Eklavya Modal Residential Schools Recruitment | एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 38480 पदांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा

Categories
Breaking News Education social देश/विदेश महाराष्ट्र

Eklavya Modal Residential Schools Recruitment |एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 38480 पदांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा

Eklavya Modal Residential Schools Recruitment | आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 38480 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. (Eklavya Modal Residential Schools Recruitment)

👥 एकूण रिक्त जागा : 38480

🧾 रिक्त पदांनुसार पदसंख्या :
◆ प्राचार्य – ७४० पदे
◆ उपप्राचार्य – ७४० पदे
◆ पदव्युत्तर शिक्षक – ८१४० पदे
◆ पदव्युत्तर शिक्षक (Computer Science) – ७४० पदे
◆ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – ८८८० पदे
◆ कला शिक्षक – ७४० पदे
◆ संगीत शिक्षक – ७४० पदे
◆ शारीरिक शिक्षण शिक्षक – १४८० पदे
◆ ग्रंथपाल – ७४० पदे
◆ स्टाफ नर्स – ७४० पदे
◆ वसतिगृह वॉर्डन – १४८० पदे
◆ लेखापाल – ७४० पदे
◆ खानपान सहाय्यक – ७४० पदे
◆ चौकीदार – १४८० पदे
◆ कुक – ७४० पोस्ट
◆ समुपदेशक – ७४० पदे
◆ चालक – ७४० पदे
◆ इलेक्ट्रिशियन कम प्लंबर – ७४० पदे
◆ गार्डनर – ७४० पदे
◆ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – १४४० पदे
◆ लॅब अटेंडंट – ७४० पदे
◆ मेस हेल्पर – १४८० पदे
◆ वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – ७४० पदे
◆ सफाई कामगार – २२२० पदे

📚 शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचा..

👤 वयोमर्यादा : वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.राखीव प्रवर्गांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

🖨️ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

🌐 *अधिकृत संकेतस्थळ : https://emrs.tribal.gov.in/show_content.php?lang=1&level=0&ls_id=148&lid=119

🖨️ ऑनलाइन अर्ज करा: https://emrs.tribal.gov.in


News Title |Eklavya Modal Residential Schools Recruitment |Recruitment for 38480 Posts in Eklavya Modal Residential Schools | Apply online

Recruitment | जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती

| पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

लवकरच जलसंपदा विभागात कनिष्ट अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती लवकरच होणार असून त्यातून क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल. मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यासाठी वर्ग ३ व ४ मधील कर्मचारी बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करुन घ्यावेत. असे निर्देश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune Guardian minister Chandrakant patil) यांनी दिले. तसेच पाणी वापर संस्थांची ५० टक्के परताव्याची रक्कम प्राधान्याने वितरीत करावी, कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी आदी सूचना श्री. पाटील यांनी केल्या.(Recruitment of 500 posts of Junior Engineers in Water Resources Department)

| नीरा उजव्या कालव्याची १९ जूनपर्यंत सलग दोन आवर्तने

 

नीरा प्रणालीतील भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून त्यानुसार १० मार्चपासून १२ मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून दुसरे सलग आवर्तन १३ मे ते १९ जूनपर्यंत देण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समिती बैठकीत ठरले. (Canal advisory committee)

जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, दीपक चव्हाण, समाधान आवताडे, भिमराव तापकीर, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

नीरा प्रकल्पात उपयुक्त साठ्याच्या ४७.५० टक्के म्हणजेच २२.९६ टीएमसी पाणी उपलब्ध असून उन्हाळी हंगामात नीरा उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी १३.९३ टीएमसी पाणी व बिगर सिंचनासाठी १४.७८ टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. त्यानुसार १९ जूनपर्यंत सलग दोन उन्हाळी आवर्तने देण्यात येणार आहेत. माळशीरस, सांगोला, पंढरपूरपर्यंत कालव्याच्या टेलपर्यंत पुरशा दाबाने पाणी जावे यासाठी पाटबंधारे विभागाने यांत्रिकी विभागाच्या सहाय्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले. (Neera canal)

 

नीरा डाव्या कालव्याची दोन आवर्तने

नीरा डाव्या कालव्याला १ मार्चपासून ३० एप्रिलपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून लगेच १ मेपासून ३० जूनपर्यंत दुसरे आवर्तन देण्यात देण्यात येणार आहे. नीरा डावा कालवा एका ठिकाणी फुटल्याचा प्रकार घडला होता. ती दुरुस्ती पूर्ण झाली असून तेथील उर्वरित चाऱ्यांना प्राधान्याने सोडण्यात यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. (Neera left canal)

भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवण्यात येते. त्याशिवाय भामा व भीमा नदीत १५ ते २७ मे पर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पवना धरणात ३.२३ टीएमसी पाणीसाठा असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले असल्यामुळे १५ जुलैपर्यंत पाणीवापर निश्चित करण्यात आला असला तरी तो पुढील कालावधीतही पुरणार आहे.

चासकमान प्रकल्पाची तीन आवर्तने

चासकमान प्रकल्पातंर्गत चासकमान आणि कलमोडी धरणात मिळून एकूण ३.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. योग्य नियोजनामुळे उन्हाळी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. १ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन सुरू आहे. दुसरे आवर्तन ५ मे ते ३ जूनपर्यंत आणि तिसरे आवर्तन ८ मे ते १७ जूनपर्यंत देण्याचे चासकमान कालवा सल्लागार समिती बैठकीत ठरले. (Chaskaman dam)

प्रारंभी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी मोसमी पावसाच्या अंदाजाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. एल निनो सक्रिय होण्याची शक्यता, आयओडी, युरेशियावरील बर्फाचे आवरण यांचा पावसावर होऊ शकणार परिणाम याविषयी माहिती देण्यात आली.

यावेळी बैठकीस विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडके नीरा देवघर डावा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, नीरा देवघरचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता नामदेव करे आदी उपस्थित होते.

PMC Recruitment | पुणे महापालिका पद भरती | अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

Categories
Breaking News PMC social पुणे

 पुणे महापालिका पद भरती |  अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरतीकरण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवाराना 28 मार्च पर्यंत अर्ज करण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. दरम्यान महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. त्यामुळे अर्ज वाढण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार 13 एप्रिल पर्यंत मुदत वाढवली होती. मात्र अजून एकदा ही मुदत वाढवली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल ची मुदतवाढ देण्यात आली आहे. असे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
याअगोदर महापालिकेने 448 पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे.  पुणे महानगरपालिका पद भरतीची जाहिरात  6/3/2023 अन्वये देण्यात आली असून उमेदवारांना अर्ज सादर करणेकरिता 28/3/2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यांनतर सदर जाहिरातीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज सादर करणेकरिता 13/4/2023 अखेर मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत महापालिकेकडे 9 हजाराच्या आसपास अर्ज आले आहेत. त्यानंतर आता अजून एकदा मुदतवाढ देत 30 एप्रिल ची मुदत देण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 30/04/2023 पर्यंत आहे.  इच्छुक उमेदवारांनी
https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर  online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या
लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.

PMC Recruitment | पुणे महापालिका पद भरती | अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ | उमेदवार 13 एप्रिल पर्यंत करू शकतात अर्ज

Categories
Breaking News Education PMC social पुणे

पुणे महापालिका पद भरती |  अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ

| उमेदवार 13 एप्रिल पर्यंत करू शकतात अर्ज

| पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरतीकरण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवाराना 28 मार्च पर्यंत अर्ज करण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. दरम्यान या प्रक्रियेला खूप अल्प प्रतिसाद मिळाला आहे. कारण एवढ्या कालावधीत महापालिकेकडे फक्त 4 हजाराच्या आसपास अर्ज आले. महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. त्यामुळे अर्ज वाढण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवार 13 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकतात. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
याअगोदर महापालिकेने 448 पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे.  पुणे महानगरपालिका पद भरतीची जाहिरात  6/3/2023 अन्वये देण्यात आली असून उमेदवारांना अर्ज सादर करणेकरिता 28/3/2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि सदर जाहिरातीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज सादर करणेकरिता 13/4/2023 अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. शासनाचे प्रचलित आदेश, वेळोवेळी केलेल्या सुधारणा या पद भरतीस नियमाप्रमाणे लागु राहतील. असे महापालिकेने म्हटले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 13/04/2023 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी
https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर  online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या
लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.

PMC Recruitment | महापालिका भरतीला अल्प प्रतिसाद! | फक्त 4 हजाराच्या आसपास अर्ज | 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका भरतीला अल्प प्रतिसाद!

| फक्त 4 हजाराच्या आसपास अर्ज

पुणे | पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवार यासाठी 28 मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. दरम्यान या प्रक्रियेला खूप अल्प प्रतिसाद मिळाला आहे. कारण एवढ्या कालावधीत महापालिकेकडे फक्त 4218 अर्ज आले. त्यातील 3775 अर्ज पात्र झाले आहेत. महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. याअगोदर महापालिकेने 448 पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली. (PMC Pune recruitment)
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०८/०३/२०२३ पासुन ते दिनांक २८/०३/२०२३ पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी
https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर दिनांक २८/०३/२०२३ रोजीचे२३:५९ वाजे पर्यंत online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या
लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.
दरम्यान आतापर्यंत या भरती प्रक्रियेला अल्प असा प्रतिसाद मिळताना दिसला आहे. कारण कारण एवढ्या कालावधीत महापालिकेकडे फक्त 4218 अर्ज आले. त्यातील 3775 अर्ज पात्र झाले आहेत. महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. उपसंचालक (प्राणी संग्रहालय) यासाठी तर अजून एकही अर्ज आलेला नाही. या भरती प्रक्रियेत फायरमन च्या सर्वात जास्त जागा आहेत. फायरमन च्या 200 जागांसाठी एकूण 1630 अर्ज आले. त्यातील 1490 पात्र झाले आहेत. त्या खालोखाल औषध निर्माता पदासाठी 1152 अर्ज आले. त्यातील 1044 पात्र झाले आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) साठी 741 अर्ज आले. त्यापैकी 618 पात्र झाले आहेत. आरोग्य निरीक्षक साठी 249 अर्ज आले त्यातील 223 पात्र झाले. वैद्यकीय अधिकारी पदासाठी 162 अर्ज आले. त्यातील 151 पात्र झाले.   अजूनही तीन दिवस शिल्लक आहेत. यात अर्ज वाढू शकतात. असे उपायुक्त इथापे यांनी सांगितले.
– पदे आणि अर्जाची संख्या

१) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) – 5
२) वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – 151
३) उप संचालक (प्राणी संग्रहालय) – 0
४) पशु वैदयकीय अधिकारी – 12
५) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक – 71
६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 618 
७) आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर – 223
८) वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर – 74 
९) औषध निर्माता – 1044
१०) पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – 87 
११) अग्निशामक विमोचक / फायरमन – 1490

Recruitment | सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता

Categories
Breaking News Education Political social पुणे महाराष्ट्र

सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता

| उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, वित्त विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून ही पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तसेच, १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे.याशिवाय उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या पदांपैकी उर्वरित ग्रंथपाल – १२१ आणि शारीरिक शिक्षण संचालक – १०२ अशी एकूण २२३ पदे भरण्यास दिलेली स्थगिती शिथिल करण्याबाबत वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. या प्रस्तावास वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार पदभरतीस मान्यता देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

Appointment | PMC Pune | आरोग्य विभागात मानधन तत्वावर काम करणाऱ्या 75 कर्मचाऱ्यांची महापालिकेत कायमस्वरूपी नियुक्ती 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

आरोग्य विभागात मानधन तत्वावर काम करणाऱ्या 75 कर्मचाऱ्यांची  कायमस्वरूपी नियुक्ती

| पुणे महापालिका आयुक्तांचा निर्णय

पुणे | प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम (RCH) फेज 2 अंतर्गत पुणे महापालिकेतील मानधन तत्वावर कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांची महापालिका आस्थापनेवरील रिक्त जागांवर कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत.
प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम (RCH) फेज 2 साठी आरोग्य विभागात 75 कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर कामावर घेण्यात आले होते. या कर्मचाऱ्याकडील अनुभव विचारात घेता महापालिका सेवा प्रवेश नियमावली नुसार संबंधित पदाची अर्हता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागाकडे प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाकरिता कायस्वरूपी नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेताना सेवा निमयमावलीतील अटींचे पालन करावे लागणार आहे. असे महापालिका आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
– हे आहेत कर्मचारी 

PMC Pune Recruitment | पोटनिवडणूक संपल्यानंतर पुणे महापालिकेच्या भरतीची जाहिरात!  | जवळपास 300 विविध पदांसाठी होणार भरती 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

पोटनिवडणूक संपल्यानंतर पुणे महापालिकेच्या भरतीची जाहिरात!

| जवळपास 300 विविध पदांसाठी होणार भरती

पुणे | होतकरू आणि गरजू युवकांना पुणे महापालिकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेत दुसऱ्या टप्प्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. कसबा पेठ पोटनिवडणूक संपल्यानंतर जवळपास 300 पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. (PMC pune Recruitment)
पुणे महापालिकेकडून पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. जवळपास 448 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये सहायक विधी अधिकारी, सहायक अतिक्रमण निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, लिपिक अशा विविध पदांचा समावेश होता. विशेष म्हणजे खूप पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया घेण्यात आली आणि उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देखील देण्यात आल्या. यामुळे पुणे महापालिका प्रशासनाचे कौतुक देखील होत आहे. यामुळे महापालिकेवरील विश्वास देखील वाढला आहे. (Pune Municipal corproation)
दरम्यान महापालिकेत अजूनही काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यावर बोजा येत आहे. म्हणून महापालिका प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया राबवण्याचे मनावर घेतले आणि त्यानुसार काम सुरु केले. या टप्प्यात जवळपास 300 पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये अग्निशमन विभागातील जास्त जागा आहेत. कारण सरकारने या विभागात भरती करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार जवळपास 200 फायरमॅन ची भरती करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य विभाग आणि इतर विभागात देखील उमेदवार घेण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून याबाबतचे रोस्टर तपासून त्याची राज्य सरकार कडून देखील मंजुरी घेतली आहे. फक्त याची जाहिरात प्रसिद्ध होणे बाकी आहे. पोटनिवडणूक संपल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.   (PMC Recruitment)

Teacher Recruitment | शिक्षक भरतीसाठी राज्य सरकार कडून अर्ज मागवले

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

शिक्षक भरतीसाठी राज्य सरकार कडून अर्ज मागवले

| शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी – २०२२ परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Recruitment | महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यावेळी उपस्थित होते.

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. यावेळी राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये ३७२० पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ८४९० पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करुन मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन पद्धती वापरा
डिसेंबर २०२० मध्ये एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू करण्यात आली असून त्याअंतर्गत इमारत बांधकाम परवानगीसाठी ‘बीपीएमएस-ऑनलाईन’ आणि ‘बीपीएमएस टीपी- क्लायंट’ ॲपवर आधारित प्रणालीचा वापर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

रुग्णालये, शाळांना अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात
महापालिका, नगरपरिषदांच्या शाळा आणि रुग्णालयांना आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांनी भेटी देऊन स्वच्छतेवर भर द्या, ज्येष्ठ नाग़रिक आणि गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. कोविडपासून खबरदारी घेण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यासह रुग्णालयांच्या इमारती तेथील ऑक्सिजन आणि अग्निशमन सुविधांचे परीक्षण करुन घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेकडे रुग्ण खाटा, व्हेंटिलेटर, डायलिसिस यंत्रे आदी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असून नगरपालिकांना ती विनामूल्य देण्यात येणार आहे, नगरपालिकांनी ही सामुग्री घेऊन जाण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
सर्व २७ शाळा डिजिटल केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे कौतुक करुन खाजगी आणि पालिकेच्या शाळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे असे कार्यक्रम आखण्याच्या सूचनाही दिल्या. शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण द्या, शिक्षणाबरोबरच शालेय पोषण आहाराचा दर्जा वाढविण्यासाठी पालिकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. शालेय स्वच्छतागृहांची नियमित सफाई करण्यासाठी पाण्याच्या सुविधा निर्मितीकरिता निधी देण्याचीही तयारी यावेळी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.

उत्पन्नवाढीवर भर द्या
महानगरपालिकांच्या विशेषतः ‘ड’ वर्ग महापालिकांच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना सूचविण्यासाठी समिती गठीत केली आहे. सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी वसूलीवर विशेष भर देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडकोद्वारे आकारण्यात येणारे सेवाशुल्क १ नोव्हेंबर २०२२ पासून आकारण्यात येऊ नये असे आदेश दिलेले असून केवळ महापालिकेमार्फतच हे सेवाशुल्क आकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बचत गटनिर्मित वस्तूंच्या विक्रीसाठी योजना तयार करा
नागरी भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी त्यांच्या वस्तूंना मॉलमध्ये स्थान मिळावे, ऑनलाईन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), अमृत, स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन, रात्र निवारा आदी विषयांचा आढावा घेतला