Reading Habits in Students | लोकसहभागातून उभारले ग्रंथालय | नांदेड सिटी मंगल भैरव गृहरचना संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी पुस्तक महोत्सव

Categories
cultural Education social पुणे

Reading Habits in Students | लोकसहभागातून उभारले ग्रंथालय | नांदेड सिटी मंगल भैरव गृहरचना संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी पुस्तक महोत्सव

Reading Habits in Students | पुणे | आजकाल घरोघरी मुले टीव्ही, मोबाइलमध्ये गुरफटलेली दिसतात. काही मुले तर मोबाइलशिवाय जेवणही करत नाहीत. ही परिस्थिती बदलून या मुलांची पुस्तकांशी मैत्री व्हावी, त्यांना वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे संस्कार बालवयातच त्यांच्या अंगी रुजावेत या हेतूने नांदेड सिटी येथील मंगल भैरव गृहरचना संस्थेने पुस्तक महोत्सव २०२४ चे आयोजन केले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला.
या महोत्सवाची सुरुवात दिमाखदार ग्रंथदिंडीने करण्यात आली. या दोन दिवसांच्या महोत्सवात लोकसहभागातून उभारलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन, भव्य ग्रंथप्रदर्शन, तसेच मुलांसाठी नाट्यछटा सादरीकरण, वक्तृत्व स्पर्धा, बालकवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून नामवंत लेखिका वंदना बोकिल, बुक क्लबचे संस्थापक अविनाश निमसे, लेखिका प्रियंका चौधरी आणि सामाजिक कार्यकर्ते आविनाशदादा लगड आणि विजयबापू लगड हे उपस्थित होते.
यावेळी बोकिल यांनी विविध गोष्टींमधून मुलांना पुस्तक वाचनाचे महत्व पटवून दिले. तसेच अविनाश निमसे यांनी ग्रंथालयाला त्यांच्या बुकक्लब संस्थेतर्फे देणगी स्वरूपात पुस्तके देण्याचे आश्वासन दिले. प्रियंका चौधरी यांनी स्वातंत्र्य चळवळ तसेच साहित्य क्षेत्रात महिलांचा सहभाग याविषयी प्रेरणादायी माहिती दिली. नांदेड परिसरातील सुमारे ५०० पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमास भेट देत पुस्तकांचे ज्ञानभांडार जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, रविवारी, दि. ११ रोजी लघुकथा लेखनविषयक मार्गदर्शन, लेखक कसे घडतात, पुस्तक लेखनाचे प्रकार याविषयी डाॅ. नितीन हांडे, लेखिका दीपा देशमुख, लघुकथा लेखिका उर्मिला घाणेकर, पूर्वा काणे यांचे मार्गदर्शन सत्र आणि वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. तर, महोत्सवाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठ्यांच्या कविसंमेलनाने होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अॅड. रविंद्र वाघमारे, राहुल सावंत यांनी दिली.या प्रसंगी नांदेड सिटी मधील सोसायटीचे सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते

Mindset | Book | Mindset हे पुस्तक का वाचावे? | कदाचित तुमचा दृष्टिकोन किंबहुना आयुष्य देखील हे पुस्तक बदलू शकेल..!

Categories
Education social देश/विदेश लाइफस्टाइल संपादकीय

Mindset हे पुस्तक का वाचावे?

| कदाचित तुमचा दृष्टिकोन किंबहुना आयुष्य देखील हे पुस्तक बदलू शकेल..!

काही पुस्तकं अशी असतात. ती तुमचे आयुष्य बदलून टाकतात. तुमचा दृष्टिकोन बदलतात आणि तुमचे आयुष्य सुलभ होते. त्यातीलच एक महत्वाचे पुस्तक म्हणजे माइंडसेट. डॉ कॅरोल एस ड्वेक या लेखिकेने लिहिलेले आणि जगप्रसिद्ध असलेले हे पुस्तक.
 मनोरचना तुम्ही बदलू शकता. स्थिर मनोरचना आणि वाढीची मनोरचना (Growth mindset) असे दोन ठळक प्रकार सांगितले गेले आहेत.  मात्र तुम्हाला वैयक्तिक प्रगती साधायची असेल, यश, पैसा मिळवायचा असेल, नातेसंबंध सुधारायचे असतील तर वाढीची मनोरचना उपयुक्त ठरते.
तुम्ही तुमच्या मनोरचनेत वाढ करू शकता.
फक्त असं मानू नका कि एखादा माणूस त्याच्या नशिबाने मोठा झालेला असतो. त्याच्यामागचे कष्ट शोधा आणि तेवढे परिश्रम घेण्याची तयारी ठेवा. त्याचप्रमाणे बुद्धिचातुर्य वापरा. व्यूहरचना आखा.
सगळ्यांत महत्वाचे म्हणजे आपल्या मुलांची
प्रशंसा करू नका. त्यांच्या परिश्रमाची प्रशंसा करा. हे करून तुम्ही देखील खूप काही करू शकता.
क्षेत्र कुठलेही का असेना … सर्वोच्च स्थानी कायम टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे चारित्र्य आणि चांगले वर्तन या दोन गोष्टी असाव्याच लागतात.
तुमच्या क्षमतेने सर्वोच स्थानी जाऊ शकता मात्र तिथे टिकून राहण्यासाठी उपरोक्त दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
प्रत्येकजण आपली मनोरचना बदलून वाढीची मनोरचना अंगिकारू शकतो.  नैसर्गिक बुद्धिमत्तापेक्षा आपल्या परिश्रमावर लक्ष द्यायला हवंय.
अशा वेगवेगळ्या सूत्रासाठी हे पुस्तक वाचायला हवंय आणि संग्रही ठेवायला हवंय ..!