देण्याच्या दृष्टीने एसटी प्रमाणेच पीएमपी मध्ये देखील सर्व महिला 50% सवलत देण्याची मागणी राणी भोसले यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त आणि पीएमपी प्रशासन मिळून काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

PMP Bus : कात्रज ते विंझर बसमार्गाचा विस्तार वेल्हे-किल्ले तोरणापर्यंत 

Categories
Breaking News Political social पुणे

कात्रज ते विंझर बसमार्गाचा विस्तार वेल्हे-किल्ले तोरणापर्यंत

: कात्रज ते सासवड (मार्गे गराडे) नवीन बसमार्ग सुरू !

पुणे : पीएमपीएमएलकडून आजपासून मार्ग क्रमांक २९६ कात्रज ते विंझर या बसमार्गाचा विस्तार वेल्हे-किल्ले तोरणापर्यंत करण्यात आला. तसेच मार्ग क्रमांक २०९ ब कात्रज ते सासवड (मार्गे गराडे) हा नवीन बसमार्ग सुरू करण्यात आला. या दोन्ही मार्गांच्या बसला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
कात्रज सर्पोद्यान स्थानक येथे या दोन्ही बससेवांचा शुभारंभ करण्यात आला. खडकवासला विधानसभा आमदार  भीमराव तापकीर, नगरसेविका राणीताई भोसले, नगरसेविका वर्षाताई तापकीर, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, माजी महापौर नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक प्रकाशशेठ कदम, नगरसेविका अमृताताई बाबर, नगरसेविका स्मिताताई कोंढरे, नगरसेवक   प्रसन्न जगताप, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्यासह दोन्ही मार्गावरील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
मार्ग क्रमांक २९६ – कात्रज ते वेल्हे-किल्ले तोरणा या बससेवेचा मार्ग कात्रज, खेड शिवापूर, नसरापूर, आंबवणे, विंझर, वेल्हे-किल्ले तोरणा असा असणार आहे. सध्या या मार्गावर ५ बसेसद्वारे साधारणपणे दर एका तासाने दिवसभरात एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत.
मार्ग क्रमांक २०९ ब – कात्रज ते सासवड या बससेवेचा मार्ग कात्रज, येवलेवाडी, बोपदेव घाट, भिवरी, गराडे, कोडीत, सासवड असा असणार आहे. सध्या या मार्गावर १ बसद्वारे साधारणपणे अडीच तासाने दिवसभरात एकूण १२ फेऱ्या होणार आहेत.
गेल्या एक ते सव्वा वर्षात पुणे शहराला लागून असलेल्या तालुक्यांमधील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार यांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलच्या माध्यमातून ३५ नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले. यामुळे नवीन बसमार्गांवरील ३५० ते ४०० गावे पुणे शहराला जोडली गेली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करावा. मार्च महिन्यात पीएमपीएमएलच्या ताफ्यात नवीन १०० ई-बसेस दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ई-बसेसचे लोकार्पण होणार आहे.