PMC What’s up | पुणे महापालिकेचा हा whats up नंबर तुमच्या कामाचा!

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिकेचा हा whats up नंबर तुमच्या कामाचा! 

पुणे – पुणे महापालिकेकडून नागरिकांना अनेक सुविधा ऑनलाइन देण्यात येतात. पण आता संकेतस्थळावर जाऊन किंवा ॲप डाऊनलोड करण्याची गरज पडणार नाही. 8888251001 हा मोबाईल क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि मेसेज टाकून तुम्हाला हवा असलेला दाखल्याची सॉफ्ट कॉपी मिळवता येणार आहे.

पहिल्या टप्प्यात (ता. ७) पासून मिळकतरासंदर्भातील सेवा सुरू करण्यात आली आहे. पुढील काळात जन्म-मृत्यू दाखला, पाळीव प्राणी दाखला, यासह इतर सेवा दिल्या जाणार आहे.अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संगणक विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, सहाय्यक आयुक्त राहुल जगताप यावेळी उपस्थित होते. सेवा हमी कायद्यानुसार नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले लगेच देणे आवश्‍यक आहे. अनेक नागरिकांना संकेतस्थळ वापरता येत नाही, तसेच संकेतस्थळावर गेले तर संबंधित विभाग निवडून त्याची प्रक्रिया करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे हे नागरिक दाखले घेण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावे लागते. पण आता ही दाखले मिळविण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी वॉट्सॲप बॉट ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, “नागरिकांना सहजतेने सर्वप्रकारचे दाखले मिळावेत यासाठी महापालिकेने वॉट्सॲप बॉट ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मिळकतकरा संदर्भातील दाखले, पावती व इतर सुविधा उपलब्ध आहे. मिळकतकर विभागाकडे नागरिकाचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकल्यास किंवा प्रॉपर्टी क्रमांक टाकल्यास सर्व माहिती उपलब्ध होईल. तसेच यावरून लगेच संकेतस्थळावर जाऊन बिल देखील भरता येणार आहे. पुढील काळात वाॅट्सअॅप वरूनच बिल भरता येईल अशी सुविधा केली जाईल.
उपायुक्त प्रतिभा पाटील म्हणाल्या, ‘सध्या केवळ वॉट्सॲप बॉटवर मिळकतकर विभागाची सेवा उपलब्ध होत असली तरी पुढच्या टप्प्यात पाणी पट्टी, जन्म-मृत्यू दाखल, बांधकाम दाखला, पाळीव प्राणी दाखला यासह इतर सर्व प्रकारचे दाखले मिळणार आहे.’एका व्यवहारासाठी ५० पैसे शुल्कमहापालिकेने यासाठी थेट वॉट्सॲपच्या मेटा कंपनीशी करार केला आहे. दाखल्याची माहिती घेणे, ती तपासून दाखला मिळवणे ही सर्व प्रक्रिया २४ तासात पार पाडली गेली तर महापालिकेकडून प्रति व्यवहार ५० पैसे इतके शुल्क वॉट्सॲप घेणार आहे. नागरिकांना यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, असे बिनवडे यांनी सांगितले.२०१९ पूर्वीचे दाखले मिळणारजन्म व मृत्यू दाखल्यांसाठी २०१९ नंतर केंद्र शासनाच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमचे (सीआरएस) सॉफ्टवेअर वापरले जात आहे. त्यामुळे २०१९ नंतरच्या जन्म व मृत्यू दाखल्याची माहिती महापालिकेच्या सर्व्हरवर उपलब्ध नाही. ही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वॉट्सॲप क्रमांकावर २०१९ पूर्वीचेच जन्म व मृत्यू दाखले उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाकडून माहिती महापालिकेच्या सर्व्हरला आल्यानंतर २०१९ नंतरचे दाखलेही उपलब्ध होतील.

PMC Election 2022 | Women Reservation | महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या | महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या

: महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी

पुणे : आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या (ता. ३१) सकाळी ११ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे काढली जाणार आहे. त्यांची रंगीत तालीम सोमवारी सायंकाळी महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ही सोडत लॉटरी पद्धतीने होणार असून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ती काढण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त यशवंत माने यांनी दिली.

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली आहे. ५८ प्रभागांत १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये २३ जागा अनुसूचित जाती तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणूका होणार असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. १७३ सदस्यांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. यामध्ये १२ अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असतील. तर ७४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण असणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन महिला असणार आहेत.

: असे असेल नियोजन

उपायुक्त माने यांच्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत कार्यक्रम सुरु होईल. त्यासाठी महापालिका कर्मचारी 9:30 पासूनच उपस्थित असतील. अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या तयार करणे, सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाइव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीन बसविणार आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन केले आहे.

दरम्यान आज सायंकाळी आरक्षण सोडतीची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, निवडणूक उपायुक्त यशवंत माने, सहायक आयुक्त आशिष महाडदळकर, सांख्यिकी व संगणक विभागाचे राहुल जगताप, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, उपस्थित होते.

Dress Code : गणवेश परिधान करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी  : कारभारी च्या बातमीचा परिणाम 

Categories
Breaking News PMC पुणे

खातेप्रमुख करणार सेवकांच्या गणवेशाची तपासणी

: गणवेश परिधान करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी

: कारभारी च्या बातमीचा परिणाम

पुणे : पुणे महापालिकेतील सेवकांना महापालिकेने ठरवून दिलेला गणवेश आवडत नसल्याचे दिसून येत आहे. कारण गणवेश घेण्यासाठी महापालिकेने अदा केलेली रक्कम घेऊन देखील  गणवेश घालत नसल्याचे समोर येत आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील शिपाई सोडले तर मनपा भवन मधील इतर कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयातील शिपाई गणवेश घालताना दिसत नाहीत. महापालिका या ड्रेस वर लाखों रुपये खर्च करते. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. गणवेश परिधान करणे, हे सेवकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे खातेप्रमुख आपल्या सेवकांच्या गणवेशाची तपासणी करतील. याबाबतचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत.
महापालिकेने कामकाजात शिस्त आणण्यासाठी काही नियम आखून दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिपाई लोकांना ड्रेस कोड ठरवून दिलेला आहे. मात्र महापालिकेतील महिला आणि पुरुष शिपाई हा गणवेश घालताना दिसत नाहीत.  महापालिका गणवेशावर लाखों रुपये खर्च करते. असे असताना देखील शिपाई गणवेश घालताना दिसत नाहीत. त्यामुळे साहेब आणि शिपाई यातील फरक लोकांना कळेनासा झाला आहे. फक्त आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील शिपाई याचे पालन करताना दिसतात. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. गणवेश परिधान करणे, हे सेवकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे खातेप्रमुख आपल्या सेवकांच्या गणवेशाची तपासणी करतील. याबाबतचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत.
: असे आहेत आदेश
गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील विविध हुद्यांवरील सेवकांचे सुधारित गणवेश
नियमावलीनुसार गणवेश निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुषंगाने संबंधित सेवकांनी कार्यालयीन वेळेत  गणवेश नियमावलीनुसार अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील अग्निशमन विभागाकडील इ. कार्यालयात काम करणारे सेवक व शिपाई संवर्गातील सेवक इ. सेवकांना गणवेश अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. तसेच संबंधित
सेवकांनी गणवेश परिधान करणेबाबत संदर्भ क्र. १ व २ अन्वये प्रशासनाकडून आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तथापि त्याप्रमाणे कर्मचारीवर्ग गणवेश परिधान करीत नसल्याने नागरिकांना महापालिका
कर्मचारी व नागरिक यामध्ये फरक लक्षात येत नाही अशा तक्रारी प्राप्त होत आहेत.
त्यानुषंगाने या कार्यालयीन आदेशान्वये खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
१) गणवेश अनुज्ञेय असणाऱ्या प्रत्येक सेवकाने गणवेश स्वच्छ व नीटनेटका ठेवणे व कर्तव्यावर
असताना परिधान करणे हे त्या सेवकाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने खातेप्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखालील विभागामधील सेवकांच्या गणवेशाची तपासणी करावी.
२) तसेच श्री. नितिन केंजळे, कामगार अधिकारी यांनी स्वतःचे पदाचे कामकाज सांभाळून संदर्भ क्र. ३ चे आदेशान्वये प्रकरणी तपासणी करणेबाबतचे कामकाज करावे. त्याचबरोबर संबंधित विभागांचे
खातेप्रमुख / प्रशासन अधिकारी / अधिक्षक व इतर संबंधित वरिष्ठ नियंत्रक अधिकारी यांनी देखील त्यांचे नियंत्रणाखालील कर्मचारी हे गणवेश परिधान करतील, याची दक्षता घ्यावी.

GAnvesh 1

eFile : PMC : पुणे महानगरपालिकेमध्ये आता ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणाली

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महानगरपालिकेमध्ये आता ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणाली

पुणे : महापालिकेचे कामकाज अधिक कार्यक्षम, प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये सर्व खात्यांमध्ये आता ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व खात्याकडून माहिती मागवण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत.

: 5 दिवसांत माहिती पाठवा : अतिरिक्त आयुक्त

महाराष्ट्र शासनाकडील ई-ऑफिस हा प्रकल्प ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत आहे. प्रशासकीय कामकाजाचे दृष्टीकोनातून ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे. तदनुषंगाने, पुणे महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र शासनाकडील ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणाली अंमलबजावणी करणेचे प्रयोजन आहे. ई-ऑफिस (eFile) अंमलबजावणीचा उद्देश व उद्दिष्ट, हे शासकीय कामकाज अधिक कार्यक्षम, प्रभावी आणि पारदर्शक करणे हे आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये सर्व खात्यांमध्ये ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तरी, पुणे महानगरपालिकेतील सर्व विभागांनी ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणाली अंमलबजावणीकरिता आवश्यक असलेली सर्व माहिती हि माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे ५ दिवसाच्या आत पाठविण्यात यावी. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. या माहितीमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांची सगळी माहिती तसेच कार्यालयामध्ये असणारे संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, स्कॅनर आदींची देखील माहिती मागवण्यात आली आहे.

Municipal Secretary’s Department : नगरसचिव विभागाकडील 36 कर्मचाऱ्यांच्या बदल्या  : अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचे आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

नगरसचिव विभागाकडील 36 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

: अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचे आदेश

पुणे : महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडील सुमारे 36 कर्मचाऱ्यांच्या बदल्या विभिन्न विभागात करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी हे आदेश जारी केले आहेत. मात्र काही कर्मचाऱ्यांनी या बदल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांना वेतन सध्याच्या वेतनाच्या खात्याकडून अदा केले जाईल. फक्त काम दुसऱ्या विभागात करावे लागणार आहे. बदली केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये समिती लेखनिक, लिपिक टंकलेखक, शिपाई, उपाधीक्षक, वरिष्ठ लिपिक अशा पदांचा समावेश आहे.
मात्र या बदल्यावरून काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बदल्यामध्ये भेदभाव केला असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार देखील केली आहे. अतिरिक्त आयुक्तांनी याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन या कर्मचाऱ्यांना दिले आहे.

: कंत्राटी सेवकांना कमी करणार

दरम्यान काही महिन्यापूर्वी नगरसचिव विभागाकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले होते. मात्र विभागाकडील कामाचा बोजा कमी झाल्याने आता त्यांना कामावरून कमी केले जाणार आहे. नगरसचिव विभागाने याबाबत सामान्य प्रशासनाकडे प्रस्ताव देखील दिला आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

24*7 water project : 24*7 योजनेची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडे 

Categories
Breaking News PMC पुणे

24*7 योजनेची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडे

: महापालिका आयुक्तांनी घेतला योजनेचा आढावा

पुणे : शहरात पाणी समस्येवरून बराच गदारोळ सुरु आहे. समान पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे ही समस्या निर्माण होत आहे. कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत खासदार गिरीश बापट यांनी सभात्याग केला होता. शिवाय महापालिका आयुक्तांच्या घरी देखील दौरा केला होता. यावेळी आयुक्तांनी आश्वासन दिले होते कि समान पाणीपुरवठा अर्थात 24*7 योजनेचे काम मार्गी लागण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केली जाईल. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची नियुक्ती केली आहे. शिवाय योजनेच्या कामाचा आढावा देखील आयुक्तांनी सोमवारी घेतला.

: 7 टाक्यांचे काम भूसंपादन अभावी रखडले

महापालिकेच्या वतीने शहरात नागरिकांना समान पाणी पुरवठा व्हावा, याकरिता 24*7 योजना हाती घेतली आहे. 2018 सालापासून या योजनेचे काम सुरु आहे. मात्र योजनेचे काम अधुरे आहे. याअंतर्गत 82 पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार आहेत. त्यातील काहीँचे काम पूर्ण झाले आहे, तर काही अधुऱ्या आहेत. जवळपास 7 टाक्यांचे काम भू संपादन अभावी रखडले आहे. यामध्ये एफ सी रोड, बिशप स्कुल, मुंबई पुणे रोड, चिखलवाडी अशा विभिन्न जागांचा समावेश आहे.
दरम्यान महापालिका आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत या योजनेचा आढावा घेतला. तसेच अतिरिक्त आयुक्त यांना निर्देश दिले कि योजनेचा वेळोवेळी आढावा घ्या आणि योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा. तसेच नागरिकांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेण्यास देखील सांगण्यात आले.

: राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली पाणीपुरवठा अधिकाऱ्याची भेट

दरम्यान राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी समान पाणीपुरवठा योजनेचा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून खुलासा करण्याची मागणी केली. शिवाय नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यास सांगितले.

Responsibility Of PMC Officers : महापालिका अधिकाऱ्यांना आता नवीन जबाबदारी! 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका अधिकाऱ्यांना आता नवीन जबाबदारी

: पुणेकरांच्या तक्रारींचे निवारण करावे लागणार

पुणे : महापालिका (Pune Municipal Corporation) सभागृहाची मुदत संपल्याने मंगळवारपासून (दि़१५) प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार ( PMC Commissioner Vikram Kumar) यांनी जबाबदारी घेतली आहे. लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपुष्टात आल्याने नागरिकांना, त्यांच्या नागरी सुविधांबाबत प्रश्न, गाऱ्हाणी वा अन्य तक्रारीसाठी अधिकारी वर्गाला विशिष्ट वेळेत आप-आपल्या कार्यालयात थांबण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त  रविंद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade)  यांनी दिले आहेत.  या आदेशानुसार सर्व खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, उप आयुक्त परिमंडळ १ ते ५ यांनी सोमवार व गुरूवारी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत आपल्या कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तसेच सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त (क्षेत्रिय कार्यालय प्रमुख) यांनी दररोज सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत आपल्या कार्यालयात उपस्थित रहावे. यावेळी नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकून त्यांचे निवारण करण्याची तातडीने कार्यवाही करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नागरिकांचे प्रश्न क्षेत्रिय कार्यालयस्तरावरच मार्गी लागतील अशा प्रकारे कामकाज करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर नागरिकांनी महापालिकेच्या टोल फ्री क्रमांक, व्हॉट अप क्रमांक व व्टिटर व फेसबुकवर आपल्या समस्या मांडून त्याचे निवारण करून घ्यावे असे आवाहन केले आहे़

तक्रारीसाठी संपर्क क्रमांक

टोल फ्री क्रमांक :- १७००१०३०२२२व्हॉटअप क्रमांक :- ९६८९९००००२व्टिटर व फेसबुक :- पीएमसी केअर

Public Services : PMC : नागरिकांना मिळणार 83 लोकसेवा!

Categories
Breaking News PMC social पुणे

नागरिकांना मिळणार 83 लोकसेवा!

: महापालिका प्रशासनाने निश्चित केली जबाबदारी

पुणे : नागरिकांना (Citizens) छोट्या छोट्या प्रमाणपत्रासाठी  (Certificates) महापालिकेचे (PMC) वारंवार खेटे घालावे लागतात. मात्र आता आगामी काळात ही वेळ येणार नाही. महापालिकेकडून सुमारे 83 लोकसेवा नागरिकांना देण्यात येतील. त्यासाठीचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले असून त्याची जबाबदारी देखील निश्चित केली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे ( Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी हेआदेश नुकतेच जारी केले आहेत.

प्रशासनाने १५ लोकसेवा अधिसुचित करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. तसेच दिनांक ४ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या Ease of Doing Business च्या अंतर्गत ६८ लोकसेवा अधिसुचित करून त्याचे राजपत्र प्रसिध्द करण्यात आले होते.  लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसुचित केलेल्या एकूण ८३ लोकसेवा देणेबाबतची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम २०१६ मध्ये विहित केलेल्या कार्यपद्धतीने देणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित खातेप्रमुखांनी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

१) महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम २०१६ मधील नियम क्र. १७ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत प्राप्त होणा-या अर्जाची नोंदवही तसेच प्राप्त होणा-या प्रथम अपिल व द्वितीय अपिल अर्जाची नोंदवही व्यक्तिश: किंवा ईलेक्ट्रॉनिक नमून्यात ठेवावी.
२) सर्व संबंधित खातेप्रमुखांनी लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विहित केलेल्या नियतकालमर्यादेत सेवा देण्याची दक्षता घ्यावी, सेवा देण्यास विलंब होणार नाही व शास्ती करण्याची वेळ येणार नाही याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
३) सर्व संबंधित खातेप्रमुखांनी त्यांच्या खात्यामार्फत लोकसेवा हक्कांतर्गत दिल्या जाण-या सेवांसाठी दरमहा प्राप्त होणा-या अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सामान्य प्रशासन
विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या spreadsheet मध्ये विहित नमुन्यात दरमहा ५ तारखेपूर्वी भरण्यात यावे.
वर नमूद केल्याप्रमाणे सर्व संबंधित खातेप्रमुखांनी काटेकोरपणे कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी. याबाबत आमचेकडे कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. असा इशारा देखील अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे.

Engineering Staff : Ravindra Binwade : PMC : कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता यांची अखेर कोविड कामातून सुटका 

Categories
PMC पुणे

कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता यांची अखेर कोविड कामातून सुटका

: मूळ खात्यात काम करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

पुणे : शहरात कोरोनाचा प्रसार(Spread of Corona) थांबवण्यासाठी महापालिकेकडून (Pune municipal Corporation)  वेगेवगेळ्या उपाययोजना करण्यात येत होत्या. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेकडून जम्बो हॉस्पिटल, बाणेर कोविड हॉस्पिटल, अशा मोठ्या कोविड सेंटर  (Covid care Center) ची निर्मिती केली होती. त्यासाठी अभियांत्रिकी संवर्गातील (Engineering staff)  कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, उप अभियंता यांची नेमणूक केली होती. मात्र आता कोविड चा जोर कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांची या कामातून सुटका करण्यात आली आहे. त्यांना मूळ खात्यात काम करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी दिले आहेत.

: काय आहेत आदेश

पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड केअर सेंटर (CCC), कोविड केअर हॉस्पिटल (DCH बाणेर), अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान (कोविड जंबो हॉस्पिटल) व इतर ठिकाणी अभियांत्रिकी संवर्गातील कार्यकारी अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)/ उप अभियंता (स्थापत्य/विद्युत यांत्रिकी) / शाखा अभियंता (स्थापत्य/विद्युत) / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) या पदावरील अधिकारी /कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेच्या कामकाजास असलेले अधिकारी/कर्मचारी यांना या आदेशान्वये कार्यमुक्त करण्यात येत आहे. सदर कर्मचाऱ्यास स्वतंत्र कार्यमुक्तीची आवश्यकता नाही. त्यानुसार सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी आपल्या मूळ खात्यात रुजू व्हावयाचे आहे. सदर अधिकारी /कर्मचारी मूळ खात्यात हजर झाले नंतरच त्यांचे महिनेमहाचे वेतन संबधित खातेप्रमुख यांनी आदा करावे. अधिकारी/कर्मचारी यांना कार्यमुक्त केल्यानंतर भविष्यात सदर सेवकांची आवश्यकता भासल्यास सदर सेवकांना उपलब्ध करून देण्यात येईल. तरी संबंधीत खातेप्रमुख यांनी पुढील योग्यती तजवीज करावी.

Covid Center : Ravindra Binwade : कोविड सेंटर मध्ये काम करणारे कर्मचारी कार्यमुक्त!  : आपल्या मूळ खात्यात रुजू होण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश 

Categories
Breaking News PMC पुणे

कोविड सेंटर मध्ये काम करणारे कर्मचारी कार्यमुक्त!

: आपल्या मूळ खात्यात रुजू होण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

पुणे : शहरातील कोरोनाचा(Corona) प्रसार कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या(Civic body) वतीने विभिन्न उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून शहरात कोविड सेंटर(covid senter) ची स्थापना करण्यात आली होती. इथे काम करण्यासाठी आरोग्य विभागातील(Health Department) कर्मचारी अपुरे पडत होते. त्यामुळे इतर खात्यातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा कहर कमी झाला आहे. शिवाय काही नगरसेवकांनी(corporators) देखील या कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ खात्यात पाठवण्याची मागणी केली होती. त्यानुसार कोविड सेंटर वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना आपल्या मूळ खात्यात काम करण्यास सांगितले आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे(Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी नुकतेच जारी केले आहेत.

: असे आहेत आदेश

पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये खालील कोविड केअर सेंटर (CCC) सुरु करण्यात आले होते. उपरोक्त कोविड केअर सेंटर येथे कामकाजासाठी परिमंडळ क्र. १ ते ४ चे मध्ये आदेशान्वये अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपरोक्त कोविड केअर सेंटर बंद झाल्यामुळे सदर ठिकाणी कामकाजास असलेले अधिकारी/कर्मचारी यांना या आदेशान्वये कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यानुसार सदर ठिकाणी कामकाजास असणाऱ्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी आपल्या मूळ खात्यात रुजू व्हावयाचे आहे. उपरोक्त अधिकारी/कर्मचारी यांना कार्यमुक्त केल्यानंतर भविष्यात कोविड केअर सेंटर येथे सदर सेवकांची आवश्यकता भासल्यास सदर सेवकांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. तरी संबंधीत खातेप्रमुख यांनी पुढील योग्यती तजवीज करावी.