Maval Loksabha | AAP | मावळ लोकसभेची जागा आप पार्टी लढवणार!

Categories
Breaking News Political पुणे

Maval Loksabha | AAP | मावळ लोकसभेची जागा आप पार्टी लढवणार!

| रविराज काळे, युवक शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड यांची माहिती

Maval Loksabha | AAP | आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) इंडिया आघाडीत असलेला अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (Aam Aadami Party) मावळ लोकसभेची (Maval Loksabha) जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविराज काळे (Raviraj Kale) यांनी युवक आघाडी आम आदमी पक्षाच्या येथे पुणे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मावळ या लोकसभेची जागा आपण लढवणार आहोत. अशी माहिती दिली. (Maval Loksabha AAP Party)

सध्या ही जागा शिवसेना पक्षाकडे होती परंतु शिवसेना हा पक्ष सत्तेत असल्याने आम आदमी पक्ष ही जागा लढवणार आहे.महाराष्ट्रातील इतर जागांवर इंडिया आघाडीतील पक्षांचे उमेदवारांचे काम करणार आहोत असे रविराज काळे यांनी सांगितले. या जागेबाबत सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील पक्षाची ताकद इतर जागांच्या तुलनेत चांगली आहे.आपल्या कार्यकर्त्यांची ताकद पाहून आपण या जागेची निवड केली आहे. त्यासंदर्भात इंडिया आघाडीतील इतर पक्षाध्यक्ष यांच्याशी चर्चा करुन निर्णय होईल. असे रविराज काळे यांनी सांगितले.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. असे कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले.

Pimpari Chinchwad Smart City | AAP | पिंपरी चिंचवड शहरात साचलेल्या पाण्यात आप कडून सोडल्या कागदी होड्या

Categories
Breaking News Political पुणे

Pimpari Chinchwad Smart City | AAP | पिंपरी चिंचवड शहरात साचलेल्या पाण्यात आप कडून सोडल्या कागदी होड्या

Pimpari Chinchwad Smart City | AAP |आम आदमी पार्टी (Aam Aadami Party) कडून शहरात साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडून निषेध व्यक्त केला आहे.  येत्या दोन दिवसांत शहरातील खड्डे बुचवण्यात आले नाही तर खड्यांमध्ये झाडे लावू. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावाने या खड्ड्यांचे नामकरण करू. असा इशारा आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे (Raviraj Kale) यांनी दिला. (Pimpari Chinchwad Smart City | AAP)

काळे यांनी सांगितले कि, पिंपरी चिंचवड शहरात शेकडो कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीचे स्वप्न आम्हाला पिंपरी चिंचवडकरांना दाखवण्यात आले. परंतु सध्या शहराची खासकरून पिंपळे निलख, विशालनगर,कस्पटे वस्ती या परिसरात जागोजागी पाणी साचलेले दिसते. स्मार्ट सिटीचे कामाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्याच जागी अनेक मोठमोठे खड्डे पडलेले दिसतात. या संबंधीत प्रकार वेळोवेळी ड प्रभागातील जनसंवाद माध्यमातून मांडण्यात आला परंतु प्रशासक असल्याने या अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्यास कारणीभूत असणाऱ्या ठेकेदारांना नेमके शहरातील रस्त्यांवर पाणी साचवण्याचे काम दिले होते की रस्ते स्मार्ट करण्याचे काम दिले होते याची चौकशी मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी करावी. अशी मागणी काळे यांनी केली आहे. (Pimpari Chinchwad Municipal Corporation)


News Title |Pimpari Chinchwad Smart City | AAP | Paper boats left by AAP in stagnant water in Pimpri Chinchwad city

Pimpari Chinchwad Municipal Corporation | पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना जलपर्णीचा हार घालण्याचा आप चा इशारा

Categories
Breaking News Political पुणे

Pimpari Chinchwad Municipal Corporation | पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना जलपर्णीचा हार घालण्याचा आप चा इशारा

 Pimpari Chinchwad Municipal Corporation  | पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpari chinchwad city) इंद्रायणी,पवना,मुळा नदीपात्रातील (Indrayani, pawana, Mutha River) जलपर्णी काढण्यासाठी थेट पद्धतीने वारंवार कामे दिले आजपर्यंत गेल्या एक वर्षात अंदाजे 8 कोटी रुपयांची कामे थेट पद्धतीने देऊन सुद्धा जलपर्णीचा विळखा शहरातील नद्यांना पडलेला दिसतो.  येत्या आठ दिवसांत जलपर्णी काढण्यात आली नाही तर आम्ही आम आदमी पार्टीकडून त्याच जलपर्णीचे तोरण करून महानगरपालिकेच्या गेटला बांधू. तसेच  आयुक्त (PCMC Commissioner) म्हणून त्याच जलपर्णीचा हार करून घालू. असा इशारा  आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे (AAP city President Raviraj Kale) यांनी दिला आहे. (Pimpari Chinchwad Municipal Corporation)
आप पार्टीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार  गेले दिड वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आपण काम पाहत आहात. परंतु आजपर्यंत आपणसुद्धा शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी  खेळण्याचा प्रकार चालू आहे. आरोग्य विभागामार्फत पूर्वीच्याच ठेकेदारांना पुन्हा काम देण्यात आली होते. मात्र याच ठेकेदारांवर आरोग्य विभागाची मेहरबानी का? याच ठेकदारांवर  सतत जलपर्णी वरून आरोप होत असताना  कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने काम का दिले का दिले जात होते? आरोग्य विभाग आणि ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध जोपासणे एवढेच काम महानगरपालिकेकडून होत होते का? महानगरपालिकेचे बोधवाक्य बदलण्याची हीच योग्य वेळ आहे “कटिबद्ध जनहिताय”बदलून “कटिबद्ध ठेकेदार” हिताय असे जाहीर करावे एवढेच महानगरपालिकेकडून बाकी राहिले आहे.
निवेदनांत पुढे म्हटले आहे कि, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तिन्ही नदीपात्रातील जलपर्णी काढली जात नाही. आपणसुद्धा ठेकेदाराप्रमाणेच पावसाच्या पाण्याने जलपर्णी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जलपर्णी वाहून जाण्याची वाट पाहत आहात*.गेल्यावर्षी आम्ही 15 तरूणांनी मुळा नदीपात्रात उतरून जलपर्णी काढण्यास सुरुवात केली होती आणि तिच जलपर्णी मा.पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पोस्टाद्वारे पाठवली होती त्यानंतर महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्यास सुरुवात केली होती. ठीक त्याच प्रमाणे यावेळी आठ दिवसांत जलपर्णी काढण्यात आली नाही तर आम्ही आम आदमी पार्टीकडून त्याच जलपर्णीचे तोरण करून महानगरपालिकेच्या गेटला बांधू अन्यथा महानगरपालिका आयुक्त म्हणून आपणास त्याच जलपर्णीचा हार करून घालू असे आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.
News Title | Pimpari Chinchwad Municipal Corporation |  AAP warns Pimpri Chinchwad Municipal Commissioner to garland Jalparni

PCMC | मैला शुद्धीकरण केंद्रातून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची चौकशी करावी – रविराज काळे

Categories
Breaking News Political social पुणे

मैला शुद्धीकरण केंद्रातून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची चौकशी  करावी – रविराज काळे

 दापोडी येथिल 20 दशलक्ष लिटर क्षमतेचे मैला शुद्धीकरण केंद्र आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदिपात्रात सोडण्यात येत आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी केली आहे.
काळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार गंभिर बाब म्हणजे मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगार मैला कोणत्या सुरक्षा साधनांशिवाय उचलण्याचे काम करत होते. कामगारांच्या पायात बूट नव्हते, हंडग्लोज नव्हते. हा सर्व प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी निकम  यांच्या समोर चालू होता. त्यांच्यासोबत ठेकेदार देखिल हजर होता परंतु त्या ठेकेदाराला बोलण्याची किंवा या सर्व चालू असलेल्या प्रकाराची विचारायची देखिल हिंमत झाली नाही.असे पालिकेचे अधिकारी काम करत आहेत.मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात आले या प्रश्नी तेथील सुपरवाईजर यांना विचारले असता त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची उत्तरे नव्हती.
        या मैला शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदिपात्रात वारंवार सोडण्यात येत आहे असे निदर्शनास आले.यामुळे नदिपात्रातील जीवसृष्टी धोक्यात आली आहे.संबंधित ठेकेदारामुळे नदीपात्रातील प्रदूषण वाढत आहे.या प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी घ्यावी.संबधीत प्रकारची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि आम आदमी पार्टीचे रविराज काळे, ऋषिकेश कानवटे,निरज सुतार यांनी केली आहे. अन्यथा मनपा समोर आंदोलन करण्याचा इशारा देखिल दिला आहे.