PMC Recruitment | महापालिका भरती |१३५ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) च्या नेमणुका | ६ महिने असणार प्रशिक्षण कालावधी

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका भरती |१३५ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) च्या नेमणुका

| ६ महिने असणार प्रशिक्षण कालावधी

पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध पदांची भरती करण्यासठी प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल घोषित करण्यात आलाहोता. मात्र अजूनही नियुक्त्या देण्यात आल्या नव्हत्या. दरम्यान महापालिका प्रशासनाने १३५ अभियंत्याच्या नेमणुका केल्या आहेत. मात्र या लोकांना ६ महिने प्रशिक्षण कालावधी असेल. तोपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे काम करावे लागणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष खाते दिले जाणार आहे.

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती  प्रक्रिया राबवण्यात आली. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली.  कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. तर कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर झाल्या. दरम्यान सर्व परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. मात्र नेमणुका बाकी आहेत.

महापालिका प्रशासनाने नुकत्याच १३५ अभियंत्याच्या (स्थापत्य) नेमणुका केल्या आहेत. मात्र या लोकांना ६ महिने प्रशिक्षण कालावधी असेल. तोपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे काम करावे लागणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष खाते दिले जाणार आहे. त्यानुसार हे उमेदवार जॉईन होण्यासाठी महापालिकेत येण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान सहायक अतिक्रमण निरीक्षक तसेच लिपिक लोकांना अजून नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत. हे उमेदवार देखील याबाबत महापालिकेकडे वारंवार चकरा मारत आहेत.

pmc civil engineer recruitment

PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक  या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | १४  नोव्हेंबर पासून  कागदपत्रांची छाननी

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक  या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | १४  नोव्हेंबर पासून  कागदपत्रांची छाननी

जाणून घ्या सविस्तर

पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. त्यानुसार परीक्षा घेण्यात येत आहेत. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी 4 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल घोषित करण्यात आला आहे. महापालिकेच्या वेबसाईट वर याची यादी देण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार वेबसाईट वर निकालाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला मिळालेले मार्क आणि topers ची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार मेरीट मध्ये पात्र होणाऱ्या सदर यादीमधील उमेदवारांनी दि. १४ ते १८ नोव्हेंबर  ते सकाळी ११:०० वाजता, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली.  कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. तर कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर झाल्या.

दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदांसाठी झालेल्या परीक्षेचा निकाल व कागदपत्र पडताळणीस पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

लिंक

https://www.pmc.gov.in/sites/default/files/DISPLAY_PRT_0.pdf

https://www.pmc.gov.in/sites/default/files/SELECT_PRT.pdf

https://www.pmc.gov.in/sites/default/files/WAIT_PRT_0.pdf

PMC Pune Recruitment Exam | पुणे महापालिका पदभरती साठीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता!

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका पदभरती साठीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता!

| उमेदवारांना पहावी लागणार वाट

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. मात्र यासाठी महापालिकेला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसला नाही. कारण 10 ऑगस्ट पर्यंत महापालिकेकडे 87 हजार 471 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अर्ज लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) पदासाठी 63948 दाखल झाले आहेत. दरम्यान या भरतीसाठीची परीक्षेची तारीख अजून निश्चित झालेली नाही. महापालिका प्रशासनाच्या सूत्रानुसार ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते. तोपर्यंत उमेदवारांना वाट पहावी लागणार आहे.
महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. 2014 सालापासून महापालिकेत भरती झाली नव्हती. त्यामुळे भरती निघाल्यानंतर उमेदवारांच्या उड्या पडतील आणि लाखों अर्ज दाखल होतील. अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 93 हजार 991 उमेदवारांची नोंदणी झाली आहे तर त्यापैकी 87 हजार 471 उमेदवारांचे शुल्क सहित अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये 1. सहायक विधी अधिकारी  (श्रेणी 2) पदा साठी 690 अर्ज आले आहेत. लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) साठी 63948 अर्ज दाखल झाले आहेत.  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी 3) साठी 17361,  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (श्रेणी 3) साठी 2146,  कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (श्रेणी 3)  साठी 25 तर  सहायक अतिक्रमण निरीक्षक (श्रेणी 3) साठी 3201 असे एकूण 87 हजार 471 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
दरम्यान महापालिकेकडून या पद भरतीचे काम IBPS या संस्थेस देण्यात आले आहे. संस्थेकडून सांगण्यात आले आहे कि, सप्टेंबर महिन्यात इतर परीक्षा असल्याने महापालिका भरतीसाठीची परीक्षा या महिन्यात घेणे शक्य नाही. त्यामुळे ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते. परीक्षा कशी घ्यावी याबाबत ही महापालिका आणि संस्था या दोहोमध्ये एकमत होत नसल्याने परीक्षा घेण्यास उशीर होत आहे. यामुळे मात्र उमेदवारांना वाट पहावी लागत आहे.

PMC Pune Recruitment Update | पुणे महापालिकेत दुसऱ्या टप्प्यातील भरती देखील लवकरच! | महापालिका प्रशासनाने सुरु केली पूर्वतयारी

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेत दुसऱ्या टप्प्यातील भरती देखील लवकरच!

| महापालिका प्रशासनाने सुरु केली पूर्वतयारी

पुणे : महापालिकेत पदभरती करण्यावर राज्य सरकार कडून निर्बंध लागू करण्यात आले होते. वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने 2 जून 2015 पासून हे निर्बंध लागू केले होते.  त्यामुळे महापालिकेतील विभिन्न विभागातील भरती प्रक्रिया रखडली होती. त्याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर जाणवत होता. मात्र सरकारने आता हे निर्बंध हटवले आहेत. नुकतेच सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महापालिकेत पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने भरती प्रक्रिया सुरु केली होती. पहिल्या टप्प्यातील भरतीची परीक्षा लवकरच होणार आहे. सोबतच प्रशासनाने आता दुसऱ्या टप्प्यातील भरतीची देखील पूर्व तयारी सुरु केली आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागाकडून रिक्त पदांची माहिती मागवली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन यांनी महानगरपालिका आस्थापनेवरील विविध पदे सरळसेवेने भरण्यास मान्यता दिलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने पदभरती करणेसाठी संवर्गनिहाय बिंदुनामावली नोंदवह्या तपासून घेणे गरजेचे आहे . तसेच पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांना कुठल्या पदांची आवश्यकता आहे त्याची माहिती घेऊन सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या विवध विभागांनी महाराष्ट्र शासन यांनी मान्यता दिलेल्या आकृतीबंधानुसार आपले विभागासाठी संवर्गनिहाय सरळसेवेने भरती करावयाच्या पदांबाबत पुढीलप्रमाणे विहित नमुन्यात माहिती asthapanainfo@gmail.com या इमेलवर सॉफ्ट कॉपी (Excel File Font – Arial ms Unicode font Size – 12 मध्ये ) तसेच उप आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे हार्ड कॉपीमध्ये या कार्यालयीन परिपत्रकाच्या दिनांकापासून त्वरित सादर करावी. आदेशात पुढे म्हटले आहे कि, आकृतीबंधानुसार सरळ सेवेने भरावयाच्या पदांची नावे, आकृतीबंधानुसार पदांची संख्या, आकृतीबंधानुसार कार्यरत पदसंख्या, रिक्त पदसंख्या आणि रिक्त पदाबाबत प्राधान्य, अशी माहिती सादर करावे, असे देखील सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.

राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. पूर्वतयारी म्हणून दुसऱ्या टप्प्यात भरती करण्यासाठी आम्ही विविध खात्याकडून रिक्त पदांची माहिती मागवली आहे.

सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पुणे मनपा.

CM Eknath Shinde | राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र शेती

राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा नियम २९२ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदसंख्येत आणखी काही हजारांत वाढ होण्याची शक्यता आहे.

आरे येथेच मेट्रो कारशेड होणार

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कारशेड आरे येथेच उभारले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, आरे येथे वनजमिनींची एकूण १२८५ हेक्टर जमीन आहे. त्यामध्ये आणखी ३२६ हेक्टर जमीन वन क्षेत्रात समावेश केला आहे. कारशेडसाठी केवळ २५ हेक्टर जमीन लागणार आहे. या जागेच्या तीनही बाजूंनी रहदारीचे रस्ते आहेत. त्यामुळे आरेमधील जागा कारशेडसाठी योग्य आहे. याबाबत मदान समिती आणि सौनिक समितीनेही आरे येथील जागाच कारशेडसाठी उपयुक्त असल्याची शिफारस केली आहे.

राज्यातील गुन्हेगारीत घट

राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर गुन्हे प्रकटीकरणात वाढ होत आहे. पोलीसांनी मुस्कान अभियानामधून राज्यातील सुमारे ३७ हजार ५११ मुले आणि मुलींचा शोध घेऊन पालकांकडे सुपूर्द केली आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीसांनी कठोर कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीसांना पंधरा लाखांत घर

बीडीडी चाळीचा पुनर्विकास गतीने पूर्ण केला जाईल. या पुनर्विकास इमारतींमध्ये पोलीसांना केवळ पंधरा लाख रुपयांत घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पोलीसांना अधिक घरे उपलब्ध व्हावीत यासाठी गृहनिर्माण धोरणात विशेष तरतूद केली जाईल. पोलीसांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. न्यायालयीन विकासासाठी दरवर्षी भरीव निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील मालमत्ता करात वाढ नाही

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती. आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उल्हासनगर मधील एक जानेवारी २००५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी विशेष कार्यप्रणाली राबविण्यात येईल. त्यासाठी प्रशमन शुल्कातही मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. हे शुल्क प्रति चौरस मीटरास २२०० रुपये आकारले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना भरीव मदत

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत तत्काळ दिली आहे. पूर्वी ही मदत केवळ पाच हजार रुपये होती. ती मदत आता पंधरा हजार रुपये दिली जात आहे. गावांचे शहराशी दळणवळण वाढायला मदत व्हावी यासाठी रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

*पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली

*चौदा लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत

*उपसा जलसिंचन योजनेच्या वीजदरात एक रुपयांने कपात

*राज्यातील गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक प्रयत्न

*हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गचे लवकरच लोकार्पण

*सत्तावीस हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प हाती

*एमएमआरडीएच्या साठ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना शासन हमी

*मुंबई-गोवा महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरुवात

*प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार

वसई विरार मल्टीमोडल हबचा सविस्तर प्रकल्प अहवाल

पुणे रिंग रोड आणि रेवस-रेड्डी रस्त्यास निधी उपलब्ध करणार

*पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सर्वंकष विकास आराखडा

*मंदिरे आणि गड किल्ले यांचे जतन-संवर्धन करणार

*कोल्हापूर सांगली शहरातील पुराबाबत सल्ला घेऊन उपाययोजना करणार..

Beware Of Brokers | भरतीच्या नावाखाली पैसे घेण्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस! | महापालिकेकडून पुन्हा एकदा आवाहन

Categories
Breaking News PMC पुणे

भरतीच्या नावाखाली पैसे घेण्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस!

| सुरक्षा रक्षकांनी वेळीच अडवले

पुणे | भरतीच्या नावाखाली आणि नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळण्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस आला. महापालिकेतील सुरक्षा रक्षकांनी वेळीच याकडे लक्ष दिल्यामुळे ही गोष्ट उजेडात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि पुणे जिल्ह्यातील बारामती तसेच इतर काही नगरपरिषद मध्ये नोकरी लावून देण्याचे बहाण्याने एक युवक दुसऱ्या काही विद्यार्थ्यांकडून पैसे घेत होता. विशेष म्हणजे संबंधित इसमाने पैसे घेण्यासाठी महापालिका हे स्थळ निवडले होते. मात्र पैसे घेत असताना महापालिकेतील सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले. त्यांना त्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त त्यांच्याकडे नेण्यात आले आणि सख्त ताकीद देण्यात आली.

| महापालिकेकडून पुन्हा एकदा आवाहन

पुणे महापालिकेत एकूण 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र याबाबत काही दलाल किंवा अपरिचित व्यक्ती अफवा पसरवून आर्थिक देवाण घेवाण करत राहतात. त्यामुळे अशा दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही मध्यस्थ / दलाल / परिचित/ अपरिचित व्यक्तीशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये, अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे जाहीर आवाहन महापालिकेने केले आहे.

Recruitment in Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेत 448 पदांसाठी भरती!  | 10 ऑगस्ट पर्यंत करू शकता अर्ज 

Categories
Breaking News Education PMC पुणे

पुणे महापालिकेत 448 पदांसाठी भरती!

| 10 ऑगस्ट पर्यंत करू शकता अर्ज

| सरळसेवा पद्धतीने होणार भरती

पुणे | पुणे महापालिकेत एकूण 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवे मधील आहेत. इच्छुक उमेदवार यासाठी 20 जुलै पासून ते 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतात.
वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याच्या हेतूने राज्य सरकारने जून 2015 सालापासून महापालिकेतील भरती प्रक्रियेवर निर्बंध लागू केले होते. मात्र सरकारने आता हे निर्बंध हटवले आहेत. सरकारने याबाबतचे आदेश जारी केले होते. त्यामुळे महापालिकेत पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने ही प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की जाहिरात क्र.१/३९८ नुसार र्ग-२ मधील ४ पदे व वर्ग-३ दि.२०/०७/२०२२ पासुन हे उमेदवारांनी मधील ४४४ पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. १०/०८/२०२२ रोजी पर्यंत आहे. इच्छुक
https://pmc.gov.in/mr/recruitments या संकेतस्थळावर दि.१०/०८/२०२२ रोजीचे २३:५९ वाजे पर्यंत online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क,
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर
पाहण्यास उपलब्ध आहेत.

अशी भरली जाणार आहेत पदे

1. सहायक विधी अधिकारी  (श्रेणी 2) |  एकूण पदे – 4
2. लिपिक टंकलेखक. (श्रेणी 3). | एकूण पदे  -200
3. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी 3) | एकूण पदे -135
4. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (श्रेणी 3) | एकूण पदे -5
5. कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (श्रेणी 3) | एकूण पदे – 4
6. सहायक अतिक्रमण निरीक्षक (श्रेणी 3) | एकूण पदे – 100

PMC Recruitment Update | महापालिकेच्या मेडिकल कॉलेज साठी अध्यापक पदांची भरती 

Categories
Breaking News Education PMC आरोग्य पुणे

महापालिकेच्या मेडिकल कॉलेज साठी अध्यापक पदांची भरती

पुणे | महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे अध्यापक वर्गांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात 23 विभागांत अध्यापक पदे केवळ 11 महिन्यांपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी दिनांक १४/०७/२०२२ ते दिनांक २०/०७/२०२२ अखेर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

यामध्ये शरीररचना शास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, जनरल मेडिसिन, कम्युनिटी मेडिसिन, पॅथॉलॉजि, दंतशास्त्र अशा 23 विभागाचा समावेश आहे.

वरील पदासाठीची सविस्तर जाहिरात पुणे महानगरपालिकेच्या http://bavmcpune.edu.in, www.punecorporation.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचे काळजीपूर्वक अवलोकन करून उमेदवारांनी अर्ज करावेत.
उमेदवाराने http://metrecruitment.punecorporation.org या लिंक वर अर्जा सादर करावेत.
मुलाखत २५/०७/२०२२ अथवा २६/०७/२०२२ रोजी ( सविस्तर तपशील वरील संकेतस्थळावर पहावा) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे येथे घेण्यात येतील.

Fire brigade | recruitment and promotion | महापालिकेच्या अग्निशमन दलात भरती, पदोन्नतीचा मार्ग मोकळा…!

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या अग्निशमन दलात भरती, पदोन्नतीचा मार्ग मोकळा…!

| अग्निशमन दलाच्या सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियमास (२०२२) शासनाची मान्यता

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आग विझवण्याची यंत्रणा असली तरी अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ नाही. विभागात सुमारे 55 टक्के जागा रिक्त असून केवळ 45 टक्के अधिकारी व कर्मचारी आगीशी झुंज देत आहेत.  रिक्त पदे भरण्यासाठी तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता, मात्र तो होता. मात्र आता सरकारने या विषयाकडे गंभीरपणे लक्ष दिले आहे.  आता अग्निशमन विभागाच्या भर्ती आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने सेवा प्रवेश नियमावलीस मान्यता दिली आहे.

 – सरकारकडे प्रलंबित होता  प्रस्ताव

   आग लागल्यास अग्निशमन दलाकडे पुरेसे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आवश्यक आहे.  मार्च 2018 मध्ये, अग्निशमन संचालनालयाने अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी ‘मॉडेल कॉमन सर्व्हिस अॅडमिशन नियम’ तयार केले.  तो मंजुरीसाठी नगरविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आला.  त्याला तीन वर्षे झाली तरी नगरविकास विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नव्हती.  त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील भरती ठप्प झाली होती.  सध्या अग्निशमन दलात 28 विविध प्रकारची पदे आहेत.  यापैकी मुख्य अग्निशमन अधिकारी, ऑपरेटर (वाहन), वरिष्ठ रेडिओ तंत्रज्ञ, अधीक्षक, उपअधीक्षक आणि शिपाई ही पदे केवळ सात कार्यरत असताना पूर्ण क्षमतेने भरण्यात आली आहेत.  उर्वरित २२ पदांसाठी ९०३ जागा रिक्त असताना सध्या ३९३ लोक कार्यरत आहेत.  त्यामुळे 510 पदे रिक्त आहेत.

प्रमुख पद रिक्त

  तांडेल – 47
  फायरमन – १९८
  चालक – 152
  रुग्णवाहिका चालक – 37
  उप अग्निशमन अधिकारी – 17
  सहाय्यक अग्निशमन अधिकारी – 18

| सरकारच्या मान्यतेमुळे आता सगळे प्रश्न सुटणार

याबाबत सरकारने जीआर जरी केला आहे. पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४, दि. २६.०८.२०१४ नुसार शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या
आकृतीबंधास मान्यता दिलेली आहे. परंतू सेवाप्रवेश नियम मंजूर नसल्याने पुणे महानगरपालिकेतील अग्निशमन विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना विविध प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याने आयुक्त, पुणे
महानगरपालिका यांनी पुणे महानगरपालिका, अग्निशमन विभागातील सेवाप्रवेश नियम मंजूर करण्याची विनंती केलेली आहे. त्यास अनुसरून पुणे महानगरपालिकेतील अग्निशमन विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवाप्रवेश नियमास शासनाची मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या अनुषंगाने शासनाने  निर्णय घेतलेला आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयाने आता अग्निशमन विभागातील सर्व प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

| ही पदे भरली जाणार

-मुख्य अग्निशमन अधिकारी : पदोन्नती १००%
-उप मुख्य अग्निशमन अधिकारी : नामनिर्देशन ५०%, पदोन्नती ५०%
-विभागीय अग्निशमन अधिकारी : नामनिर्देशन २५%, पदोन्नती ७५%
-सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी : नामनिर्देशन २५%, पदोन्नती ७५%
-अग्निशमन केंद्र अधिकारी : पदोन्नती १००%
-साहायक अग्निशमन केंद्र अधिकारी : पदोन्नती १००%
-उप अग्निशमन अधिकारी : नामनिर्देशन २५%, पदोन्नती ७५%
-प्रमुख अग्निशमन विमोचक : पदोन्नती १००%
-चालक यंत्र चालक : नामनिर्देशन २५%, पदोन्नती ७५%
-वाहन चालक : पदोन्नती १००%
-अग्निशमन विमोचक : नामनिर्देशन १००%

MPSC Exam : राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर : १६१ जागांसाठी भरती

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

: १६१ जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, ही जाहिरात आयोगाच्या वेबसाईटवर आज प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आयोगाने ट्विट करुन दिली. या जाहिरातीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून परीक्षेसाठी तयारी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

जाहिरातील गट ‘अ’ ५९, तर गट ‘ब’ साठी १४ पदांसाठी आणि इतर ८८ पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेची तारीख २१, २२, २३ जानेवारी २०२३, रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे. या जाहिरातीमध्ये सांगितलेल्या अटी व शर्तींची पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी अयोगाच्या वेबसाईटला तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही जाहिरात दिसत नसल्याने गोंधल उडाला होता. मात्र तांत्रिक अडचण बाजूला झाल्याने आता ही जाहिरात दिसत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. त्यामुळे आता राज्यसेवीची तयार करणाऱ्या अनेकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.